Subscribe Us

header ads

Global and National Biodiversity: वैश्विक व राष्ट्रीय जैवविविधता

 वैश्विक व राष्ट्रीय जैवविविधता 

 Global and National Biodiversity 


1. वैश्विक जैविक विविधता 

Global  Biodiversity

यास जागतिक जैविकविविधता असेही म्हणतात. वैश्विक जैविक विविधतेत जीवावरण यातील बद्ध परिसंस्थेत आढळणाऱ्या जैविक विविधतेचा समावेश होतो. याचा भौगोलिक विस्तार जास्त असल्यामुळे भौगोलिक कारकांच्या बदलत्या स्वरूपानुसार भिन्नता अधिक आढळून येते . यामुळे संपूर्ण जीवावरणात जवळपास 21 दशलक्ष वनस्पती आणि प्राण्यांच्या जाती आहेत.  

संपूर्ण पृथ्वीवर आढळणाऱ्या जैविक विविधतेची सीमा  हवामानीय कटिबंधीय निश्चित करत असतात . विषुववृत्तीय जंगलातील जैविक विविधता कारण यातील जैविक विविधता हवामानामुळे भिन्नता दिसून येते. सर्वाधिक संपन्न जैविक विविधता विषुवृत्तीय आरण्यातील मानली जाते .अति महत्त्वाची भूमिका बजावते .

X X

1. हवामानाच्या दृष्टिकोनातून वैश्विक जैविक विविधता

 1. विषुववृत्तीय प्रदेशातील परिसंस्था

2.  उष्ण कटिबंधीय प्रदेशातील परिसंस्था

3.  समशीतोष्ण कटिबंधातील परिसंस्था 

4. ध्रुवीय प्रदेशातील परिसंस्था 

वरील परिसंस्थेतील अजैविक घटक हे एकमेकांपासून भिन्न आढळतात. त्यामुळे जैविक घटकांच्या जाती-प्रजाती सुद्धा प्रदेश परिसंस्था नुसार एकमेकापासून वेगळे आढळतात.

2.  आधिवासानुसार वैश्विक जैविक विविधता 

1. भूपरिसंस्था 

2. जलपरिसंस्था 

3. वातावरणीय परिसंस्था

 जमिनीच्या प्रकारावरून भूपरिसंस्थेचे, प्राण्यांच्या प्रकारावरून जलपरीसंस्थेचे व वातावरणीय फरकावरून  वातावरणीय परिसंस्थेचे उपप्रकार दिसून येतात.

 जमिनीवरील परिसंस्थेत अरण्याचा प्रदेश, उष्णकटिबंधातील वाळवंटी प्रदेश ,पर्वतीय प्रदेश, गवताळ प्रदेश यांचा समावेश होतो. तर सरोवर, नदी, खाडी ,सागर, महासागर ह्या जलीय परिसंस्थेमध्ये येतात.

X X

2. राष्ट्रीय पातळीवरील भारतातील जैवविविधता 

 National Biodiversity

 भारत देश हा जैवविविधतेने समृद्ध व  अनेक प्राणी आणि वनस्पती च्या विविधतेने संपन्न असा जगातील एकमेव देश आहे.

 भारतात 45000 वनस्पतीच्या व 8100 प्राण्यांच्या विविध प्रजाती आहेत. येथील अनेक प्रजाती तर भारतातच उगम पावले आहेत. 

 सपुष्प वनस्पतींच्या 15000 प्रजाती आहेत. प्राण्यांच्या बाबतीत 65000 प्राण्यांच्या जाती आहेत. त्यातील 50,000  अपृष्ठवंशीय प्राणी, सस्तन प्राण्यांच्या जवळपास 3340 जाती, भारतात नोंदवल्या गेल्या आहेत .

एवढ्या प्रचंड प्रमाणावर प्रजाती राहण्याचे मुख्य कारण म्हणजे भारताचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती आहे .जगातल्या सर्व हवामानचे विभाग जवळपास भारतामध्ये पाहावयास मिळतात.

उदा. सतत पाऊस पडणारा हिमालयाचा भाग ,बाजूला राजस्थानचे वाळवंट .भारत हा प्राचीन काळापासून कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे असंख्य औषधी वनस्पती सापडतात.

भारतातील जैवविविधतेला संकटात आहे कारण कारण वन्य जीवांची शिकार येथे मोठ्या प्रमाणावर होते . चित्ता ,गुलाबी डोके असलेले बदक, घुबड हिमालयातील तित्तर, वाघ इत्यादी जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे वाचवण्यासाठी सरकारी व  निमसरकारी पातळीवर स्वयंसेवी संघटना प्रयत्न करत आहे. 

त्यासाठी राष्ट्रीय उद्याने ,अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प द्वारे भारतामध्ये जैवविविधतेचे संरक्षण केले जाते .

वनस्पतींचे संवर्धन उद्यानामध्ये, बागांमधून केले जाते .भारतात काही कायदे सुद्धा जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत केलेले आहेत.

X X

3.महाराष्ट्रातील जैवविविधता 

Biodiversity in Maharashtra

महाराष्ट्राच्या 3 लाख 10 हजार चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी 46 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र जंगल आहे. हे जंगल सुमारे 15%  आहे त्यापैकी 80 % जंगल हे विदर्भात आहे, 20% जंगल हे सह्याद्रीरांगा व इतर ठिकाणी आहे. 

महाराष्ट्रात सदाहरित, पानगळ ,काटेरी व खारफुटी प्रकारची जंगले आहेत .त्यामुळे येथे जैवविविधता वैशिष्ट्यपूर्ण पहावयास मिळते. 

महाराष्ट्रामध्ये वनस्पतींच्या प्रजाती बरोबर सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, बेडूक वर्गीय प्राणी, मासे, किटक इत्यादी प्रजाती मोठ्या प्रमाणावर आहेत. 

जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात 5 राष्ट्रीय उद्याने व ते 33 अभयारण्य तयार केलेली आहे.

 जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे काम सरकारी पातळीवरून व स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून केले जाते.






Comment and share..

Post a Comment

4 Comments