Subscribe Us

header ads

P. L. Deshpande: Marathi writer

P. L. Deshpande or Purushottam Laxman Deshpande: 

Marathi writer and humorist from Maharashtra,film and stage actor, script writer, author, composer, musician, singer and orator. "Maharashtra's beloved personality"

पु ल ऊर्फ  पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे: नाटककार, विनोदीलेखक, संगीतकार, प्रवासवर्णनकार

जयंती - 8 नोव्हेंबर 

स्मृतिदिन: 12 जून



बालपण आणि शिक्षण:

अवघ्या "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व" म्हणुन जवळपास अर्धशतक महाराष्ट्रावर साहित्य संगीत नाटक या विविध क्षेत्राच्या माध्यमातून वर्चस्व गाजवणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ 'पुल' यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मुंबईमधील गावदेवी मधल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. 

त्यांचे वडील लक्ष्मणराव देशपांडे उर्फ आबा कर्नाटकातील बेळगावच्या चंदगड गावचे.

 आपल्या कुटुंबजीवनात त्यांनी संगीतप्रेम जपले ते उत्कृष्ट गात असत जे पुढे पुलंमध्ये हा वारसा आला.

 पुलंचे आजोबा म्हणजे आईचे वडील वामन मंगेश हे कारवारचे दुभाषी होते. त्यांनी "ऋग्वेदी" या टोपण नावाने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी 'आर्यांच्या सणांचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला.त्यांनी केलेले रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'चे भाषांतर सुद्धा केले.

 त्यांची कन्या कमल ऊर्फ सौ. लक्ष्मीबाई ह्या पुलंच्या आई होत. त्यांचा गोड गळा आणि पेटीवादनाची आवड ही त्यांची वैशिष्ट्ये वंशपरंपरेने पुलंमध्ये आली आहेत. 

आई-वडील, आजी-आजोबा, शेजारी राहणारे मातुल कुटुब यांच्या समोर पुलंच बालपण सुरुवातीला मुंबईतील जोगेश्वरी येथे व त्यानंतर विलेपार्ले येथे खूप आनंदात गेले.

पुल लहानपणी खूप नकला करायचे, गाणी गायचे, पेटी वाजवायचे, नाटके लिहायचे व ती बसवायचे त्यात छोट्या मोठ्या भूमिका करायचे, अतिशय चांगले भाषण करायचे, ऐकायचे असे अनेक उपक्रम पुलनी लहानपणापासून केले व त्यामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व या उपक्रमातून विकसित होत गेले. 

या सर्व व्यक्तिमत्त्वाच्या विकसित मार्गावर त्यांचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण असे, उत्तम भाषा प्रभुत्वही त्यांच्याकडे होते. ते हरहुन्नरी होते. त्यामुळे त्यांचा सर्वत्र खूप मोठा नावलौकिक होता. 

X X

 पुलंनी 1966 साली मॅट्रिक मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय या ठिकाणी पूर्ण केली. त्यानंतर इस्माईल युसुफ कॉलेज मुंबई येथून 1938 साली इंटर पास झाले आणि पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी बीए पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 

बी.ए. झाल्यावर दादरच्या ओरिएन्ट हायस्कूलमध्ये ते शिक्षकाची नोकरी करू लागले. पूल यांची पहिली पत्नी सुंदर दिवडकर यांचा मृत्यू झाल्यानंतर,रत्नागिरी येथील ठाकूर वकिलांची मुलगी सुनीता ह्या सहशिक्षिका होत्या.

 नोकरीच्या ठिकाणी त्यांना भेटल्या व 12 जून 1946 रोजी रत्नागिरी येथे नोंदणी विवाह करून दोघांनी 54 वर्षांचे समृद्ध दांपत्यजीवन अनुभवले पण या दोघांना कुठलच मुलबाळ झालेलं नाही.

1941 साली एल.एल.बी. ची पदवी मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून पूर्ण केली. त्या काळात इंटरच्या परीक्षेनंतर थेट एल.एल.बी. ची पदवी घेता येत होती. 

1941 वर्षी पुलंच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. पुलंना त्यांचे मुंबईचे बिऱ्हाड आवरून पुण्याला उदरनिर्वाह करिता स्थलांतरित व्हावे लागले. 

दुःखी आई आणि उमेदीच्या वयातली उमाकांत, रमाकांत भाऊ आणि बहीण मीरा यांना मोठा भाऊ या नात्याने वडीलकीचा आधार द्यावा लागला. कुटुंबाच्या चरितार्थासाठी भावगीतांचे कार्यक्रम करणे अशी पुलंची धडपड सुरू झाली. 

पुल 1950 मध्ये सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. 

शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले व त्यानंतर मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. 

1943 वर्षी बडोदा येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'अभिरुची' मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले "अण्णा वाडगावकर " हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर पुलंची लेखणी ही अर्धशतकीय कारकिर्द सुरू झाली.

X X

आकाशवाणीतील सेवा व परदेशातील शिक्षण:

पुल आकाशवाणीच्या सेवेत डिसेंबर 1955 मध्ये पुणे केंद्रावर रुजू झाले.

 1959 ते 1961 या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून दिल्लीत आकाराला आलेली कारकिर्द ही त्यांच्या प्रसारमाध्यमातल्या जाणकारीची महत्त्वपूर्ण ठरली. 

भारताच्या दूरदर्शनसाठी पुलंनी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रकट मुलाखत घेतली व ते पहिले मुलाखतकार ठरले. 

त्यानंतर सरकारने त्यांना बीबीसी इंग्लंड या ठिकाणी एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते.

20 ऑगस्ट 1958 ला पुलंनी युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मिडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी लंडन गाठले. 

इंग्लंडमधल्या त्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले 'अपूर्वाई' हे त्यांचे प्रवासवर्णन अगोदर किर्लोस्कर मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. नोव्हेंबर 1960 मध्ये ते पुस्तकरूपाने आले. 

लंडनमधल्या मुक्कामातच 'बटाट्याची चाळ'मधल्या निवडक अंशांचे जाहीर अभिवाचन त्यांनी केले, जी पुढे विलक्षण गाजलेल्या एकपात्री खेळाची नांदी होती. 

अशा प्रकारे 1957-58 मध्ये नाटककार पुल, प्रवासवर्णनकार पुल आणि खेळीया पु.ल. हे तिघेही उदयाला आले. 

X X

नाटककार पुल:

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललितकलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर ह्यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पुल काम करीत होते. 

'तुका म्हणे आता' हे मंचावर झालेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा 8 नोव्हेंबर 1948 रोजी पुण्यात पहिला प्रयोग झाला. त्याला यश मिळाले नाही, पण रंगभूमीवरचे पुलंचे प्रेम अधिक दृढ झाले. 

1957-58 हा काळ त्यांच्या जीवनात अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. 26 जानेवारी 1957 रोजी 'तुझे आहे तुजपाशी' हे त्यांचे सामाजिक नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते.

तर 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असा मी', 'हसवण्याचा माझा धंदा', 'वटवट' इत्यादी बहुरूपी कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 

याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या सामूहिक घडामोडी विनोदी अंगाने रंगवणारे त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ते खूप गाजले. 

1958 साली मौज प्रकाशन गृहाने त्यांचे 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक प्रसिद्ध केले. 

X X

पुलची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द:

रांगणेकर लिखित-दिग्दर्शित 'कुबेर' या चित्रपटात पुलंनी नायकाच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. 

त्यात 'जा जा ग सखी, जाऊन सांग मुकुंदा' हे गीतही गायले होते.

 यावेळ पासून पुलची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द सुरू झाली. 1947 वर्षीच्या 'कुबेर' चित्रपटा पासून 1954 सालच्या 'गुळाचा गणपती' पर्यंत एकूण पुलंनी 24 मराठी चित्रपटांत कथा, पटकथा, संवाद, संगीत, भूमिका, दिग्दर्शन अशा विविध चित्रपटसृष्टीतील क्षेत्रांमध्ये पुलंची कामगिरी पार पडली. 

1. कुबेर 2. भाग्यरेषा 3. वंदे मातरम 4. जागा भाड्याने देणे आहे 5. मानाचे पान 6. मोठी माणसे 7. गोकुळचा राजा 8. जरा जपून 9. जोहार मायबाप 10. नवरा बायको 11. पुढचे पाऊल 12. देव पावला 13. वर पाहिजे 14. दूध भात 15. घरधनी 16. नवे बिराड 17. माईसाहेब 18. संदेश 19. देव बाप्पा 20. ही वाट पंढरीची 21. गुळाचा गणपती 

हे त्यांचे मराठीत गाजलेले चित्रपट.

X X

विनोदीलेखक पु ल:

विनोदाची सुखद पखरण पु.लंच्या या सर्व आविष्कारांमध्ये होती. शिवाय स्वतंत्रपणे विनोदी साहित्यही त्यांनी अधिक प्रमाणात लिहिले आहे. 

