अशाश्वत विकासाकडे शाश्वत विकासाकडे
From Unsustainable to Sustainable Development
पर्यावरणीय साधन संपदा यांचा अतिरेकी प्रमाणात व अविवेकी स्वरूपात उपयोग केल्यामुळे पर्यावरणाचा रास होत असून पर्यावरणात असंतुलन निर्माण होत आहे.
विकसनशील राष्ट्रात ही सर्व बाब सर्वात जास्त दिसून येत आहे. पृथ्वीवरील मानवाचे भवितव्य हे पर्यावरणाच्या देखरेखीवर जतन करण्यावर अवलंबून आहे .
यासंदर्भात पर्यावरणाचा दीर्ध कालावधीपर्यंत उपयोग आणि अभिवृद्धीसाठी शाश्वत विकासाची संकल्पना विकसित झाली.
स्वतःचा किंवा समाजाचा विकास करताना जर निसर्गाला धक्का पोहोचत असेल तर असा विकास म्हणजे अशाश्वत विकास होय व भावी पिढीच्या गरजा भागविण्याच्या निसर्गातल्या क्षमतेला कोणताही धक्का न लावता लोकांच्या गरजा आजच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे" श्वाश्वतक्षम विकास" होईल.
X X
शाश्वत विकासाची संकल्पना
Concept of sustainable development
ही संकल्पना दोन दशकांपूर्वीच विकसित झाली. शाश्वत विकास (Sustainable Development) या शब्दाचा सर्वप्रथम वापर "जागतिक संवर्धन रणनीति "(World Conservation strategy ) मध्ये इ. स. 1980 ला केला गेला. परंतु याचा सविस्तर रीतीने प्रसार "जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगा " द्वारे( World Commission on Environmental Development) केला गेला.
WCED त्याची खालील प्रमाणे व्याख्या करण्यात आली "भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यावरणाच्या क्षमतेचा ह्वास न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास होय."(Sustainable Development as meeting the needs of present without compromising the ability of future generations to meet their needs.)
शाश्वत विकासाचे आणखीन एक व्याख्या "प्रदेशातील नैसर्गिक आणि भौतिक परिस्थिती, नैसर्गिक संसाधने ,पर्यावरण लोकसंख्या इत्यादी घटकांचा समतोल अभ्यास करून पर्यावरणीय घटक तसेच नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित मर्यादित वापर करणारी नवीन जीवनप्रणाली आत्मसात करणे म्हणजेच शाश्वत विकास होय."
X X
शाश्वत विकासाचे उपाय
Remedies of Sustainable Development
शाश्वत विकासाची मान्यता अशी आहे की, योग्य तांत्रिकज्ञान(Appropriate Technology) आणि सामाजिक व्यवस्थेद्वारे परीसंस्थेतून किंवा पर्यावरणातून पर्याप्त प्रमाणात साधन संपदा यांची पूर्तता होऊ शकते .
ज्यामुळे मानवी समाजाची वर्तमानकालीन व भविष्यकालीन गरजांची पूर्तता करू शकते. शाश्वत विकास हा पर्यावरणाच्या सकारात्मक संवर्धनावर जोर देत असतो. त्यामुळे पुढील उपायांची आवश्यकता आहे.
1. पूर्णविकरणीय ऊर्जासाधनांचा वापर
अपूर्णवीकरणीय ऊर्जा साधने ही संपणारी असून ती पुन्हा निर्माण करता येत नाहीत किंवा त्यांच्या निर्मितीला लाखो वर्षे लागतात.
भारतात अशा अपूर्णवीकरणीय साधनांचा अवास्तव वापर केला जातो. त्यामुळे भविष्यकाळात या साधनांची भीषण टंचाई निर्माण होईल म्हणून लोकांनी विविध माध्यमातून या ऊर्जा साधनांचे महत्त्व पटवून देणे व त्यांना सौरऊर्जा, पवन ऊर्जा अशा पुनर्विकरणीय ऊर्जासाधनांचा वापरासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
2. साधन संपदा यांचे महत्त्व ओळखणे
साधनसंपदा शिवाय मानव जगू शकत नाही. त्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे .म्हणून त्याचे महत्व ओळखणे गरजेचे आहे.
3. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण
अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या भारतात अनेक प्रकारच्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागते. त्यातूनच पर्यावरणीय समस्या देखील निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे वाढत्या लोकसंख्येला आळा घालने. त्यासाठी कडक कायद्यांची आवश्यकता आहे.
4. नैसर्गिक साधनसंपदा सांभाळणे
पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक घटकांपैकी ज्या ज्या घटकांचा मानवाला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष उपयोग होतो .त्या सर्व बाबी मानवाने व्यवस्थित वापराव्या म्हणजे सुरक्षित विकास साधता येईल.
5. ऊर्जासाधनांचा योग्य वापर करणे
निसर्गाच्या विविध घटकात ऊर्जा साठविली जाते. ती सर्व ऊर्जा साधने होत. अशा ऊर्जा साधनांच्या ज्वलनाने किंवा वापराने मानवाला विविध कार्य करायला शक्ती मिळते. कोळसा ,खनिज तेल ,जळाऊ लाकूड या प्रमुख ऊर्जासाधनांचा व्यवस्थित वापर करावा.
6. साधनसंपत्तीचे संवर्धन करणे
निसर्गाकडून मिळणारी साधन संपत्ती मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे व अनमोल आहे तिचा योग्य काळजीपूर्वक नासाडी न करता पर्याप्त वापर करणे गरजेचे आहे.
X X
7. भारतातील जैवविविधतेच्या संरक्षणाची गरज
भारत हा जैवविविधतेने नटलेला एक देश आहे. विकासाकडे वाटचाल करताना मानवाकडून या जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. मानव स्वतःच्या लाभासाठी या जैवविविधतेचा एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करीत आहे. त्यामुळे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे .म्हणून त्याच्या संरक्षणासाठी शासन पातळीवर विविध योजना आखल्या पाहिजेत.
8. अन्नसाखळीचे महत्त्व ओळखणे
"वनस्पती "हा जीवावरणातील महत्त्वाचा घटक आहे .ते ऊर्जा साठवितात म्हणून ते प्राथमिक घटक आहे. या साठवलेल्या ऊर्जेचे ग्रहण करणारे "तृणभक्षी "प्राणी जीवावरणातील द्वितीय घटक ठरतात. या प्राण्यांवर उपजीविका करणारे "मांसभक्षी "प्राणी हे तृतीय घटक आहेत .या सर्व घटकांच्या मृत्युनंतर त्यांचे विघटन करणारे "सूक्ष्मजीव "हे चतुर्थ घटक आहेत .मृत जीवांच्या विघटनामुळे त्यांच्या शरीरातील माती ,जल ,वायू हे मूळ घटक पर्यावरणास परत केले जातात .अशाप्रकारे हे चक्र पूर्ण होते. या अन्नसाखळीसाठी चांगले पर्यावरण राखणे गरजेचे आहे.
Comment and share.....
7 Comments
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteGood
ReplyDeleteNice
ReplyDeletedelightful
ReplyDeleteVery useful
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete