Subscribe Us

header ads

Lokmanya Bal Gangadhar Tilak

Lokmanya Bal Gangadhar Tilak 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

23 जुलै: जयंती 

1 ऑगस्ट : पुण्यतिथी




लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला.

 रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.

अत्यंत सात्विक परंपरा प्रिय सुसंस्कृत असणारे आई-वडील हेच त्यांचे प्रेरणास्त्रोत होते.

इसवी सन 1872 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 1878 ला बी. ए. व 1879 मध्ये एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले.

 लोकमान्य टिळकांनी शिक्षण संस्था व वृत्तपत्रे या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला प्रारंभ केला.

एक विद्वान, निर्भय व झुंजार नेते म्हणून त्यांचा लौकिक महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेरही झाला होता.

 भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात टिळकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. 

अखिल भारतीय पातळीवरील देशाचे पहिले नेते अशी त्यांची ओळख आहे.

 देशाच्या सर्व प्रदेशात सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचे नाव पोहोचले होते. देशाच्या सर्वच भागात त्यांना अनुयायी लाभले होते.


लोकमान्य टिळकांचा "केसरी"

इसवी सन 1880 मध्ये "केसरी" हे मराठी साप्ताहिक व "मराठा" हे इंग्रजी साप्ताहिक लोकमान्य टिळकांनी सुरू केले.

 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करणारी मंडळीच या वृत्तपत्राच्या संपादक मंडळात होती. 

प्रारंभीच्या काळात टिळक धर्मशास्त्र व कायदा या विषयावर लेख लिहीत  असत. 

इसवी सन 1888 पासून टिळक केसरीचे संपादक म्हणून नियमितपणे लिखाण करू लागले. हळूहळू केसरी हे लोकपत्र बनले टिळकांनी लोकांवरील अन्याय जुळवून राज्यकर्त्यांचे जुलमी कायदे व कृत्ये ही सतत केसरीत मांडून लोकमत अनुकूल करून घेतले.

X X


टिळकांचे शैक्षणिक कार्य

1 जानेवारी 1880 रोजी पुणे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 

पुढे काही सहकाऱ्यांच्या सहकार्याने सहाय्याने त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने इसवी सन 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले.

 टिळक गणित व संस्कृत या विषयाचे अध्यापन करत टिळकांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद हवे होते पण टिळक अल्पमतात होते. 

त्यांचे नामदार गोखले, वामन आपटे व आगरकर यांची मतभेद होते. 

शेवटी टिळक 1888 मध्ये या दोन्ही संस्थांचे त्यागपत्र देऊन बाहेर पडले.


लोकमान्य टिळकांचा प्रारंभीचा तुरुंगवास व राजद्रोहाचा पहिला खटला

टिळकांना अनेकदा तुरुंगात जावे लागले होते. कोल्हापूर संस्थांचे दिवाण बर्वे यांच्या विरुद्ध केलेल्या वृत्तपत्रीय लिखाणामुळे टिळक आगरकरांवर खटला चालला. 

ते दोघे साडेतीन महिने तुरुंगात होते "डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस" हा ग्रंथ आगरकरांनी तेथे लिहिला. 

इसवी सन 1896 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ व प्लेगची साथ यांनी थैमान घातले. याकडे सरकारचे दुष्काळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. 

या पार्श्वभूमीवर प्लेग कमिशनर रॅड व त्यांचा सहकारी अम्हस्ट यांचा खून चाफेकर बंधूंनी केला. 

टिळकाने केसरीतून अत्यंत जहाल स्वरूपाचे टीका ब्रिटिश सरकारवर केली "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' राज्य करणे म्हणजे सूड-उगविणे नव्हे.' राजद्रोह कशाला म्हणतात? या शीर्षकाचे त्यावेळचे टिळकांचे अग्रलेख खूपच गाजले. 

