Subscribe Us

header ads

Rain Water Harvesting: पावसाच्या पाण्याचे संचयन

 पावसाच्या पाण्याचे संचयन

Rain Water Harvesting


पावसाचे पाणी घराघरावर पडते .पाऊस पडण्याचे प्रमाण प्रत्येक भागात वेगवेगळे असते .जसे हिमालयामध्ये खूपच अधिक पाऊस पडतो तर वाळवंटी भागात राजस्थान मध्ये 100 मि.मी. सुद्धा पाऊस पडत नाही .म्हणजे तेथे पावसाचे प्रमाण नगण्य आहे. 

त्यामुळे ज्या भागात पाऊस पडतो तेथील लोकांनी त्या पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात त्याचा वापर केला पाहिजे .यासाठी जनतेला जलसाक्षरतेची खूप आवश्यकता आहे.

X X

1.पावसाच्या पाण्याची संचयनाची संकल्पना

Concept of Rain Water Harvesting

पावसाच्या पाण्याचे संचयन ही संकल्पना आज वेगाने पुढे येत आहे. यात गच्चीवर पडणारे पाणी पाईप किंवा चॅनेल द्वारे वाहून नेले जाते व ठराविक टाकीत साठवले जाते ते जमिनीतील खड्ड्यात सोडले जाते व तेथे मुरल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते . 

धुळे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री दिलीप बांड यांचे कार्य याबाबत उल्लेखनीय मानले जाते .त्यांनी हा प्रयोग स्वतःच्या जिल्हाधिकारी निवासगृहात केला व त्याची प्रात्यक्षिके जनतेला दाखवण्यात आली त्यामुळे धुळे शहरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने छतावरील पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था सुरु केली .

वरील प्रयोग जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये केलेला होता .आज धुळे शहरात महानगरपालिकेने पाण्याचे महत्व ओळखून  जिल्हाधिकारी यांच्या मदतीने "पांजरा" नदीच्या पात्रात "राजस्थान भवन " जवळ (अग्रवाल भवन) छोटा बांध /बंधारा घालून पांजरा नदीचे पाणी अडविले आहे .

आता उन्हाळ्यात सुद्धा कोरडी असणारी पांजरा नदीचे पात्र  बंधाऱ्याच्या ठिकाणी भरलेले असते.

X X

धुळे शहरात बांधकाम करताना प्रत्येक व्यक्तीला छतावरील पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था मी करतो असे हमीपत्र द्यावे लागते. तेव्हाच महानगरपालिका बांधकाम परवानगी देते. त्यामुळे पाणी टंचाईला धुळे शहराला तोंड द्यावे लागत नाही. 

धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा" नकाणे तलाव" 100 वर्षात या वेळी प्रथमच कोरडा पडला .

त्यामुळे युद्धपातळीवर प्रयत्न करून "एक्सप्रेस कॅनल" च्या साह्याने "लाटीपाडा" धरणातून पाणी आणून हा तलाव भरण्यात आला. 

त्यामुळे त्यांना पंधरा दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत होते .पण आता उन्हाळ्यात सुद्धा दोन दिवसाआड पाणीपुरवठा नगरपालिका करते.

2. पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती

Methods of Rain Water Harvesting

भारतात पडणारा पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवले  व जमिनीत पुरविले तर त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी भासते .

भारतात पारंपारिक जलाशय भारतीय भूमीवरील बऱ्याच मोठ्या प्रदेशातील प्रदेशावरील लोकसंख्येची पाण्याची गरज पूर्ण करण्यास सक्षम होते.

 परंतु काळाच्या ओघात या जलाशयाचे अवमूल्यन झाले.

 पारंपारिक जलस्त्रोत याचा साठवलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व कृषीसाठी केला जात आहे .

सिंचनासाठी उपयोगात आणलेल्या जलसंवर्धन पद्धतीत ,

पहाडी कुदल जिंग (लडाख), 

अरुणाचल प्रदेशातील खूप पद्धती, 

नागालँडची जाबो पद्धती,

 हरियाणाची आबी तलाव ,

आसाममधील डोंगरपोखर, 

महाराष्ट्रातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ,

कर्नाटकातील केरे, 

तामिळनाडूतील इरा तलाव ,

अंदमान निकोबार मधील जॅकवेल, 

राजस्थानमधील कुंड ,नाडी , टांका, खडीन, झालरा, बेरी

 इत्यादी महत्त्वपूर्ण पद्धती आहेत.

