A. P. J.Abdul Kalam (Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam): Indian aerospace scientist, President of India
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्फ अवुल पाकिर जैनुलब्दीन: भारतरत्न वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक
जन्म दिन : 15 ऑक्टोंबर
स्मृतिदिन: 27 जुलै
वाचन प्रेरणा दिन
बालपण आणि शिक्षण:
भारतरत्न वैज्ञानिक आणि भारताचे 11वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्फ अवुल पाकिर जैनुलब्दीन यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी ब्रिटीश दक्षिण भारतातील तामिळनाडू तत्कालीन मद्रास राज्यातील श्रीक्षेत्र रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलबदीन व आईचे नाव अशीयअम्मा हे होते. रामेश्वर या छोट्याशा गावामध्ये सर्व आजूबाजूच्या लोकांमध्ये ते "एक आदर्श जोडपे" म्हणून ओळखले जात होते.
श्रीक्षेत्र रामेश्वरांच्या शिव मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री आणि अब्दुल कलाम यांचे वडील हे खूप चांगले मित्र होते ते दोघे मित्र दैविकृपा अध्यात्म तत्त्वज्ञान अशा गंभीर विषयावर मनःपूर्वक चर्चा करत असत व या चर्चेचा परिणाम अब्दुल कलांवर लहानपणापासूनच संस्कार रूपाने होत होता.
छोट्या अब्दुल कला यांच्यावर संस्कार होत असताना त्यांनी आपल्या वडिलांना प्रार्थना किंवा नमाज पडण्यामागचे गुढ काय असते असे विचारले असता त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, "प्रार्थनेमध्ये, नमाज पढण्यामध्ये गुढ असे काही नाही, एकत्र येऊन नमाज पढ ताना माणसातील भेदभाव नाहीसे होतात, संपत्ती, वय ,जात ,धर्म, वंश, शरीर सर्व काही विसरून आपण त्या आघात दैवी विश्वशक्तीशी एकरूप होतो."
X X
रामेश्वर या ठिकाणी एस.टी.आर. मनीकम नावाचे एक माजी क्रांतीकारक राष्ट्रभक्त राहत होते त्यांच्याकडे बऱ्याच पैकी पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी अब्दुल कलाम यांना पुस्तके वाचण्यासाठी उत्तेजना व प्रेरणा दिली व यांनीही अब्दुल कलाम यांनीही त्यांच्या घरी धाव घेऊन अनेक पुस्तके बांधले अवस्थेत वाचले.
कलाम अण्णा सायन्स शिकवणारे शाळेतील श्री शिवशुब्रमनिया अय्यर या शिक्षकांनी त्यांना " कलाम मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचे तू व्हायला हवेस" असे नेहमी त्यांना सांगायचे कारण कलाम हे त्यांचे आवडते विद्यार्थी होते. रामनाथपुरम मधल्या" श्वर्झ" या माध्यमिक शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले.
अब्दुल कलाम यांनी 1950 मध्ये त्रिचीच्या "सेंट जोसेफ कॉलेज"मध्ये बी. एससी. पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या महाविद्यालयात शिकत असताना त्यांना इंग्लिश साहित्याची गोडी लागली. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तके वाचले हळूहळू ते तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांकडे वळले. शिकत असताना हा त्यांचा त्या काळात विशेष आवडीचा विषय बनला होता.
बी.एससी. चे शिक्षण पूर्ण करून अब्दुल कलाम यांनी एमआयटी (मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये इंजीनियरिंग चा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी फीस साठी लागणारी रक्कम फक्त एक हजार रुपये होती ती सुद्धा त्यांच्या वडीलाकडे नव्हती. मग त्यांना त्यांच्या जोहरा या बहिणीने आपल्या बांगड्या विकून अब्दुल कलाम यांची फिस भरण्यासाठी पैसे दिले. इंजीनियरिंग ला असताना त्यांनी "एअरोडायनामिक्स" विमानाच्या बांधनिशी असणारी संबंधित शाखा त्यांनी निवडली.
"मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी" मधून शिक्षण पूर्ण करून बंगलोर मधील "हिंदुस्तान एरोमॅटिक्स लिमिटेड" मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अब्दुल कलाम दाखल झाले आतापर्यंत पुस्तकात का वाचलेले ते आता प्रत्यक्षात विमानाची देखभाल काटकोन पणे कशी करावी कसे तयार करावे याबद्दल त्यांना काम करावयाचे होते. त्या ठिकाणी "पिस्टन" आणि गोल फिरणाऱ्या असा वर चालणारी "टर्बाईन" या दोन प्रकारच्या विमानांची देखभाल ते करत होते.
xx xx
जीवन प्रवास व कर्तव्या पुढील आव्हाने:
"हिंदुस्तान एरोमॅटिक्स लिमिटेड" मधले प्रशिक्षण संपून अब्दुल कलाम एरोनॉटिकल अभियंता म्हणून बाहेर पडले व प्रत्यक्षात काम करण्यासाठी त्यांच्याकडे हवाई दलात वैमानिक म्हणून पर्याय होता किंवा संरक्षण खात्यात "डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन" (एअर) या ठिकाणी नोकरी करण्याची संधी त्यांना मिळणार होती.
"डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन" (एअर) मध्ये अब्दुल कलाम यांनी मुलाखत दिली व त्यानंतर डेहराडूनच्या "हवाई दलाच्या निवड समिती" समोर सुद्धा त्यांनी मुलाखत दिली. हवाई दलाच्या मुलाखतीमध्ये त्यांना यश मिळाले नाही. आता पुढे काय करायचे हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता कारण भारतीय वायुसेने दाखल होऊन आकाशात उडण्याची इच्छा त्यांची आता अपुरी राहणार होती. तिथून निराश होऊन ते दिल्लीला दिलेल्या दिल्लीला दिलेल्या मुलाखतीचा निकाल पाहायला दिल्लीला गेले आणि आश्चर्य त्यांना त्या ठिकाणी "वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी" म्हणून 250 रुपयाच्या मूळ पगारावर त्यांच्या हातात 1958 मध्ये नेमणूक पत्र पडले आणि दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी रुजू झाले.
X X
त्यांना तंत्रज्ञान केंद्र " सिव्हील ॲव्हींएशन" या ठिकाणी प्रथम नेमणूक देण्यात आली. पहिल्याच वर्षी माझ्या स्वप्नातील लढाऊ विमानाचा आराखडा मी बनवला आणि तो तेथील अधिकारी आर . वरदराजन यांची मदत घेऊन. या आराखड्याला विभाग प्रमुख डॉ. नीलकंठण यांनी खूप प्रशासना केली आणि मला विमानाची देखभाल करणे शिकण्यासाठी "एअरक्राफ्ट अँड अर्मामेन्ट टेस्टिंग युनिट कानपूर" या औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या शहरात पाठवण्यात आले .
त्यानंतर दिल्लीत डार्ट या युद्धमनाचे डिझाईन तयार करण्यासाठीच्या टीम मध्ये सुद्धा अब्दुल कलाम यांनी काम केले. तीन वर्ष दिल्लीला नंतर बेंगलोर येथे "एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट" या संस्थेत रुजू झाले. या ठिकाणी संपूर्ण स्थानिक साधने वापरून हावरक्राफ्ट डिझाईन करून ते विकसित करायचे असा प्रकल्प हाती घेतला त्यासाठी त्या वेळचे संरक्षण मंत्री हे कृष्ण मेमन यांनी परवानगी दिली. या वाहनाला शंकराचे वाहन "नंदी" असे समर्पक नाव दिले व या वाहनातून संरक्षण मंत्री श्रीकृष्ण मेमन यांनी प्रत्यक्ष बसून उडण्याची इच्छा व्यक्त केली. व "नंदी" या वाहनातून आम्ही यशस्वी उड्डाण केले.
मुंबईहून "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च" या संस्थेचे डायरेक्टर प्रोफेसर मेनन हे "नंदी " पाहण्यासाठी आले व ते नंदी मधून फिरवून त्यांचे समाधान झाले . त्यांनी अब्दुल कलाम यांना रॉकेल इंजिनिअरिंगच्या जागेसाठी मुंबईला "इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च" या ठिकाणी बोलावले कारण ही संस्था टाटा मूलभूत संशोधन संस्था यामधील बुद्धिमान लोकांची निवड करून "भारतीय स्पेस रिसर्च प्रोग्राम" मध्ये म्हणजे अवकाश संशोधन सुरू करण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था होती. अब्दुल कलाम यांनी ही मुलाखत दिली की मुलाखत डॉक्टर विक्रम साराभाई यांनी व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी घेतली होती. या मुलाखतीत डॉ. कलाम हे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या उंद्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षले गेले होते. व त्यांची नेमणूक इनकोस पार मध्ये "रॉकेट इंजिनियर" म्हणून झाली.
