जैवविविधता व त्याचे संवर्धन
Biodiversity and it's Conservation
22 मे :जागतिक जैवविविधता दिन.
जैवविविधता हे एक नैसर्गिक संसाधन मानले जाते. निसर्गाने मानवाला दिलेल्या विविध देणग्यापैकी एक देणगी असून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. परंतु सध्याच्या काळात जैवविविधतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.
वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर, वृक्षतोड, भूमीच्या वापरात होत जाणारे बदल यामुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत व बऱ्याच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
उष्ण तापमान पट्ट्यातील वनामध्ये पृथ्वीवरील सजीवांच्या 50% पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचा दर नैसर्गिक रित्या नष्ट होण्याच्या दराच्या सुमारे 1000 पटीने जास्त आहे असे शास्त्रज्ञ मानतात.
जैवविविधता पर्यावरणाचा आत्मा असून वन व वन्यजीव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळेच संतुलित पर्यावरणासाठी जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
X X
जैवविविधता
Biodiversity
जैवविविधता ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी असून मानवाच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे.
मानवाच्या सभोवताली विविध प्रकारच्या वनस्पती ,प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो .या सजीवांचा आकार ,प्रकार, संरचना यामध्ये भिन्नता दिसून येते .तरीदेखील एका विशिष्ट वातावरणात विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या संख्येचे सजीव दिसून येतात. सजीवांचा या एकत्रित आधिवासास "जैवविविधता" असे म्हटले जाते.
रिओडी जानेरो या ब्राझीलमधील राजधानीमध्ये सन 1992 मध्ये "वसुंधरा शिखर परिषद "संपन्न झाली त्यावेळपासून" जैवविविधता" हा शब्द जास्त प्रचलित झाला.
वॉल्टर डी. रोसेन यांच्यामते,
"एकाच परिसंस्थेत किंवा परिसंस्थेची संबंधित क्रियांमध्ये भिन्न जातींच्या भिन्न संख्यांच्या सजीवांचे एकत्रीकरण म्हणजे जैवविविधता होय".
"पृथ्वीवरील सजीव सृष्टी मध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात भिन्न आकाराचे, आकारमानाचे, संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसूत्रांचे ,कमी ,अधिक आयुष्य मानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात यालाच त्यांनाच जैवविविधता असे म्हणतात."
जैवविविधतेचे प्रकार
Types of Biodiversity
सध्या जैविक तंत्रज्ञान हे शास्त्र विकसित होत आहे. जैवतंत्रज्ञान शास्त्राच्या विकासामुळे मानवाला हवे ते अनुवंशिक बदल घडवून आणता येत आहेत . पारंपारिक पैदास पद्धतीने जे शक्य नव्हते ते तंत्रज्ञान या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे . दोन वेगवेगळ्या जातीतील जनुकांची आदलाबदल ही या तंत्रज्ञानाने आज शक्य झाली आहे .
जैवविविधतेत विविधतेत विविध प्रकार आढळतात. त्यातील तीन मुख्य प्रकार खालील प्रमाणे आहेत .
1.अनुवंशीय विविधता
Genetic Diversity
2.प्रजातीची विविधता
Species Diversity
3.परिसंस्था विविधता
Ecosystem Diversity
1.अनुवंशीय विविधता
Genetic Diversity
प्राणी आणि वनस्पती च्या दृष्टीने फार महत्वाचा सूक्ष्म घटक म्हणजे जनुक किंवा जीन एकाच प्रजातींच्या प्राणी आणि वनस्पती या जनुकांची विविधता म्हणजे अनुवंशीय विविधता किंवा गुणसूत्रीय विविधता किंवा जनुकीय विविधता .
प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती या जनुकाचा ठराविक संच असतो या संचात थोडाही बदल झाला तर त्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या गुणात, आकारात बदल होतो . जनुकात होणारा बदल त्याच प्रकारच्या सजीवातील समूहात होत राहतो व त्यामुळेच जातीसमूह तयार होत राहतात .
गुणसूत्रीय विविधता ही निरोगी संकरासाठी आवश्यक असते व अन्य जातींच्या विविधतेतून आपणास अन्नधान्यांच्या व पाळीव प्राण्यांच्या विविध जाती हजारो वर्षांच्या संकरातून मिळालेल्या आहेत .अनुवंशिक विविधतेचा व गुणसूत्रांचा अभ्यास करून संशोधन करून मानवाने वनस्पती व प्राण्यांच्या गुणसूत्रांमध्ये बदल घडवून पूर्वीपेक्षा जास्त सक्षम अशा सजीवांची निर्मिती केली. संकरित बियाणे निर्माण करून त्यापासून धान्यांचे उत्पादन वाढविले गाई व म्हशी यांच्या संकरित जाती निर्माण केल्या ज्यामुळे जातीपेक्षा कितीतरी जास्त दुधाचे उत्पादन देतात . या जाती निर्माण करताना सजीवांची अनुवंशीय विविधता लक्षात घ्यावी लागते व गुणसूत्रांमध्ये बदल घडवून नवीन संकरित जाती निर्माण कराव्या लागतात . अशा प्रकारे एकाच जातीच्या प्राण्यांच्या "जीन" मध्ये दिसून येणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय.
X X
2.प्रजातीची विविधता
Species Diversity
एकाच जातीच्या समूहामध्ये एकाच प्रकारचा जनुक (जीन) आढळतो.
त्यामुळे एकाच जातीच्या प्राण्यांमध्ये साम्य दिसून येते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचा अधिवास ही एकच असतो. परंतु अशा अधिवासात पोषक द्रव्यांची उपलब्धता वाढल्यास अनेक सजीव त्या ठिकाणी गोळा होतात. त्यात इतर अधिवासातून आलेले सजीवही असतात.
एकाच अधिवासात विविध प्रकारचे व विविध जातींचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात त्यालाच प्रजातीय विविधता असे म्हणतात.
प्रजातीय विविधता नैसर्गिक परिसंस्था आणि कृषी परिसंस्थेमध्ये जास्त दिसून येते . नैसर्गिक स्वरूपातील जंगलामध्ये वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळून येतात . विविध प्रजातींच्या वैविध्यामुळे जंगल संपदेचे महत्त्व आहे.
ब्रिटनमधील एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आत्तापर्यंत मासे , इतर जलचर, अपृष्ठवंशीय प्राणी, पक्षी व सस्तन सजीवांच्या 724 प्रजाती संपूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तसेच 22530 सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत त्यांचे संरक्षण मानवाने केले पाहिजे.
पर्यावरणातील बदलानुसार सुद्धा सजीवांच्या काही प्रजाती नष्ट होतात. तर काही नवीन सजीव उत्पन्न होतात.
3.परिसंस्था विविधता
Ecosystem Diversity
सजीव घटक व पर्यावरणातील घटक यांच्यातील क्रमबद्ध आंतरक्रिया यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजेच परिसंस्था होय. प्रत्येक परिसंस्थेतील पर्यावरण अधिवास त्यातील सजीव प्रजातींचे प्रकार ठराविक असतात. परिसंस्था बदलाबरोबर हे सर्व घटकही बदलतात यालाच परिसंस्था विविधता असे म्हणतात.
प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती यांचे ठराविक प्रकार असतात.
उदा. जंगल परिसंस्था ,गवताळ परिसंस्था त्यातील ठराविक प्रजातींचे सजीव सापडतात .
गवताळ परिसंस्थेत साप, उंदीर, सरडे इत्यादी प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती तर गवताचे प्रकार एकत्र राहतील तर
गोड पाण्याच्या परिसंस्थेत कासव, मासे, झिंगे वगैरेसारखे प्राणी व पानवनस्पती एकत्र राहते राहतात. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक, विघटक हे ठरावीक असतात.
म्हणजेच प्रत्येक परिसंस्थेत सजीवांच्या प्राप्तीची विविधता आढळते. यालाच परिसंस्था विविधता असे म्हणतात.
Comment and share.
7 Comments
Very nice information
ReplyDeleteVery nice kaka
ReplyDeleteBest
ReplyDeleteNice
ReplyDeleteEfforts deserve appreciations. ... and ... and ... exert a grand salutary influence.
ReplyDeleteNice information
ReplyDeleteThere is very important information...👌👍
ReplyDelete