X X

पारंपारिक पाणी साठविण्याच्या संचय या पद्धतीची सुरुवात इ. स.पूर्व 3000 वर्षांपूर्वी "जावा "बेटावर विशाल जनसागराच्या निर्मितीपासून झाली .

भारतात हडप्पा- संस्कृतीत ( 3000 ते 1500 इ.स.पूर्व ) पण पाणी संचयन व्यवस्था असल्याची माहिती मिळते .

भारतात पर्जन्याच्या स्वरूपानुसारच जलसंवर्धनाच्या पद्धती विकसित केल्या होत्या.भारतात पाण्याच्या संवर्धनासाठी विविध पद्धती विकसित केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये ,

कश्मीरमध्ये बाराव्या शतकात जलसिंचन व्यवस्था पूर्णपणे विकसित होती .

पूर्वोत्तर राज्यात 200 वर्षांपूर्वी बांबूंच्या नळीद्वारे दगडात जमिनीवरील पाण्याचे संवर्धन करण्याची पद्धती अवलंबली होती .ती सध्या सुद्धा अस्तित्वात आहे. 

पश्चिम भारतात कुंड ,आड ,विहिरी, तलाव इत्यादी इ.स. 500 वर्षापूर्वी अस्तित्वात होती .ज्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संचयन करून उपयोगात आणले जात होते.

 जेथे कोणताच पर्याय उपलब्ध नसेल त्या ठिकाणी पावसाचे पाणी तलावात एकत्रित साठवून कृषीला पाणीपुरवठा केला जात असे या पद्धतीला मध्य प्रदेशा मध्ये" हवेली" असे म्हणतात.

3. पावसाचे पाणी साठविण्याचे फायदे

Advantages of Rain Water Harvesting

पावसाद्वारे भरपूर पाणी उपलब्ध होत असले तरी त्यापैकी फार थोड्याच पाण्याचा मानवाकडून वापर केला जातो .

वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी ,जीवावरनात आढळणारी जैविक समाज प्रामुख्याने भूपृष्ठीय व भूमिगत पाण्याचा उपयोग करत असतो .

जे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा मुख्य स्त्रोत पावसाचे पाणी आहे .भूपृष्ठाला प्राप्त होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा एक मोठा हिस्सा दरवर्षी त्याचा उपयोग न होता प्रवाहित होऊन खाऱ्या पाण्यात मिसळत असतो .

त्यामुळे पाण्याची टंचाई कायम राहते म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे .त्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे सामांसाय पाणीपुरवठा वरील भार कमी होतो. भूजल पातळी वाढते .

पंपचा खर्च कमी येतो. पाणी उच्च दर्जाचे मिळते .पाणी साठवण्याची पद्धती या कमी खर्चाच्या होतात व सोपी होते व जमिनीत क्षार यांचे प्रमाण कमी करता येते.


पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धतीमुळे आर्थिक बचतही होते असे अनेक तज्ञांचे मत आहे .

उदा. मुंबईचे भौगोलिक क्षेत्र 437 चौरस किलोमीटर आहे. शहराचे वार्षिक पर्जन्यमान 2000 मि.मी. आहे. 

त्यामुळे 8,78,000 दशलक्ष मीटर वार्षिक पाणी येथे मिळू शकते. या क्षेत्रातील 70 टक्के पावसाचे पाणी साठवले तरी उपलब्ध पाणी 10,180 दशलक्ष पाणी जमा होते. 

त्यापैकी छतावरील पाणी 50 टक्के उपलब्ध होऊ शकेल असे मानले तरी 50 दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन मिळू शकते. मुंबई महानगरपालिका शहराला रोज 3000 दशलक्ष पाणी देते.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रति व्यक्ती रोज 135 लिटर पाणी लागते .

या पाण्यात काटकसर करता येते. रोज वापरले जाणारे पाणी गच्चीवरच्या पाण्यापासून मिळविता येते .

असे झाले तर कपडे धुण्यास ,भांडी धुण्यासाठी ,बाग कामाला गच्चीवरचे पाणी सहज वापरता येईल व चांगल्या पाण्याची बचत करता येईल.





Comment and share......

Post a Comment

6 Comments