BAMU : University Foundation Day
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपति संभाजीनगर वर्धापन दिन
23 ऑगस्ट
महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील हे सर्वात प्रमुख छ.संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ आहे.
या विद्यापीठाचे जुने नाव मराठवाडा विद्यापीठ असे होते व त्याची स्थापना 23 ऑगस्ट 1958 रोजी झाली होती.
X X
या विद्यापीठाच्या परिसराला नागसेनवन असे म्हणतात.हा विद्यापीठ परिसर 725 एकर (2.93 चौ. किमी) पसरलेला आहे. हिल्स एक सुंदर पार्श्वभूमी प्रदान करतात.
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) लेण्या विद्यापीठ परीसरातच आहेत. टेकडीच्या पायर्यावरील प्राचीन स्मारक सोनोरी महल (गोल्डन पॅलेस) हे कॅम्पसच्या मध्यभागी आहे,
तर बीबी का मकबरा उत्तरेकडे आहे. विद्यापीठाचे कुलपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल हे काम पाहतात.
विद्यापीठाचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी कुलगुरू ची नेमणूक केली जाते.
x x
विद्यापीठाचे ब्रीदवाक्य
हे ज्ञानिची पवित्रता । ज्ञानीचि आथि ॥ हे आहे.
ज्ञान संसाधन केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय आहे.
विद्यापीठ लायब्ररी इ.स. 1958 साली विद्यापीठ ग्रंथालय म्हणून स्थापन झाली.
विद्यापीठ ग्रंथालयामध्ये काही जुनी पुस्तके आहेत .ज्यांचे वर्ष 1600 पर्यंत आहेत.
अलीकडे नॉलेज रिसर्च सेंटर ने नोएडास्थित कंपनीद्वारे वर्ल्ड ई-बुक लायब्ररीची सदस्यता घेतली आहे.
X X
ज्यामुळे विद्यार्थ्यांना 300,000 पेक्षा अधिक ई-पुस्तके जर्नलंसह इतर दस्तऐवज मिळू शकतील.
विद्यापीठावर नियंत्रण हे विद्यापीठ अनुदान आयोग व राष्ट्रीय मूल्यमापन व मूल्यांकन समिती यांचे असते.
X X
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच छ.संभाजीनगर (औरंगाबाद) परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती.
आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथे उस्मानिया युनिव्हर्सिटी संबंधित सर्व सूचीबद्ध मराठवाड्यामध्ये नऊ महाविद्यालये आहेत.
मराठवाडा विभागात जनतेच्या मागणीसाठी विद्यापीठात 27 एप्रिल 1957 रोजी एक विद्यापीठाची समिति नियुक्ती करण्यात आली आणि अशा विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतच्या शिफारशी प्रदान करण्यासाठी एक समिती प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी नेमण्यात आली.
X X
महाराष्ट्राच्या राज्यपालाने 5 मे 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठ कायदा करारावर स्वाक्षरी केली.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे उद्घाटन छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विद्यापीठ अस्थायी मुख्य इमारतीचे परिसरात केले. एस.आर. डोंगरेकरी हे पहिले कुलगुरू झाले.
उस्मानिया विद्यापीठातून नव्याने स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठात 9 महाविद्यालयांचे संलग्नीकरण करण्यात आले:
1.शासकीय कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) (इ.स. 1923 साली स्थापन).
2.मिलिंद महाविद्यालय, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) (इ.स. 1950 मध्ये स्थापन)
3.पीपल्स कॉलेज, नांदेड (इ.स. 1950 मध्ये स्थापन)
X X
4.सरकारी कॉलेज ऑफ एज्युकेशन, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) (इ.स. 1954 मध्ये स्थापन).
5.मराठवाडा कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, परभणी (इ.स. 1956 साली स्थापन)
6.माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) (इ.स. 1956 मध्ये स्थापन)
7.सरकारी मेडिकल कॉलेज, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) (इ.स. 1956 मध्ये स्थापन)
8.योगेश्वरी विज्ञान महाविद्यालय, मोम्याबाद (इ.स. 1956 मध्ये स्थापन)
9.जालना एज्युकेशन सोसायटीचे,आर.जी.बगडिया कला,एस.बी.लखोटिया वाणिज्य आणि आर. बेझंजी विज्ञान महाविद्यालय, जालना (इ.स. 1958 साली स्थापन)
X X
विद्यापीठ नामांतर:
मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार:'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ'नामांतर आंदोलन हे 1976 ते इ.स.
