Hot Spots of Biodiversity in India
भारतातील जैवविविधता संपन्न ठिकाणे
संपूर्ण जगात एकूण 25 जैवविविधता प्रदेश आहेत. भारतातही काही ठिकाणी असे हॉटस्पॉट (अनुकूल क्षेत्र ) आढळतात. त्याचे तीन विभाग आहेत.
1. ईशान्य भारत
2. पश्चिम घाट
3. अंदमान व निकोबार बेटे
या प्रदेशात समृद्ध असे प्राणी आणि वनस्पतींच्या जीवजाती आढळतात.
अंदमान निकोबार बेटा मध्ये सुमारे 2200 फूल वनस्पतींच्या जाती, 120 नेचे वनस्पतींच्या जाती.
ईशान्य राज्यात 63 टक्के सस्तन प्राणी 1500 स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.
पश्चिम घाटामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचे प्रमाण जास्त आहे तसेच 1500 वनस्पतींच्या प्रजाती येथे आढळतात.
मानवी हस्तक्षेपामुळे सर्व क्षेत्रातील जैवविविधता 2-3% पर्यंत खाली आलेली आहे .त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
याचे नुकसान म्हणजे मूळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मानवी स्थलांतर व लोकसंख्या वाढ हे मुख्य कारण, जैवविविधतेच्या क्षेत्राच्या नाशास कारणीभूत आहे.
PAI च्या अभ्यासानुसार जागतिक लोकसंख्येच्या 20 % लोक हे या हॉटस्पॉट क्षेत्रात राहतात व याची वार्षिक वाढ 1.8 % इतकी आहे म्हणजे जगाच्या 1.4 % एवढी लोकसंख्या.
हॉटस्पॉट चे संरक्षण आणि संवर्धन
Protection and Conservation of Hot Spots
या कामासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यात वनस्पतीचे आणि प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी " मॅकअर्थर फाउंडेशन" ही पहिली संस्था संरक्षण व संवर्धनासाठी पुढे आली आहे .
त्यांनी अशी क्षेत्रे निवडले आहेत त्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. अशा अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत आहेत.
जैविक विविधतेवरील संकटांची कारणे
Causes of Threats to Biodiversity
निसर्गाने जैविक विविधता दिली आहे. पण तिचा ऱ्हास हळूहळू होत आहे.
अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे भूकंप ,ज्वालामुखी, अवर्षण ,वादळे त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. पण या ऱ्हासाला सर्वात जास्त जबाबदार मानवच आहे .
मानवाने निसर्गावर वेळोवेळी आक्रमण केलेले आहे .जंगल तोडणे, नद्या अडवणे , डोंगर पोखरणे, मोकळी राने सिमेंटच्या जंगलात रुपांतर करणे असे नानाविध उपक्रम मानवाने करून जैविक विविधतेवर संकट आणले आहे.
X X
1. अधिवासांचा विनाश
Habitat Distruction
पृथ्वीवरील जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही वर्षात त्यांच्या अधिवासाचा मानवाकडून केला गेलेला विनाश आहे .
तीव्र गतीने जंगलांचा नाश करून वन्य जीवांना एकाकी पाडले गेले आहे .त्यांना एकाकी गटात विभागले गेल्यामुळे ते संकटाचा सामना करण्यास सक्षम नाहीत.
वन्यजीवांचे अधिवास याचा विनाश करून आपण फक्त प्रमुख प्रजातीच विनाश केला नाही तर ज्या प्रजाती आपणास ज्ञात नव्हत्या त्या आपण प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.
2. बेकायदा वन्यजीवांची शिकार
Poaching of Wildlife
जगामध्ये वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार मोठ्या प्रमाणात केली जात आहे .म्हणून बरेच वन्य प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . बरेच नामशेष पण झाले आहेत . वन्यजीवांचा अन्न म्हणून उपयोग केला जात आहे. त्या शिवाय त्यांच्यापासून इतर उत्पादन देखील लोक मिळवत आहेत.
उदा. फर गोळा करणे, कातडी मिळवणे, सिंग( Horns) दात इत्यादी. याशिवाय अनेक वन्यजीवांचा संशोधनासाठी पण उपयोग केला जात आहे.
