ओझोनचा क्षय भाग 2
क्रमश
ओझोन छिद्र: ओझोन क्षयाची कारणे
Ozone Hole and Causes of Ozone Depletion
क्लोरो फ्ल्युओरो कार्बन हॅलोन आणि नायट्रोजन ऑक्साईड मुळे ओझोनचा क्षय होत असल्याचे सिद्ध झाले आहे .
1930 साली संयुक्त संस्थांच्या शास्त्रज्ञांनी नायट्रोजन ऑक्साईड प्रमाणेच क्लोरीन अणूमुळे ओझोनचा क्षय होतो हे सिद्ध केले आहे. वास्तविक क्लोरो फ्लोरो कार्बन संयुगे जमिनीजवळ विषारी नसून अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. त्यामुळे औद्योगिक द्रावण म्हणून 25 % उत्पादनात वापरतात.
ब्रोमीन अंश असलेले संयुक्त संस्थांच्या सैन्यदलाने दुसऱ्या महायुद्धात रणगाडा विरोधी वापरले होते.
क्लोरो फ्ल्युओरो कार्बन ही संयुगे F11 व F 12 नावाने बाजारात विकतात. 1975 साली त्यांचे उत्पादन 15 % नी घटले होते .तरीही उत्पादन 7 लाख टन झाले होते.
मॉट्रीरियल करारानुसार उत्पादन घटूनही 1987 साली 10 लाख टन उत्पादन झाले होते.
नैसर्गिक प्रक्रियेद्वारे ओझोनची होणारी वाढ व घट ऋतूनुसार वाऱ्याच्या हालचालीमुळे नियंत्रित होते.
परंतु मनुष्यनिर्मित क्लोरो फ्ल्युओरो कार्बन तपांबर मध्ये निरूपद्रवी असतात. शिवाय ही सावकाश हवेबरोबर पीतांबरा मध्ये जातात .तेथे पोहोचण्यास त्यांना 7 ते 8 वर्षे लागतात. मात्र त्यांच्यामुळे ओझोनचा ऱ्हास होतो.
ओझोनचा क्षय घडवून आणणारी संयुगे क्लोरिन, सल्फेट, नायट्रोजन ऑक्साईड नावाने प्रसिद्ध असून क्लोरो फ्ल्युओरो कार्बन च्या तुलनेने नायट्रोजन ऑक्साईड हे स्थितांबर यामध्ये लवकर पोहोचते .कारण त्याची निर्मिती सुपरसोनिक विमानातील इंधनाच्या ज्वलनापासून होते आणि हे विमाने स्थितांबरातून जात असल्यामुळे प्रगत देशात ओझोनचा ऱ्हास लवकर होण्याचे हे मुख्य कारण ठरले आहे.
X X
ओझोन ऱ्हासाचा परिणाम
Impact of Depletion of Ozone
स्थितांबरा मधील ओझोन ऱ्हास झाला की अल्ट्राव्हायोलेट मुळे तपांबर यामधील तापमान वाढते. त्याचा परिणाम जीवावरनावर होतो.
1. परिस्थितीकीवरील परिणाम
परिस्थिकीतीची उत्पादकता ,स्थिरता ,पर्यावरणाचे संतुलन बिघडेल जीवशास्त्रीय समुद्रावर प्रतिकूल परिणाम होईल. मानवही यातून वाचणार नाही.
2. मानव जातिवरील परिणाम
तापमान वाढून त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल. सुपरसोनिक विमानातील नायट्रोजन ऑक्साईड मुळे ओझोनचा ऱ्हास होऊन संयुक्त संस्थानातील 1,20,000 लोकांना त्वचेचा कॅन्सर होईल. अल्ट्राव्हायोलेट च्या प्रभावाने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गजन्य रोग वाढतील. विषुववृत्तीय प्रदेशात हवा आणखी उष्ण व दमट होऊन शरीर व मनाची वाढ किंचित खुंटेल. त्यामुळे श्वसनाचे विकार जडतील .बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. मत्स्य संख्या घटेल. अन्न उत्पादन घटेल व अन्नाच्या समस्या निर्माण होतील.
3. हवामानवरील परिणाम
ओझोनचा क्षय झाल्याने तापमानात वाढ होईल व 5 ते 20 टक्के जास्त अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे तापमान वाढीची प्रक्रिया सुमारे 40 वर्षात होईल. अंटार्टिका, ग्रीनलँड मधील बर्फ वितळून किनारी प्रदेश पाण्याखाली जातील .वातावरणातील हायड्रोजन पेरॉक्साइड वाढून पर्यायाने आम्लपर्जन्य पडेल प्रकाशाच्या रासायनिक क्रियांमुळे शहरात धूर- धूके ( Smog) निर्माण होतील.
4. सजीव सृष्टी वर परिणाम
वाढीव तापमानामुळे पाण्याची उपयुक्तता आणि पिकांची वाढ कमी होईल .जमिनीवरील फॉस्फरसचे प्रमाण अधिक वाढेल. पिकांची प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्यांची नासाडी होईल. समुद्रातील माशांचे खाद्य कमी होऊन मासे मरतील. सागरी पर्यावरणातील कठीण कवचधारी प्राणी नष्ट होतील. रक्तभिसरण संस्था मध्ये बिघाड होईल. विशिष्ट पेशींची अनियंत्रित वाढ होईल.
X X
ओझोनच्या संरक्षणाचे उपाय
Remedies of Protection of Ozone
खालील प्रमाणे काही ओझोनच्या संरक्षणाचे उपाय सुचविलेले आहेत.
1. 1987 च्या मॉट्रियाल करारामुळे व 1989 च्या लंडन परिषदेमुळे लोकांमध्ये ओझोनच्या ऱ्हासाचे गांभीर्य रुजविण्याचे कार्य झाले आहे. लोकांना ओझोनचे महत्त्व पटले आहे. करारामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन संयुगे उत्पादने 20% नी कमी झाली आहेत.
2. क्लोरो फ्ल्युओरो कार्बन ना पर्याप्त रसायने कि जी ओझोनच्या वाढीस प्रोत्साहन देखील देतील. अशी शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना आव्हान केले आहे.त्यामुळे 1993 पासून अशा उत्पादनात 20 टक्क्यांची घट सुरू झाली आहे.
3. 1998 पासून 30 % घट अपेक्षित होती व हे हॉलोन चे उत्पादन 1992 पासून थांबवले आहे.
4.मॉट्रियाल करारानुसार 1999 पासून क्लोरो फ्ल्युओरो कार्बन चे उत्पादन 50 टक्के बंद होणार व त्याला काही पर्याय संयुगे शोधून फर्मांसी क्लोरीन युक्त संयुगे शोधून काढण्याचे जाहीर केले आहे.
6. फ्रीओन 12 ऐवजी HFC 134 हे विषारी नसून त्यामुळे कोणतीही झीज होत नाही.
Comment and share...
5 Comments
Very informative - Gaurav
ReplyDeleteGood information..sir
ReplyDeleteGood
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete