Subscribe Us

header ads

Jagadish Chandra Bose ( Sir ): Indian Plant Physiologist and Physicist

Sir Jagadish Chandra Bose: Biologist, Physicist, Botanist and an early writer of science fiction. He pioneered the investigation of radio microwave optics, made significant contributions to Botany.

डॉ. जगदीशचंद्र बोस (सर) : भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ

जन्मदिन : 30 नोव्हेंबर

स्मृतीदिन: 23 नोव्हेंबर


बालपण आणि शिक्षण:

भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील संशोधन कार्य महान आहे . 

पूर्व बंगालमधील ढाका जिल्ह्यातील फरिदपूर येथील मेमेनसिंग येथे मेमेनसिंग (सध्याचा बांगलादेश) येथील राणीखल या खेडेगावात 30 नोव्हेंबर 1858 रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला होता. 

त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत "सब डिव्हिजनला ऑफिसर" म्हणून काम करत होते. त्यांनी फरीदपूर, वर्धमानसह अनेक ठिकाणी "उप दंडाधिकारी" आणि "सहायक आयुक्त" म्हणून काम केले होते. 

बोस यांचे बालपण फरीदपूरमध्ये गेले. त्या काळी बंगाली आडनाव इंग्रजीत ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग नुसार बोस झाले.

X X

जगदीशचंद्र यांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती.

 लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. 

निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का! असा प्रश्न त्यांना पडे. त्यांचे वडील भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असत. 

सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का असतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फळे फुलपाखरे, सभोवतालचा निसर्ग यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद झाला होता.

डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील " सेंट झेवियर" शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्या मूळ गावी शिक्षण घेतल्यानंतर जगदीशचंद्र बोस यांना 1869 मध्ये कोलकाता येथे पाठवण्यात आले. 

त्यांनी "सेंट झेवियर्स कॉलेज"मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या "ख्राईस्ट चर्च" महाविद्यालयातून भौतिकी, रसायन, वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. 

1896 मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून "निसर्ग विज्ञान" विषयात "डॉक्टरेट" मिळवली.(B.Sc, D.Sc) या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ "लॉर्ड रॅली" यांचे मार्गदर्शन लाभले.

जगदीश चंद्र बोस 1885 मध्ये भारतात परतले. स्त्रीवादी, अधिकारवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या आबाला बोस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांची कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली परंतु त्यांना या पदासाठी दिलेल्या पगाराच्या अर्ध्या वेतनावर ठेवण्यात आले होते. 

त्यांचे काम पाहून तीन महिन्यानंतर त्यांना पूर्ण वेतन अदा करण्यात आले. कारण ते एक उत्कृष्ट प्राध्यापक आणि संशोधक होते हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दिले.

X X

विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय संशोधनातील योगदान:

A) रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सचा शोध:

इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात 1885 ते 1915 अशी 30 वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी "विद्युतशक्तीवर" संशोधन केले.

जगदीशचंद्र बोस हे "रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स"चा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ होते, ज्यांनी 5 मिलिमीटर ते 25 मिलिमीटर आकाराच्या सूक्ष्म रेडिओ लहरी निर्माण करू शकणारे उपकरण तयार केले. 

त्यांनी बनवलेले हे उपकरण आकाराने लहान असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेले जाऊ शकत होते.

1894 मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये आपल्या रेडिओ लहरींचे प्रदर्शन केले होते.

 यासोबतच जगदीशचंद्र बोस यांनीही त्यांच्या प्रात्यक्षिकादरम्यान विद्युत चुंबकीय लहरी हवेच्या मदतीने दूरच्या ठिकाणी पोहोचू शकतात हे दाखवून दिले.

म्हणजेच जगदीशचंद्र बोस यांनी त्या काळात या महान शोधातून हे सिद्ध केले होते की, या लहरींचा वापर करून दूरवर असलेली कोणतीही वस्तू सहज नियंत्रित करता येते. 

आजच्या "रिमोट कंट्रोल सिस्टम" या संकल्पनेवर आधारित आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. 

बोस यांच्या महान शोधामुळेच आज आपण रडार, मायक्रोवेव्ह ओव्हन, रेडिओ, कम्युनिकेशन रिमोट, इंटरनेट, दूरदर्शन इत्यादींचा आनंद घेऊ शकलो आहोत.नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.

 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले हे आता अमेरिकेत मान्य केले आहे.


X X

B) वनस्पती शास्त्रातील संशोधन:

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला.

वनस्पतींमध्ये उत्तेजनांचा संचार रासायनिक माध्यमाऐवजी विद्युतीय माध्यमातून होतो आणि या कल्पनेच्या आधारे त्यांनी वनस्पतींच्या पेशींवर विद्युत सिग्नलचा प्रभाव यावर बरेच संशोधन केले आणि नंतर त्यांच्या प्रयोगातून ते सिद्ध झाले. 

स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला.

 वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

 वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. 

भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी 2016 मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.

X X

 वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.

वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी "क्रेस्कोग्राफ" उपकरणाचा शोध लावला. 1915 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी संशोधन कार्य सुरूच ठेवले आणि हळूहळू त्यांची प्रयोगशाळा त्यांच्या घरी हलवली. 

बोस इन्स्टिट्यूटची स्थापना 30 नोव्हेंबर 1917 रोजी झाली, जगदीश चंद्र बोस त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत संचालक होते.

X X

बोस संशोधन संस्थेची स्थापना:

सर जगदीशचंद्र बोस यांनी सन 1917 मध्ये कोलकाता येथे "बोस रिसर्च इन्स्टिट्यूट" कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे (1917 Bose established the Bose Institute in Kolkata, West Bengal, India.) नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

X X

ग्रंथ संपदा/ निर्मिती:

1. "इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स" (Researches on Irritability of Plants (1913)

2. "इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स" (Comparative Electro-physiology: A Physico-physiological Study)( 1907)

3. "ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स"(Growth and tropic movements of plants)( 1929)

4. "दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स"(The Nervous Mechanism of Plants)(1926)

5. "प्लॅंट रिस्पॉन्स" (1906)(Plant response as a means of physiological investigation)( 1906)

6. "दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस"(The physiology of photosynthesis)(1924)

7. "दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स"(Motor mechanism of plants)(1928)

8. "रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग" (1906)(Response in the Living and Non-living) ( 1902)

9. "लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स" (भाग 1 ते 4) (Life Movements in Plants (vol.1), First Published (1918), Reprinted (1985)

Life Movements in Plants, Volume II)( 1919 )

10. "Physiology of the Ascent of Sap" (1923)

11. "Plant Autographs and Their Revelations" (1927)

12. J.C. Bose, Collected Physical Papers. New York, N.Y.: Longmans, Green and Co. (1927)

13. "Abyakta" (Bengali) ( 1922)

X X

जर्नल्स मध्ये संशोधन पेपर प्रसिध्द:

1. Journals "Nature" published about 27 papers.

2. Bose J.C. (1902). "On Electromotive Wave accompanying Mechanical Disturbance in Metals in Contact with Electrolyte". Proc. R. Soc. 70 (459–466): 273–294. Bibcode:1902RSPS...70..273C. doi:10.1098/rspl.1902.0029.

3. Bose J.C. (1902). "Sur la réponse électrique de la matière vivante et animée soumise à une excitation — Deux procédés d'observation de la réponse de la matière vivante". Journal de Physique. 4 (1): 481–491.

X X

सन्मान व पुरस्कार:

1. 1886 मध्ये रेडिओ विज्ञानाचे जनक जगदीश चंद्र बोस यांना लंडन विद्यापीठातून विज्ञान विषयात "डॉक्टरेट" प्रदान करण्यात आली.

2. 1903 मध्ये जगदीश चंद्र बोस यांना ब्रिटीश सरकारने "कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर" (CIE) हा पुरस्कार प्रदान केला.

3. 1911 मध्ये "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया "(CSI) 

4. 1917 मध्ये महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांना ब्रिटीश सरकारने "नाइट बॅचलर " या पदवीने सन्मानित केले होते.

5. 1920 मध्ये जगदीशचंद्र बोस यांची रॉयल सोसायटीचे "फेलो" म्हणून निवड .

6. 1927 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 14 व्या सत्राचे अध्यक्ष.

7. 1928 मध्ये व्हिएन्ना विज्ञान अकादमीचे सदस्य.

8. 1929 मध्ये "फिन्निश सोसायटी ऑफ सायन्सेस"चे सदस्य .

9. 1924 ते 1931 पर्यंत बौद्धिक सहकार्यासाठी "लीग ऑफ नेशन्स कमिटी"चे सदस्य.

X X

10. "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया"चे संस्थापक फेलो. (आता भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी) 

11. 1958 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ पश्चिम बंगालमध्ये "JBNSTS शिष्यवृत्ती कार्यक्रम" सुरू करण्यात आला. त्याच वर्षी भारताने त्यांचे पोर्ट्रेट असलेले "टपाल तिकीट" जारी केले.

12. 25 जून 2009 रोजी "इंडियन बोटॅनिक गार्डन"चे नाव बदलून "आचार्य जगदीश चंद्र बोस इंडियन बोटॅनिक गार्डन" हे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

13. 2004 मध्ये बीबीसीच्या सर्वांत महान बंगाली सर्वेक्षणात बोस यांना 7 वा क्रमांक मिळाला होता.

14. 14 सप्टेंबर 2012 रोजी, मिलिमीटर-बँड रेडिओमधील बोसच्या प्रायोगिक कार्याला इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये IEEE माइलस्टोन म्हणून मान्यता मिळाली. भारतातील अशा प्रकारची पहिली ओळख आहे.

15. 30 नोव्हेंबर 2016 रोजी बोस यांना त्यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त "Google डूडल"मध्ये साजरी करण्यात आली.

16. जगदीशचंद्र बोस यांना वायफाय तंत्रज्ञानावरील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी त्या नामांकन यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

17. जगदीशचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ "जे.सी.बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ", वायएमसीए.

X X

निधन:

विज्ञान क्षेत्रात केलेल्या महान शोधांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ शास्त्रज्ञ तसेच "रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स"चा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ डॉ. सर जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या 79व्या वर्षी 23 नोव्हेंबर 1937 रोजी गिरीडीह, बंगाल प्रेसिडेन्सी ब्रिटिश भारत सध्याचे झारखंड राज्य येथे निधन झाले. "रेडिओ विज्ञानाचे पितामह आणि जनक" देखील मानले जाते. यासोबतच अमेरिकन पेटंट मिळवणारे ते भारतातील पहिले शास्त्रज्ञ होते.




X X

View, Comments and share....


 

Post a Comment

5 Comments