24 जुलै १८९७ रोजी टिळकांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला चालला  रॅड च्या हत्येला उत्तेजन दिले म्हणून ब्रिटिशांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला व त्यांना 18 महिने कारावासाची शिक्षा झाली व नंतर ते 6 सप्टेंबर 1897 रोजी टिळकांची तुरुंगातून सुटका झाली.

X X


टिळक :गणेशोत्सव व शिवजयंती 

इ.स. 1893 मध्ये टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.  

हिंदूंत एकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणपती उत्सवाला सामाजिक स्वरूप प्राप्त करून दिले. 

सर्व जाती या उत्सवात भाग घेऊ लागल्या. त्यामुळे जनजागृती व सामाजिक ऐक्य प्रस्थापित होण्यास मदत होईल असे टिळकांना वाटत होते.

 टिळकांना स्वसंस्कृती व धर्माबद्दलचा अभिमान अशा उत्सवातून वाढीस लागेल असे वाटत होते. 

गणपती उत्सवामागे ब्रिटिशांचे राज्य उलथवून टाकणे ही प्रेरणा होती.

 गणराज्य देणारा गणपती म्हणजे स्वतंत्र देवता आहे असे टिळक सांगत असत.

 गणेशोत्सव हे लोकजागृतीचे प्रभावी माध्यम बनले. 

वऱ्हाड-मध्यप्रांतात तसेच हैदराबाद संस्थानातील मराठवाड्यात गणेशोत्सव हळूहळू साजरा होऊ लागला.

इ.स. 1896 मध्ये टिळकांनी रायगड येथे असलेल्या शिवसमाधीच्या जीर्णोध्दाराची चळवळ हाती घेतली.

 रायगडावर त्यांनी शिवजयंती साजरी केली. शिवाजी महाराज हे शौर्य, धैर्य, राष्ट्रप्रेम यांचे प्रतीक होते. त्यांनी अन्याय, जुलूम व अत्याचारांविरुद्ध लढा दिला होता. 

त्यांचे कार्य एका जातीपुरते नव्हते म्हणून महाराष्ट्रातील विविध जातींचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्याचे स्थळ म्हणजे शिवचरित्र होय. 

महान पुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम ठेवण्याचे एक चांगले साधन आहे असे टिळक म्हणत. 

इ.स. 1906 सालच्या शिवाजी उत्सवासाठी टिळकांना कोलकाता येथे निमंत्रित करण्यात आले होते.


टिळक व पुणे सार्वजनिक सभा 

पुणे सार्वजनिक सभा ही मवाळ सुधारणावाद्यांच्या हातात 25 वर्षापासून होती. 

टिळकांनी इ.स. 1895 मध्ये या सभेची सूत्रे हाती घेतली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कृतिप्रवण राजकीय चळवळीस प्रारंभ केला होता. या संस्थेच्या कार्यकर्त्यांना खेडोपाडी पाठवून त्यांच्यामार्फत सरकारने केलेल्या Famine Relief Code नुसार शेतकऱ्यांना मिळावयाच्या सवलतीची त्यांना माहिती करून दिली.

 Famine Relief Code चे मराठी भाषांतर करून त्याच्या प्रती जनतेला वाटाव्यात अशी मागणी टिळकांनी केली होती. या उपक्रमामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांत जागृती निर्माण झाली होती.


लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री 

अगदी प्रारंभीच्या काळात टिळकांचाही नेमस्तांच्या मार्गावर विश्वास होता. पण तो उडाला. 

त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चार सूत्रांचा वापर राष्ट्रीय चळवळीसाठी केला.

1) स्वराज्य 

लखनौ येथे 1916 मध्ये टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच' ही सिंहगर्जना केली होती. 'स्वराज्य' व 'सुराज्य' या दोन कल्पनातील फरक टिळकांनी स्पष्ट केला होता. 

स्वराज्य म्हणजे आपले राज्य प्रजेच्या प्रतिनिधीमार्फत चालणारे राज्य.

 टिळकांच्या व्याख्येनुसार ब्रिटिशांच्या राज्यास स्वराज्य कधीच म्हणता येणार नाही. कारण त्यात राज्यकर्ते परधर्मी व परदेशी आहेत. त्यांचे हितसंबंध त्यांच्या स्वत:च्या देशात गुंतलेले आहेत.

