Subscribe Us

header ads

Raja Ram Mohan Roy: Indian reformer, Founder of Brahmo Sabha

Raja Ram Mohan Roy:  Indian reformer, Founder of  Brahmo Sabha 

राजा राममोहन रॉय: आधुनिक भारताचे जनक, ब्राह्मोसमाजाचे संस्थापक

22 मे : जन्मदिन 

स्मृतिदिन: 27 सप्टेंबर 


जीवन व कार्य:

भारतीय प्रबोधनाचे जनक, ब्राह्मोसमाजाचे संस्थापक व धर्मसुधारक, सतीची चाल आणि अन्य अनिष्ट रूढीविरोधात जनमत घडविणारे समाजसुधारक, वृत्तपत्रस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते, मानवतावादी व प्रखर बुद्धिवादी विद्वान अशा राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावी 22 मे 1772 रोजी झाला.

बॅनर्जी आडनाव असणाऱ्या या कुटुंबाला राममोहनच्या आजोबांपासून 'रॉय' म्हटले जाऊ लागले. त्यांचे वडील रमाकांत रॉय हे वैष्णव पंथाचे तर आई फुलठाकुरनी शाक्त पंथाची होती. रॉय यांचे घराणे सनातन संस्काराचे होते. 

राजा राममोहन यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. उंची सहा फूट, बांधा दणकट, रुंद कपाळ, धारदार नाक, काळेभोर डोळे, लांब कुरळे दाट केस आणि सुंदर चेहरा त्यांना लाभला होता.

राजा राममोहन रॉय यांचे आरंभीचे शिक्षण गुरुकुलात झाले. मौलवींनी त्यांना फारसीचे धडे दिले. त्यांच्या आईचा आग्रह यांनी संस्कृत शिकावे असा, तर वडिलांचा आग्रह गणित आणि अरेबिक शिकावे असा होता. सामाजिक शास्त्रे आणि इस्लामी अध्यात्मविद्या शिकण्यासाठी त्यांना पाटण्याला पाठविण्यात आले. वाराणसी येथे हिंदु धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला. 

तिबेटमध्ये ल्हासा येथे जाऊन त्यांनी बौद्धधर्माचा अभ्यास केला. हिब्रू, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, फारसी, अरेबिक, संस्कृत, इंग्रजी, उर्दू, बंगाली भाषा त्यांना अवगत होत्या. विविध देशांमधील साहित्य, संस्कृती, समाजदर्शन या भाषांच्या अध्ययनातून, घडले. बायबल, कुराण या धर्मग्रथांचा आणि ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा त्यांनी अभ्यास केला होता. आरबी भाषेतील तार्किक सुसंगती. मुताजिल म्हणजे बुद्धिवादी प्रवाह यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. वेदांच्या काही भागांचे, कनोपनिषद या उपनिषदाचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले. रंगपूरच्या वास्तव्यात जैनांचे कल्पसूत्र व इतर ग्रंथ, इंग्लंड व युरोपचा राजकीय विकास तसेच तांत्रिक वाङ्मयाचे अध्ययन केले.

तत्कालीन समाजातील अतिमानवीशक्ती यांचे स्तोम, अंधश्रद्धा, अज्ञान कार्यकारणभावाचा अभाव यामुळे त्यांचा हिंदू धर्मातील अनेक व्यवहारांबाबत भ्रमनिरास झाला. हिंदू मध्ययुगीन प्रवृत्तीविरोधी त्यांनी लढा देण्याचे ठरवले. 

हिंदू धर्मातील वेगवेगळे पंथ व मूर्ती यांच्याबाबत असणारे वाद, अनेकेश्वरवाद यावर त्यांनी प्रखर कोरडे ओढले. टीकात्मक निबंध लिहिले. परिणामी त्यांना घर सोडावे लागले.१५ व्या वर्षी घर सोडल्यावर ते तिबेटमध्ये गेले. त्यानंतर वाराणसी येथे अनेक वर्षे राहिले. 