नोकरीत रुजू झाल्यानंतर प्रथम" टी आय एफ आर " या संगणक विभागांमध्ये प्रथम काम करण्याची संधी अब्दुल यांना मिळाली.
xx xx
थुंबा येथील अवकाश स्थळ उभारणी:
भारत सरकारने 1962 मध्ये शेवटच्या महिन्यात केरळमधील थुंबा या ठिकाणी अवकाश तळ उभारण्याचा निर्णय घेतला. मासेमारीवर अवलंबून असणारे हे "थुंबा" हे खेडे गाव केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या जवळ होते. ही जागा शोधण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. चिटणीस यांनी पार पाडले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तापासून अगदी जवळ होते .भारतातील "रॉकेट" वर आधारित अवकाश संशोधनाची ही खूप मोठी सुरुवात झाली होती. या थुंबा अवकाश केंद्रासाठी त्रिवेंद्रमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री के. माधवन नायर हे काम अगदी कुशलतेने जागा संपादनाचे करून त्रिवेंद्रमचे बिशप राईट रेव्हरंड डॉ. डेरिया यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने 1962 मध्ये पूर्ण झाले. "थुंबा स्पेस सेंटर" चे पहिले ऑफिस "सेंट मेरी मॅकडेलान चर्च" मध्ये झाले सुरू केले. चर्चचे प्रार्थना स्थळ हे प्रयोगशाळा म्हणून वापरण्यात आले. सध्या भारतीय अवकाश संग्रहालय त्याच चर्चमध्ये आहे.
X X
काही काळ काम केल्यानंतर अब्दुल कलाम यांना सहा महिन्यासाठी अमेरिकेला पाठविण्यात आले व त्या ठिकाणी त्यांनी अवकाश यान उडानाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला तो जगप्रसिद्ध "नासा" या संस्थेमध्ये जाऊन. अमेरिकेतील मेरी लँड स्टेट मध्ये ग्रीनबेल्ट या गावी "बोर्डार्ड स्पेस फ्लाईट सेंटर" या ठिकाणी प्रशिक्षणाचे काम नासाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून शेवटचे प्रशिक्षण पूर्व किनाऱ्यातील वर्जीनिया स्टेट मधील "व्यालॅप्स आयलँड" या ठिकाणी अब्दुल कलामांनी पूर्ण केले या ठिकाणी नासाच्या रॉकेट क्षेत्रातील कार्याचा इथे प्रथम अभ्यास चाचणी परीक्षा केली जाते आणि त्यानंतर कार्यान्वित केली जाते. नासाचे अब्दुल कलाम यांनी प्रशिक्षण पूर्ण करून भारतात परत आले आणि 21 नोव्हेंबर 1963 मध्ये भारताचे पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले. हे यान "नाइके -अपाची" नासामध्ये बनवण्यात आले होते व त्याची जुळणी थुंबा येथील चर्चमध्ये करण्यात आली व याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
अब्दुल कलाम व त्यांचे सहकारी श्री सी आर सत्या, श्री पी एन सुब्रमण्यम ,श्री एम एन सत्यनारायण यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी "फिलामेंट विणणाऱ्या यंत्राची निर्मिती" केली. हे यंत्र खूप शक्तिशाली धाग्यांनी बनलेले काचेचा थर दिलेले कापड तयार कले. त्यामुळे या कापडातून चुंबकीय लहरींना दाद न देणारी पेलोड ठेवता येण्यासारखी वापरणारी उपकरणे तयार केली. साऊंडिंग रॉकेट्स मध्ये यांचा यशस्वीपणे वापर करण्यात आला. या देशातील पहिल्या "फिलामेंट विणणाऱ्या यंत्रा"चे उद्घाटन भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते फेब्रुवारी 1969 मध्ये थूंबा या ठिकाणी केले.
यानंतर थूंबा येथे दोन प्रकारची रॉकेट बनवण्यात आली. २० नोव्हेंबर 1967 ला "रोहिणी- 75" चे यशस्वी उड्डाण झाले. यानंतर अब्दुल कलाम यांना दिल्लीला बोलवून घेण्यात आले. दिल्लीच्या बैठकीमध्ये हवाई दलातील प्रमुख अधिकारी ग्रुप कॅप्टन सी एस नारायण व प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी बैठकीत " रॉकेट असिस्टंट टेक ऑफ सिस्टीमचा" (राटो)विकास करायचा यावर चर्चा झाली. व 18 महिन्यात "राटो" इंजिन बनवू शकता का असे विचारले असता अब्दुल कलामांनी हो हे उत्तर तात्काळ दिले.
X X
उपग्रह उड्डाण अवकाश तळ श्रीहरीकोटा:
भारतात उपग्रहांचे उड्डाण करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची कल्पना त्या काळात मूर्त स्वरूपामध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी 1969 मध्ये मांडली. देशातच मिळणाऱ्या साधनसंपत्तीतून स्वदेशी बनावटीचा उपग्रह तयार करायचा व तो अवकाशात सोडायचा आणि जमिनीवरूनच नियंत्रण करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्यासाठी त्यांनी स्वतः मद्रास जवळील शंभर किलोमीटर अंतरावर "श्रीहरीकोटा" हे ठिकाण निवडले आणि त्या ठिकाणी अवकाश तळ बांधण्यात आले.
"इंडियन रॉकेट सोसायटी"ची स्थापना 1968 मध्ये झाली. त्यानंतर "इनकोस्पर" ची पुनर्रचना करून "इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी" संस्थेची सल्लागार उपसंस्था म्हणून एक भाग बनवण्यात आली आणि "इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन"( इस्रो) हा स्वतंत्र विभाग अनुशक्ती खात्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आला भारतीय बनावटीचे "सॅटॅलाइट लॉन्च व्हेकल" म्हणजे "उपग्रह अवतरण वाहन" भरण्याचे प्रोफेसर विक्रम साराभाईंचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी माणसे निवडली व त्यामध्ये अब्दुल कलाम यांचा इस्त्रोचा प्रमुख म्हणून समावेश केला. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. अब्दुल कलाम हे प्रमुख होते.
जमिनीवरील वरून आकाशातील लक्षाचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे संरक्षण खात्याच्या संस्थेमध्ये यांचा विकास करायचा मोठा प्रकल्प चालू असताना त्यासाठी "डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी" हैदराबादच्या संस्थेमध्ये अब्दुल कलाम यांना नेहमी बैठकीसाठी जावे लागायचे.
X X
भारताने "रॉकेट इंजिनिअरिंग सेक्शन" उभारण्याचा निर्णय घेतला. साध्या टायमरने ऐनवेळी दगा दिला त्यामुळे त्यातून रॉकेट इंजीनियरिंग लायब्ररीचा जन्म झाला.
1966 ते 1971 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एसएलव्ही-3 हा प्रकल्प तयार झाला तो प्रोफेसर विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनातून. अब्दुल कलाम म्हणत असत की प्रोफेसर विक्रम साराभाई हे भारतीय विज्ञान क्षेत्रातील महात्मा गांधी आहेत.
सतीश धवन हे इस्रोचे प्रमुख म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली . त्यांनी थुंबा येथील अवकाश केंद्रास "विक्रम साराभाई स्पेस सेंटर" हे नामकरण केले.
अखेर 10 ऑगस्ट 1969 रोजी एस एल व्ही -3 प्रथम चाचणी करण्यासाठीं याचे उड्डाण झाले. हे उड्डाण 560 किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यानंतर समुद्रा अर्पण झाले.
आणि 18 जुलै 1980 सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी श्रीहराकोटा येथून देशाचे पहिले उपग्रह प्रक्षेपक वाहन उचलले गेले. असेल एस एल व्ही - 3 च्या यशस्वी उडण्याचा यशाचे प्रमुख ज्यांनी या कार्यक्रमाचे मुहूर्त भेट रोवली ते पितामह प्रोफेसर विक्रम साराभाई यांना जाते.
xx xx
डॉ. कलाम डी.आर. डी .एल .चे संचालक:
डॉ. अब्दुल कलाम यांची फेब्रुवारी 1982 मध्ये हैदराबाद येथील डिफेन्स मेटॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी ( डी आर डी एल) चे संचालक पदी नियुक्ती झाली. प्रत्यक्षात एक जून 1982 मध्ये अब्दुल कलामांनी सूत्रे हातात घेतली.
X X
एस एल व्ही -3 साठी लागणारा एक महत्त्वाच्या सुट्ट्या भागासाठी विशिष्ट गुणधर्माच्या अल्युमिनियमच्या मिश्र धातूची गरज होती व तो मिश्र धातू डीआरडीएल मध्ये दोन महिन्यात स्वदेशी बनावटीचा प्रथम तयार करण्यात आला.
