Subscribe Us

header ads

Stephen William Hawking : English Theoretical Physicist, Cosmologist

Stephen William Hawking : English Theoretical Physicist, Cosmologist, and Author 

 स्टीफन विल्यम हॉकिंग:  सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ

जन्मदिन: 8 जानेवारी

सृतिदिन: 14 मार्च

   Stephen Hawking 

   (8 जानेवारी 1942 14 मार्च 2018)


स्टीफन हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. 

कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. "अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम" या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली. 

X X

जन्म व बालपण:

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची वैद्यकीय संशोधन सचिव होती. 

त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती. 

हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, त्यांचे आई वडील उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर झाले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. 

लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची खूप आवड होती.

X X

शिक्षण:

स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. 

1950 मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच 1950 ते 1953 अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले.

हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. 

गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी 1959 साली वयाच्या 17 व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. 

त्यांनी 1962 यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.

X X

संशोधन:

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते.

 यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली.

 याच प्रबंधाचा पुढचा भाग "सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम" हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. 

या प्रबंधासाठी 1966 सालचे "ऍडम्स प्राईझ" त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. 

एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. 1974 साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 

स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्जनाला "हॉकिंग उत्सर्जन" असे नाव देण्यात आले. 

त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची "रॉयल सोसायटीचा फेलो" म्हणून निवड झाली.

1980 च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. 

यासाठी हॉकिंग यांना 1979 "Royal Association for Disability and Rehabilitation" या संस्थेकडून "मॅन ऑफ दि इयर" हा किताब देण्यात आला.

"ब्लॅक होल आणि बिग बँग" सिद्धांत समजून घेण्यात स्टीफन हॉकिंगने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याला 12 मानद पदवी आणि अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.

“मी विश्वाच्या गोष्टी समजून घेण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली याचा मला फार आनंद होत आहे. याची रहस्ये लोकांसमोर आली आणि त्यावरील संशोधनात मी हातभार लावू शकलो. जेव्हा लोकांना माझे काम जाणून घ्यायचे असते तेव्हा मला अभिमान वाटतो."

"मला नेहमीच अभिमान वाटेल की मी विश्वाची ओळख पटविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, विज्ञान क्षेत्रात अनेक नवीन शोध लावले आणि लोक माझ्या या योगदानाचे कौतुक करतात."

"माझ्या जवळजवळ सर्व स्नायूंवर माझे नियंत्रण गेलेले आहे आणि आता मी माझ्या गालाच्या स्नायूद्वारे संगणकावर माझ्या चष्मावरील सेन्सर जोडून बोलतो."


X X

स्टीफन हॉकिंग यांनी लिहलेली पुस्तके :

(Stephen Hawking Books)

स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या आयुष्यात बरीच पुस्तकेही लिहिली आहेत आणि हे पुस्तक अवकाश विषयी लिहिले गेले आहे.


1. 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' : हॉकिंग यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाचे नाव 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' असे होते. हे पुस्तक बिग बँग आणि ब्लॅक होल या विषयावर आधारित होते आणि 1988 मध्ये प्रकाशित झाले होते, हे पुस्तक 40 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

2. " द यूनिवर्स इन ए नटशेल" : हे पुस्तक 2001 मध्ये - प्रकाशित झाले होते आणि हॉकिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकाला 2002 मध्ये  "ॲव्हेंटिस प्राइस ऑफ सायन्स बुक्स" मिळाले.

3. "द ग्रँड डिझाईन" : हॉकिंग यांनी लिहिलेले "द ग्रँड डिझाईन" हे पुस्तक सन 2010 मध्ये प्रकाशित झाले होते आणि या पुस्तकाने जागेसंदर्भात माहिती देखील दिली होती. हे पुस्तक देखील एक अतिशय यशस्वी पुस्तक असल्याचे सिद्ध झाले.

4. 'ब्लॅक होल अँड बेबी युनिव्हर्स' : हे पुस्तक वर्ष 1993 मध्ये आले आणि या पुस्तकात ब्लॅक होलशी संबंधित हॉकिंग यांनी लिहिलेले निबंध आणि व्याख्याने आहेत.

 याव्यतिरिक्त, हॉकिंग यांनी मुलांसाठी एक पुस्तक देखील लिहिले त्याचे नाव "जॉर्ज अँड द बिग बँग" होते आणि हे पुस्तक 2011 मध्ये आले.

X X

निधन:

कुटूंबाच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, 'हॉकिंग यांचे 14 मार्च 2018 रोजी सकाळी केंब्रिज येथे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांचे निवेदन व्यक्त करत एक निवेदन जारी केले होते.

X X


स्टीफन हॉकिंग यांचे विचार:

 (Stephen Hawking Quotes)


" आयुष्य दुर्दैवी असेल जर ते विचित्र आणि मनोरंजक नसले तर."


" जर आपण नेहमी नाराज आणि स्वतःला दोष देत राहू तर इतरांना तुमच्यासाठी वेळ देण्यात काहीच रस नसणार ."


" माझ्या जीवनाचे ध्येय हे खूप सोपे आहे कारण हते विश्वाला समजून घेणे आणि हे असे का आहे आणि ते तेथे का आहे हे शोधणे आहे. ."

" अज्ञान हा शत्रू नसतो, तर शत्रू हे भ्रम असतात जे म्हणतात की आपल्याला सर्व काही माहित आहे.."


                               स्टीफन हॉकिंग







X X

View comments and share..



Post a Comment

5 Comments