 स्वराज्याचा 'प्रजासत्ताक राज्य' हा अर्थ त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविला.

 टिळक म्हणतात, 'नैतिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अनुकूल परिस्थिती फक्त स्वराज्यातच असते. टिळकांनी स्वदेशीची कल्पना लोकप्रिय करून तिला चळवळीचे रूप दिले.

2) स्वदेशी

दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त, म. गो. रानडे इत्यादींनी मांडलेल्या आर्थिक शोषणाचे सूत्रच घेऊन टिळकांनी भारताच्या आर्थिक अवनतीसंबंधी लिखाण केले. 

स्वदेशीच्या बाबत सुशिक्षित पांढरपेशा वर्गाची जबाबदारी मोठी आहे असे त्यांना वाटे. 

देशाच्या कल्याणासाठी देशी कपड्याचा वापर करा असा आग्रह त्यांनी धरला.

 वर्तमानपत्रे, सभा, संमेलने भरवून स्वदेशीचा तुफान प्रचार त्यांनी केला.

 बंगालच्या फाळणीचा निषेध, कपड्यांची होळी त्यांनी केली.

 स्वदेशीमुळे खेड्यातील उद्योगांना संरक्षण मिळेल असे ते म्हणत.

 राजकीय, औद्योगिक, सामाजिक, नैतिक व सांपत्तिक या सर्वच दृष्टीने स्वदेशीच्या चळवळीची आवश्यकता आहे असे टिळक म्हणत.

 विदेशी माल घेतल्याने ग्राहकांचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होते म्हणून स्वदेशी वस्तूंच्या वापराचा त्यांनी आग्रह धरला.

X X

3) राष्ट्रीय शिक्षण 

ब्रिटिश शिक्षणपद्धती ही निःसत्त्व, ध्येयशून्य आहे. ती फक्त कारकून निर्माण करते. 

ब्रिटिशांच्या शिक्षणातून उद्योजक, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होऊच शकत नाहीत असे ते म्हणत.

 सरकारी अनुदानामुळे शिक्षण संस्थांवर बंधने येतात. त्यामुळे लोकांच्या अभयावर अवलंबून असणारे राष्ट्रीय शिक्षण सुरू करावे असा आग्रह त्यांनी धरला. 

विद्यापीठीय शिक्षणावर त्यांनी वारंवार हल्ले केले. विद्यापीठे ही परीक्षा घेऊन पदव्या देणाऱ्या कंपन्या झाल्या आहेत; विद्यापीठे ही सरकारी हमाल खाते होत आहे; सरकारला नोकरवर्ग पुरविणारे खाते म्हणजे शिक्षण खाते अशी टीका त्यांनी केली होती.

 'देशातील तरुण नोकरीच्या मागे न लागता देशाचे राजकीय, औद्योगिक, सामाजिक, बौद्धिक वैभव वाढविण्यास समर्थ होईल असे शिक्षण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण' अशी व्याख्या टिळकांनी केली होती. 

'National Education must be on National times and under National Control' असे त्यांनी म्हटले होते.

 राष्ट्रीय शिक्षणामुळे राजकीय व सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे. स्वतः च्या पायावर उभा राहणारा देशाभिमानी तरुण निर्माण झाला पाहिजे असे टिळक म्हणत. 

'हे आमचे गुरूच नव्हेत' या शीर्षकाचे तीन लेख टिळकांनी 'केसरी'त अनुक्रमे 17, 24 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर 1905 या दिवशी लिहून सरकारी कॉलेजातील प्रोफेसरांवर टीकेची झोड उठवली.

 सरकारी कॉलेजातून हिंदी विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताची किंवा राष्ट्रउन्नतीची तत्त्वे शिकवली जात नाहीत ही त्यांची तक्रार होती. 

