पर्यावरणविषयक जनजागृतीची गरज भाग-2
Need for Environmental Public Awareness
पर्यावरण विषयक जागतिक जनजागृती
Environmental world awareness
क्रमश........
4. आंतरराष्ट्रीय जैविक कार्यक्रम
International biological program- IBP
या संस्थेचा मुख्य उद्देश उत्पादकांचा जीविण आधार व मानव कल्याण संबंधी संशोधन करणे हा आहे. ह्याची सुरुवात इ. स. 1964 मध्ये वैज्ञानिक संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेद्वारे केली गेली .या कार्यक्रमाचे मुख्य सात विभाग आहेत.
1. भूप्रदेशावरील समाजाची उत्पादकता (PTC- Productivity of Territorial Communities)
यामध्ये जमिनीवरील स्वयंपोशी हिरव्या वनस्पती द्वारे प्राथमिक उत्पादकता, शाकाहारी व मांसाहारी जीवाद्वारे द्वितीय उत्पादकता व विविध घटकांच्या विविध प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.
X X
2. उत्पादन प्रक्रिया
(PP-Production Processes)
यामध्ये परिसंस्थेतील जैविक घटकांच्या विभिन्न क्रियांचा अभ्यास केला जातो.
3. भूपृष्ठीय समाजाचे संरक्षण
(CTC-Conservation by Terrorists real Communities)
4. गोड्या पाण्यातील समाजाची उत्पादकता (PFC-Productivity of Freshwater Communities)
5. सागरी समाजाची उत्पादकता
(PMC-Productivity of Marine Communities)
6. मानवी जुळणी
(HA-Human Adaptation)
7. जैविक साधन संपत्ती चे उपयोग आणि व्यवस्थापन
(UMBR-Use and Management of Biological Resources)
5. आंतरराष्ट्रीय भूआवरण- जीवावरण कार्यक्रम
International Geosphare Biological Program-IGBP
या संस्थेची स्थापना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघ परिषद (ICSU-International Council of Scientific Union) याद्वारे 1986 मध्ये करण्यात आली. संपूर्ण पृथ्वी ही एक परिसंस्था असून ही परिसंस्था संतुलित राहण्यासाठी पृथ्वीवरील भौतिक, सामाजिक व जैविक घटकांतील आंतरक्रिया समजून घेणे. हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे व ह्याच्या व्यवस्थापनासाठी काही सूचनावजा मार्गदर्शन सर्व देशातील निर्णय कर्त्याकरिता तयार करण्यात आले. या संस्थेचे कार्यक्रमांतर्गत पुढील परियोजना कार्यरत आहेत.
X X
1. आंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना
2. समताप आवरण क्षोभावरण आंतरक्रिया व जीवावरण
3. विश्वव्यापी संयुक्त सागरीय परिवर्तन अध्ययन
4.किनारी प्रदेशात भूमी- सागर आंतरक्रिया चे अध्ययन
6. आधुनिक समाजाच्या आव्हानांसंबंधी समिती
Committee on the Challenges of Modern Society-CCMS
या समितीची स्थापना नाटो(NATO) द्वारे इ. स. 1969 ला मानव पर्यावरण संबंधी समस्यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने झाली. ही समिती पुढील विषयावर लक्ष केंद्रित ठेवत असते.
1. हानीकारक अविशिष्ट पदार्थांची विल्हेवाट
2. तटवर्ती जलप्रदूषण
3. खंडांतर्गत पाणी (Inland Water)
4. हवा प्रदूषण(Air Pollution)
7. संयुक्त राष्ट्रसंघाचा आर्थिक आयोग
United Nations Economic Commission -UNEP
या आयोगाची निर्मिती युरोप, उत्तर अमेरिका, रशिया यांच्या द्वारा इ. स. 1971 मध्ये करण्यात आली.
X X
8. जलसंशोधनावर वैज्ञानिक समिती
Scientific Committee on Water Research- SCWR
9. पर्यावरणीय समस्यावर वैज्ञानिक समिती
Scientific Committee of Problems of Environment- SCOPE
10. महासागरीय संशोधनावर वैज्ञानिक समिती
Scientific Committee of Oceanic Research- SCOR
वरील सर्व संघटना एकमेकांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जाणीव आणि संरक्षणासाठी वैचारिक आदानप्रदान संशोधने इत्यादी विश्वव्यापी पर्यावरण मूल्यमापनाशी संलग्न आहेत.
Comment and share.....
7 Comments
nice
ReplyDeleteVery good information🙏.
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice👍
ReplyDeleteVery informative
ReplyDelete