 X X

ईस्ट इंडिया कंपनीत नौकरी:

ईस्ट इंडिया कंपनीत बंगालमधील रंगपूर या गावी महसूल विभागात नोकरी करू लागले. जॉन डिग्बी यांचे ते सहायक होते. 

पाच वर्षे त्यांनी ही नोकरी केली. या 5 वर्षात ख्रिश्चन, मुस्लिम व इतर धर्मीयांचा घनिष्ठ सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांच्या पुढील कार्याची तयारी पूर्ण झाली. 

जॉन डिग्बी इंग्लंडला परत गेल्यावर त्यांनीही ही नोकरी सोडली. सामाजिक सुधारणांचे विचार, त्यासाठी चळवळी, लेखन, जाणीव जागृती यात ते गुंतले गेले. 

X X

राजा राममोहन रॉय आणि भारतीय प्रबोधन:

 पाश्चात्य देशांमध्ये 16 व्या, 17 व्या शतकात ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची जी सुरवात झाली, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या उदयाने या सर्वांगीण परिवर्तनाला जी गती प्राप्त झाली ते प्रबोधन, पुनरुज्जीवन आशियायी देशांमध्ये भारत, चीन, इजिप्त या प्राचीन सभ्यतांचा वारसा असणाऱ्या देशांमध्ये, येण्यासाठी एकोणिसवे शतक उजाडले. 

विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर बाजारपेठांचा शोध घेणाऱ्या साम्राज्यांनी आशियायी देशांमध्ये प्रवेश केल्यावर पाश्चात्य विद्या, जीवनपद्धती, राज्यपद्धती, अर्थकारण या घटकांमधून प्रबोधनाची ही प्रक्रिया भारत व इतर अशियायी देशांमध्ये सुरू झाली. 

राजा राममोहन रॉय अशा प्रबोधनाचे जनक होते. रॉय यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची तर्कसंगत उत्पत्ती लावली. प्राचीन भारतीय विद्येचा त्यांना आदर होता. पण त्याचबरोबर पाश्चात्य प्रगतीचे आकर्षण होते. 

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे संश्लेषण करून पुनरुज्जीवनवादाचा त्यांनी संदेश दिला. देशवासीयांमध्ये जागृती, राष्ट्रीय जाणीव, भावी जीवनाची प्रगती, मध्ययुगीन विचारांना, प्रवृत्तींना विरोध, गतानुगतेऐवजी आधुनिकतेचा अंगिकार अशा प्रबोधनाच्या वैशिष्ट्यांचा राजा राममोहन रॉय यांनी स्वीकार केला. 

त्यासाठी त्यांनी कुलीनवाद, सतीप्रथा, बहुपत्नित्व, पुरोहितशाही, हिंदुमधील तत्कालीन अन्य संकुचित दृष्टिकोन यांना नकार दर्शवला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये त्यांनी जोपासली व प्रतिपादन केली. 

 मानवतावाद व आंतरराष्ट्रीयवादाचा पुरस्कार केला. पाश्चिमात्य शिक्षणातून या मूल्यांचे संस्करण होईल म्हणून स्वतः शिक्षण घेतले, ज्ञानविस्ताराचे कार्य केले. धर्मग्रंथांचा अभ्यास करून शास्त्रीय आधारावर त्यांचे परिशीलन केले. त्याआधारे त्यातील अनिष्ट बाबींवर आघात केले. 

 धार्मिक श्रद्धांना आध्यात्मिक, बौद्धिक पाया प्राप्त करून दिला. वैचारिकदृष्ट्या राजा राममोहन रॉय यांनी पाश्चात्य उदारमतवादी विचारप्रवाहांची मांडणी केली. त्यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मोसमाजात उदारमतवादी, सुधारणावादी तसेच पुनरुज्जीवनवादी हे दोन्ही प्रवाह दिसून येतात. त्यांची ब्राह्मोसमाजाची चळवळ ही नवयुगाचे प्रतिनिधित्व करणारी होती. 

