Monthly Lecture series: Rashtriy Swaysevak sangh Shatabdi varsh 2025-26
मासिक व्याख्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष 2025- 26
======================
संघशताब्दी निमित्त माहे जुलै 2026 मासिक व्याख्यान दिनांक 28 जुलै 2026 दुपारी 4.00 वाजता.
मासिक व्याख्यान कार्यक्रम पत्रिका
श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात संघ शताब्दी 2025 26 यानिमित्ताने मासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून सुरुवात करण्यात आली. प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
माहे जुलै 2026 मासिक व्याख्यानाचे व्याख्याते माननीय श्री प्रशांत जी महाजन धाराशिव यांचे स्वागत आणि सत्कार करताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारणी चे सहकार्यवाह माननीय श्री अमरनाथजी खुरपे, व तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य , तथा श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक माननीय श्री प्रकाश भाऊ दुग्गड
संघ शताब्दी निमित्त मासिक व्याख्यानाचे व्याख्याते माननीय श्री प्रशांत जी महाजन यांनी भारतीय कुटुंब व्यवस्था या विषयावर विस्तृत असे व्याख्यान दिले. प्राचीन काळापासून भारतीय कुटुंब व्यवस्था किती सक्षम होतील ती टिकून ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक कुटुंबप्रमुखवर आहे
अशा पद्धतीचे विस्तृत असे व्याख्यान दिले.मासिक व्याख्यान माहे जुलै 2026 च्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभयजी कोकड यांनी अध्यक्षीय समारोप केला.
मासिक व्याख्यान जुलै 2026 च्या व्याख्यान च्या कार्यक्रमाचे आभार आणि शांती मंत्र उपप्राचार्य डॉक्टर गजानन होन्ना यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत सोनार यांनी केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मुकुंदजी देवर्षी हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर युवराज मुळे तथा सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
====================================










0 Comments