Subscribe Us

header ads

Janapadas -1: Mahajanapadas and the rise of Magadha-1जनपद व महाजनपदे आणि मगधचा उदय

Janapadas -1: Mahajanapadas and the rise of Magadha-1

जनपद व महाजनपदे आणि मगधचा उदय:1



 मीर्यपूर्वकालात इ. स. पू ६ व्या शतकात अनेक धर्मपथांचा व धर्माचा उदय होऊन शेवटी बौद्ध धर्मासारखा महान धर्म उदयास आला. त्याचप्रमाणे या काळात अनेक राज्याचा उदय होऊन शेवटी मगधाचे महान राज्य म्हणजेच मगध साम्राज्य उदयास आले.

 इसवीसनपूर्व ६ व्या शतकात भारतात अनेक लहानलहान राज्ये होती. त्यापैकी सोळा राज्य प्रमुख असून त्यांना 'सोळा महाजनपदे' असे म्हणत.

XX

सोळा महाजनपदे:

 (१) काशी (बनारस). (२) कोशल (अयोध्या). (३) अंग (पूर्व बिहार-भागलपूर जिल्हा). (४) मगध (दक्षिण बिहार, पाटणा व गया जिल्हे). (५) वृज्जि संघराज (उत्तर बिहार). (६) मल्ल (गोरखपूर जिल्हा). (७) चेदी (आजचा बुंदेलखंड), (८) वत्स (अलाहाबाद प्रदेश). (९) कुरू (अलिगढ, मिरत, दिल्ली , स्थानेश्वर हे जिल्हे). (१०) पांचाल (रोहिलखंड) (११) मात्स्य (जयपूर), (१२) शूरसेन (मथुरा), (१३) अश्मक (गोदावरी जवळ). (१४) अवन्ती (मध्य माळवा). (१५) वायव्य गांधार (पेशावर व रावळपिंडी हे जिल्हे) आणि (१६) कंबोज (भारत) 

सर्व राज्यांतील शासनप्रणाली सारखी नव्हती. लोकसत्ताक, एकसत्ताक, राजसत्ताक महाजनसत्ताक अल्पजनसत्ताक ई. प्रकारच्या शासनप्रणाली निरनिराळ्या राज्यात प्रचलित होत्या.

 काही राज्यांतील कार्यकारी शाखेचा मुख्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडलेला असे. अशा राज्याला "गणराज्य" म्हणतात.

 गणराज्याच्या अस्तित्वावरून भारतीयाना गणराज्याची कल्पना होती है स्पष्ट आहे. वृज्जी हे आठ राज्यांचे संघराज्य होते.

 मिथिलापती जनकाच्या विदेहाच्या पतनानंतर विदेह, लिच्छवी व इतर सहा प्रांताचे मिळून हे वृज्जिसंघराज्य बनले होते. ह्या राज्यात सत्तासंघर्ष सतत सुरू असून मोठा मासा लहान माशाला गिळकृत करतो. या मात्स्यन्यायानुसार सामर्थ्यशाली राज्ये दुर्बल राज्यांना गिळकृत करू लागली. 

या सत्तास्पर्धेत लहान राज्ये व गणराज्ये नष्ट होऊन एकसत्ताक व राजसत्ताक स्वरूपाची मोठी राज्ये व मगध साम्राज्य याचा उदय झाला. 

अशाप्रकारे अनेक राज्यात सोळा महाजनपदे प्रमुख व सोळा महाजनपदातही (१) अवन्ती (२) वत्स, (३) कोशल व (४) मगध हो चार राज्ये प्रसिद्ध आणि या चार मध्येही मगध सर्वश्रेष्ठ व प्रबल राज्य असून त्याचे शेवटी साम्राज्यात रूपांतर झाले .

XX

सोळा महाजनपदांची माहिती खालील साहित्यातून आलेली आहे. 

१) रामायण, महाभारत व पुराणग्रंथांत सोळा महाजनपदांचे उल्लेख येतात. शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची परंपरा जरी भारतात नसली तरी महाकाव्ये व पुराणग्रंथांतून या महाजनपदांपैकी काही महाजनपदांची नावे, त्यांच्या सीमा, राज्यांची नावे आलेली आहेत. अर्थात, पुराणग्रंथांच्या त्यासंदर्भातील नोंदीत नेमकेपणा नाही. 

२) जैन ग्रंथ- जैन भगवती सूत्र किंवा ज्या ग्रंथाला 'व्याख्या प्रज्ञाप्रती' या नावाने ओळखले जाते. त्यात सोळा महाजनपदांविषयी माहिती आहे. 

३) दीपवंश, महावंश, जातककथा, महापरिनिर्वाण सूत्र, अंगुत्तनिकाय, दीर्घनिकाय या बौद्ध ग्रंथांतून सोळा महाजनपदांचे उल्लेख आले आहेत.

४) मगध साम्राज्याच्या उदयाच्या शेवटच्या टप्प्यावर ग्रीकांचा भारताशी संबंध आला. ग्रीकांची आक्रमणे झाली. ग्रीक इतिहासकारांनी तत्कालीन भारताच्या राजकीय इतिहासासंबंधी ज्या नोंदी केल्या आहेत त्यातही सोळा महाजनपदांचे उल्लेख आहेत.

५) पाणिनीचा 'अष्टाध्यायी' हा ग्रंथही सोळा महाजनपदांच्या अभ्यासासाठी उपयोगाचा आहे.

६) वाङ्मयीन पुराव्याशिवाय तत्कालीन शिलालेख व नाणीही १६ महाजनपदांच्या अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. Rhys Davids यांनी लिहिलेल्या Buddhist India या ग्रंथात १६ गणराज्याची विस्तृत माहिती आहे.


महाजनपदांची वैशिष्ट्ये:

1) महाजनपदे ही नद्यांच्या समृद्ध प्रदेशांतच आकारास आली होती. 

2) महाजनपदांचा आकार समान नव्हता. ती काही मोठी तर काही छोटी होती. 

3) प्रत्येक महाजनपदाची प्रशासन व्यवस्था भिन्न भिन्न होती. काहींचे प्रशासन गणतंत्र पद्धतीने चाले तर काहींचे एक राजेशाही पद्धतीने चाले. 

4) काही महादनपदांचे स्वरूप संघराज्यात्मक स्वरूपाचे होते. 

5) यादवी युद्ध हा महाजनसत्तेचा स्थायिभाव होता. 

6) महासत्तांमध्ये शत्रुगट व मित्रगट होते. मित्रगट स्थिर करण्यासाठी महाजनपदांमध्ये विवाहसंबंध होत असत. क्वचितप्रसंगी नातेसंबंधांचा विचार न करता त्यांच्यात युद्धेही होत असत.

XX

'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत. 

जैन भगवती सूत्रात 16 महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात 7 महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत.

 'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांची माहिती आहे. या 16 महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

या 16 महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 16 महाजनपदांच्या नावांच्या 8 जोड्या प्रसिद्ध आहेत. 

अंग-मगध, काशी-कोसल, वृज्जी-मल्ल, चेदी- वत्स, कुरू-पांचाल, मत्स -शूरसेन, अश्मक- अवंती, गांधार-कंबोज,








Comment and share

Post a Comment

4 Comments