नवभारताचे आद्य व्यासपीठ ठरलेल्या या ब्राह्मोसमाजाने जे प्रबोधन केले, त्यामुळे पुढील काळातील राजकीय जागृतता, राष्ट्रवाद यांना चालना मिळाली. होतकरू तरुण देशस्थितीबाबत चर्चा करू लागले. 

देशाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अंगांबाबत सखोल दृष्टी, नवीन जीवन व सृजनाची इच्छा यांची ओढ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. 

भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाचा हे प्रबोधन महत्त्वपूर्ण घटक ठरले. 1820 नंतर झालेल्या युरोपातील राष्ट्रवादी चळवळींचा त्यांना परिचय होता. 

राजकीय मुक्ततेसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमांबद्दल राजा राममोहन रॉय यांना आदर होता. भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण द्यावे म्हणजे त्यांना आधुनिक जगाचे ज्ञान होईल. ते स्वावलंबी बनतील. त्यांना आपले राज्य चालविता येईल. असा राजा रामहोन रॉय यांचा विचार होता. 

राजा राममोहन रॉय हे भारतीय प्रबोधनाचे शिल्पकार ठरले.

राजा राममोहन रॉय यांच्या उदारमतवादी विचारामुळे आणि बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनामुळे हिंदू धर्म आणि भारतीय समाजात व्यापक सुधारणा घडून आल्या. अनेक अनिष्ट सामाजिक व धार्मिक चालीरीतींविरुद्ध त्यांनी लढा दिला. 

X X

जातिवाद, सांप्रदायिक कर्मकांड, पुरोहितशाही इत्यादींबाबत योग्य उपाययोजना सुचवल्या. अनेक धर्माच्या चांगल्या तत्त्वांना एकत्रित करून मानवी धर्माचा त्यांनी पुरस्कार केला. 

विधवा विवाहाचे समर्थन केले. स्त्रियांच्या समानतेचा आग्रह धरला. थोडक्यात राजा राममोहन रॉय यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक क्षेत्रात नवीन विचार, दृष्टिकोन मांडले. नव्या तत्त्वज्ञानाचा, जीवनशैलीचा अवलंब केला.  म्हणून राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे रचनाकार, प्रेषित, प्रबोधनाचा अर्ध्वयु संबोधतात. 

X X

राजा राममोहन रॉय यांचे धर्मविषयक विचार :

परंपरागत भारतीय समाजात धर्म घटकाचा विलक्षण प्रभाव होता. दोनशे वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीत वाढलेल्या राममोहन रॉय यांच्यावर धार्मिक संस्कार स्वाभाविपणेच झालेले होते. धर्मावर त्यांचा विश्वास होता. 

हिंदू धर्मावर श्रद्धा होती. याशिवाय धर्म त्यांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय होता. धार्मिक ग्रंथ, साहित्य यांची समीक्षा, चिकित्सा करणे, त्यासाठी चर्चा घडूवन आणणे याची त्यांना रुची होती. 

कलकत्याला स्थायिक झाल्यावर आपल्या घरी ते अनेकांना धार्मिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलवत. वेगवगेळ्या धर्मांची तत्त्वे त्यांनी अभ्यासली होती. त्या-त्या धर्मातील मूलभूत ग्रंथांचे त्यांना चांगले ज्ञान होते. 

हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध धर्मांचे तत्त्वज्ञान अभ्यासून त्यांनी त्यातील भेददर्शक मुद्दे, साम्यस्थळे यांचे आकलन झाले होते. 

