परिसंस्थेची मूलभूत तत्वे
Cardinal Principles of Ecosystem
पर्यावरणातील नैसर्गिक अधिवास, अजैविक व जैविक घटकांनी युक्त असतात.
कोणत्याही अधिवासात सजीवांची आपापसात तसेच त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणातील अजैविक घटकांशी सतत पारस्परिक क्रिया-प्रक्रिया होत असतात.
या संपूर्ण प्रक्रियेत ऊर्जेची गरज सूर्याकडून भागविली जाते व पोषक द्रव्यांची देवान -घेवान होत राहते .
निसर्गातील अशी साधारण परिपूर्ण जैवअजैव अधिवासात परिसंस्था असे म्हटले जाते.
परीसंस्थांच्या समग्र व श्रंखलायुक्त संतुलनावर पर्यावरणाचे आरोग्य अवलंबून असते.
एकाच परिसंस्थेत विविध जीवजाती जीवन जगतात व या जीवजातींचे पर्यावरणाशी सुसंवादित साहचर्य असते.
परिसंस्थेचे विशिष्ट कार्यात्मक अस्तित्व मुख्यतः खालील तीन मुलभूत तत्वावर आधारलेले असते.
X X
1. परिसंस्था रचना
Structure of Ecosystem
2. पोषक द्रव्यांचे चक्रीकरण
Nutrient Cycling
3. ऊर्जास्त्रोत
Energy Flow
1. परिसंस्था रचना
Structure of Ecosystem
अजैविक माती ,खनिजे ,पाणी ,CO2 वर सूर्यकिरणांच्या प्रभावाने प्रकाश संश्लेषण क्रिया घडून हरितद्रव्य निर्माण होते .
हरितद्रव्य पासून वनस्पती वाढतात . पुढे वनस्पतींचा क्षय होतो . या वनस्पती तृणभक्षक प्राण्यांचे अन्न असतात.
तृणभक्षक प्राण्यावर वाघ ,सिंह सारखे मांसभक्षक प्राणी वाढतात.
मांसभक्षक प्राणी मरण पावल्यानंतर गिधडा सारखे सर्वभक्षक प्राणी हे अन्नसाखळी पुढे नेतात.
शेवटी सर्वभक्षक प्राण्यांचा नाश होऊन संयुक्त प्रथिने विघटनाची क्रिया सुरू होते.
बुरशी ,बॅक्टेरिया शेवाळ हे जीव विघटन घडवून आणतांना त्यांचे मूलभूत द्रव्यात रूपांतर करतात.
त्याच वेळी ऊर्जा व पोषण द्रव्ये निर्माण होतात .ही सर्व अजैविक द्रव्य असतात .
पुढे अजैविक द्रव्य पाणी, ऊर्जा ,सूर्यप्रकाशात अन्ननिर्मिती किंवा सजीवास सुरुवात होऊन पूर्ण चक्र पूर्ण होते.
X X
परिसंस्थेच्या रचनेचे खालील दोन मुख्य भाग आहेत.
1. अजैविक घटक Abiotic Factors
2. जैविक घटक Biotic Factors
1. अजैविक घटक
Abiotic Factors
अजैविक घटकांचे खालील दोन उपगट पडतात.
1. प्राकृतिक घटक
प्राकृतिक घटकांमध्ये पर्जन्य, तापमान ,सूर्यप्रकाश ,आर्द्रता ,मृदा प्रकार आणि भूपृष्ठरचना इत्यादींचा समावेश होतो.
2. रासायनिक घटक
रासायनिक घटकांमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन ,कार्बन डाय-ऑक्साइड, मॅग्नेशियम फॉस्फरस इत्यादींचा समावेश होतो.
या घटकांच्या मांडणीस अजैविक संरचना म्हणून ओळखले जाते.
परिसंस्थेत जैविक किंवा निर्जीव घटक व पोषक पदार्थ क्रमाने फिरत असतात आणि त्याच बरोबर उर्जेचा प्रवाह ही सुरू असतो. त्यात सजीवांचाही अंतर्भाव असतो.
पोषक चक्र व ऊर्जाप्रवाह साध्य होण्यासाठी परिसंस्थेत अनेक संरचनात्मक परस्पर संबंध आवश्यक असतात.
3. अजैविक घटकावर परिणाम करणारे घटक
अजैविक घटकांवर हवामान, मृदा व प्राकृतिक अडथळे या तीन गोष्टींचा परिणाम होत असतो.
1. हवामान
अजैविक घटकात तापमान आणि पर्जन्य हे प्रमुख घटक असून यांचा भूमीच्या जीव सहिता वर खूपच प्रभाव पडतो.
