परिसंस्था रचना
Structure of Ecosystem
1. अजैविक घटक Abiotic factors
2. जैविक घटक Biotic factors
2. जैविक घटक Biotic factors
पर्यावरणातील वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव हे प्रमुख जैविक घटक आहेत.
वनस्पती पशु व सूक्ष्मजीव हे सजीव समूह ज्या पद्धतीने परिसंस्थेत पात्र ठरलेले आहेत. त्या पद्धतीस जैविक संरचना म्हणतात .
वर्षावन प्रदेशापासून ते वाळवंटी प्रदेशापर्यंतच्या निरनिराळ्या परिसंस्थेत जैविक संरचना समान असते. म्हणजे सर्व परिसंस्थेत मूलभूत सजीव गट असून त्यांच्यातील आंतरक्रिया समान पद्धतीने होत असतात .
x x
सजीवांचे प्रमुख दोन गट आहेत.
1. उत्पादक Producers
2. ग्राहक किंवा भक्षक Consumers
1. उत्पादक : Producers
परिसंस्थेतील सर्व हिरव्या वनस्पती ह्या उत्पादक असतात.
वनस्पती सेंद्रीय पदार्थापासून सूर्यप्रकाशाद्वारे सेंद्रिय पदार्थ तयार करतात .हे सेंद्रिय पदार्थ वनस्पतींचे अन्न असते. वनस्पती कडून प्रकाशसंश्लेषण (Photo synthesis) होत असते .
हिरव्या वनस्पती प्रकाशऊर्जेचा वापर करून त्यांचे कार्बन-डाय-ऑक्साईड मध्ये आणि पाण्याचे शार्करे मध्ये परिवर्तन करतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण म्हणतात.
प्रत्येक परिसंस्थेत मग ती भूमी किंवा जल परिसंस्था असो .त्यात हिरव्या वनस्पती असतात, वनस्पती सेंद्रीय द्रव्य किंवा खाद्य उत्पादन करणारा प्रमुख घटक असल्यामुळे त्यांना उत्पादक असे म्हणतात.
या वनस्पती स्वयंपोषी ( Autotrops) असतात .
या वनस्पतींच्या अन्नावरच परिसंस्थेतील सर्व सजीवांची उपजीविका होते.
x x
2. ग्राहक किंवा भक्षक : Consumers
परिसंस्थेतील प्राण्यांना वनस्पती वर अवलंबून राहावे लागते. ज्या सजीवांना ऊर्जा व पोषक द्रव्ये यासाठी सेंद्रिय द्रव्यावर अवलंबून राहावे लागते .ते जीव वनस्पतीचे भक्षण किंवा ग्रहण करतात, म्हणून त्यांना भक्षक किंवा ग्राहक म्हणतात .
हे जीव परपोषी (Hetero trops) असतात.
ग्राहक किंवा भक्षक या संज्ञेत सूक्ष्म जीवाणूपासून हे महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. परिसंस्थेतील संरचनेत अन्नस्त्रोता नुसार भक्षकांच्या विविध अन्न पातळ्या आहेत .
प्राण्यांच्या अन्नसवयी व जीवन क्रमानुसार खालील चार गट पडले आहेत.
1. प्राथमिक ग्राहक किंवा भक्षक:
Primary Consumers
जे प्राणी प्रत्यक्षपणे झाडपाला ,गवत, धान्य, फळे इत्यादी खाऊन जगतात. त्यांना प्राथमिक ग्राहक किंवा भक्षक म्हणतात. गुरे, मेंढ्या, हरणे ,ससे, उंदीर इत्यादी शाकाहारी प्राणी हे प्राथमिक भक्षक आहेत.
2. द्वितीयक ग्राहक किंवा भक्षक
Secondary consumers
शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे घुबड, साप, वाघ ,सिंह ,चित्ता इत्यादी हिंस्र प्राणी हे द्वितीयक ग्राहक किंवा भक्षक आहेत.
3. तृतीयक ग्राहक किंवा भक्षक
Tertery consumers
प्राण्यांच्या मृत अवशेष यावर ज्यांची उपजीविका होते .ते कृमी, घारी, गिधाडे ,कावळे इत्यादी तृतीयक ग्राहक किंवा भक्षक आहेत.
4. अपघटक व अपमार्जक
Decomposers and Detirtivores
कोणत्याही वनस्पती व प्राणी यांच्या मृतअवशेष यावर फार शेवटी ज्यांची उपजीविका होते. ते सूक्ष्मजीव त्यांच्या शरीराचे अपघटन करतात, म्हणून त्यांना अपघटक म्हणतात.
सूक्ष्मजंतू , भुकंदुक हे अपघटक आहे. भुंगेरे ,गांडुळे इत्यादी भूमीगत प्राणी वनस्पती व प्राणी यांचे लहान लहान तुकडे करतात त्यांना अपमार्जक म्हणतात.
x x
परिस्थितीकी मनोरा
Pyramid
ब्रिटिश परिस्थितिक शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी सन 1927 साली परिस्थितीकी मनोर्याची संकल्पना मांडली.
त्यांना निरीक्षणांमधून असे लक्षात आले की, ज्या पक्षांवर कोल्हे जगत आहेत ,ते पक्षी कोल्हा पेक्षा संख्येने खूप जास्त आहेत.
तर जे पक्षी कीटक किंवा वनस्पतीवर पोसले जात आहेत ,त्यांची संख्या कीटक किंवा वनस्पती पेक्षा बरीच कमी आहे.
त्याने या जीवांची संख्या या आलेखाच्या स्वरूपात एकावर एक मांडली तेव्हा त्यांची मनोरा या सारखी रचना तयार झाली त्यालाच पिरॅमिड असे म्हणतात.
एका जिवाकडून दुसऱ्या जिवाकडे ऊर्जा विनिमय स्तरावर ऊर्जेचे हस्तांतर होत असताना मूळ ऊर्जेचा तीव्रतेने ऱ्हास होत असतो.
त्यामुळे निम्नस्तराकडून उच्चस्तराकडे जीवांच्या संख्येत घट होत जाते .या संकल्पनेच्या आकृतिबंधाला परिस्थितिक पिरॅमिड अथवा मनोरा ( Ecological Pyramid) असे म्हणतात.
यामध्ये उत्पादक जीव पायाभूत असतात आणि एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या जीवन समूहांची संख्या क्रमाने घटत जाऊन पिरॅमिडचा शिरोबिंदू तयार होतो.
परिस्थितिक पिर्यामिड तीन प्रकारचे असतात.
1. संख्येचा पिरॅमिड
Pyramid of Numbers
प्राथमिक उत्पादक ,तृणभक्षक, प्राथमिक मांसभक्षक, द्वितीयक मांसभक्षक, तृतीयक मांसभक्षक.
2. जैविक वस्तुमानाचा पिरॅमिड
Pyramid of Biomass
3. ऊर्जेचा पिरॅमिड
Pyramid of Energy
Comment and share
11 Comments
Very nice sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteसुपर
ReplyDeleteNice
ReplyDeleteUseful information sir
ReplyDeleteNice
ReplyDeleteV. Nice
ReplyDeletevery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteWell Structured writing👍🏻
ReplyDelete#happy_reading_folks🙌
Very nice
ReplyDelete