Characteristic of democracy
लोकशाहीची वैशिष्ट्ये
लोकशाहीची काही महत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
1.अंतिम निर्णय घेण्याची सत्ता जनतेकडे:
लोकशाहीचे हे वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचे आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या करताना म्हटले आहे "Democracy is the rule of the people for the people and by the people "याचाच अर्थ जनतेला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारी ही व्यवस्था आहे.
राज्यातील सर्वोच्च सत्ता ही जनतेच्या हातात असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा जनतेकडेच असतो.
लोकशाहीत जनता ही आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवत असते. हे प्रतिनिधी जनतेकडून निवडले गेले असल्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय हे जनत तेच निर्णय असतात.
X X
2. मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका:
मुक्त आणि सार्वत्रिक निवडणुका शिवाय लोकशाहीचे अस्तित्व शक्य नाही. या निवडणुकीद्वारे जनता आपले प्रतिनिधी शासन कारभारासाठी निवडते.
लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही आज शक्य नाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक शासन कारभारात सहभाग घेतो. पण ते आज शक्य नाही.
परिणामी जनता अप्रत्यक्षपणे आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालविते. या अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार आहेत.
लोकशाहीमध्ये केवळ निवडणुका असून पुरेसे नाही. जनतेपुढे विविध राजकीय पर्याय (Political Alternatives) उपलब्ध असणे गरजेचे आहे.
जनता या पर्यायांमधून निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर पसंतीचा पर्याय निवडते.
निवडणुकीमुळे जनतेला केवळ आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळत नाही तर अस्तित्वात असलेले शासन बदलण्याची संधी मिळते.
3 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार:
गेल्या दोन शतकात लोकशाहीसाठी चाललेला संघर्ष हा प्रामुख्याने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार यासाठीचा संघर्ष आहे.
कोणत्याही भेदभावाशिवाय राज्यातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला एक मत मिळायला हवे आणि त्या एक मताला एक मूल्य असायला हवे हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मतदानाचा अधिकार हा सामाजातील विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित होता. महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले होते.
असा भेदभाव लोकशाही संकल्पनेच्या विरोधात जाणार आहे. राजकीय समानता ( Political Equality ) हे लोकशाहीचे आधारभूत तत्त्व आहे.
सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धत ही राजकीय समानता दर्शवणारी आहे.
भारत ही जगातील एकमेव मोठी लोकशाही आहे. भारतीय राज्यघटनेने राजकीय समानतेचे तत्व अंगीकारत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार केलेला आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या भारतीय नागरिकाला कोणत्याही भेदभावाशिवाय, पूर्वअटीशिवाय मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
X X
4.घटनात्मक कायदा आणि जनअधिकारांना केंद्रस्थान:
लोकशाहीचे चौथे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घटनात्मक कायदा जनअधिकारांना आलेले केंद्रस्थान.
निवडणुकीद्वारे निवडून आलेला प्रत्येक शासनाला घटनात्मक कायद्याच्या चौकटीत राज्यकारभार करावा लागतो.
घटनात्मक कायदा हा राज्यातील सर्वोच्च कायदा असून तो सर्वांसाठी समान असतो. घटनात्मक कायद्याने जनतेला काही नागरी आणि राजकीय अधिकार बहाल केलेले असतात.
या अधिकारांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. शासनाकडून या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास व्यक्तीला न्याय पालिकेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.
हे अधिकार लोकशाहीतील राजकीय सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
5. व्यापक राजकीय सहभाग:
लोकशाहीमध्ये जनतेचा राजकीय सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असतो. हा राजकीय सहभाग विशिष्ट अंतराने होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका मधून प्रतिबिंबित होतो.
लोकशाहीत सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार दिला जातो.
भारतामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे.
नागरिक मोठ्या संख्येने निवडणुकांमध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावतात.
या व्यापक राजकीय सहभागामुळेच लोकशाही खर्या अर्थाने लोकांची, लोकांकडून आणि लोकांसाठी चालविलेले शासन प्रणाली मानली जाते.
X X
6. स्पर्धात्मकता:
स्पर्धात्मकता हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
लोकशाहीमध्ये विविध राजकीय पक्ष सत्ताप्राप्तीसाठी निवडणुकांच्या रिंगणात असतात.
निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असते.
या बहुलतेमुळे नागरिकांनाहि पर्याय उपलब्ध होतात. बहुपक्षपद्धतीमुळे ही स्पर्धात्मकता वाढली आहे.
चीन सारख्या साम्यवादी राष्ट्रांमध्ये साम्यवादी पक्षाची एकपक्षीय राजवट असल्यामुळे स्पर्धात्मकतेला वाव नाही. लोकांकडे निवडीला पर्याय नाही.
राजकीय बहुलतेतून स्पर्धात्मकता वाढते. अशी राजकीय बहुलता चीनमध्ये नसल्यामुळे चीनला लोकशाहीवादी राष्ट्र म्हणायचे कि नाही हा वादाचा मुद्दा आहे.
असे असले तरी चीन स्वतःला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून गौरवून घेत आहे.
Comment and share
2 Comments
Nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDelete