संगम कालखंडातील समाजजीवन
(चौल, पांड्य व चेर )
दक्षिण भारतात तामिळनाडू व केरळ भागावर इसवी सन दुसऱ्या ते इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या चौल, पांड्य व चेर यांचा अभ्यास या राजसत्तांचा उदय व विकास याची माहिती मिळते.
संगम साहित्यावरून त्या काळातील समाजजीवनाचे विविध पैलू स्पष्ट होतात.
तामिळ प्रांतातील लोकांनी आर्य लोकांच्या काही प्रथा, परंपरा, विधी जशास तसे स्वीकारले होते.
राजे-महाराजे व धनाढ्य लोक वैदिक यज्ञ करण्यात बराच पैसा खर्च करत. राजदरबारी ब्राह्मणास प्रतिष्ठा होती. दक्षिणेतील अनार्यांनी उत्तर भारतातील आर्य संस्कृती स्वीकारली होती.
उत्तरेतील आर्य संस्कृतीतील सामाजिक व धार्मिक संस्था, रूढी व परंपरा व चालीरीतींचा सहज स्वीकार करून तामिळ समाजाने स्वतः परिवर्तन घडवून आणले होते.
संगम कालखंडात अनेक धार्मिक प्रथा व रूढी होत्या. शुभ अशुभ, भूत-भविष्य इ. गोष्टींवर लोकांचा विश्वास होता.
दुष्ट शक्तीपासून लहान मुलांचे रक्षण व्हावे, पाऊस पडावा, पीक उत्तम यावे इ. इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून धार्मिक विधी करणे, यज्ञ करणे इ. गोष्टी तामिळ समाजात रूढ झाल्या होत्या.
X X
मेगॅस्थेनिसने 'इंडिका' ग्रंथात पांड्य राज्याचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, पांड्य राज्य मोत्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. तो असेही लिहितो की, पांड्य राज्याचे शासन स्त्रियांच्या हाती होते. म्हणजेच पांड्य समाज हा मातृसत्ताक होता.
संगम साहित्याच्या माध्यमातून पांड्य राज्य समृद्ध होते असे दिसते.
पांड्य राज्यांनी रोमन साम्राज्याशी व्यापार करून समृद्धी मिळवली. पांड्य राजांनी रोमन सम्राट ऑगस्टसच्या दरबारी आपले राजदूत पाठविले होते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच पांड्य राजे वैदिक यज्ञ करीत असत.
पांड्य राज्य हे आधुनिक तित्रेवेल्ली, रामनंद व मथुरा या ३ जिल्हांत होते.
चौलांचे राजनैतिक केंद्र उरेमुरे होते जे सुती कापडाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते.
इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मध्यास एलारा नावाच्या एका चौल राजाने श्रीलंकेवर विजय मिळवला व तेथे ५० वर्षे राज्य केले.
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासूनच चौलींचा सुनिश्चित इतिहास उपलब्ध होतो.
कारिकालाने श्रीलंकेतून १२००० गुलाम कैदीर म्हणून आणले व कावेरी नदीवर १६० किलोमीटर लांब बंधारा बांधला.
पांड्य, चौल व चेर या तिन्ही राज्यांचे पश्चिमी राष्ट्रांशी व्यापारी संबंध व्यापक प्रमाणात होते. या तिन्हीही राज्यांत मसाल्यांच्या पदार्थाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होई व मसाल्यांच्या पदार्थांना पाश्चिमात्य देशांत मोठी मागणी होती.
तसेच हस्तिदंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हस्तिदंताच्या वस्तूंना युरोपच्या बाजारपेठेत मागणी होती.
समुद्रकिनाऱ्यावर प्राप्त होणारे मोती, रत्ने यांचीही निर्यात पश्चिमी देशांना होई.
त्याशिवाय रेशीम व मलमलचे उत्पादन होई. प्राचीन तामिळ साहित्यातून रेशीम कपड्यावरील नक्षीकामाचे उल्लेख आहेत. तेथे तयार होणारे सुती कापड सापाच्या कातीनप्रमाणे पातळ होते.
X X
उरैभूर हे सुती कपड्याच्या व्यापारसाठी प्रसिद्ध होते. तांदूळ, अद्रक, दालचिनी इ. वस्तूंची युनानी भाषेतील नावे तामिळ भाषेवरून घेतलेली आहेत.
इसवी सनाच्या प्रारंभीच्या अडीच शतके दक्षिणेकडील राज्यांचा रोमशी व्यापार होता. या व्यापाराच्या अस्ताबरोबरच दक्षिणेकडची ही राज्येही बुडाली.
तामिळ प्रदेशात अन्नधान्य, फळे, मिरची व हळद यांचे प्रचंड उत्पादन होते. शेतीच्या उत्पादनाचा कितवा हिसस राजास मिळे हे मात्र निश्चित सांगता येत नाही.
शेती उत्पादनाचा जो हिस्सा राजास मिळे त्या उत्पन्नातूनच राजा सैनिकांचा किंवा लष्करी दलांचा पगार करत असे.
