Subscribe Us

header ads

Watershed Management: पाणलोट व्यवस्थापन

पाणलोट व्यवस्थापन

Watershed Management




पावसाच्या पाण्यामुळे निर्माण होणारे अनेक प्रवाह एकत्रित येवून मोठा जलप्रवाह तयार होतो व तो नदीला मिळून शेवटी समुद्रात विलीन होतो .या वेगवेगळ्या प्रवाहामुळे सिंचन क्षेत्राचे विभाजन होते.

पावसाचे व्यवस्थापन आणि जमिनीवरील पावसाच्या वाहणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे पाणलोट व्यवस्थापन होय. यालाच जलविभाजक व्यवस्थापन ही म्हणतात

जलविभाजक क्षेत्राचा आकार कितीही मोठा असू शकतो. परंतु त्याचे नैसर्गिक तसेच भूशास्त्रीय स्वरूप अबाधित राहणे आवश्यक आहे.

x x

पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टे

Objectives of Water Shed Management

पाणलोट व्यवस्थापनाची खालील प्रमाणे उद्दिष्टे आहेत.

1. जंगल लागवड करणे व वृक्षारोपण करणे.

2. पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे व त्याचा दर्जा खालावू न देणे.

3 वृक्षलागवड करणे सामाजिक वनीकरण यास प्राधान्य देणे.

4. जमिनीची पाणी वाढण्याची क्षमता निर्माण करणे.

5. शेतीवर आधारित कृषी उद्योग वाढीस लावणे.

6. खड्डे खोदून त्यात पाणी जिरवणे.

7. विविध पिकांचे उत्पादन घेणे त्यांच्यासोबत फळझाडे लागवड करणे ,वन शेती करणे.

8. जमिनीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन करून उत्पादनक्षमतेत सकारात्मक बदल घडवून आणणे. 

भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी बांध घालून अडवून जमिनीत मुरविणे.

9. पूरनियंत्रण जलाशय आणि  नदीतील गाळाच्या संचयाला रोखणे.

10. साधनसंपत्तीच्या विकासाची अशी राणी ती तयार करणे ज्याद्वारे आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्देशांची पुर्तता सहज करू शकू.

अशाप्रकारे पाणलोट विकास कार्यक्रमाचा उद्देश नैसर्गिक साधन संपत्तीच्या  व्यवस्थापनाद्वारे टिकाऊ उत्पादकता प्राप्त करून स्थानिक लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा आहे.

x x

पाणलोट व्यवस्थापन विकास कार्यक्रमातील अडचणी

Obstacles in the Developmental Program of Watershed Management

सध्याच्या परिस्थितीत काही नैसर्गिक व मानवनिर्मित घटक आहेत की, ज्यामुळे पाणलोट व्यवस्थापन विकास कार्यक्रमात अडचणी निर्माण करतात. पुढील प्रमुख अडचणी,

1. सहकार्याचा अभाव आणि स्थानिक राजकारण

2.तांत्रिक ज्ञान व उपयुक्त मानवी क्षमतेचा अभाव

3. शिक्षणाच्या अभावामुळे जागरूकतेचा अभाव

4. पैशाचा अभाव

5. सत्य आकडेवारी आणि संदेशवहन तंत्राचा अभाव

6. काम करणाऱ्या संस्था व ग्रामीण लोकात एकमेकाबद्दल संशयाचे वातावरण

x x

पाणलोट व्यवस्थापनाचे उपयोग व आवश्यकता

Use and Necessity of Watershed Management

जलविभाजकाचे उपयोग आणि आवश्यकता पुढीलप्रमाणे आहेत.

1. पावसाच्या पाण्याची साठवण करता येते.

2. बंधाऱ्याच्या कामातून ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

3. जंगल लागवड करण्यास मदत होते.

4. पडीक जमिनीचा विकास करता येतो.

5. पर्यावरण संरक्षित होऊन उत्पादनात वाढत होते.

6. भूमिपात टाळता येतो व जमिनीची उत्पादकता वाढते.

7. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटते.

8. खान कामा मुळे होणारे प्रदूषण टाळता येते.

9. गाळ संशयाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जलाशयांची साठवणक्षमता वाढते.

10. पावसाच्या पाण्याची साठवण करता येते.





VIEW,COMMENTSAND SHARE......


Post a Comment

6 Comments