जैवविविधतेचे महत्त्व
Importance of Biodiversity
निसर्गात किंवा पर्यावरणात आढळणारे प्राणी वनस्पती मानवाला अनेक रूपाने लाभदायक आहेत. मानव प्राचीन काळापासूनच वनस्पती आणि प्राण्यांच्या शोषण करत आला आहे. सध्याच्या परिस्थितीत जीवनात उपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू प्राणी जगतावर अवलंबून आहेत. जैविक विविधतेत मानवासाठी खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यात्मक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर परिसंस्थेच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहेत.
जीवावरनाच्या निकोपपातेसाठी आणि समृद्धीसाठी जैवविविधतेची गरज आहे. उपभोग्यता (Consumptive) उत्पादकता ( Productive )सामाजिकता ( Social)आणि व्यवहारिकतिच्या दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व खालील प्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
1. उपभोग्यतेच्या दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Consumptive Importance of Biodiversity
जैवविविधतेमुळे "जीन "चा अभ्यास सहज शक्य झाल्यामुळे पिकांचे गुणधर्म बदलणे शक्य झाले आहे. या माध्यमातून कीड नियंत्रण करणारे जीन पिकात संकरीत केल्याने कीड नियंत्रण पीक तयार झाली आहेत.
गांडूळ सारखा प्राणी शेतजमीन भुसभुशीत करतो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.
2. उत्पादकता दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Productive Importance of Biodiversity
मानवासाठी आवश्यक असलेले अन्न सजीव व पासून प्राप्त होते. विविध प्रकारच्या वनस्पतींचा वापर मानव अन्न म्हणून करतो. प्राण्यांचे मांस ,दूध ,अंडी यांचा मानवाच्या आहारात समावेश आहे.
कापड उत्पादनासाठी कापूस वनस्पतीपासून मिळतो, रेशमाचे उत्पादन रेशमाचा किड्यापासून होते , मध मधमाशांच्या पोळ्या पासून प्राप्त होतो .प्राण्यांच्या कातडीचा वापर अनेक वस्तू तयार करण्यासाठी होतो.
जैवविविधतेमुळे अनेक औषधी विविध प्रकारच्या वनस्पती व वृक्षांमुळे प्राप्त होतात. मोर्किन हे वेदना वेदनाशक औषध, मलेरियावर उपयुक्त असलेले औषध क्यूँनीन ,कर्करोगाविरोधी टॉझोल, विविध वनस्पती पासून मिळते.
आयुर्वेदिक उपचार पद्धतीत कोरफड, कडूलिंब ,जास्वंद, जांभूळ, सदाफुली या वनस्पतींचा वापर औषध म्हणून केला जातो.
X X
3. सामाजिक दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Social Importance of Biodiversity
भारतीय संस्कृतीमध्ये काही वनस्पतींना व वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे.
दुर्वा आणि लाल जास्वंदीच्या फुलांचा उपयोग गणेश पूजेसाठी केला जातो .
वडाची पूजा ,पिंपळाची पूजा, तुळस पूजा, हिंदू संस्कृतीत महत्त्वाची मानली जाते.
शंकराच्या पूजेसाठी बेलाची तर मारुतीच्या पूजेसाठी रुईची फुले व पाने वापरली जातात .
घरांमध्ये धार्मिक कार्य असेल तर आंब्याच्या पानाचे तोरण दरवाजांना बांधले जाते .
वनस्पती प्रमाणेच काही प्राणी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत पूजनीय आहेत.
पोळ्याला बैलाची पूजा केली जाते . दीपावली वसुबारसमध्ये गाईची पूजा केली जाते .
कासवाला वैभवाचे प्रतीक मानले जाते .
प्राण्यांनी उत्सर्जित केलेल्या मल-मूत्र ,शेन इत्यादी पदार्थांचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. शेणाचा वापर करून गोबर गॅस इंधन निर्मिती सुद्धा होते.