त्यामुळे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामधला विनोदकार हाच अनेक लोकांच्या स्मरणात राहिला, लोकांना जवळचा वाटला. 

स्वतःच्या रोजच्या, सामान्य जीवनाकडे बघण्याची एक उमेदी निकोप जीवनदृष्टी त्यांना पुलंनी आपल्या विनोदी साहित्यातून दिली. 

पुलंनी "बटाट्याची चाळ" मधून साठ बिऱ्हाडांचा एक मानस-समूह निर्माण केला आणि त्यांच्या दैनंदिन मध्यमवर्गीय जीवनसरणीची मार्मिक उलटतपासणी केली. 

सूक्ष्म निरीक्षण, भाषेवर विलक्षण हुकमत, उपरोध-उपहास-विडंबन ह्यांचा सहज वापर, विविध क्षेत्रांमधील संदर्भांची समृद्धी, सहृदयता आणि तारतम्याचे भान ह्यांमुळे पुलंचा विनोद सहजसुंदर झाला. 

X X

विनोदी लेखसंग्रह:

'खोगीरभरती', 'नसती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक', 'खिल्ली', 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला.

पुलंनी विनोद लिहिला, अभिनित केला, उत्तम वक्तृत्वाने तो लोकांपर्यंत पोहोचवला, सिनेमा-नाटकांतून तो दाखवला. इतक्या दीर्घ काळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही.

जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई-टंचाई - कुचंबणा - कोतेपणा ह्यांनी गांजलेली वेळोवेळी येणाऱ्या साम्यवाद समाजवाद - स्त्रीवाद ह्या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली अशी माणसे ही पुलंचे लक्ष्य होती. 

त्यांना पुलंनी आपल्या व्यक्तित्वाने, कर्तृत्वाने, वक्तृत्वाने मोकळेढाकळे केले. 

X X

पुलंमधली गुणग्राहकता:

1977 मध्ये देशात अणीबाणी जाहीर झाली आणि पुलंमधला विवेकवादी स्वातंत्र्यप्रेमी लोकांसमोर आला.

 सेवादलाचे, गांधीजी व सावरकर यांच्या विचारांचे, पुढे लोहियाप्रणीत समाजवादाचे संस्कार घेतलेले पुलंचे मन तेव्हाच्या राजकारण्यांतल्या मनमानीमुळे व्यथित झाले आणि काही काळ त्यांनी विदूषकाचा पोशाख उतरवून लेखणीचे शस्त्र हाती घेतले. 

अणीबाणीच्या विरोधातली पुलंची जाहीर भाषणे, 'खिल्ली' ह्या पुस्तकात संग्रहित झालेले राजकीय उपहासपर लेख, जयप्रकाशजींच्या डायरीचा अनुवाद यांतून वेगळेच पुल लोकांना ऐकायला-वाचायला मिळाले.

पुलंमधली गुणग्राहकता, मूल्यविवेक, उत्कट भव्यतेची आस आणि क्षुद्रतेचा तिटकारा हे सारे त्यांना नुसते रंजनपर लेखक राहू देत नव्हते. 

देशपरदेशांत जिथे काही चांगले काम होत असेल त्याची नोंद घेणे, ते करणाऱ्यांना मानाचा मुजरा करणे ही त्यांची आंतरिक गरज होती. 

X X

साहित्य निर्मिती:

1. 'खिल्ली' ह्या पुस्तकात संग्रहित झालेले राजकीय उपहासपर लेख आहेत.
2. 'व्यक्ती आणि वल्ली', 
3. 'गणगोत' 
4. 'गुण गाईन आवडी' 
5. 'मैत्र'
X X

पुलची भाषांतरे-रूपांतरे :

1. 'सुंदर मी होणार'
2. 'तीन पैशाचा तमाशा'
3. 'राजा आयदिपौस'
4. 'एक झुंज वाऱ्याशी'
 5. 'ती फुलराणी' 
 ही त्यांची नाटके गाजलेल्या पाश्चात्त्य कलाकृतींवर आधारलेली होती. 
 6. हेमिंग्वेच्या 'ओल्ड मॅन ॲन्ड द सी' ह्या कादंबरीचा 'एका कोळियाने" हा त्यांनी केलेला अनुवादही लक्षणीय आहे.

X X

प्रवासवर्णनपर लेखन:

1. "अपूर्वाई " -1960
2. 'पूर्वरंग'
3. 'जावे त्याच्या देशा'
4. 'वंगचित्रे' 

या प्रवासवर्णनपर लेखनातून मराठी माणसाला बोटाला धरून त्यांनी जगभर फिरवले.