अब्दुल कलाम यांनी डी आर डी एल मध्ये एक संशोधकांची समिती स्थापन केली त्याला "मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटी "हे नाव देऊन त्यामध्ये अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ संशोधक यांना सामील करून घेतले व त्या समितीला "गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" हे नाव दिले याच्यावर पूर्ण प्रोजेक्ट तयार करून केंद्रीय मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. या प्रोजेक्टला जवळपास 388 कोटी रुपयाची एवढी मंजुरी मिळून हा प्रोजेक्ट मान्य करण्यात आला. हा सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. भारताची एक महत्त्वाकांक्षी व प्रतिष्ठेची योजना जन्माला आली होती. "इंटिग्रेटेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" त्याचे मग एक लघुरूप "आय जी एम डी पी" (समग्र लक्षवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना) असेच ठेवले.
या प्रकल्पामध्ये तयार करण्यात येणारी क्षेपणास्त्रे ही भारतीय संस्कृतीला अनुरूप अशी नावे देण्यात आली जमिनीवर जमिनीवरचे लक्ष वेधणाऱ्या शस्त्र समूहाला "पृथ्वी" प्रॅक्टिकल कोर वेहिकल साठी 'त्रिशूल' अवकाशातून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे आकाश रणगाडा उध्वस्त करणारे शस्त्र "नाग" ही नावे योजनेत आली व शेवटचे "अग्नी" हे नाव अब्दुल कलाम यांनी सुचवले. या प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. अरुणाचलन यांनी 27 जुलै 1983 रोजी केले.
"पृथ्वी " या क्षेपणास्त्राच्या प्रकल्पासाठी प्रमुख अधिकारी म्हणून अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले कर्नल सुंदरम ही यांत्रिकी विषयात पारंगत होते त्यामुळे "स्ट्रक्चर ग्रुप"चे विभाग प्रमुख होते. त्यामुळे अब्दुल कलाम यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
अब्दुल कलाम यांनी " त्रिशूल" साठी इलेक्ट्रॉनिक्स आणि क्षेपणास्त्रे या दोघांची पूर्ण माहिती असलेले टीम मधील श्री एस आर मोहन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
अग्नि हे क्षेपणास्त्राची जबाबदारी स्वतः अब्दुल कलाम यांनी श्री आर्यन अग्रवाल यांच्या समवेत घेतली अग्रवाल हे जगप्रसिद्ध "मेसेटूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी" येथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते.
अब्दुल कलाम यांनी केलेल्या 1985 च्या कांचा मधील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान संशोधन केंद्राची उभारणी केली. 3 ऑगस्ट 1985 ला भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते "रिसर्च सेंटर इमारत" ( आरसीआय) संकुलाची कोणाशीला बसविण्यात आली. या सर्व कामाचा आढावा घेतल्यानंतर राजीव गांधी डॉ. अब्दुल कलाम यांच्या कामावर खूप खुश होऊन त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.
डॉ. अब्दुल कलाम यांनी 200 तरुण अभियंत्यांना घेऊन सर्व डीआरडीएलच्या कार्यपद्धतीचा कायापालट करून टाकला होता या तरुण टीमच्या मदतीने " री- एन्ट्री" तंत्रज्ञान (अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणे) कमी तरंग लांबीच्या लहरी वापरून बनवलेले रडार अनेक भागात विस्तारून उभारलेली रडार यंत्रणा, रॉकेटचे लहान लहान भाग असे अनेक नवे तंत्रज्ञान विकसित केले.
16 सप्टेंबर 1985 ला श्री हरी कोटाच्या अवकाश तळावरून त्रिशूल हे क्षेपणास्त्र आकाशात यशस्वी उड्डाण झाले.
