Career path finder:
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी ज्या माध्यमातून विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण घेऊन किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊन आपल्या करीयरची योग्य ती निवड करून पुढील वाटचाल करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरेल.
X X
खालील प्रमाणे 12 (बारावी) कला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उच्चशिक्षनातले काही पदवी कोर्सेस आहेत पूर्ण करू शकतात.
1. विद्यार्थी 12 (बारावी) कला पास झाल्यानंतर दोन वर्षाचा डी.एड (D.Ed.) हा डिप्लोमा करून शासकीय किंवा निमशासकीय शाळेत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
X X
2. 12 (बारावी) कला पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस.डब्ल्यू.(B.S.W.) हा तीन वर्षाचा पदवी (समाजकार्य)कोर्स करून पुढे एम. एस. डब्ल्यू. (M.S.W.) पदव्युत्तर कोर्स पूर्ण करून शासकीय नोकरी मध्ये किंवा एन.जी.ओ.(N.G.O.) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळू शकते.
3.12 बारावी कला उत्तीर्ण विद्यार्थी पाच वर्षाचा एल.एल.बी .(L.L.B.) वकिलीचा पदवी कोर्स पूर्ण करून पुढे एल. एल.एम. (L.L.M.) दोन वर्षाची पदव्युत्तर पदवी प्राप्त करून सरकारी नोकरी मध्ये किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस कोर्टामध्ये करू शकता .स्पर्धा परीक्षा देऊन न्यायाधीश या पदावर सुद्धा आपल्याला संधी मिळू शकते. यामध्ये आणखी दोन कोर्स आहेत डी .टी .एल .(D.T.L.) वर्षाचा कोर्स आणि डी . एल .एल .(D.L.L.) एक वर्षाचा कोर्स पूर्ण करून प्रायव्हेट प्रॅक्टिस व्यवसायिक दृष्टीकोनातून आपण करू शकता.
4. दोन वर्षाचा इंटेरियर डिझाईन डिप्लोमा आणि तीन वर्षाचा फॅशन डिझायनिंग डिप्लोमा फॉरेन लैंग्वेज डिप्लोमा हा करून आपण स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता सध्या या व्यवसायाला खूप मोठी मागणी आहे आणि संधी आहे.
X X
5. 12 बारावी उत्तीर्ण झालेले कला शाखेतील विद्यार्थी तीन वर्षाचा बी.ए.(B.A.) कोर्स पूर्ण करून एम. ए ..(M.A.) दोन वर्षाची पदव्युत्तर पदवी वेगवेगळ्या भाषा विषय व सामाजिक शास्त्र विषय मिळून उच्च शिक्षणामध्ये जावयाचे असल्यास सेट ,नेट ,एम .फिल. आणि पीएच.डी. .(SET/NET/M.Phil./Ph.D.) पदव्या घेऊन आपण प्राध्यापक म्हणून नोकरी मिळू शकतात किंवा संशोधन केंद्रामध्ये आपण संशोधक म्हणून काम करू शकता.
X X
6. तीन वर्षाची बी.ए. .(B.A.) पदवी प्राप्त केल्यानंतर आपण बी.पी.एड. .(B.P.Ed.) वर्षाची पदवी प्राप्त करू शकता आणि पी टी टीचर म्हणून किंवा पुढे एम. पी .एड.(M.P.Ed.) करून महाविद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. एम. ए. (M.A.) मास कम्युनिकेशन ही ही पदव्युत्तर पदवी आपण प्राप्त करू शकता. बी.जे . (B.J.) जर्नालिझम ची एक किंवा दोन वर्षाची पदवी आपण प्राप्त करू शकता. बी. लीब. (B.Lib.) लायब्ररी सायन्स एक वर्षाची पदवी आपण मिळवू शकता. एक ते दोन वर्षाची बी एड.(B.Ed.) पदवी आणि पुढे एम.एड.(M.Ed.) एक वर्षाची शिक्षण क्षेत्रातली पदवी मिळवून आपण शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ शकता.
7. 12 बारावी कला उत्तीर्ण विद्यार्थी दोन वर्षाचा ॲडव्हर्टायझिंग अंड कमर्शियल मॅनेजमेंट हा डिप्लोमा किंवा इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा पूर्ण करून विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात.
X X
8. 12 बारावी कला यामध्ये मॅथ आणि इंग्लिश घेऊन पास होणारे विद्यार्थी पाच वर्षाचा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर(B.Arch.) हा पदवी कोर्स पूर्ण करू शकतात व स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकतात .सध्या या व्यवसायाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.
X X
9. 12 बारावी कला उत्तीर्ण होऊन तीन वर्षाची बी.ए. .(B.A.) पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी एमपीएससी(MPSC),यु पी एस सी(UPSC) एसएससी (SSC)बी आर बी (BRB)किंवा बीएसएफ(BSF) सी आर पी एफ (CRPF)किंवा सीआयएसएफ(CISF) मध्ये सब इंस्पेक्टर या पदासाठी तयारी करू शकता.
10.आपण एम .सी .ए .,एम .सी. एम.(MCA,MCM.) दोन किंवा तीन वर्षाची सॉफ्टवेअर पदवी शिकू शकता किंवा एमबीए (MBA)पदवी-पदव्युत्तर पऱ्यांचे शिक्षण घेऊ शकता व त्याचा फायदा आपणास आयटी किंवा अन्य कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदावर नोकरी मिळू शकते.
X X
X X
View, comments and share.............
17 Comments
Very nice..I like it.
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete👌👌👍👍👍👍
ReplyDelete,👌👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice opportunity
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery Nice information sir
ReplyDeleteNice information sirji
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice sirji
ReplyDelete👍👍
ReplyDeleteVery good
ReplyDelete