X X

एकांकिका:

1. 'सारं कसं शांत शांत'
2. 'विठ्ठल तो आला आला'
3. 'पूर्वज, सांत्वन'
4. 'मोठे मासे छोटे मासे' 

 X X

सामाजिक बांधिलकी:

पुलंच्या सामाजिक जाणिवेचा आविष्कार म्हणजे त्यांनी 1966 साली स्थापन केलेले "पु.ल. देशपांडे प्रतिष्ठान"

'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।'

 हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या सामाजिक विश्वस्त निधीतून पुलंनी विविध शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांना आपल्या हयातीत सुमारे एक कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले. 

X X

सन्मान व पुरस्कार:. 

पुलंच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. अध्यक्षपदे, पारितोषिके, सत्कार, ह्यांनी उत्तरायुष्य गजबजून गेले. 

1. 1958 ते 1966 ही सहा वर्षे त्यांच्या पुस्तकांना ओळीने "उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार " मिळाले. त्यात
1. 'तुझे आहे तुजपाशी', 
2. 'बटाट्याची चाळ', 
3. 'अपूर्वाई', 
4. 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 
5. 'पूर्वरंग'. 
2. 1966 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाला प्राप्त झाला, 
3. 1966 वर्षी भारत सरकारतर्फे 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव करण्यात आले.
4. 1967 मध्ये संगीत नाटक अकादमी अवार्ड ने सन्मानित.
5. 1979 मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप ने सन्मानित.
6. 1979 वर्षी रवींद्र विद्यापीठ, कोलकाता यांच्यातर्फे ‘साहित्याचार्य' (म्हणजेच डी. लिट) मी सन्मानित.
7. 1980 मध्ये पुणे विद्यापीठाने डी. लिट. देऊन सन्मानित केले.
8. 1983 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या तर्फे डी. लिट. देऊन गौरव केला.
9. महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार
10. 1987 मध्ये मध्य प्रदेश सरकारने "कालिदास सम्मान" पुरस्काराने सन्मानित केले.
11. 1990 मध्ये भारत सरकारने "पद्मभूषण " हा किताब देऊन गौरव केला.
12. 1993 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार
13. 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित.
XInitiating something " In Search of Knowledge" for learning and for sharing and growing do visit the blog for some intresting of " General and Scientific Knowledge" for UPSC /MPSC/SSC and Other Competitive exams. www.insearchofknowledge.org X
14. बालगंधर्व स्मृतिगौरव मानचिन्ह, पुरस्कार
15. ग.दि.मा पुरस्कार
16. गडकरी पुरस्कार
17. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपद.
18. नाट्यसंमेलन, अध्यक्षपद
19. तमाश परिषद, अध्यक्षपद 
20. पहिल्या जागतिक मराठा परिषदेतर्फे गौरव करण्यात आला.
21. 2002 मध्ये महाराष्ट्र सरकारने " पु ल देशपांडे कला अकादमी" ची स्थापना मराठी साहित्यातील केलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यासाठी केली.
22. 2002 मध्ये पु ल देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने चार रुपयाचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले.
23. 2020 च्या 121 जयंती निमित्त गुगलने गुगल डूडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व संगणकात Pula 100 नावाचा त्यांच्या हस्ताक्षराचा हुबेहूब फॉन्ट तयार करण्यात आला.
 X X

निधन:

साहित्य संगीत नाटक या विविध क्षेत्राच्या माध्यमातून वर्चस्व गाजवणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ 'पुल'यांचे 12 जून 2000 रोजी पार्किन्सन्स या आजारामुळे पुणे या ठिकाणी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

 मृत्यूच्या दिवशी त्यांचा लग्नाचा 54 वा वर्धापन दिन होता.

पुलंच्या सर्व जीवन चरित्रावर आधारित कायमस्वरूपी त्यांच्या पुरस्कारांचे सन्मानाचे सन्मानचिन्ह व काही फोटो चे प्रदर्शन विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघामध्ये ठेवलेले आहेत, प्रदर्शित केलेले आहेत हा एक महाराष्ट्राच्या एका नामवंत लेखकाचा विनोद वीरांचा व नटाचा एक जीवनपट आपल्याला अनुभवायला व पाहायला मिळेल.





X X

View, Comments and share.....


Post a Comment

5 Comments

  1. पु. ल. म्हणजे हर हुनरी व्यक्तिमत्त्व.
    विनोदी, हसतमुख. ते साहित्य रूपाने अमरच आहेत.

    ReplyDelete