Louis Pasteur : Father of Microbiology
लुई पाश्चर( Louis Pasteur ) : मायक्रोबायोलॉजीचे जनक,पाश्चारायझेशन प्रकिया,रेबीज व अँथ्रॅक्स रोगांवर प्रतिबंधक लशींचे जनक
27 डिसेंबर: जन्मदिन
28 सप्टेंबर : स्मृतिदिन
लुई पाश्चर ( Louis Pasteur ) फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हे प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखले जातात.
लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली.
जंतुसंख्येच्या सिद्धांताचा प्रस्ताव मांडणारा पाश्चर पहिला नव्हता, परंतु त्याच्या प्रयोगांनी त्याची योग्यता दर्शविली आणि बहुतेक युरोपला हे सत्य असल्याचे पटवून दिले.
X X
बालपण आणि शिक्षण:
लुई पाश्चर यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 साली फ्रान्सच्या पूर्व भागातील ज्युरा येथील डोल या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबात झाला. तो लहानपणापासूनच अतिशय संवेदनशील मनाचा होता.
निसर्गामध्ये रमायला त्याला खूप आवडत असेल तो अतिशय पेन्सिलने चित्रांचे रेखाटन करायचा व मासे पकडण्यात त्याला खूप मजा यायची.
किशोर वयातच त्यांनी काढलेली चित्रे 1827 मध्ये यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स नदीच्या काठी गेले.
लुई पाश्चर यांनी अनेक महाविद्यालयात प्राध्यापकाचे काम केले.
एका महाविद्यालयातील प्राचार्य लॉरेंट यांची मुलगी मेरी हिच्याशी पाश्चर यांचा विवाह 1849 मध्ये संपन्न झाला.
X X
रसायनशास्त्रातील संशोधन:
प्रथम लुई पाश्चरनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये संशोधन केले होते. टार्टारिक आम्लाच्या रेणूच्या रचनेत चा त्यांनी अभ्यास केला. या त्यांनी नैसर्गिक पदार्थांमध्ये असणाऱ्या कृत्रिमरीत्या तयार केलेल्या टार्टारिक आम्लाच्या रेणूंच्या रचनेत काही फरक आढळून आला होता व त्या पदार्थांमधील तरकारी आम्लाचा रेणू ध्रुविकृत प्रकाशाची दिशा बदलतो.
तर कृत्रिम रित्या तयार केलेला रेणु मात्र हे परिवर्तन घडवून आणू शकत नाही व याचे सर्व बाकीचे रसायनिक व भौतिक गुणधर्म मात्र अधिक सारखे असतात हे त्यांनी प्रयोगांती सिद्ध केले.
X X
रेबीज आणि अँथ्रॅक्स प्रतिबंधक लशींची निर्मिती:
लुई पाश्चर यांचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे त्यांनी संपूर्ण मानव जातीसाठी रेबीज आणि अँथ्रॅक्स या रोगावर प्रतिबंधक लस निर्माण केली व ती यशस्वीपणे तिची चाचणी घेऊन ती समाजाला एक वरदान ठरली.
या लसीची निर्मिती कोंबड्यांच्या पिल्यामध्ये कॉलरा या रोगाचा प्रदुभाव नेहमी होत असतो. त्यामुळे त्या रोगांच्या जिवाणूंचा प्रयोगशाळेत वाढ करून त्यांनी हा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवला.
लुई पाश्चरने केलेल्या कोंबड्यांच्या प्रयोगावरून अशाच पद्धतीची जिवाणूंची अँथ्रॅक्स नावाच्या रोगावर सुद्धा त्याने एक नवीन लस शोधून काढली.
माणसांना किंवा प्राण्यांना पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्यांना हायड्रोफोबिया हा आजार होतो, हे लक्षात घेऊन पाश्चर यांनी एक अभूतपूर्व संशोधन करून रेबीज नावाची लस तयार केली.
यासाठी सुद्धा लुई पाश्चरने कुत्र्याच्या तोंडातील लाळेचे सॅम्पल नमुने गोळा केले व त्याची लस तयार करून जोसेफ मास्टर नावाच्या एका नववर्षाच्या मुलाला कुत्रा चावला होता. ही लस त्याला टोचली व त्याचा तो प्रयोग आश्चर्यकारक यशस्वी झाला. तो मुलगा संपूर्ण बरा झाला.
लुई पाश्चर यांनी 1883 मध्ये पाच लाख प्राण्यांमध्ये ही लस टोचली व ती पूर्णपणे लस रोगप्रतिबंधक कारक आहे असे त्यांनी सिद्ध केले.
