Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) - December 30 डिसेंबर 30 : दिनविशेष

Day of Special (Dinvishesh) - December 30

डिसेंबर 30 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


30 डिसेंबर 1971 रोजी कोवलम , तिरुवनंतपुरम ( केरळ ) येथे वैज्ञानिक संशोधन, उद्योग आणि कला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. साराभाईंना वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी निधन झाले. थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) या महान शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ तिरुअनंतपुरम आणि संबंधित अंतराळ संस्थांना "विक्रम साराभाई स्पेस सेंटर" असे नामकरण करण्यात आले .

30 डिसेंबर 2016 रोजी भारत सरकारने " भीम ॲप योजना" ची सुरुवात केली.


X X
30 डिसेंबर 1803 रोजी ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.

30 डिसेंबर 1906 रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

30 डिसेंबर 1924 रोजी एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

30 डिसेंबर 1969 रोजी पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
X X

30 डिसेंबर 1865 रोजी नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म झाला. 18 जानेवारी 1936 रोजी यांचे निधन झाले.

30 डिसेंबर 1879 रोजी भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी
यांचा जन्म झाला. 14 एप्रिल 1950 रोजी यांचे निधन झाले.

X X
30 डिसेंबर 1887 रोजी मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म झाला. 8 फेब्रुवारी 1971 रोजी यांचे निधन झाले.

30 डिसेंबर 1902 रोजी भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार डॉ. रघू वीरा यांचा जन्म झाला. 14 मे 1963 रोजी यांचे निधन झाले.

30 डिसेंबर 1923 रोजी भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म झाला. 23 नोव्हेंबर 1977 रोजी यांचे निधन झाले.

30 डिसेंबर 1934 रोजी हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म झाला. 17 ऑगस्ट 2005 रोजी यांचे निधन झाले.
X X
30 डिसेंबर 1935 रोजी प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1950 रोजी सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1950 रोजी भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1983 रोजी इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1989 रोजी भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म झाला.

30 डिसेंबर 1992 रोजी भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1994 रोजी भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म झाला.

X X
30 डिसेंबर 1691 रोजी रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. 25 जानेवारी 1627 रोजी यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1944 रोजी रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (1915) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक यांचे निधन झाले. 29 जानेवारी 1866 रोजी यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 1971 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन झाले. 12 ऑगस्ट 1919 रोजी यांचा जन्म झाला.


30 डिसेंबर 1974 रोजी गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन झाले.

X X
30 डिसेंबर 1982 रोजी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन झाले. (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट). 2 डिसेंबर 1913
रोजी यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.

30 डिसेंबर 1987 रोजी संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ यांचे निधन झाले.

30 डिसेंबर 1990 रोजी भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन झाले. 9 डिसेंबर 1929 रोजी यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 2006 रोजी इराकी हुकूमशहा व इराकचे 5 वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. 28 एप्रिल 1937 रोजी यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 2015 रोजी भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन झाले. 10 मार्च 1929
रोजी यांचा जन्म झाला.

30 डिसेंबर 2024 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) हे अंतराळामध्ये दोन उपग्रह सोडणार आहे या उपग्रहाच्या द्वारे डोकिंग आणि अनडॉकिंग ही प्रणाली राबवली जाणार आहे त्यामुळे जगात भारताचा चौथा क्रमांक या संशोधन क्षेत्रात लागणार आहे. याला स्पेडिक मिशन असेही म्हणतात. भारत या मिशनच्याद्वारे स्पेस सेंटर अवकाशामध्ये निर्माण करण्याची तयारी आहे. हे दोन उपग्रह आज रात्री दहा वाजता सोडले जाणार आहेत. त्यानंतर अंतराळामध्ये या दोन उपग्रहांना वेगळे केले जाणार आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा हा भक्कम पाया असणार आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. हे उपग्रह 220kg आहेत.

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-29-day-of-special-dinvishesh-29.html
👆
Day of Special (Dinvishesh) - December 29 

डिसेंबर 29 : दिनविशेष

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/blog-post_11.html
👆
Vikram Sarabhai: Indian Scientists 

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक: प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई ( भौतिकशास्त्रज्ञ )

30 डिसेंबर: स्मृतिदिन
X X

X X







View, Comments and Share...........





 

Post a Comment

0 Comments