Subscribe Us

header ads

SSC (10th.)passed students: Education Opportunities

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी



एसएससी (SSC) पास झाल्यानंतर पुढील शैक्षणिक वाटचाल व करियर संबंधित काही मार्ग आपल्यासमोर असायला हवेत.

 त्यात खालील प्रमाणे ज्या वाटा आपल्या भविष्यातील शिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी आपणास उपयुक्त ठरतील.

X X

1. आयटीआय( ITI )यामध्ये आपणास दोन वर्षाचा फिटर, वेल्डर, मेकॅनिक, स्टेनोग्राफर, डिझेल मेकॅनिक इत्यादी कोर्स करण्याची संधी उपलब्ध आहे. ज्या माध्यमातून आपणास सरकारी नोकरी किंवा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी तात्काळ मिळू शकतो.

२. आपण डी एफ ए (DFA) चार वर्षाचा किंवा दोन वर्षाचा फाईन आर्ट किंवा कमर्शियल आर्ट डिप्लोमा करून नोकरी किंवा आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो.

X X

३. आपण आर्मी, नेव्ही, एअर फॉर्स, पोलीस विभाग इत्यादी सरकारी विभागांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, सोल्जर इत्यादी पदासाठी आपण तयारी करून नोकरी मिळू शकता.

४. ज्या विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग क्षेत्रात जायचे आहे त्यांनी पॉलिटेक्निक ही शाखा निवडून तीन वर्षाचा डिप्लोमा करू शकता व त्यानंतर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल व पुढील शिक्षणासाठी आपण बी.ई. किंवा बी. टेक. इंजिनीअरिंग क्षेत्रातील पदवी साठी पुढील शिक्षण घेऊ शकता त्यामध्ये आपण आरटीओ सारख्या सरकारी क्षेत्रामध्ये इन्स्पेक्टर या पदावर परीक्षा देऊन नोकरी मिळू शकते.

X X

५. ज्या विद्यार्थ्यांना शेतीची आवड आहे असे विद्यार्थी एसएससी नंतर दोन वर्षाचा फार्म मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा एनिमल हसबंडरी (Animal Husbandry)डिप्लोमा करून स्वतःचा व्यवसाय करू शकतात.

६. जे विद्यार्थी सर्टिफिकेट कोर्स बिल्डिंग सुपरवायझर, डिप्लोमा कोर्स इंटेरियर डिझाईन, स्टेनोग्राफी, प्रायव्हेट सेक्रेटरी प्रॅक्टिस, ब्युटी कल्चर, गारमेंट, टेक्नॉलॉजी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि दोन वर्षाचा डान्स आणि म्युझिक डिप्लोमा करून विविध वरील क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय करून स्टेबल होऊ शकतात.

X X

७. सरकारी नोकरी मध्ये क्लेरिकल ग्रेडच्या परीक्षा त्यात गव्हरमेंट क्लार्क, बँक कलर्क, इन्शुरन्स कंपनी व इतर प्रायव्हेट कंपनी यामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

X X

८. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक संधी म्हणजे अकरावी व बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या विषयात बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आपल्या करियरची निवड भविष्यकाळासाठी योग्यरीत्या करता येते.

कला शाखेत बी.ए. व अन्य कोर्सेस बी.सी. ए. एम. ए., एम. फिल.,पीएच.डी., डी.एड., बी.एड, एल.एल.बी, इत्यादी कोर्सेस करून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक प्राध्यापक पदावर नोकरी करू शकता किंवा स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा आपणास जाता येते.,

X

वाणिज्य शाखेत बी.कॉम. व बी.सी.ए, एम कॉम, बि.एड, एल.एल.बी., टॅक्स कन्सल्टंट, सी,ए व अन्य कोर्सेस आणि

 विज्ञान शाखेत बी.एससी. एम एस सी एम फिल पीएचडी त्यांना इंजिनिअरिंग मध्ये जायचे ते विद्यार्थी बी.टेक. एम. टेक. ज्यांना मेडिकल क्षेत्रात जावयाचे आहे ते एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस. , डी.एच.एम.एस. व अन्य कोर्सेस ज्यामध्ये कृषी पदवी फार्मसी क्षेत्रातील पदवी पदविका करून आपले करिअर चांगल्या पद्धतीने निवडू शकता व पुढील काळात नोकरी करुन आपलं करिअर यशस्वी करू शकता.

X X











X X

View, comments and share............

Post a Comment

7 Comments

  1. उपयुक्त माहिती आहे 🙏🙏🙏👆

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Useful information

    ReplyDelete
  4. Thank you sir 🙏

    ReplyDelete
  5. सर खुप छान माहिती दिली

    ReplyDelete