Subscribe Us

header ads

Green House Effect 2 हरितगृह परिणाम -भाग 2

Green House Effect 2  

हरितगृह परिणाम  -भाग 2


क्रमश...

3. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान

Effect of Green House and World Temperature

हरितगृह परिणामामुळे वातावरणातील CO2 च्या अस्तित्वाने तापमान वाढत चाललेले असल्याचे सर्वांनी मान्य केले आहे . त्याचा स्थानिक ,प्रादेशिक व जागतिक पातळीवर परिणाम भिन्न स्वरूपात दिसतो .

खालील सहा परिणाम अतिशय महत्त्वाचे मानले जातात.

1. वाढीव CO 2 मुळे समुद्र पाण्यातही co2 चे प्रमाण वाढून पाणी आम्लधर्मी होईल. त्यामुळे सागरी वनस्पतींचे प्रमाण घटेल. त्याचा सागराच्या प्रतीक्षपे  ( Albedo)  वर परिणाम होईल. 

2. तापमानातील वाढीमुळे विकसित देशांतील शेतीवर परिणाम होऊन पर्जन्य व जमिनीवरील बाष्प घटेल .वनस्पती, प्राणी आणि कीटक प्राप्त परिस्थितीनुसार बदलतील व संपूर्ण परिसंस्थाना मोठा आघात होईल.

3. वातावरणातील वाढीव तापमानामुळे महाद्वीपीय व पर्वतीय हिमनद्या वितळून 2050 साली सागर पातळी एक मीटरने वाढेल. भूमध्य सागरी भागात व बांगला देशातही सुमारे एक कोटी लोक पूरग्रस्त होतील असे तज्ञांचे मत आहे.

4. पिटॉक (1972)  यांच्या मते जगातील तापमान काही अंश सेल्सिअसने वाढल्यास परिणाम मानव समाज व शेतीवर निश्चित होईल.

5.वातावरणातील शेवटचा परिणाम ओझोनच्या घटण्यात होईल व पर्यायाने भूपृष्ठाचे तापमान जास्त वाढेल.

6. वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते सध्या असलेले प्रमाण 0.6 दर हजारी झाले तर वनस्पतीची उत्पादन क्षमता 30 टक्क्यांनी वाढेल परंतु पिकांचे उत्पादन क्षमता काही प्रमाणात घटेल.

X X

4. हरितगृह परिणाम (जागतिक तापमान वाढ ) वरील उपाय

Remedies of Green House Effect

वातावरणातील CO 2 चे प्रमाण कमी करण्याचे खालील पाच महत्त्वाचे उपाय आहेत.

1.1988 च्या टोरंटो करारानुसार 2005 सालापर्यंत सर्वांनी खनिजतेल व तत्सम वस्तूंचा वापरात 20 टक्क्याने कपात करावी हे सुचविले. परंतु याचा विकसनशील देशांवर विपरित परिणाम होणार असल्याने हा करार प्रत्येक देश कोणतीतरी सबक काढून कराराचे पालन करण्याचे टाळले .कराराचे पालन केल्यास  CO 2 ची लक्षणीय घट होईल.

2.शास्त्रज्ञांनी पेट्रोलियमला पर्यायी शक्तीसाधन शोधणे आवश्यक आहे किंवा सध्यापेक्षा नवीन तंत्रिक उपयुक्त मार्ग शोधला पाहिजे मेथानोल पासून मिथेन निर्मिती करणे शक्य आहे काय,याचां शास्त्रज्ञाने विचार करावा. कारण मिथेन हा खनिज तेल  वाहतुकीकरिता पर्याय होईल असे वाटते.

3. CO 2 चा प्रश्न हा एवढा महत्त्वाचा असल्याने दोन जागतिक संघटना होऊनही त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये सुधारणा झाल्यास सर्वांना हायसे वाटले.

4.सौरशक्ती ही खनिज तेलाचा चांगला पर्याय आहे. परंतु त्याचे उत्पादन मूल्य जास्त असल्याने विकसित देशांनी विकसनशील देशांना आर्थिक मदत केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. बायोगॅस हा घरगुती पर्याय आहे शिवाय सर्वच देशांना कच्चामाल उपलब्ध होणार नाही.

5.co2 चे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी 12 कोटी हेक्‍टर क्षेत्रात जंगल लागवड केली तर प्रश्न कायमचा मिटेल भारत, ब्राझील, कोलंबिया इंडोनेशिया आफ्रिका पाकिस्तान इत्यादी देशांनी मनापासून लक्ष घातले तर जगाचे कल्याण होण्याची शक्यता आहे.

X X




View, Comments and share...

Post a Comment

5 Comments