Subscribe Us

header ads

Biogeographical Classification of India: भारताचे जैवभौगोलिक वर्गीकरण

 भारताचे जैवभौगोलिक वर्गीकरण 

 Biogeographical Classification of India 


वेगवेगळ्या परिसरात राहणारे सजीव त्यांची उत्पत्ती त्यांचा पर्यावरणाशी संबंध तसेच त्या भागाचे भौगोलिक स्थान यानुसार त्यांचे केलेले अवलोकन म्हणजे जैवभौगोलिक किंवा भूजैविक वर्गीकरण. 

एखाद्या प्रदेशात आढळणाऱ्या भूपृष्ठीय हवामान, जलाशय, मृदा इत्यादी घटकातील विविधता जैवभौगोलिक वर्गीकरणाचे प्रमुख आधार म्हणून ओळखले जातात. या आधारावरच वनस्पतीच्या वितरनानुसार जैवभौगोलिक वर्गीकरण केले गेले आहे.

भारतामध्ये असणाऱ्या भौगोलिक विविधतेमुळे भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा विकास झाला आहे. भारतातील प्राकृतिक विभाग भिन्नतेमुळे वनस्पतीच्या प्रकारात विविधता आढळून येते. या आधारेच भारताला विविध वनस्पती प्रदेशांमध्ये विभक्त केले गेले आहे. 

या दिशेने प्रादेशिक भिन्नतेच्या आधारावर सर्वप्रथम विंचात्यत  हूकर आणि थामसन यांनी ई.स.1867 मध्ये भारताला आठ वनस्पती प्रदेशात विभागले होते. यानंतर कॉल्डर यांनी इ. स. 1939 मध्ये, चटर्जी यांनी भारतातील वृक्षवेली च्या आधारे आठ वनस्पती प्रदेशात भारताचे विभाजन केले.

 भारतात जवळजवळ दहा जैवभौगोलिक क्षेत्रे आहेत.

X X

1. पश्चिम हिमालय प्रदेश/ अतिउच्च प्रदेश

 काश्मीर पासून ते कुमायुपर्यंत पर्यंत उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंधतील जंगले  येतात. अर्ध उष्णकटिबंधीय जंगले 1520 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात. यामध्ये साल, ताड, आवळा, पिंपळ , शिसम ,जांभूळ, बोर इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात .

समशीतोष्ण कटिबंधीय जंगलात रुंदपर्णी व सेकदार पानांची वृक्ष संमिश्र स्वरूपात 1520 मीटर ते 3660 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात. 

खालच्या भागात पर्जन्याची कमतरता व थंडीचे प्रमाण जास्त म्हणून देवदार, ब्लूपाईन, पॉपलर, इत्यादी वृक्ष आढळतात. पर्वतीय जंगले 3660 मीटर उंची पासून 4570 मीटर उंचीपर्यंत आढळून येतात. पर्वतीय जंगले सिल्वर, फर, बर्च इत्यादी वृक्ष अधिक प्रमाणात आढळून येतात.

2. पूर्व हिमालय प्रदेश 

ट्रांस हिमालय क्षेत्राच्या दक्षिणेला व या क्षेत्राला लागूनच तसेच अरुणाचल प्रदेशाच्या उत्तरेकडे हिमालयाचा पूर्वेकडील भाग यांचा पूर्व हिमालय प्रदेशांमध्ये समावेश होतो. या क्षेत्रात सदाहरित वृक्ष आढळतात . रानम्हशी ,गेंडा , लालपांडा याक, लेपर्ड असे प्राणी आढळतात.

3. वाळवंटी प्रदेश 

आखली पर्वताच्या पश्चिमेस या प्रदेशात गवत, निवडुंग, काटेरी झुडपे इत्यादी वनस्पती दिसून येतात .तसेच जंगली गाढव, हरणे, रानमांजर ,काळवीट इत्यादी प्राणी ही दिसून येतात.

4. निम्न वाळवंटी प्रदेश 

वाळवंटी प्रदेश आणि दख्खनचे पठार या दोघांच्या मध्ये निम्न वाळवंटी क्षेत्राचा विस्तार आहे .या क्षेत्रात दाट झाडी व विविध प्रकारचे गवत तसेच साप, उंट, कोल्हा इत्यादी प्राणी आढळतात.

X X

5. गंगेचा मैदानी प्रदेश

हा प्रदेश अखली पर्वत श्रेणी पासून पश्चिम बंगाल व ओरिसापर्यंत विस्तृत आहे. या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे सतत जंगलांचा ऱ्हास होत आहे. येथे आंबा ,अंजीर, ताड ,सुपारी, चिकू ,केळी व कमाळ यांनी भरलेले तर असंख्य तलाव आढळून येतात.

6. पश्चिम घाट प्रदेश 

गुजरात राज्यातील भडोच पासून दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत या प्रदेशाचा उत्तर-दक्षिण विस्तार आहे. उष्ण कटिबंधीय पानझडी जंगले आढळतात .अनेक प्रकारचे प्राणी पश्चिम घाट प्रदेशात दिसून येतात .

पश्चिम घाट माथ्यावर "रोलिंग शोलाजू" ही महत्त्वपूर्ण गवताळ प्रदेश परिसंस्था अस्तित्वात आहे. मलबार गंध मार्जार, बिन्नरवी पानमांजर, मीसोरी , स्लेडर ,लिरीस, वाघ, निलगिरी ताहर, सिंहपुच्छ वानर, निलगिरी लंगूर इत्यादी प्राणी आढळतात.

7. दख्खनचा प्रदेश

या पठारी प्रदेशाचा आधार त्रिकोणाकृती आहे. या प्रदेशाचा विस्तार उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा पासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत आहे.

8. पूर्वांचल प्रदेश 

भारताचा उत्तर पूर्व प्रदेश या प्रदेशात ऑर्किड, फर्न, केळी, बांबू, लिंब इत्यादी वनस्पती आढळतात .हिमबिबट्या, हुलुक, बोकेड, मेंढ्या इत्यादी प्राणी या क्षेत्रात आढळतात.

X X

9. समुद्रकिनारी प्रदेश 

भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश व लक्षणीय बेटांचे किनारपट्टीच्या प्रदेशाचा या विभागात समावेश होतो. या अनेक जलीय वनस्पती व जलीय प्राणी या क्षेत्रात आढळतात.

10. द्वीपसमूह प्रदेश

 बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेट  समूहाचा या क्षेत्रात अंतर्भाव होतो. अनेक प्रकारच्या सजीवांच्या जाती प्रजाती या बेटावर आढळतात. वटवाघळांच्या 26 जाती तसे 252 प्रकारचे विविधरंगी व आकर्षक अनेक प्राणी आढळतात.






Comments and share...

Post a Comment

9 Comments