राष्ट्रीय चळवळीची बीजे या सरकारी कॉलेजातून कधीच मिळणार नाहीत, राष्ट्रीय चळवळीपासून तरुणांना दूर ठेवणे हेच ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीचे गुपित आहे असे ते म्हणतात.

 'राष्ट्रीय शिक्षण व खासगी शाळाची जबाबदारी' या शीर्षकाचे तीन लेख इ.स. 1906 च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी 'केसरी'त लिहिले.

 टिळकांनी देशी भाषेत शिक्षण द्यावे, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण द्यावे, शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, सक्तीच्या शिक्षणासाठी लोकमताचा दबाव सरकारवर आणला पाहिजे, धर्मशिक्षणही दिले पाहिजे इत्यादी मते टिळकांनी आग्रहाने मांडली होती.

4) बहिष्कार 

सर्व ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन टिळकांनी केले होते. 

8 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात लकडी पूल ते फर्ग्युसन कॉलेज दरम्यानच्या पटांगणावर विदेशी कपड्याची होळी केली. 

त्यात 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. घरोघर जाऊन विद्यार्थ्यांनी विदेशी कपडे गोळा केले होते. 

शि. म. परांजपे, भास्करराव भोपटकर हे युवकांचे मार्गदर्शक व नेते होते. या उपक्रमात भाग घेतल्याबद्दल वि. दा. सावरकर व त्यांच्या साथीदारांना प्राचार्य र. पु. परांजपे यांनी कॉलेजच्या वसतीगृहातून काढून टाकले व दंड केला. 

बहिष्कार चळवळीचा परिणाम म्हणून स्वदेशी वस्तूचे उत्पादन, विक्री, व्यापार यास गती प्राप्त झाली. 

विदेशी माल स्वस्त आहे म्हणून आम्ही तो वापरतो असे सांगणाऱ्या सुशिक्षित वर्गाबद्दल त्यांच्या मनात चीड होती.

 ब्रिटिश माल आपण मुळीच खरेदी करू नये, गरज पडलीच तर जर्मनी, जपान वा अमेरिकेकडून माल घेण्यास हरकत नाही असे टिळक म्हणत. 

विद्यार्थी, कुणबी, माळी वगैरे बहिष्काराची चळवळ उचलून धरतात. उलट मध्यम व श्रीमंत वर्गातील पुढारी मात्र त्याबाबत संताप व्यक्त करतात. याची चीड टिळकांना येईल.

 बहिष्काराची चळवळ ही केवळ औद्योगिक आहे. राजकीय नव्हे, हे मत टिळकांना मान्य नव्हते.


लोकमान्य टिळक : भारतीय असंतोषाचे जनक 

व्हॅलेन्टाईन चिरोल या ब्रिटिश पत्रकाराने इ.स. 1905 मध्ये भारताला भेट दिली होती. 

वंगभंगाची चळवळ त्याने पाहिली होती. टिळकांचे कार्य व एकूण हालचाली त्याने जवळून पाहिल्या. 

चिरोल यांनी The Indian Unrest' हे पुस्तक लिहिले. त्यात टिळकांचा उल्लेख 'Father of Indian Unrest' या शब्दांत केला होता.

 मंडालेहून सुटल्यानंतर चिरोल यांचे 'The Indian 'हे Unrest' हे पुस्तक टिळकांच्या पाहण्यात आले तेव्हा टिळकांची या पुस्तकात लेखकाने जी नालस्ती केली होती त्याविरुद्ध त्यांनी लंडनच्या न्यायालयात तक्रार नोंदविली.

 या खटल्याच्या संदर्भात टिळक लंडनला असताना खटल्याच्या खर्चासाठी भारतीय जनतेने 3 लक्ष रु. निधी उभारला होता. हा खटला टिळक हरले. पण या खटल्याच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये टिळकांचे जे वास्तव्य होते त्या काळात त्यांनी इंग्लंडमधील लोकमत भारतीय स्वराज्याला कसे अनुकूल होईल याचा प्रयत्न केला.