भिन्न धर्मांचा तुलनात्मक दृष्टिकोन, जाणते अजाणतेपणे, त्यांनी आत्मसात केला होता. राजा राममोहन रॉय धर्मसुधारक होते. जहाल धर्मसुधारक असे त्यांचे वर्णन करता येईल. मुसलमान धर्मसभेत मौलवी या उपाधिने त्यांना गौरवले होते. 

तिबेटात राहून त्यांनी बौद्ध विचार जाणून घेतले. दलाईलामाच्या अतिमानवी स्वरूपाबद्दल त्यांनी वाद घातला त्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले.

X X

सर्व धर्मांमधील समान तत्त्वांचा शोध घेणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली, “हे जगन्नियंत्या असा एक धर्म तू निर्माण कर जो माणसामाणसातील भेद, परस्परांबद्दल नावड नाहीशी करून माणसामाणसातील ऐक्य, सहजीवनास उपकारक ठरेल.”

प्राचीन भारतातील धर्म, संस्कृती, मध्ययुगातील भक्तिमार्गातून ऐक्य, बंधुभाव यांचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजा राममोहन रॉय यांनी ख्रिश्चन धर्म प्रचारकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार केला.

X X

राजा राममोहन रॉय यांचे राजकीय विचार :

उदारमतवाद :

उच्च श्रेणीचे मानवतावादी आणि विश्वबंधुत्ववादी अशी रॉय यांची ख्याती होती. रॉय हे प्रख्यात उदारमतवादी होते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या क्षेत्रातील ते योद्धे होते. 

सर्व देशांमधील सर्व लोकांना स्वातंत्र्य लाभले पाहिजे याचा त्यांनी शोध घेतला, राजकीय क्षेत्रासह समाजजीवनांच्या व्यक्तिजीवनाच्या सर्व अंगामधील स्वातंत्र्य हा त्यांच्या स्वातंत्र्याचा आशय होता. जगात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य, न्याय, लोकशाही असावी अशी त्यांची इच्छा होती. विचारस्वातंत्र्य आणि निर्णयाचे स्वातंत्र्य यांना त्यांनी सर्वोच्च स्थान दिले. 

विज्ञानावर आधारित पाश्चात्य शिक्षणाचा त्यांनी आग्रह धरला. नागरिहक्कांचे ते खंदे समर्थक होते. दिवणी आणि फौजदारी कायद्यांचे संहितीकरणात त्यांचा मोठा वाटा होता. यावर आधारित विज्ञान, विवेकवाद पाश्चात्य शिक्षणाचे ते कैवारी होते. त्यांच्याच पुढाकाराने भारतात पाश्चात्य शिक्षण बेटिंगच्या काळात सुरू झाले. 

पूर्वेकडील संस्कृती आणि पाश्चात्य विज्ञान यांच्यातील संयोगाचा विचार त्यांनी मांडला, उदारमतवादाला पोषक अशा अनेक प्रस्तावांची त्यांनी मांडणी केली. 

ब्राह्मो म्हणजेच सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ, शाश्वत होय. या सर्वश्रेष्ठ देवाला शीर्षक नाही हुद्दा किंवा निर्देशन नाही. मात्र या देवासाठी त्याग करणे अनुस्यूत आहे. ब्राह्मोसमाज सर्व जातींच्या, वर्णांच्या, रंगांच्या धर्मांच्या आणि देशांच्या लोकांसाठी खुला आहे. उदारता, दयाभाव यासारख्या गुणांची निर्मिती करणे हे त्याचे ध्येय मानले जाते. 

ब्राह्मोसमाजाचा हेतू हा एका विश्वधर्माची निर्मिती करणे असा असून त्यात मानवतावाद आणि विश्वबंधूत्व यांचा समावेश आहे. देवाचे पितृत्त्व आणि माणसाचे बंधुत्व या तत्त्वावर त्यांची श्रद्धा आहे. हिंदुसमाजातील तमोयुग घालवून तो शुद्ध करणे हा ब्राह्मोसमाज स्थापनेमागील विचार होता. 

सामाजिक धार्मिक अनिष्ट बाबींनी ग्रासलेल्या हिंदू समाजात मूलभूत क्रांतिकारक सुधारणा करणे , विवेकावर आधारित आध्यात्मिक लोकशाहीचा विचार राजा राममोहन रॉय यांनी मांडला. 

X X

स्वातंत्र्य :

लॉक, ग्रोशियस, थॉमसपेन प्रमाणे रॉय यांनी नैसर्गिक अधिकाराच्या सिद्धांताला मान्यता दिली होती. जीवित, स्वातंत्र्य, संपत्तीच्या अधिकारांबरोबर व्यक्तीच्या नैतिक हक्काचे तसेच व्यक्तिगत हक्कांचे ते कैवारी होते. 

1728 मध्ये एक पुस्तक लिहून प्राचीन काळी स्त्रियांना जे हक्क होते ते त्यांना पुन्हा मिळावे, वारसा हक्क हिंदू कायद्याप्रमाणे देण्यात यावे, मालमत्तेचा निम्मा वाटा मुलीला मिळावा, असे प्रदनाव त्यांनी सादर केले. 

विधवा विवाहाचा पुरस्कार केला. स्त्रियांना जिवंत राहण्याचा हक्क मिळावा. स्त्री पुरुषापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही या विचाराचे ते होते.  त्यांनी 1815 मध्ये स्थापन केलेल्या आत्मीय सभेचे उद्दिष्ट मुलींची विक्री प्रथा नष्ट व्हावी. स्त्री अधिकाराची पुनर्रप्राप्ती अशी होती. 

1818 मध्ये त्यांनी सतीविरुद्ध प्रबंध लिहिला. त्यांच्यावर बंगाली मुखपत्रांकडून टीका झाली. हिंदू धर्मसभेकडून निषेध झाला. त्यांनी मागणी केलेल्या हक्कांमध्ये जगण्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क, मन, बुद्धी, सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य, जगण्याचा हक्क, व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क अशा विविध हक्कांचा अंतर्भाव होता. त्याकाळचा संदर्भ विचारात राजा राममोहन रॉय यांनी लेखन, मुद्रण व वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य यावर भर दिला. 

वृत्तपत्र हे मत प्रकटणाचे प्रभावी साधन आहे, त्यातून समाजाचे उद्बोधन होते असे त्यांचे मत होते. 

धार्मिक स्वातंत्र्याला रॉय यांनी महत्त्व दिले. ते धार्मिक सहिष्णुतेचे पुरस्कर्ते होते. व्यक्तीला आपल्या पसंतीचा धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य हवे. राज्यकर्त्यांनी व्यक्तीच्या व समूहाच्या धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करू नये. 

एकूणच राजा राममोहन रॉय स्वातंत्र्याकडे मोठा ठेवा म्हणून पाहतात. स्वातंत्र्यप्रेम ही त्यांच्या कार्याची प्रेरणा होती. शरीर, मन, कृती, विचार या साऱ्यांसाठी स्वातंत्र्य केंद्रस्थानी आहे. 

स्वातंत्र्याच्या तीव्र इच्छेमुळे इतिहासात धर्म, वंश, घराणे, पायंडे, सामाजिक स्थान यांचे अडथळे तुडवणे असे मत त्यांनी नोंदले आहे. राजकीय आणि सामाजिक प्रगतीसाठी स्वातंत्र्य हे त्यांना महत्त्वाचे वाटते. स्वातंत्र्य संकल्पनेला देश समाज यांच्या मर्यादा नाही. ते म्हणतात स्वातंत्र्य ही वैश्विक संकल्पना आहे. 

व्यक्तीचे स्वातंत्र्य, राष्ट्राचे स्वातंत्र्य, सर्व समाजांना मिळणारे स्वातंत्र्य यांचाही त्यांनी विचार मांडला. 

