Subscribe Us

header ads

Sangam literature संगम वाङ्मय (साहित्य)

 संगम वाङ्मय (साहित्य) 



संगम साहित्याची निर्मिती ही मदुरेच्या पांड्य राजांच्या आश्रयाने घडून आली.

 प्राचीन तामिळ वाङ्मय संगम वाङ्मय या नावाने ओळखले जाते. 

संगम साहित्य युगाचा काळ हा साधारणपणे पहिले शतक ते सहावे शतक असा गृहीत धरला आहे.

 भारताच्या अतिदक्षिणेकडील तामिळनाडू व केरळ राज्यांच्या इतिहासाविषयी फारशी अधिकृत माहिती इतिहासात नाही. 

सम्राट अशोकाचे शिलालेख तसेच कलिंग देशाचा राजा खारवेलच्या जुनागढ येथील शिलालेखातून या प्रदेशाच्या इतिहासाचे काही धागेदोरे जुळतात. 

X X

कलिंग देशाचा राजा खारवेल याने त्याच्या कारकीर्दीच्या ११ व्या वर्षी तामिळ राज्यावर स्वारी करून ते उद्धवस्त केले. 

एवढेच नव्हे तर तामिळ राज्यातील मोती, घोडे, हत्ती, जवाहिर इ. ची लूट केली. 

तामिळनाडूतील पांड्य राज्याशी खारवेलने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते.

संगम या विद्वत्तसभा होत्या व त्यांचे काम फ्रेंच अकादमीच्या धर्तीवर चालत होते. 

पांड्य राज्यांमध्ये अशा तीन संगम झाल्याचा दाखला मिळतो. हा काळ संगम काळ' म्हणून तामिळ इतिहासात प्रसिद्ध आहे. हा कालखंड तामिळ वाङ्मयाचे सुवर्णयुग मानला जातो.

 विविध, विपुल व चिरंजीवी अशी ग्रंथरचना या काळात झाली.

पहिली संगम जुन्या मदुरेला पांड्य राजांच्या आश्रयाखाली भरली होती.

 तिचा प्रारंभ अगस्त्य मुनीच्या हस्ते झाला. तिने 4499 लेखकांच्या ग्रंथांचे परीक्षण करून त्यांना पुरस्कार दिला.

 दुसरी संगम कवाटपुरम येथे भरली. या सभेने 3700 कवींना पुरस्कार दिला.

 तिसरी संगम उत्तर मदुरा येथे पांड्य राजांच्या आश्रयाखाली भरली होती. मक्कीर हा त्याचा अध्यक्ष होता. या संघाकडे 449 कवींनी आपल्या रचना पाठवल्या. 49 राजांनी या संघाचे संरक्षण केले.

जे स्वायत्त साधारणतः संगम साहित्यात तामिळ प्रदेशातील प्रामुख्याने तीन प्रमुख राजघराणी (पांड्य, चौल, चेर) यांचा समावेश होता. 

त्याशिवाय 7 लष्करी नायक, सत्ताधीश होते किंवा मांडलिक होते त्या 3 राजवंशांनी व त्या 7 लष्करी सत्ताधीशांनी कवींना जो आश्रय दिला त्यामुळेच तामिळ भाषेत वाङ्मयनिर्मिती होऊ शकली.

पहिले संगम साहित्य युग इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात होऊन गेले. यासंबंधीची माहिती पुलगूर येथील अर्नातमल्लही टेकड्यांवरील शिलालेखात आहे. 

स्ट्रॅबो, पेरिप्लस, प्लिनी व टॉलेमी यांच्या लिखाणातही दक्षिणेकडील राजांच्या आश्रयाने संगम सभा होत होत्या व त्यात काही काव्यनिर्मिती केली जात होती असे वर्णन केले आहे.

X X

प्रमुख तामिळ ग्रंथ (साहित्य)

1) एटटुतो - यात 8 संग्रहग्रंथ आहेत.

1) कलित्तोग

2) पारिपाडल - हा दीर्घ व अवडंबरयुक्त गीतांचा संग्रह आहे.

3) एंगरूनूरू - यात चेर राजवंशाची प्रशंसा आहे.

 4) पदिट्रपतू यात चेर राजवंशाची प्रशंसा आहे.

5) अहनानूरू ही भावगीते आहेत.

6) पुरनानुरू - यात बाह्य जगाचे वर्णन केले आहे.

7) नटिणे यात प्रेमगीतांचा संग्रह आहे.

8) कुरुंतोगे - यात प्रेमगीतांचा संग्रह आहे.