X X


लोकमान्य टिळक व क्रांतिकारक 

संशोधक व आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे भाष्यकार डॉ. य. दि. फडके यांनी 'लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक' या ग्रंथात सशस्त्र क्रांती लढ्याशी टिळकांचा जो संबंध होता त्याचा अत्यंत वस्तुनिष्ठ, अस्सल मूळ साधनांच्या आधारे अभ्यास केला आहे.

 स्वतः टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात शस्त्रांचा वापर कधी केला नाही' पण शस्त्रधारी देशभक्तांशी त्यांचा सतत संपर्क होता. 

अशा उलाढाली करणाऱ्या मंडळींना टिळक उत्तेजन देत, साहाय्य करत.

 टिळकांच्या सहकाऱ्यांपैकी व अनुयायांपैकी दादासाहेब खापर्डे, वासुकाका जोशी, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजीपंत खाडिलकर, गंगाधरराव देशपांडे, वीर वामनराव जोशी, अच्युतराव कोल्हटकर वगैरे मंडळींचा क्रांतिकारकांच्या उलाढालीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग असे.

विदर्भातील पांडुरंग खानखोजे हे लष्करी शिक्षणासाठी प्रथम जपान व नंतर अमेरिकेत गेले ते टिळकांचा सल्ला घेऊनच टिळकांचे विचार क्रांतिकारी होते.


होमरुल लीग चळवळ

'होमरुल' म्हणजे स्वराज्यप्राप्ती होय. आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार आपण प्राप्त करून घेणे म्हणजे 'होमरुल' होय.

 स्वयंशासनाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी ॲनी बेझंट, टिळक यांनी चेन्नई व मुंबई प्रांतांत होमरुल चळवळ सुरू केली होती.

 वस्तुत: होमरुल चळवळ ही मुळात आयर्लंड या देशातील लोकांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी केली होती. 

या चळवळीचे बारकाईने निरीक्षण मूळच्या आयर्लंडच्या रहिवासी असलेल्या डॉ. ॲनी बेझंट यांनी केले होते. 

भारत व आयर्लंड या दोन देशांची राजकीय समस्या सारखीच असल्याने आयर्लंडप्रमाणे भारतातही होमरुल चळवळ सुरू केली तर भारतीय लोकांत जागृती निर्माण होईल असे डॉ. ॲनी बेझंट यांना वाटत होते.

सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी 'होमरुल लीग'ची स्थापना केली.

 कोलकाता, मुंबई, चेन्नई, कानपूर, अलाहाबाद आदी शहरांत होमरुल लीगच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.

प्रतियोगी सहकारितेची टिळकांची संकल्पना 


इ.स. 1919 मध्ये माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्या. 

टिळक 27 नोव्हेंबर 1919 ला मायदेशी परत आले. या सुधारणा कायद्यावर काँग्रेसमध्ये मतभेद होते. 

भारतीयांनी या सुधारणांना सहकार्य करावे असे ब्रिटिशांनी आवाहन केले होते. 

गांधीजी, ॲनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय हे सुधारणांना बिनशर्त पाठिंबा द्यावा या मताचे होते, तर चित्तरंजन दास, बिपिनचंद्र हे सुधारणांचा धिक्कार करावा या मताचे होते. 

या सुधारणा म्हणजे स्वराज्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे अशी मवाळांची भूमिका होती. 

टिळकांच्या मते बिनशर्त सहकार्य करण्याऐवजी प्रतियोगी सहकार्य करावे.

 ब्रिटिश सरकार (नोकरशाही) जेवढ्या प्रमाणात जनतेशी सहकार्य करील तेवढ्याच प्रमाणात आपण सहकार्य द्यावे. सरकार, नोकरशाही जेथे सहकार्य देत नाही तेथे सरकारशी असहकार पुकारावा.

 सहकाराचे उत्तर सहकार्याने व असहकाराचे उत्तर असहकाराने द्यावे या मताचे टिळक होते.