काही देशात वन्यजीवा पासून तयार केलेल्या वस्तूंची मागणी युरोपीय, उत्तर अमेरिका देश व काही आशियाई देशात वाढली आहे. जपान, तैवान, हॉंगकॉंग यात मांजर आणि सापांच्या जागतिक आयात पैकी 3/4 आयात करतात.
भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाघांची तस्करी केली जात आहे .परिणाम म्हणून गेल्या पन्नास वर्षात वाघांच्या संख्येत खूप घट झाली आहे.
त्यांची शिकार करून त्यांची हाडे व कातडी यांची यांची तस्करी भारत-नेपाळ , तिबेट मध्ये करण्यात येते.
3. जंगल तोड
Deforestation
मानवाने इंधन, चारा ,इमारती लाकूड यासाठी जंगलांची कटाई केली त्यामुळे वनात राहणाऱ्या प्राण्यांची घरे नष्ट झाली.
ससा, हरिण ,कोल्हा ,वाघ वगैरे यांचे अन्नसाखळी नष्ट झाली. त्यामुळे हे प्राणी वन सोडून गेले व काही नष्ट झाले.
4. वाढती लोकसंख्या
Population Growth
जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाला निवाऱ्यासाठी घरे कमी पडू लागली. त्यामुळे त्यांनी जंगलांचा नाश केला. तेथील जागा स्वत: राहण्यासाठी वापरली .
मोठे मोठे वृक्ष तोडणे त्याचा उपयोग इमारतीच्या लाकडासाठी करणे त्यामुळे त्या वृक्षावर राहणारी वानरे, वटवाघळे, कावळे ,चिमण्या व इतर पक्षी या बेघर झाले व त्यांचा नाश झाला.
5. औद्योगिक औद्योगिकीकरण
Growing Industrialisation
उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा लागते. त्यासाठी मानवाने जंगल तोडून ती मिळवली. कारखाने सुरू केले. पण त्यामुळे प्रदूषण वायू आणि प्रदूषित पाणी निर्माण झाले व हे वायू आणि प्राणी अनेक जैविक संपत्तीचा नाश करणारे ठरले.
6. नद्या- धरणे काम
River-Dam Projects
अनेक नद्यांवर धरणे बांधली गेली. त्यामुळे नद्यांचा प्रवाह खंडित झाला .या खंडित प्रवाहाचे वाळवंट झाले. त्यामुळे पाण्यात राहणारे मासे, कीटक व इतर जलचर प्राणी यांचा नाश झाला.
7. खाणकाम
Mining
मानवाने लोह, तांबे, कोळसा ,डिझेल ,पेट्रोल, गॅस यासाठी अनेक खाणी खोदण्याचे काम केले. त्यामुळे अशा जागेखालील बिळे करून राहणारे असंख्य साप , बेडुक, कोल्हे इत्यादी प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
8. किटकनाशके व रोगनाशके
Insecticide and Pesticides
मानवाने आपल्या अन्नधान्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक किटकनाशके व रोगनाशके फवारली. त्यामुळे फळे ,पाने विषारी झाली. हे खाणारे पशुपक्षी, कीटक यांना मात्र विष पचवता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
X X
9. अणूचाचण्या स्फोट
Atomic Explosion
अणूचाचणी ह्या बऱ्याच वेळा वाळवंटी प्रदेशात व समुद्राच्या तळावर घेतल्या जातात .या चाचण्यासाठी जमीन खोदावी लागते. या अनुदानामुळे समुद्रातील व वाळवंटी भागातील सजीवांची आधिवास क्षेत्रे सजीवांसह नष्ट होतात.
10. लष्करी तळ
Military Camps
लष्करी हेतूसाठी बर्याचदा जमिनीवर लष्करी तळ उभारले जातात. यामुळे सुद्धा त्या जमिनीवरील सजीवांची अधिवास क्षेत्रे नष्ट होतात.
11. स्थलांतरीत शेती
Shifting Agriculture
स्थलांतरित शेतीमुळे जंगलांचा नाश झाला. म्हणून सजीवांची राहण्याची ठिकाणी नष्ट होण्यास मानवाकडून केली जाणारी स्थलांतरीत शेती सुद्धा कारणीभूत आहे.
Comment and share..
8 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice info sir
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery good
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery usefull and important
ReplyDeleteThank you 😊 for knowledge
ReplyDelete