X X

स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते :

राजा राममोहन रॉय हे भारताच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ततेबाबत मूग गिळून बसतात. रॉय हे दैवी वरदान सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. 

ब्रिटिश भारतात का आणि कोणत्या परिस्थितीत आले याची ते चिकित्सा करतात. देशभक्तीचा अभाव, धार्मिक आणि सभ्यताविषयक अतिरेकीपणा, आपापसातील यादवी, नामर्दपणा, प्रगत युद्धतंत्रज्ञानाचा अभाव, अज्ञान, जातीयतेने विदिर्ण असलेला समाज अशी अनेक  कारणे आपल्या पराभवाला आणि ब्रिटिशांच्या आगमनाला त्यांनी दिली आहेत.

 ब्रिटिशाच्या संपर्कामुळे सामाजिक, राजकीय, वाङमयीन प्रगती शक्य झाली. उद्योगवाढीस लागले, स्थानिक लोकांना स्थैर्य प्राप्त झाले. अंधश्रद्धेपासून मुक्ततेची शक्यता बळावली, राज्यकारभाराचे धडे गिरवता आले. 

X X

राज्य व कायदेविषयक विचार:

राजा राममोहन रॉय ब्रिटिशसत्तेचे समर्थक होते मात्र ब्रिटिशांकडून उदारमतवादी राजवट, जनतेचे कल्याण, हक्कांचे संरक्षण, स्वातंत्र्याचा परिपोष, देशाची आर्थिक, सामाजिक प्रगती, लोकशाही मूल्यांची प्रस्थापना अशा अनेक चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतात. त्या मिळत नसल्यामुळे नोकरशाहीवर ते टीका करतात. यातून त्यांचे राज्य व शासनविषयक विचार स्पष्ट होतात.

राजा राममोहन रॉय हे प्रातिनिधिक लोकशाही शासनाचा पुरस्कार करतात. अमर्याद, राजेशाही शासनप्रकाराला त्यांचा विरोध होता. 

निरंकुश राजेशाही ही एका व्यक्तीचे लहरी शासन असते. अशा शासनात प्रजेला पशुवत वागवले जाते. सर्वोत्तम शासनप्रकार ते मर्यादित घटनात्मक राजेशाहीला मान्यता देतात.

 न्यायव्यवस्थेवर त्यांनी सखोल विचार केला होता. न्यायिक प्रक्रिया योग्य, निःपक्षपाती आणि न्यायतत्त्वाला धरून असावी. कायदा व समन्याय बुद्धीने न्यायदान केले जावे.

 देशी भाषेत खटले चालवले जावे. त्यांना प्रसिद्धी दिली जावी असे त्यांना वाटते. 

कायद्याची त्या काळातील महत्त्वाची समस्या अशी होती की, भारतीयांसाठी कायदे भारताच्या कायदेमंडळांनी करायचे की, ब्रिटिश पार्लमेंटने अशी होती. राममोहन रॉय यांच्या मते इंग्लंडच्या संसदेला असे अधिकार असावे. स्थानिक राज्यकर्त्यांना ते नसावे. 

1832 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या प्रवर समिती समोर साक्ष देताना त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीऐवजी पार्लमेंटने भारतासाठी कायदे करावे हा विचार मांडला. कारण त्यांची सम्राटांच्या राज्यसत्तेवर निष्ठा होती. स्थानिक राज्यकर्त्यांना वटहुकूम काढण्याची तात्पुरती सत्ता असावी. 

X X

ब्राह्मो समाजाची स्थापना:

राजा राममोहन रॉय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. 

भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

 हिंदू समाजात सुधारणा, एकेश्वरी तत्त्वाचा प्रचार, धार्मिक भेदभाव समाप्त करणारा सर्व विध्वधर्म या त्यामागील प्रमुख प्रेरणा होत्या. 

