Subscribe Us

header ads

Conservation of Biodiversity: जैविक विविधतेचे संवर्धन

 जैविक विविधतेचे संवर्धन 

Conservation of Biodiversity

 


भारतामध्ये प्राचीन काळापासून विपुल आणि समृद्ध जैवविविधता आढळून येते. विविध वनस्पती व प्राण्यांच्या जाती मध्ये विविध भागात विविधता आढळून येते .

उत्तरेकडील उंच हिमालय ,ईशान्य भागातील घनदाट जंगले, देशाच्या पूर्व पश्चिमेला असलेला पूर्व व पश्चिम घाट ,गंगेचे मैदान, राजस्थानातील वाळवंट ,खारफुटीची जंगले ,विस्तृत पठारी भाग, अति घनदाट जंगल असलेले अंदमान निकोबार बेटे ,उष्ण कटिबंधातील सदाहरित व निम सदाहरित जंगले ,हिमालयातील सूचिपर्णी वृक्षांची आलाइन फॉरेस्ट , दमट व कोरडी पानगळी जंगले, काटेरी वने, खारफुटीची जंगले अशा विविध जंगलांमध्ये सजीवांची विविधता आढळून येते .

जगातील अतिसंवेदनशील 25 भूभागापैकी पश्चिम घाट हा भूभाग भारतात आहे .

भारतात आढळणाऱ्या वनस्पती व जंगल संवर्धन व संरक्षणासाठी इ. स. 1980 मध्ये जंगल संरक्षण तर इ. स. 1972 मध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन्यजीव संरक्षण कायदे पास करण्यात आले .

X X

आज भारतात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी 23 व्याघ्र प्रकल्प, 92 राष्ट्रीय उद्याने, 490 अभयारण्य आणि  15 राखीव जंगले तयार करण्यात आली आहेत.

 आज भारतात वरील प्रकल्पासाठी एक लाख 55 हजार हेक्‍टर जमीन वनाच्छादित आहे. त्यात वन्यजीवांना अभय मिळते आणि त्यांची संख्या त्यामुळे वाढत आहे. 

जैवसंवर्धनासाठी संकरित पद्धतीने नवीन जाती तयार केल्या जातात. परंतु त्यासाठी लोकल जंगली जातींचा खूप उपयोग होतो. त्या जातीतील जनुक  हा सर्वात महत्त्वाचा अनुवंशिक भाग म्हणून जंगली प्राणी व वनस्पतींचे जनुक जपण्यासाठी अशा सजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यालाच "जीन बँक" किंवा "जनुक बँक "असे म्हणतात .

अलीकडे नैसर्गिक जनन प्रक्रियेला डावलून "क्लोनिंग" पद्धतीने सजीव प्रयोगशाळेत तयार केले जातात .त्यामध्ये ही जनुकांचा संबंध येतो त्याला जणूक संवर्धन असे म्हणतात.

परिसंस्थामधील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य हे जैवविविधता संवर्धन व करमणुकीची महत्त्वाची साधने आहेत .

वन्यजीव संवर्धनासाठी " वन्यजीव संरक्षण कायदा" 1972 ( Wild life Protection Act-1972 ) मध्ये पास करण्यात आला .

वरील कायद्यातील भाग 29 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे या देशातील कोणताही वन्यजीव मारता येणार नाही. भले तो वन्यजीव जंगलात असो अभयारण्यात असो किंवा इतरत्र त्यासाठी वन्यजीव संवर्धन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते . मारण्यासाठी सबळ कारण असावे लागते. वन्यजीव विभागाला त्या कारणची खात्री पटल्यावरच संबंधित वन्यजीव पकडला जातो किंवा मारला जातो. 

X X

एकविसाव्या शतकातील जैवविविधता संवर्धन धोरण 

Policy of Conservation of Biodiversity in Twenty first Century

जगामध्ये जैवविविधता टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होताना आढळून येतात .

उष्णकटिबंधातील दमट भागांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो व नेमक्या त्याच ठिकाणी जगातील निम्म्यापेक्षा जास्त जैवविविधता आढळून येते .

अलीकडे मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचा ऱ्हास होताना आढळून येत आहे . हा

ऱ्हास निसर्गऱ्हासपेक्षा हजार ते दहा हजार पटीने जास्त असतो.

 युरोपमधील अनेक विकसित देशांमध्ये तसेच उत्तर अमेरिकेत प्रचंड प्रमाणात वनांचा नाश झाला .

सर्वसाधारणपणे भूतलावर 50 लाख सजीव जाती आढळून येतात .त्यापैकी 15 लाख प्रजातींचा अभ्यास केला गेला आहे.

मोठ्या प्रमाणावरील सजीवांचा नाश हा त्यांच्या वसतिस्थान च्या नाशामुळे झाला आहे. 

अनेक जंगली प्रजातीमध्ये चांगली जनुक आढळतात. त्यामध्ये रोगप्रतिकारक ,अन्नातील सत्वपक्वता गुणवत्ता असणार्‍या अशा प्रकारची जनुक असतात. त्यासाठी सर्व वन्य जीव वाचविणे हा आजकालचा खरा लढा आहे .

अलीकडे जगातील अनेक संस्था वनस्पती जनुक संवर्धनासाठी झगडताना आढळून येतात .

जगामध्ये FAO ही आंतरराष्ट्रीय कमिशन त्यासाठी बहुमोल काम करीत असते .

भारतामध्ये अनेक संस्था वन व वन्यजीव संवर्धनाचे काम करीत आहे ग्रामीण यांच्या सहभागातून संयुक्त वन व्यवस्थापन व कुऱ्हाडबंदी तून वन संरक्षण व संवर्धन करत आहे.

X X

 आज भारतामध्ये IN-PGRT (The Indian National plant Genetic resource system) ही संस्था ICAR (Indian Council of Agricultural Research ) या संस्थेच्या अंतर्गत जनुक संवर्धन GBC (Gene Bank Conservation ) चे काम करीत आहे.






Comment and share

Post a Comment

6 Comments