त्यासोबतच कॉलरा, घटसर्प, क्षय, देवी यासारख्या रोगावरही लुई पाश्चरनी प्रतिबंधक लस तयार केली.
x x
पाश्चारायझेशन प्रक्रियेचा शोध:
लुई पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण (पाश्चारायझेशन -Pasteurization) या प्रक्रियेचा त्याने शोध लावला.
या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
एका ठराविक तापनापर्यंत दूध जर गरम केले त्याच्या चवीत बदलतहोत नाही व ते नासतही नाही.
एक विशिष्ट तापमान दूध नासण्यास कारणीभूत असणारे जंतू नष्ट करू शकते हे त्याने सिद्ध केले.
प्राण्यांच्या शरीरात बाहेरून जे जंतू प्रवेश करतात त्याच्यामुळेच माणसांना अनेक रोग होतात ही संकल्पना त्याने मांडली व त्यावर त्याने अनेक रोगावर उपाय म्हणून लसी तयार केल्या.
x x
रेशमाच्या किड्यांवरील संशोधन:
1849 मध्ये संपूर्ण रेशीम उद्योगांमध्ये संकट निर्माण झाले व रेशमाच्या किड्यावरील रोगांची साथ फ्रान्समध्ये सुरू झाली व ती सर्वत्र जगात पसरली.
मग 1865 मध्ये लुई पाश्चर यांनी याच्यावर संशोधन केले व त्याला असे दिसून आले की एका विशिष्ट प्रकारच्या जंतूमुळेच हा रोग रेशीम व्यवसायात पसरत आहे.
त्याने ह्या उत्पादनात जंतूंची बाधित झालेली अंडी व न बाधित झालेली अंडी वेगवेगळी करून ती नष्ट केली व बाधित न झालेल्या अंड्यातील अळ्यांचा जन्म होऊ दिला.
त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवण्यास त्याला यश आले. पण हा प्रयोग करत असताना त्याच्या शरीरावर आरोग्यावर त्याचा परिणाम झाला.
त्याला पक्षघाताचा झटका आला, पण पुन्हा तो तंदुरुस्त होऊन संशोधनाच्या कार्यात काम करू लागला.
X X
ग्रंथ संपदा:
लुई पाश्चर यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांचे नाव खालील प्रमाणे आहेत.
1. 1866 -Studies on Wine
2.1868 -Studies on Vinegar
3.1870 -Studies on Silk Worm Disease (2 volumes)
4.1871 -Some Reflections on Science in France
5. 1876 -Studies on Beer
6. 1878 -Microbes organized, their role in fermentation, putrefaction and the Contagion
7. 1882 -Speech by Mr L. Pasteur on reception to the Académie française
8. 1886 -Treatment of Rabies
X X
संस्थेची स्थापना:
लुई पाश्चर यांनी सन 1818 मध्ये पॅरिस येथे पाश्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली.
x x
सन्मान व पुरस्कार:
1.1869 मध्ये रॉयल सोसायटी लंडन याचा तो मानद सभासद होता. (Foreign Member of the Royal Society)
2. 1895 मध्ये सूक्ष्मजीवशास्त्रातील ल्यूएनहॉक पदक हॉलंडचा कला आणि विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार मिळाला.
3. Legion of Honor Grand Cross (1881)
4. Rumford Medal (1856)
5. Copley Medal (1874)
6. Albert Medal (1882)
7. Foreign Associate of the National Academy of Sciences (1883)
8. Cameron Prize for Therapeutics of the University of Edinburgh (1889)
x x
निधन:
मायक्रोबायोलॉजीचे जनक,पाश्चारायझेशन प्रकिया,रेबीज व अँथ्रॅक्स रोगांवर प्रतिबंधक लशींचे जनक असलेल्या लुई पाश्चर अनेक माणसांचे प्राण वाचवणाऱ्या या महान संशोधकाचे निधन 28 सप्टेंबर 1895 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी मर्निस ला कॉकेट ( Marnes-la-Coquette) फ्रान्स येथे झाले. तो आपल्या संशोधनाने जगात अमर झाला.
x x
सन्मानार्थ संस्था:
1. लुई पाश्चर ( Louis Pasteur ) यांच्या सन्मानार्थ स्ट्रॉसबर्ग येथील विद्यापीठाचे पाश्चर विद्यापीठ असे नामांकन केले गेले.
2. लुई पाश्चर ( Louis Pasteur ) यांनी सुरु केलेल्या संशोधन प्रयोगशाळेला सुद्धा पाश्चर संशोधन संस्था असे नाव दिले गेले आहे.
View, comments and Share
3 Comments
Nice Sir 👍
ReplyDeleteNice
ReplyDelete👍
ReplyDelete