ब्राह्मोसमाज कोणताही धार्मिक ग्रंथ ईश्वरनिर्मित मानत नाही. बायबलही नाही, वेदही नाही. मूर्तिपूजा उच्छेदासाठी त्यांनी वेदाचा आधार घेतला होता. 

धर्माचे एकेश्वरी स्वरूप हे ब्राह्मोसमाजाचे महत्त्वाचे तत्त्व होते. अनेक धार्मिक प्रार्थना, प्रथा राजा रॉय यांना मंजूर नव्हत्या. उपनिषदातील आध्यात्मिक ऐक्य मान्य होते. 

तत्त्वज्ञानात एक देव होता, तैहिद या कुराणातील ऐक्याचा प्रभाव रॉय यांच्यावर झाला व त्यामुळे अनेकेश्वर तत्त्व त्यांनी अमान्य केले असे त्यांच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. थोडक्यात एकाच उद्देष्य अशा देवाची उपासना करणे हे ब्राह्मो ध्येय होते. हा देव सर्वोच्च असतो. 

ब्राह्मो म्हणजेच सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ, शाश्वत होय. या सर्वश्रेष्ठ देवाला शीर्षक नाही हुद्दा किंवा निर्देशन नाही. मात्र या देवासाठी त्याग करणे अनुस्यूत आहे.

 ब्राह्मोसमाज सर्व जातींच्या, वर्णांच्या, रंगांच्या धर्मांच्या आणि देशांच्या 'लोकांसाठी खुला आहे. उदारता, दयाभाव यासारख्या गुणांची निर्मिती करणे हे त्याचे ध्येय मानले जाते. ब्राह्मोसमाजाचा हेतू हा एका विश्वधर्माची निर्मिती करणे असा असून त्यात मानवतावाद आणि विश्वबंधूत्व यांचा समावेश आहे. देवाचे पितृत्त्व आणि माणसाचे बंधुत्व या तत्त्वावर त्यांची श्रद्धा आहे.

 हिंदुसमाजातील तमोयुग घालवून तो शुद्ध करणे हा ब्राह्मोसमाज स्थापनेमागील विचार होता. सामाजिक धार्मिक अनिष्ट बाबींनी ग्रासलेल्या हिंदू समाजात मूलभूत क्रांतिकारक सुधारणा करणे या बाबतची उमेद रॉय यांचे मध्ये होती. त्यावेळी हिंदू समाजाची स्थिती अत्यंत खालावलेली होती. ब्रामोसमाजाच्या तत्त्वज्ञानात हिंदूधर्मातील अभिजात मूल्ये मान्य करण्यात आली होती, विवेकावर आधारित आध्यात्मिक लोकशाहीचा विचार राजा राममोहन रॉय यांनी मांडला. 

X X

निर्भिड पत्रकारिता:

राजा राममोहन रॉय यांनी 

1. 'ब्राह्मणिक मासिक'

2.  4 डिसेंबर 1821 रोजी "संवाद कौमुदी" हे बंगाली भाषेतील तर 

3. 12 एप्रिल 1822 रोजी "मिरात_उल_ अखबार" हे पर्शियन वृतपत्र वृतपत्र सुरू केले, (एकेश्वरवादाची देणगी) 

4. "बंगदूत" यांसारखे स्तरावरील पेपर संपादित-प्रकाशित केले. "बांगदूत" हे एक अनोखे पत्र होते. यामध्ये बंगाली, हिंदी आणि पर्शियन भाषा एकाच वेळी 1828 आल्या होत्या. 

1821 मध्ये एका भारतीय प्रतापनारायण दास यांना ब्रिटीश न्यायाधीशांनी फटके मारण्याची शिक्षा सुनावली यावरून त्यांच्या लढाऊ आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. परिणामी त्याचा मृत्यू झाला. राय यांनी या तोडफोडीविरोधात लेख लिहिला होता.

आधुनिकतेचा अर्थ जाणणारे 19 व्या शतकातील ते एकमेच विचारवंत होते. ते मानवी सभ्यतेचा आदर्श होते. जगातील सर्व लोकांचा, बंधुभाव, ज्यात सर्व राष्ट्रातील लोकांचा समावेश होते, ते विचार करीत होते. वृत्तपत्राचे अध्वर्यु म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कार्यामुळे बुद्धिमान वर्गात जागृती निर्माण झाली.

 बंगालमधील 'पेट्रियट', 'अमृतबाजार पत्रिका' या वृत्तपत्रांवरही त्यांचा प्रभाव होता. त्यांच्या बंगाली लिखाणामुळे बंगालमधील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. 

आज बंगाल जे बोलतो आहे तोच विचार उद्या देश करेल असे अभिमानाने ते तरुण म्हणत. पुढील राष्ट्रीय जागृतीचे रॉय हे पूर्वसूरी ठरले.

X X

सतिबंदीचा कायदा:

ब्रिटिश राजवटितील त्यावेळेचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राजा राममोहन रॉय यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून सती बंदीच्या कायद्याची निश्चिती केली होती. सतिबंदीचा कायदा गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने 4 डिसेंबर 1829 रोजी जाहीर केला होता. भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

X X

ग्रंथ संपदा:

इंग्रजी, बंगाली, परशियन, अरेबिकमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यात 1. वेदांतसार

2. केनोपनिशद

3. इशोपनिशद

4. कठोपनिशद

5. मंडुकोपनिशद

6. प्रिंसेप्टस् ऑफ जिझस

7. दि गाइड ऑफ पिस अँड हॅपिनेस इत्यादींचा समावेश आहे.

8. नवविचार प्रणालीची यथोचित कल्पना देणारे "सार्वत्रिक धर्म" नामक पुस्तक लिहिले होते.

 याशिवाय काही दस्तावेज, अर्ज, पत्रे त्यांच्या चळवळीसंबंधी त्यांनी प्रसिद्ध केले आहेत, त्यातून विविध विषयांवरील त्यांचे विचार त्यांनी मांडले आहेत.

X X

संस्था स्थापनेतील योगदान :

1. 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना (सहभाग द्वारकानाथ टागोर, शंकर घोषाल आणि प्रसन्नकुमार टागोर)
2. 1817 मध्ये हिंदू कॉलेज ची स्थापना केली.
3. 20 ऑगस्ट 1820 रोजी आपल्या धर्म विषयक आणि ईश्वर विषयक उदार तत्वज्ञानाचा व उपासना पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून राजा राम मोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती.
4. 1822 मध्ये ख्रिस्ती मिशनरी च्या मदतीने मुलींसाठी पहिली शाळा कलकत्त्यामध्ये सुरू केली. 
5. 1825  मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली.
6. 1828 साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
X X

राजा राममोहन रॉय यांचे निधन :

सतीबंदीचा कायदा विरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सती बंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून 19 नोव्हेंबर 1830 रोजी राजा राममोहन रॉय इंग्लंडला रवाना झाले होते. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन राममोहन रॉय यांना "राजा" हा किताब दिला होता. परदेशात राजा राममोहन रॉय यांचे सत्कार होऊ लागले होते.

येथील प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटू लागला होता. सभा समारंभातील त्यांच्या भाषणांनी आणि चर्चा संवादांनी भारताची प्रतिमा राजा राम मोहन रॉय यांनी उजळून टाकली होती.

इंग्लंडमध्ये राजा राममोहन रॉय आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. अनेक विद्वानांच्या त्यांनी भेटी घेतल्या. इंग्लंडहून ते फ्रांसला गेले. फ्रांसहून इंग्लंडला परतल्यावर 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टल शहरी त्यांचे निधन झाले.

रविंद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर आणि इतर सहकाऱ्यांनी कारनोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली आहे. 









View, comments and Share 


Post a Comment

3 Comments