Subscribe Us

header ads

Green House Effect -1 हरितगृह परिणाम भाग 1

Green House Effect

हरितगृह परिणाम-भाग 1

 


उष्णतेच्या उत्सर्जनावर होणारा वातावरणाचा परिणाम व एखाद्या काचेच्या पेटीतील उष्णतेवर होणाऱ्या परिणामास सारखा आहे. 

भूपृष्ठावरून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणामुळे एकदम उत्सर्जित होत नाही.

 पृथ्वीवरील वातावरण हे पृथ्वीभोवती हरितगृहाचे काम करते .अन्यथा तापमान खाली गेले असते.

 वातावरणाच्या या संरक्षक कवचाच्या परिणामास "हरितगृह परिणाम " असे म्हणतात.

 तथापि या वातावरणात प्रदूषण वाढत आहे . नैसर्गिक वायू प्रमाणे विचलित झाले आहेत . 

कार्बन डाय ऑक्साईड व तत्सम वायूंचे प्रमाण वाढत असल्याने हरितगृह घटना विकृत होत आहे.

X X

1. हरितगृह परिणामाचे स्वरूप

Nature of Green House Effect

सूर्याकडून सौर शक्तीच्या रुपाने येणारी काही ऊर्जा वातावरणात शोषून घेतली जाते. 

समशीतोष्ण प्रदेशात हिवाळ्यात प्रकाश कमी काळ येतो. त्याची तीव्रताही कमी असते .

त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही . याकरिता हरितगृहांची रचना करतात .

हरितगृह सोलर कुकरच्या तत्त्वानुसार काम करते .सोलर कुकर च्या वरील काचेतून प्रकाश किरण हात येतात. परंतु जेव्हा ते पेटीच्या तळावर पडतात .तेव्हा त्यांचे उष्णता किरणात रूपांतर होते.

 उष्णता लहरींची लांबी जास्त असल्याने ते काचे बाहेर परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे काचेखालील हवेचे तापमान वाढते. या तत्त्वावरच हरितगृहाचे तापमान वाढल्याने पिकांची वाढ हिवाळ्यातही पूर्ण होते.

वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान CO 2 शिवाय क्लोरो -फ्ल्युओरो -कार्बन या वायूमुळे ही वाढते, म्हणून त्यांनाही हरितगृह परिणामाचे वायू म्हणतात.


2. कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती

Origin of CO2

पृथ्वीच्या पृष्ठभागावर उपलब्ध होणारा co2 हा मुख्यत्वे दगडी कोळसा ,खनिज तेल ,नैसर्गिक वायू ,जंगलातील लाकडाचे ज्वलन होऊन निर्माण होत असतो.

1. निरनिराळ्या उद्योगधंद्यासाठी लागणारी वीज दगडी कोळसा, नैसर्गिक वायू यांच्या ज्वलनापासून तयार करतात.

2. कारखान्यात दगडी कोळसा ,खनिज तेल, नैसर्गिक वायूचा उपयोग शक्ती साधन म्हणून करतात. त्याच्या अर्धवट ज्वलना पासून CO2 इतर वायू बरोबर धुराड्यातून वातावरणात पोहोचतो.

3. मोटार, ट्रक, दुचाक्या, ट्रॅक्टर इत्यादी स्वयंचलित वाहनातून पेट्रोल-डिझेल वापरतात. शिवाय रेल्वेही दगडी कोळसा व डिझेलवर चालते. वाहनांची भरमसाठ वाढ झाल्याने वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वरचेवर वाढत आहे.

4. जंगलातून वारंवार आगी लागतात. त्यामुळे CO 2 चे प्रमाण वाढते . प्राणी उच्छवासा द्वारे co2 बाहेर टाकतात .त्याचबरोबर वनस्पतींची अमर्याद तोड झाल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे.( वनस्पती अन्न तयार करताना CO2 शोषून घेतात.)

जगभर CO 2 निर्मितीची प्रक्रिया समान आढळत नाही. सर्वसाधारणपणे संयुक्त संस्थाने, युरोपीय देश, कॅनडा, जपान अशा विकसित देशात 1950 पर्यंत जवळपास सर्वत्र co2 ज्यादा निर्माण होत असे. 

कोरिया सारख्या विकसनशील देशांनी औद्योगिक उत्पादन वाढविल्याने समस्या गंभीर झाल्यापासून सर्वांनाच प्रदूषणाचा धोका असल्याचे पटले आहे. 

त्यामुळेच कारखानदारी कमी करण्यापेक्षा जंगलतोड कमी केल्यास CO 2 च्या वाढीचा धोका टाळता येईल. 

1970 ते 80 या काळात संयुक्त संस्थाने व विकसित देशांनी दगडी कोळसा, पेट्रोलियम चा वापर जरी कमी केला असला .तरीही दर मानसी उज 2 प्रमाण संयुक्त संस्थांचे जास्त होते. 

1980 पासून चीन, भारत, जपान, कोरिया हे देश औद्योगिक देश म्हणून पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्यावर  माँट्रीयल करारानुसार दबाव येत आहे.

X X

क्रमश...,..







Comments and share...

Post a Comment

4 Comments