4. व्यापारी दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Commercial Importance of Biodiversity
जैवविविधतेचे व्यापारी दृष्टीकोनातून महत्त्व आहे. हस्तिदंत, मध, मेन, कात ,वेत ,रबर इत्यादी उत्पादने लघुउद्योगासाठी कच्चामाल म्हणून वापरले जातात.
भारतातील जंगले ही औषधी वनस्पतींची माहेर घर आहेत. व्यापारी दृष्टीने हिरडा, बेहडा ,कोरफड वनस्पती महत्त्वाच्या आहेत.
5. पर्यावरण समतोल दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Environmental Balance Importance of Biodiversity
पशुपक्ष्यांच्या जैवविविधतेमुळे परिसंस्था समृद्ध असल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पशुपक्षी यामुळे बीजप्रसार होऊन वनस्पतींची वाढ होते.
X X
6. हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण दृष्टीने जैवविविधतेचे महत्त्व
Natural Air Purification Importance of Biodiversity
वनस्पती ह्या उत्पादक आहेत . स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ह्या वनस्पती बऱ्याच प्रमाणात प्राण्यांचे अन्न असतात.
कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र यामध्ये वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात.
हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण करण्याची महत्त्वाची भूमिका वनस्पती करतात व वनस्पतीमुळे तापमान नियंत्रित होते .
ध्वनी प्रदुषणाची तीव्रता कमी होते .कार्बन-डाय-ऑक्साईड नियंत्रणात ठेवून हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण वनस्पती करतात.
प्रत्येक प्राण्याला निसर्गाने विशिष्ट काम ठरवून दिले आहे. विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती व मानवी जीवनाला सहाय्य करतात.
X X
मातीत असणारे अझोटोबॅक्टर नावाचे विषाणू हवेतील नायट्रोजनच स्थिरीकरण करून जमिनीचा कस वाढवितात. इतर सूक्ष्म जिवाणू मार्फत मृत प्राणी ,वनस्पती तसेच टाकाऊ पदार्थांचे विघटन होते.
जंगले जमिनी चे अच्छादन म्हणून काम करतात .जंगलामुळे जमिनीची धूप थांबते . पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. वाळवंटीकरण याला आळा बसतो. वन्यजीवांना आसरा मिळतो.
जिवाणूंचा वापर करून जैविक खतांची निर्मिती करता येते. रासायनिक खते कीटकनाशके ,तणनाशके यांचे दूरगामी परिणाम लक्षात घेता जैविक खते उपयुक्त ठरतात.
संकरित प्राण्यांची निर्मिती केली जाते. हे संकरित प्राणी मूळ जातीपेक्षा जास्त दूध देतात.
संकरित बियाण्यापासून अन्नधान्यांचे भरघोस उत्पादन मिळते. संकरित प्राणी व संकरित वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही मूळ जातीपेक्षा असलेल्या रोगप्रतिकारक शक्ति पेक्षा जास्त असल्याने या वनस्पती व प्राणी सहसा रोगांना बळी पडत नाहीत व भरपूर उत्पन्न देतात.
उदा. भारतातील भाताच्या मूळ जातींचा संकर घडवून भाताची एक नवीन संकरित जात निर्माण केली गेली .जी मुख्य चार प्रकारच्या रोगांपासून मुक्त आहे. या भाताच्या नवीन संकरित जातीचीची लागवड आता आशिया खंडामध्ये बहुतेक ठिकाणी केली जाते. निसर्गातील विविध जीव व त्यांच्या प्रजाती पर्यावरणात अत्यंत महत्त्वाचे काम करीतच राहतात. कोणताही जीव बिनकामी किंवा टाकाऊ नसतो. म्हणून ही निसर्गाने दिलेली जैवविविधतेची देणगी मानवाने जतन करावयास हवी आणि ती काळाची गरज मानली जाते.
Comments and share...
6 Comments
Very nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeletegood informeation
ReplyDeleteVery good
ReplyDelete