25 फेब्रुवारी 1988 ला अकरा वाजून 23 मिनिटांनी पृथ्वी या क्षेपणास्त्राने आकाशात यशस्वी झेप घेतली देशाच्या युद्ध सामग्री इतिहासात हा एक मानाचा तुरा होता.
xx xx
"अग्नी"चे यशस्वी उड्डाण:
"अग्नि" क्षेपणास्त्रासाठी जवळपास 500 शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते ही खूप मोठी टीम होती आणि अग्नी हे क्षेपणास्त तयार केल्यानंतर 20 एप्रिल 1989 ला या क्षेपणास्त्राला उडवायचे ठरवले होते अशा पद्धतीचा अनुभव प्रथमच सर्वजण घेणार होते. पण काही अडचणीमुळे एक मे 1989 ला परत तारीख बदलून उद्यानाची तारीख निश्चित करण्यात आली. एक पण पुन्हा एकदा उड्डाण रद्द करण्यात आले कारण नियंत्रण करणारे उपकरण एक नीट कार्य करत नव्हते . आणि शेवटी 22 मे 1989 ला अग्नीचे उड्डाण निश्चित करण्याची तारीख निश्चित करण्यात आली. त्यावेळेस संरक्षण मंत्री के.सी. पंत अग्नीचे मुद्दाम उड्डाण पाहण्यासाठी आले होते. सकाळी सात दहाला आणण्याचे उड्डाण शांतपणे पार पाडले सर्व उड्डाणाचा तपशील अपेक्षेप्रमाणे होता. आणि शेवटी अग्नीचे उड्डाण यशस्वीपणे पार पाडले अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातला हा एक फार सुखाचा आणि महत्त्वाचा क्षण होता त्यावेळी त्यांनी रात्री आपल्या डायरीमध्ये काही वाक्य लिहून ठेवली होती.
एक आकाशाकडे पहात असलेली वस्तू
अनिष्ठाला दूर पळवण्यासाठी,
वा तुमच्या समर्थांचे प्रदर्शन
ती आग आहे.
भारतीयांच्या हृदयातली
तिला क्षेपणास्त्राचे रूप नकाच देऊ
तिच्या समावेत आहे
राष्ट्राची जळती अस्मिता
म्हणूनच ती तितकी प्रकाशमान आहे.
"मिसाईल मॅन"डॉ. अब्दुल कलाम हे 15 ऑक्टोबर 1991 ला निवृत्त झाले.
पोखरण अनुचाचणी द्वितीय मध्ये 1998 मध्ये अब्दुल कलामांनी महत्त्वपूर्ण भूमिका वैयक्तिक तांत्रिक व संघटनात्मकरित्या पार पाडली.
xx xx
भारताचे 11 वे राष्ट्रपती पदी निवड:
भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन विरोधी पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्हींच्या पाठिंब्याने डॉ.अब्दुल कलाम हे देशाचे 11 वे "राष्ट्रपती" म्हणून 2002 मध्ये निवडून आले. त्यांना जनतेचे राष्ट्रपती "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून सुद्धा संबोधले जाते.
X X
ग्रंथ संपदा:
2. इंडिया 2000
3. इग्नायटेड माइंड्स
4. 1994 मध्ये'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित
5. 'इंडिया 2020- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' ( 'भारत 2020 : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध')
6. इंडिया - माय-ड्रीम
7. उन्नयन (ट्रान्सेन्डन्स)
8. सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
X X
सन्मान व पुरस्कार:
1. 1981 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2. 1990 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
3. 1997 मध्ये राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
4. मद्रासच्या अण्णा विद्यापीठाने "डॉक्टर ऑफ सायन्स" ही पदवी प्रोफेसर राजारामण्णा यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
5. 1990 मध्ये जावदपूर विद्यापीठाने "डॉक्टर ऑफ सायन्स " या पदवीने सन्मानित केले.
6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांनी "डॉक्टर ऑफ सायन्स " ही सन्मानाची पदवी डॉ. अब्दुल कलाम यांना दिली.
7. 1997 मध्ये भारत सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार"प्रदान केला.
8. 1998 मध्ये भारत सरकारने "वीर सावरकर पुरस्कार"प्रदान केला.
9. 2000 मध्ये " रामानुजम पुरस्कार" मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर द्वारे प्रदान करण्यात आला.
10. 2009 मध्ये "हूवर पदक " ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स) यांनी प्रदान केले.
xx xx
निधन:
"मिसाईल मॅन" एक वैज्ञानिक डॉ. ए पी जे अब्दुल कलाम निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रामध्ये वैज्ञानिक म्हणून,नवीन विकसित तंत्रज्ञान व शिक्षण या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने देत असत. डॉ. अब्दुल कलाम "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शिलाँग" या ठिकाणी व्याख्यान देत असताना मंचावर कोसळले आणि त्यांचा 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
15 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे घर
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
View, comments and Share......
6 Comments
👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice sirji
ReplyDelete👍👍
ReplyDelete👍
ReplyDelete👍👍👍
ReplyDelete