X X

कॉंग्रेस लोकशाही पक्ष (इ.स. 1920) 

इ.स. 1919 च्या कायद्यान्वये होणाऱ्या निवडणुका लढवण्यासाठी टिळकांनी 20 एप्रिल 1920 ला हा काँग्रेस अंतर्गत पक्ष स्थापन केला होता. 

हा पक्ष राष्ट्रीय सभेच्या सहकार्याने काम करणारा होता.  

पक्षाची तत्त्वे 

1) काँग्रेसविषयी श्रद्धा. 

2) लोकशाहीवर विश्वास. 

3) शिक्षणप्रसार.

 4) जातिभेद दूर करणे. 

5) धार्मिक सहिष्णुता. 

6) संपूर्ण स्वराज्याची प्राप्ती. 

7) प्रांतीय स्वायत्तता.

 8) प्रौढाना मतदानाच्या अधिकाराचा विस्तार. 

9) रेल्वेचे राष्ट्रीयीकरण नाही. 

10) हिंदी राष्ट्रभाषा. 

11) ब्रिटिश साम्राज्य मंडळात हिंदुस्थानात सामील असावा व या साम्राज्याचे जे भागीदार आहेत त्यांच्या बरोबरीने हिंदुस्थानचा दर्जा राहावा अशी या पक्षाची मागणी होती. 

12) शक्यतो देशीभाषेतून शिक्षण, दारूबंदी ग्रामपंचायतीना प्रशासकीय व न्यायविषयक अधिकार द्यावेत. आर्थिक स्वातंत्र्य व प्रजेला नैसर्गिक हक्काची हमीही देण्यात येणार होती.

इ.स. 1895 पासून टिळक काँग्रेसला नवे रूप देण्यासाठी प्रयत्न करीत होते.

 काँग्रेस संघटना जिल्हा, तालुका व खेड्यापर्यंत पोहोचली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता.

 काँग्रेस नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेसच्या कार्यासाठी वाहून घ्यावे असे ते म्हणत असत.


जहाल- मवाळ ऐक्य

17 मे 1914 रोजी टिळकांची ६ वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका झाली.

 टिळकांच्या सुटकेमुळे जहाल गटात उत्साह निर्माण झाला. 

इ.स. 1914 च्या मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनातच टिळकांना त्यांच्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा या विषयावर विषय नियामक समितीत चर्चा झाली. 

ॲनी बेझंटच्याच पुढाकाराने ही चर्चा घडून आली होती; परंतु टिळक निःशस्त्र प्रतिकाराचा मुद्दा सोडण्यास तयार नसल्याने ना. गोखले यांनी त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला विरोध दर्शविला.

 वस्तुतः गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मदनमोहन मालवीय ही मंडळी जहाल-मवाळ गटाचे ऐक्य व्हावे या मताची होती. 

ना. गोखले फेब्रुवारी 1915 व फिरोजशहा मेहता नोव्हेंबर 1915 मध्ये मृत्यू पावले. त्यामुळे जहालांचा कॉंग्रेस प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

 इ.स. 1915 मध्ये मुंबईच्या अधिवेशनात पुन्हा टिळकांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला. 

आता काँग्रेसमधील मवाळ गटाचे दोन कर्णधार (गोखले व मेहता) मृत्यू पावले असल्याने जहालांच्या कॉंग्रेस प्रवेशाला अडचण राहिली नाही.

 मुंबईच्या अधिवेशनात जहालांच्या काँग्रेस प्रवेशाच्या संदर्भात आवश्यक ती घटनादुरुस्ती करण्यात आली व टिळकांना त्यांच्या अनुयायांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. 

जहाल नेते 6-7 वर्षे काँग्रेसच्या बाहेर होते; पण जनमनावरील त्यांचा प्रभाव कायमच होता.

X X

टिळकांचे साहित्य आणि संशोधन

टिळक  संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. 

त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas)  आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे.

 त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.

टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)

टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित केलेली.

वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)

Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak,1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.

The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).

टिळकांचा मृत्यू


लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी पुणे या ठिकाणी झाला.








Comment and share...

X X

Post a Comment

4 Comments