तामिळ भूमीत, ब्राह्मण संगम युगातच प्रथम दिसून येतात. आदर्श राजा जो की, तो ब्राह्मणांना त्रास देत नाही असा संकेत रूढ होता. विशेषत: ब्राह्मण कवींना राजदरबारी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. तामिळ राजे उदारतापूर्ण पारितोषिक देत असत.
राजा कारिकालने एका कवीला १६,००,००० सुवर्णमुद्रा देऊन पुरस्कृत केले होते असा उल्लेख आहे. पण ती अतिशयोक्ती वाटते.
सुवर्णमुद्रांशिवाय कवी व भाटांना भूमी, रथ, घोडे, हत्ती याचेही दान दिले जाई.
संगम साहित्यातून क्षत्रिय व वैश्य या वर्णातील लोकांचे उल्लेख आहेत. यौद्धयांचा वर्ग राज्यव्यवस्था व समाजजीवनात महत्त्वाचा होता.
सेनाध्यक्षाला 'एनाडी' पदवी दिली जात असे. शासक वर्गास 'अरसर' म्हटले जाई.
चौल व पांड्य राज्यांत सैनिक व असैनिक विभागात 'बल्लाळ' हे श्रीमंत जमीनमालक अधिकार पदावर नेमले जात.
बल्लाळ व असर यांच्यात वैवाहिक संबंध होत असत. बल्लाळांकडे शेती मोठ्या संख्येने होती.
बल्लाळातही गरीब व श्रीमंत होतेच. प्रत्यक्ष शेती करणारा जो वर्ग होता तो खालच्या स्तरातील होता.
काही कारागीर शेतीव्यवसाय करत. वनवासी (आदिवासी) लोक अत्यंत गरीब होते. हे स्पष्टपणे दिसते.
श्रीमंत लोक विटांच्या घरात राहत तर गरीब लोक झोपडपट्टीत राहत.
तामिळनाडूत जो प्रखर जातिभेद नंतरच्या काळात दिसून येतो तो प्रारंभिक संगम काळात नव्हता.
ब्राह्मणी संस्कृतीचा उदय व विकास तामिळनाडूत झाला. त्याचे क्षेत्र तामिळनाडूच्या काही भागांपुरते मर्यादित होते.
संगम साहित्यातून तत्कालीन व्यापार, शेती, शिल्पकारी इ. संबंधी काही माहिती मिळते.
संगम साहित्यात कांची, कोकेई, मदुरै, पुहार व उरेमुर या शहरांचे उल्लेख येतात. ही माहिती किंवा उत्खननातून प्राप्त होणारी माहिती किंवा रोमन ग्रंथातील माहितीशी बरीचसी मिळते.
संगम साहित्य प्रामुख्याने उपदेशात्मक स्वरूपाचे होते. हा उपदेश समाजातील विविध वर्ग, व्यावसायिक वर्ग, राजा व राजसभा यांच्यासाठीही होता.
X X
सदूर दक्षिणेला 'तामिलकम' असेही म्हटले जाई. ब्राह्मणी धर्मसंबंधीच्या ग्रंथात कावेरी नदीचा उल्लेख एक पवित्र नदी म्हणून आहे.
वैदिक धर्माचा फार मोठा प्रभाव सदूर दक्षिणे (तामिळकम) वर संगम काळातच पडला होता असे दिसते.
गोहत्या, ब्राह्मणाचा वध हे भयंकर अपराध मानले जात होते. दक्षिणेकडचे (तामिलाकम) राजे उत्तरेकडील राजांप्रमाणे धार्मिक यज्ञ, समारंभ, विधी करताना दिसतात.
उत्तरेकडील ब्राह्मणांप्रमाणे तेथील ब्राह्मण वेदाध्याय, ज्ञानार्जन, धर्मविधी करत असत. मंदिरात जाऊन पूजा करणे, प्रार्थना करणे, आरती करणे, देवांना खुश करण्यासाठी मंदिरात नृत्य करणे इ. प्रकार सदर दक्षिणेस (तामिलकम) रूढ झाले होते. ब्राह्मणांना राजदरबारी महत्त्व प्राप्त झाले होते.
राजा, सेना नाचवा (एनाडी) यांच्याजवळ भरपूर संपत्ती होती. या लोकांचे मदिरापान, विषयवासना व मनोरंजनाचे प्रकार याचे सचित्र चित्र संगम काळातील कवींनी रेखाटले आहे. या काळात पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते.
विधवांची अवस्था वाईट झाली होती. सती पद्धत रूढ झाली होती.
संगम साहित्यात काही व्यावसायिकांचे उल्लेख येतात.
उदा. पुलैचन (रस्सीची चारपाई तयार करणारे) चरवाहो (जनावरांना चारा चारणारे)मलवार ( हे अडाणी होते व डाके घालणे हा त्यांचा व्यवसाय होता.)
View, Comment and share
1 Comments
Useful information
ReplyDelete