2) पत्तुपाटटू :

यात 10 दीर्घ कवितांचा संग्रह आहे. त्यापैकी 9 संग्रहीत तामिळनाडूमधील राजे, त्यांचे औदार्य, व्यापार, युद्ध, पर्वतीय दृश्ये व लोकजीवन यांचे वर्णन आहे. 

दक्षिण भारतातील राजकीय परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगाचा आहे.

3) पदिनेणकीलकणक्कू :

 पदिनेमकीलकणक्कू हा 18 सुक्तिग्रंथाचा आहे. या सर्व काव्यात नीती व शील यांना प्राधान्य दिले आहे.

 यातल्या कित्येक संग्रह सुक्ती संस्कृत सुभाषितांसारख्या आहेत. या संग्रहातील 18 वा ग्रंथ 'तिरुवल्लावररचित'करल हा आहे. त्याला तामिळवेद म्हणतात.

 विद्वानांनी या ग्रंथाची मुक्तकंठाने प्रशंसा क केली आहे. हा तामिळ भाषेतील एक उत्कृष्ट धार्मिक ग्रंथ आहे. 

दोन ओळीची एक कविता व 10 कवितांचा एक गुच्छ अशा प्रकारे 133 अध्यायांत या ग्रंथाची मांडणी केली आहे. 

धर्म, अर्थ, काम असे या ग्रंथाचे 3 विभाग आहेत. प्रत्येक विभागात त्याने एका पुरुषार्थाची चर्चा केलेली आहे.

 चौथा पुरुषार्थ मोक्ष याविषयी त्याने काहीच लिहिले नाही. त्याचे म्हणणे असे की, मनुष्य निष्ठापूर्वक स्वधर्म आचारील तर त्याला मोक्ष आपोआपच मिळेल.

 मदुरा येथे संगमच्या विद्वानांपुढे तिरुवल्लवराने या ग्रंथाचे वाचन केले होते. ते ऐकून सर्व पंडित विस्मयचकित झाले. 

सर्वांनी या ग्रंथाला एकमुखी मान्यता दिली होती. या ग्रंथातील विचार सर्वंकष आहेत. ते देशकालातीत आहेत. 

तामिळ साहित्याचा तो एक अमृतकलशच होय. 2000 वर्षापूर्वीच्या तामिळ संस्कृतीचे चित्र त्यात पाहावयास मिळते. 

4) चौलकाप्पियम् :

 हा व्याकरण ग्रंथ आहे. 

चौल काप्पियर हा अगस्त्य मुनींचा तामिळनाडूतील अग्रगण्य शिष्य होता.

 हा ग्रंथ दुसऱ्या संगमने प्रमाणभूत ठरवला होता. या ग्रंथात म्हटले आहे की, तामिळी लोकांनी विवाह हा पवित्र धार्मिक संस्कार (विधी) आर्य संस्कृतीकडून घेतला आहे. 

विवाहाचे 8 प्रकार तामिळनाडूत रूढ झाले.

X X

5) शिल्प्पादिकरम् :

हे एक प्रसिद्ध प्रेमकाव्य आहे.

 कोव्वलनव त्याची पतीनिष्ठ पत्नी कणअणगी यांची हृदयस्पर्शी कथा त्यात वर्णीली आहे. 

आपल्या सुंदर पत्नीला सोडून माधवी नावाच्या वेश्येच्या नादी लागला; पण सर्व संपत्ती गमावल्यानंतर राजाने त्याला पश्चाताप झाला. तो परत पत्नीकडे आला.

 मदुरा येथील पांड्य चुकून कोब्वलनच्या शिरच्छेदाचा हुकूम बजाविला. त्याच्या वधामुळे दुःखी झालेल्या साध्वी कण्णगीने हृदय पिळवटून टाकणारा शोक केला. तिने राजाला शाप देऊन मदुरेचा नाश केला. स्वर्गामध्ये प्रेमिकांची भेट झाली. 

कण्णगी ही तामिळ प्रांताची पातिव्रत्य देवता मानली जाते.

6) मणिमकलै :

 हे तामिळ भाषेतील प्रसिद्ध महाकाव्य तामिळ भाषेत लिहिले गेले. 

ते मदुरा येथील एक बनियाने (जो अन्नधान्याचा व्यापारी करी) लिहिले.

 त्यात कोव्बलन व माधवी यांच्यापासून झालेल्या मुलींचे जीवनवर्णन आहे. हे महाकाव्य धार्मिक अधिक आहे, साहित्यिक कमी आहे.









View, Comment and share

Post a Comment

1 Comments

  1. खूपच महत्वपूर्ण माहिती

    ReplyDelete