Subscribe Us

header ads

Global Warming जागतिक तापमान वाढ

Global Warming 

जागतिक तापमान वाढ 

वातावरणीय किंवा हवामानातील बदल व पृथ्वीच्या तापमानातील वाढ

Climatic Change and Global Warming


हवामान हा पर्यावरणाचा एक अविभाज्य असा महत्त्वाचा भाग आहे. 

हवामानशास्त्र वातावरणातील बदलांच्या प्रादेशिक वितरणाचे विश्लेषण केलेले असते .या बदलामुळे विविध पर्यावरणीय समस्या भेडसावतात. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ, आम्लपर्जन्य ,ओझोन थराचा क्षय , अनुअपघात इत्यादी. 

बदलते हवामान ही एक मोठी समस्या आहे. याबद्दल अलीकडे मानवाने प्रचंड ज्ञान मिळवल्यामुळे हवामानाचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करत आहेत व त्याचा फायदा मानवास कृषी ,पशुपालन, मासेमारी, दुग्धव्यवसाय, लाकूडतोड या गोष्टींना करून घेता येतो.

X X

जागतिक तापमान वाढ

 Global Warming

हवामान विषय बदलांमध्ये जागतिक तापमान वाढ (Global Warming) हा एक महत्त्वाचा बदल आहे .

हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. 

कार्बन डाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ, मिथेन ,नाइट्रेट ऑक्साईड ,ओझोन ,क्लोरोफ्ल्युरो कार्बन यांचे  प्रमाण वाढल्यामुळे हरितगृह परिणाम होतो आणि त्याचाच परिणाम शेवटी जागतिक तापमानावर होतो. यालाच ग्रहीस तापमान वृद्धी असेही म्हणतात.


जागतिक तापमान वाढीची कारणे

Causes of Global Warming

1. ओझोन

ओझोनच्या क्षयामुळे ओझोनच्या थराला  पडलेल्या छिद्रातून सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचतात आणि त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होते.

2. मिथेन

इंधन म्हणून मिथेन वायू चा वापर केला जातो. जिवाणूंच्या जैविक क्रियेतून तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू शुध्दीकरण क्षेत्रातून मिथेन वातावरणात मिसळून जागतिक तापमानात वाढ होते.

3. नायट्रस ऑक्साईड

नायट्रस ऑक्साईड हा ओझोन क्षयासोबत च हरितगृह वायूंचे परिणामाला कारणीभूत असतो .त्यामुळेही जागतिक तापमानात वाढ होते

4. कार्बन डाय-ऑक्साइड

खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून, वाहनांच्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून तसेच जंगलांना लागलेल्या आगीतून मोठ्या प्रमाणावर कार्बन-डाय-ऑक्साइडचे निर्मिती होते व त्यामुळे जागतिक तापमानात वृद्धी होते.

5. क्लोरोफ्ल्युरो कार्बन

शीतगृहे ,शीतकपाट ,एरोस्प्रे , अग्निशामक द्रव्य इत्यादी अनेक गोष्टीत क्लोरोफ्ल्युओरो कार्बन चा वापर केला जातो. रासायनिक दृष्ट्या स्थिर असणारे हे द्रव्य ओझोन क्षया सोबतच हरितगृह परिणामास कारणीभूत असते .

अशाप्रकारे वरील पाच कारणांमुळे जागतिक तापमानात वाढ होते.

X X

जागतिक तापमान वाढीचे परिणाम

Effect of Global Warming

जागतिक तापमान वाढीचे पुढील परिणाम महत्त्वाचे आहेत.

1. पृथ्वी तापमानात वाढ

कुरणांचा ,गवताळ प्रदेशांचा ऱ्हास, शुष्कता पर्जन्यमानात घट, इत्यादी कारणामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते.

2. वनस्पती प्रजातीय संकलन

पृथ्वीवर काही वनस्पतीत वाढ होईल. तर काही नष्ट होतील. वनस्पती प्रजातींचे संतुलन बिघडू शकते.

3. प्राणी प्रजातीय संकलन

प्राण्यांचे प्रजातीय संतुलन बिघडण्याची शक्यता वर्तविली जाते.

4. वाळवंटीकरणाची शक्यता

 अल्पपर्जन्यात वाढ होऊन वाळवंटीकरनाची शक्यता आहे.

5. पुराचा धोका

बर्फाच्छादित प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्यांची पातळी वाढेल व नदीकाठच्या लोकांना पुराला सामोरे जावे लागेल.

6. घातक परिणाम

सागर पातळीत वाढ झाल्याने वारे ,समुद्रप्रवाह ,वादळी शक्यता वारे ,सूक्ष्मजिवांच्या संख्येत बदल ,मानवी आरोग्य इत्यादीवर घातक परिणाम होतात.

7. तापमानात वाढ

बर्फाळ प्रदेश नाहीसे झाल्यास पृथ्वीवरील उष्णता ग्रहणात व पर्यायात तापमानात वाढ होते.

8. किनाऱ्यावरील लोकांवर आपत्ती

बर्फ वितळल्यामुळे सागरातील पाणीसाठ्यात वाढ होऊन किनाऱ्यावरील लोकांना महापुरा सारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.

9. भूखंडाऐवजी सागरावर पाऊस

जमिनीवरील तापमानवाढीमुळे सागरावरचे तापमान कमी होईल. वाऱ्याची दिशा सागरा कडून भूखंडाकडे येण्याऐवजी भूखंडा कडून सागराकडे राहील .त्यामुळे भूखंडा ऐवजी सागरावर पाऊस पडेल . 

अशाप्रकारे जागतिक तापमान वाढीमुळे वरील प्रमाणे गंभीर परिणामांना मानवाला तोंड द्यावे लागते.

X X





Comment and share.....

Post a Comment

5 Comments

  1. ग्लोबल वार्मिंग ,,,,,धोकादायक,,, सर्वांनी विचार करावा ,,,,,,,खूप छान माहिती

    ReplyDelete