1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती.
शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.
X X
14 जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला 17 वर्ष संघर्ष करावा लागला.
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे.
दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण, उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात.
अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित नि कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
उच्चशिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते.
x x
हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते.
त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी 1950 ला छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.
मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते.
बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला.
त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.
या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली.
X X
शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यवाचक नावे होती.
व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे.
यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे 1960 साली स्थापन झाले, शिवाजीचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून छ.संभाजीनगर (औरंगाबाद) आहेत. विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव 27 जुलै इ.स. 1978 ला संमत करण्यात आला.
17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारने 14 जानेवारी इ.स. 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला.
13 जानेवारी 1994 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. शरद पवार यांनी सायंकाळी 7.45 वा. दूरदर्शन वरून मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्याचे घोषित केले.
x x
14 जानेवारी 1994 पासून मा. राज्यपालांनी काढलेल्या अध्यादेशाद्वारे औरंगाबादचे विद्यापीठ "डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" या नावाने ओळखले जाउ लागले.
त्याच दिवशी नांदेड येथे "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" या नावाने नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली.
ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. विद्यापीठाचे पहिले नाव ,
'मराठवाडा विद्यापीठ' छ.संभाजीनगर (औरंगाबाद)
असे होते. नामांतरानंतर
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ " छ.संभाजीनगर (औरंगाबाद)
एवढेच झाले.
नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला .
उस्मानाबाद उप-केंद्र:
5 ऑगस्ट 2004 रोजी, विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे स्थापित झाले. उस्मानाबादमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे तात्पुरती सुरुवात केली गेली आहे.
X X
विद्यापीठातील अध्यास केंद्र:
राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत व त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेल्या अध्यासनांमध्ये ;
1. अण्णाभाऊ साठे अध्यासन
2.मौलाना अबुल कलम आझाद अध्यासन
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र
4. बाळासाहेब पवार अध्यासन
5. गौतम बुद्ध अभ्यास केंद्र
6. ग्रामीण समस्या संशोधन केंद्र
7. महात्मा गांधी अध्यासन
8. ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र
9. महात्मा फुले अध्यासन
10. शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र
11. राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र
12. वसंतराव नाईक अध्यासन
13. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन
X X
अशा 13 अध्यासनांचा समावेश आहे.
महात्मा फुले अध्यासन हे 25 वर्षांपूर्वीहून अधिक वर्षे कार्यरत आहे. या केंद्राचे तेवढे भरीव योगदान राहिलेले आहे.
पा.बा. सावंत हे या अध्यासन केंद्राचे संस्थापक संचालक होते. त्यानंतर प्रा. बा.ह. कल्याणकर यांनी या अध्यासन केंद्राची धुरा सांभाळली.
x x
बा.ह. कल्याणकर व पा बा. सावंत यांनी या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात प्रबोधनाचे कार्य केले आहे.
इ.स. 2016 मध्ये कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांच्यासमोर अध्यासनांच्या संचालकांची फेररचना करण्याचे मोठे आव्हान होते.
विद्यार्थी संघटना किंवा अन्य काही मार्गाने विद्यापीठाकडे मागणी आल्यामुळे नवीन अध्यासनांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये,
1. गोपीनाथ मुंडे सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट सेंटर
2. विलासराव देशमुख अध्यासन केंद्र
3. यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र,
उस्मानाबाद येथे विद्यापीठ उपकेंद्राच्या ठिकाणी,
1. भाई उद्धवराव पाटील अध्यासन केंद्र
2. गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रांचा
समावेश आहे.
यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांची तरतूदही करून ठेवली आहे. त्याच प्रमाणे ,
जैन अध्यासन केंद्र
सुरु करण्याचा मानस आहे इ.स. 2016 मध्ये ,
लिबरल आर्ट मध्ये पुरातत्व विद्या
हे नविन विभाग सुरु झाला आहे.
View,Comments and share
12 Comments
Very nice information sir 👍 👍
ReplyDeleteGr8 information ....Hats off 👆👆
ReplyDeleteNice
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteUseful Information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice information sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteबहुत बढ़िया जानकारी दी गई है। आपका अभिनन्दन
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete