Subscribe Us

header ads

श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाची मौजे जायकोचीवाडी येथे 250 वृक्षांची लागवड

श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाने मौजे जायकोचीवाडी येथे 250 वृक्षांची लागवड करून दिला पर्यावरण जागृतीचा संदेश : दिनांक 16/09/2026


जायको देवी मंदिर मौजे जायकोवाडी
                   जायको देवी 

वृक्ष रोपण करताना मान्य कार्यवाह डॉक्टर हेमंत जी वैद्य

येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलकडून संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त व श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेचा सीबीएससी विभाग व महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्यापन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे जायकोचीवाडी येथे 250 वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत जी वैद्य यांचे स्वागत व सत्कार







भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाहक श्री अमरनाथ जी कृपे यांचे स्वागत आणि सत्कार करताना 



        यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखतात, प्रदूषण कमी करतात व मानवी जीवनाला ऑक्सिजन देतात. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सह कार्यवाह श्री अमरनाथ जी खुरपे यांनी पर्यावरण जागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देताना आपले मनोगत व्यक्त केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत जी वैद्य यांनी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये पर्यावरण जागृती निमित्त मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी ज्ञानेश्वर जाधव

          त्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी संस्थेचे ध्येय व उद्देश स्पष्ट केले. भा.शि.प्र.सं. अंबाजोगाई ही संस्था ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार व राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वृक्षांच्या संगोपनाची सर्वस्वी जबाबदारी आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी घेतल्याचे त्यांनी नमूद केले. दर पाच दिवसाने या झाडांना ते टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले व त्या वृक्षांची संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक वनीकरण विभागाकडून वड,पिंपळ, कवट, कडुनिंब, सिसम असे वेगवेगळ्या प्रकारचे 250 वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले.

पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये वृक्षदिंडी 




       गावापासून जायकोदेवी मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढून पर्यावरण जन जागृती व पर्यावरणाचे संवर्धनाविषयीचा संदेश गावकरी यांना देण्यात आला.


       याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सहकार्यवाह श्री. अमरनाथ खुर्पे, स्थानिक संकुलाचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र रेदासणी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष

श्री.अभय कोकड, सदस्य श्री .बाबासाहेब सरवदे, श्री. शशिकिरण गडम, श्री. तेजस महाजन महाजन, एन.एस.एल. साखर कारखान्याचे अधिकारी पारसनाथ जैस्वाल, माजी सरपंच श्री.संभाजीराव येवले,, श्री.देवबाप्पा जोगडे, श्री.पवनजी मानधने,

श्री.रामप्रसाद कलंत्री, प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, प्राचार्य सौ. सिंपल शर्मा तसेच महाविद्यालय व सीबीएससी विभागातील प्राध्यापक कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री पानपट यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गवते यांनी मानले.

त्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्यापन आणि शिक्षण विभाग या दोन विभागाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर गवते, डॉक्टर शिवशंकर मिटकरी आणि प्राध्यापक अशोक होके यांनी परिश्रम घेतले. आजीवन अध्यापन आणि शिक्षण विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुरेश बनसोडे यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर युवराज मुळे आणि प्राध्यापक डॉक्टर गजानन होना यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अमृत महोत्सवी वर्ष आणि श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल माजलगाव हिरक महोत्सवी वर्ष 2026 यानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती आणि वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे महत्त्व मौजे जायकोवाडी या ठिकाणी वृक्ष रोपणाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात आला.

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे काही क्षण चित्र माननीय संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक तथा गावातील प्रतिष्ठित व गावकरी यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली.










*सीबीएससी विभागाचे अध्यक्ष श्री. तेजस महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून सामाजिक वनीकरण विभाग यांनी वृक्ष उपलब्ध करून दिले तर एन.एस.एल. साखर कारखाना यांनी 250 वृक्ष लागवडीसाठी खड्डे करून दिले. यावेळी बोलताना तेजस महाजन म्हणाले की,भा.शि.प्र.संस्थेने या अगोदर देखील मौजे साळेगाव, मोगरा, किट्टी आडगाव, मंजरथ अशा वेगवेगळ्या गावांमध्ये दत्तक ग्राम योजनेअंतर्गत वृक्षारोपण केले आहे व यानंतर देखील संस्थेकडून भविष्यात वृक्षारोपण सुरूच राहणार आहे. पर्यावरण संवर्धन हा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत तेजस महाजन यांनी नोंदविले.   


















पर्यावरणाचे महत्त्व -

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन, झाडे, प्राणी - हे सगळे मिळून बनलेली जीवन-व्यवस्था.

१. जीवनाचा आधार: आपल्याला श्वासासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, अन्नासाठी जमीन पर्यावरणातूनच मिळते.

२. आरोग्य: स्वच्छ पर्यावरण = निरोगी मनुष्य. प्रदूषणामुळे आजार वाढतात.

३. नैसर्गिक समतोल: झाडे, प्राणी, पक्षी यांचे चक्र बिघडले तर पाऊस, तापमान, शेती सगळे बिघडते.

४. भावी पिढी:आपण पर्यावरण जपले तरच आपल्या मुलांना जगण्यासाठी चांगली पृथ्वी मिळेल.

 झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवणे म्हणजे स्वतःचे जीवन वाचवणे.


वृक्ष संवर्धनाचे फायदे

१. हवा शुद्ध होते: झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात - १ मोठे झाड वर्षाला २६० पौंड ऑक्सिजन देते.

२. पाऊस आणि पाणी: झाडांमुळे पाऊस पडतो, भूजल पातळी वाढते, विहिरींना पाणी राहते.

३. तापमान कमी:झाडांमुळे ३-४ डिग्री तापमान कमी होते, उन्हाळा सुसह्य होतो.

४. जमिनीचे संरक्षण:मुळांमुळे जमीन धरून राहते, धूप थांबते, शेती सुपीक राहते.

५. औषध आणि अन्न:फळे, लाकूड, औषधी वनस्पती झाडांपासूनच मिळतात.

६. प्राणी-पक्ष्यांचे घर:पक्षी, मधमाश्या, प्राणी झाडांवरच जगतात - जैवविविधता टिकते.

७. आर्थिक फायदा: शेताच्या बांधावर झाडे = अतिरिक्त उत्पन्न, सावली, चारा.

एक झाड = १० AC च्या बरोबरीचे काम करते. म्हणून आपण परिसरात जास्तीत जास्त झाडे लावूया आणि जगवूया.

झाडे लावा, झाडे जगवा! 🌴

View, comment and share....

Post a Comment

2 Comments

  1. बहुत बढीया सर जी बहुत ही मेहनत करके आपने यह सब तैयार किया है अभिनंदन आपका।

    ReplyDelete