जलसंवर्धन
Water Conservation
पृथ्वीवर 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे .पृथ्वीवरील जलावरणात 93 टक्के भाग महासागराचा असून 5 टक्के भाग हा जमिनीवरील पाण्याचा आहे .ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या स्वरूपात 2 टक्के पाणी आहे .
पृथ्वीवर महासागर समुद्र, सरोवर ,नद्या , ओढे ,झरे, विहिरीतून पाणी उपलब्ध होऊ शकते .पाण्याचे असंख्य उपयोग आहेत .
पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली असून प्राणी व वनस्पती यांमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सजीवांच्या शरीरात त्यांच्या क्रिया -प्रक्रिया होण्यासाठी पाण्याची गरज असते .
भूपृष्ठावरील अस्तित्वामुळेच जलचक्र कार्यरत आहे. घरगुती वापर, उद्योगधंदे, शेती तसेच प्राणी व वनस्पती यांचे पोषण व संवर्धन ,विद्युत निर्मिती, जलवाहतूक तसेच इत्यादी कारणांसाठी पाण्याचा उपयोग होतो.
पाणी हे घन, द्रव व वायू अशा अवस्थेमध्ये राहू शकते. हे महत्त्व लक्षात घेता जल ही अत्यंत उपयुक्त नैसर्गिक संपत्ती आहे असे दिसून येते.
लोकसंख्या वाढीमुळे उद्योगधंद्यांच्या आणि जलसिंचन विकासामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे.
पाण्याच्या उपलब्धतेवर मानवी उद्योग अवलंबून असतात. जगातील सर्व लोकांना शुद्ध ,स्वच्छ व आरोग्यदायी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याच्या वापराचे व वितरणाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा मानला पाहिजे .
भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे संरक्षण संवर्धन व विकास करणे व त्याची उपयुक्तता वाढविणे यासाठी पाण्याचे केलेले व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय.
X X
भारतातील पाण्याची समस्या व संवर्धन
भारतात जलसंपदा विपुल आहे .तथापि संवर्धन आणि नियोजनाचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो .एकूण पावसाच्या पाण्यापैकी फक्त 10 टक्के पाणी वापरले जाते. भारतातल्या शेतीला मोसमी पावसाचा जुगार म्हणतात. पावसाचे वितरण कालखंड व प्रमाण फारच विषम आहे .
हा वनस्पतींची अनिर्बंध तोड, मृदेची अतोनात धुप यामुळे मोसमी पावसाचा बराच भाग वाहून जातो. जलसाठ्याच्या वापरात अजिबात नियोजन नाही. तळी व सरोवरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
पंजाब ,हरियाणा ,गुजरात ,तामिळनाडू, उत्तर प्रदेश ही राज्ये भारतातील सुमारे 1/3 एक तृतीयांश पाण्याचा वापर करतात.
संपूर्ण भूजलाचे पुनर्वविकरण होऊ शकत नाही. त्याकरिता भूजल संवर्धन महत्त्वाचे मानले जाते .
X X
पंजाब मधील कपुरथळा, हरियाणातील मेहंदरगड ,उत्तर प्रदेशातील बागपत, शहरनपुर या भागात नलिका विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजल पातळी वरचेवर खाली उतरत आहे .
परिणामी गरीब शेतकरी खर्चाने डब्बा घाईत आला आहे.
महाराष्ट्रात प्राकृतिक वैशिष्ट्यामुळे काही मर्यादित भाग वगळता भूपृष्ठाखाली जलपातळी(30 ) तीस मीटरपेक्षा खोल आढळत नाही .
परंतु वारंवार पडणाऱ्या अवर्षणामुळे शेतकरी 100 मीटर पेक्षा खोल विंधन विहिरी होतात.
अशा नलिका विहिरींना सुरुवातीस पूर्वीचा भूगर्भातील साठा मिळाल्यामुळे चार ते सहा महिने नलिका विहिरी व्यवस्थित चालतात .त्यासाठी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो .पुढे ह्या कोरडा झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
केवळ महाराष्ट्रात खोदलेल्या नलिका विहिरी पैकी 80 ते 90 टक्के नलिका विहिरी आटल्या आहेत.
X X
गुजरात मध्ये दरवर्षी सुमारे दोन (2) मिलिमीटर जल पातळी खाली उतरत चालली आहे .
सागर किनारी भागात खारट पाणी जमिनीत उतरण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे.
पुर्वी किनारपट्टीला नदी ,तलावांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याचे पाणी व अंतर्गत मासेमारीवर भयानक संकट कोसळले आहे.
त्यामुळे मच्छीमारांचे स्थलांतर अटळ आहे. कलकत्याजवल "सॉल्ट सरोवरे "सारखी सर्वत्र अनेक सरोवरे निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे .
सांडपाणी ,कीटकनाशकांचा वापर, खते , पानवनस्पतींची भयानक वाढ यामुळे कश्मीर मधील वूलर, दाल,नगीना ,उत्तर प्रदेशातील भीमताल, उत्तराखंडातील नैनीताल राजस्थान मधील पुष्कर ,जयसमंदर, हैदराबाद हुसेन सागर, कोल्हापूरचा रंकाळा ,जळगावचे पद्मालय यासारखी सरोवरे सडकी, उबडी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
Comment and share....
4 Comments
Chhan
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery good
ReplyDeleteGood Information sirji
ReplyDelete