जगात हवामान सर्वत्र सारखे नाही .
पर्जन्य आणि तापमान या घटकांचा वितरणात व प्रमाणात बरीच विविधता आढळते.
पृथ्वीवर वार्षिक सरासरी पाऊस 0 ते 250 सेंटिमीटर दरम्यान आढळतो. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात अवर्षण असते .
काही भागात वर्षभर ,काही भागात हंगामी तर काही भागात एक ते दोन महिने पर्जन्य पडतो .
सरासरी वार्षिक तापमान सुद्धा जगात 0 डिग्री ते 38 डिग्री सेंटीग्रेड आढळते .
जगातील काही प्रदेश अतीउष्ण तर काही अतिथंड प्रदेश आढळतात.
तापमान आणि पर्जन्य यांचा एकत्रित परिणाम ही भिन्न भिन्न प्रदेशांत भिन्न भिन्न आहे.
यामुळे जगात निरनिराळी जीवसहिता (Biomes )वाढलेली आहे.
पाणी या घटकांमुळे वने ,गवताळ प्रदेश व वाळवंटे अशी भिन्न प्रकारची जीवसंहिता तयार झाली आहे.
वार्षिक पर्जन्य 100 सेंटीमीटर असेल तर वृक्षाची चांगली वाढ होते.
75 सेंटिमीटर पर्जन्य वृक्ष वाडीच्या सहिष्णुतेची मर्यादा आहे.
25 सेंटीमीटर पाऊस असल्यास गवत वाढू शकते.
वालुकामय प्रदेशात 5 ते 10 सेंटिमीटर पर्जन्याच्या ठिकाणी काटेरी वनस्पती आढळतात.
एखाद्या प्रदेशातील सर्वसाधारण हवामान स्थिती पेक्षा स्थानिक पातळीवर तापमान व आर्द्रता यांचे गुणधर्म काहीसे वेगळे असतात.
अशा हवामान स्थितीस त्या प्रदेशातील सूक्ष्म हवामान(Micro Climates ) म्हणून ओळखले जाते.
यामुळे विशाल जीव संहितेतील विविधता निर्माण झालेली आढळते.
महाराष्ट्रात पश्चिम भागात उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान आहे. परंतु सूक्ष्म हवामानाचा परिणाम म्हणून महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर , आंबोली या भागात सदाहरित वने तर कोकणात निमसदाहरित वने आढळतात.
2. मृदा
ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवच याचा शिजलेला थर म्हणजे मृदा होय.
मूळ खडक, खनिजे ,जैविक संयुगे , हवा व पाणी यांचे मिश्रण मृदेत आढळते .हवामान, वनस्पती, भूरचना ,मानवी क्रिया यामुळे मृदेत बदल होत असतात .
वनस्पतींना पोषक द्रव्येही मृदे कडून मिळत असतात व वनस्पतीतील खनिज द्रव्य मृदेत मिसळत असतात.
याचे विविध प्रकार आहेत .
आर्किटेक्ट प्रदेशात टुंड्रा मृदा थंड व आर्द्र हवामानाच्या प्रदेशात पॉडशल्स मृदा आहे.
सूचिपर्णी व पानझडी वनप्रदेशात तपकिरी मृदा तर समशीतोष्ण आर्द्र हवामानाच्या गवताळ प्रदेशात चैंनोर्झाम मृदा आढळते.
X X
समशीतोष्ण व शुष्क हवामानात फिकट तपकिरी मृदा तर उष्ण व आर्द्र हवामानात तांबूस व काळी मृदा आहे .
उष्ण व दमट हवामानातील वनात जांभ्याची मृदा आढळते आणि उष्ण व कोरड्या हवामानात वाळवंटी मृदा आढळते.
3. प्राकृतिक अडथळे
प्राकृतिक रचनेच्या परिणामामुळे एका परीसंस्थेतून दुसऱ्या परिसंस्थेत सजीवांचा प्रसार होऊ शकत नाही.
दोन परिसंस्था पर्वतामुळे वेगळ्या केल्या जाऊ शकतात . यांच्या दरम्यान महासागर ,वाळवंट असल्यास सजीवांचा प्रसार व स्थलांतर होऊ शकत नाही .
एखाद्या बेटावरील अथवा खंडावरील परिसंस्थेत समान अजैविक घटक असून सुद्धा त्या परिसंस्थेतील सजीव प्रकारात भिन्नता आढळून येते.
क्रमश..
Comments and share..
11 Comments
Nice information sir... - gaurav
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteUseful information sir
ReplyDeleteVery good
ReplyDelete