Subscribe Us

header ads

Depletion of Ozone -ओझोनचा क्षय भाग - 1

 ओझोनचा क्षय  भाग 1

Depletion of Ozone


ओझोन हा ऑक्सीजन पासून निर्माण होणारा वायू वातावरणाच्या स्थितांबर या थरात मुख्यत्वे समुद्रसपाटीपासून 12 ते 35 कि. मी. दरम्यान आढळतो.

 हा वायू सूर्यापासून भूपृष्ठाकडे येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट सारखे अदृष्य किरण अडवतो .हे नीलकिरण एवढे विध्वंसक असतात की ,त्यांच्यामुळे भूपृष्ठावरील जीवसृष्टी एका तासाभरात नाहीशी होईल. म्हणून म्हणून ओझोन वायूच्या थरास पृथ्वीचे संरक्षण कवच किंवा संरक्षक छत्री असेही म्हणतात.

X X

ओझोनची निर्मिती

Origin of Ozone

ओझोन हा फिकट पिवळसर रंगाचा क्षोभक वायू असून तो उग्र वासाचा आहे .

त्याच्या अस्तित्वाबद्दल मतभेद असले तरी तो 10 ते 15 कि.मी. दरम्यान स्थितांबरा च्या खालच्या भागात असतो . हा स्थिर वायू असतो. कारण त्याचे ऑक्सीजन मध्ये रूपांतर झाले कि प्रमाण घटते किंवा ऑक्सिजनचे ओझोन मध्ये रूपांतर झाले कि प्रमाण वाढते .ही स्थिती बदलायची क्रिया तपांबर यावरील गडगडाटी वादळाच्या वेळी घडून येते. 

30 ते 60 किलोमीटर उंचीच्या दरम्यान वातावरणात सूर्यप्रकाशात अल्ट्रावायलेट किरणाद्वारे प्रकाश रासायनिक क्रियेणे ओझोन निर्माण होतो .

बहुसंख्य ओझोन उष्णकटिबंधात निर्माण होऊन नंतर वाऱ्याबरोबर त्याचे ध्रुवीय प्रदेशाकडे मार्गक्रमण होते.

X X

ओझोनचा क्षय

Depletion of Ozone

ओझोनमुळे नीलकिरण शोषून पूर्ण सजीव सृष्टी चे रक्षण केले जात असल्यामुळे ओझोनचा क्षय होत आहे. ओझोन थराला छिद्र पडले आहे .या घटनेमुळे संपूर्ण मानव जमात अस्वस्थ झाली आहे .हे  शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहे .

कॅलिफोर्नियात विद्यापीठातील मोलीना आणि  रोलांड या शास्त्रज्ञांनी 1974 -75 साली ओझोनच्या क्षयाची पहिली वार्ता पाश्चिमात्य देशांना दिली. तेव्हा जग खडबडून जागे झाले.

 पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर रेफ्रिजरेटर, एसी ,हेअर ड्रायर, कॉस्मेटिक , आगरोधक इत्यादी वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरो फ्ल्युओरो कार्बन या रासायनिक संकलिष्टामुळे ओझोनचा क्षय होतो. यामुळे अमेरिकेतील लोक चक्रावून गेले. 

1967 साली वातावरणातील ओझोन चा क्षय होत असल्याचे रशियन शास्त्रज्ञांना ज्ञात होते.

 1960 पासून अमेरिका, रशिया, फ्रान्स ही राष्ट्रे अणूस्पोट घडवून आणतात. त्याच्यातील नायट्रस ऑक्साईड मुळे ओझोनचा क्षय होतो .ही घटना निंबस 3, 4 व एक्सप्लोरर 5, टायरोस 4 या उपग्रहाने पूर्वी दिलेल्या माहितीवरून रशियन शास्त्रज्ञांना माहिती होती. 

पुढे अनुचाचणी वर बंदी घातल्यावर ओझोन क्षयाचा प्रश्न काही काळ विस्मृतीत गेला.

 ब्रिटीशांच्या आंटार्टिका मोहिमेत 1985 साली वसंत ऋतुत 40% ओझोन चा क्षय झाल्याचे लक्षात आले .

1987 सालच्या ब्रिटिश च्या दुसऱ्या आंटार्टिका मोहिमेच्या वेळी संयुक्त संस्थाने सारख्या दुप्पट क्षेत्रात 50% ओझोन वायूचा क्षय झाल्याचे नजरेस आले .

याच दरम्यान काही ठिकाणी   ओझोन थराला छिद्र पडल्याने दिसून आले.

 या थरारक माहितीमुळे   मॉट्रियल मध्ये 1987 च्या सप्टेंबर मध्ये प्रगत देशांची बैठक होऊन ओझोन थराचा क्षय या संबंधी करारावर 35 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.

ओझोन क्षय घडवून आणणाऱ्या क्लोरो फ्ल्युओरो कार्बन च्या उत्पादनावर आणि वापरावर बंदी घालण्यात आली.

 10 देशातील 100 शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात ओझोनचा क्षय ही जागतिक समस्या आहे असे प्रतिपादन केले .

1989 साली लंडन कॉन्फरन्स मध्ये ओझोन च्या संबंधित अनेक बंधने घालण्यात आली.

क्रमश......

X X






Comment and share...

Post a Comment

8 Comments