Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) -December 26 डिसेंबर 26 : दिनविशेष

Day of Special (Dinvishesh) -December 26

डिसेंबर 26 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


26 डिसेंबर 1920 रोजी नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीला काँग्रेसने मान्यता दिली.

26 डिसेंबर 1895 रोजी लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.

26 डिसेंबर 1898 रोजी मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

26 डिसेंबर 1904 रोजी दिल्ली ते मुंबई पहिली क्रॉस कंट्री मोटारकार रॅलीचे उद्घाटन.
X X
26 डिसेंबर 1975 रोजी मॅक 2 पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – 144 विमानसेवा सुरू झाली.

26 डिसेंबर 1976 रोजी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.

26 डिसेंबर 1978 रोजी भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जेल मधून सुटका करण्यात आली.

26 डिसेंबर 1982 रोजी टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.

X X
26 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.

26 डिसेंबर 1997 रोजी विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार

26 डिसेंबर 2004 रोजी 9.3 रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे 2,30,000 लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील 1700 जणांचाही समावेश होता.

26 डिसेंबर 2006 रोजी शेन वार्न ने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट घेऊन एक नवीन विक्रम रचला.

26 डिसेंबर 2012 रोजी चीनची राजधानी बीजिंग पासून तर ग्वांग्झू पर्यंत पहिल्यांदा जगातील सर्वात लांब आणि वेगवान रेल्वे रस्ता सुरु केल्या गेला.
X X

26 डिसेंबर 1716 रोजी 18 व्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी थॉमस ग्रे यांचा जन्म झाला.

26 डिसेंबर 1785 रोजी बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म झाला. 10 फेब्रुवारी 1871 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1791 रोजी जगप्रसिद्ध इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांचा जन्म झाला. 18 आक्टोबर 26 डिसेंबर 1871 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1893 रोजी आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते माओ त्से तुंग यांचा जन्म झाला. 9 सप्टॆंबर 1976 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1899 रोजी भारताचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी जनरल डायर वर गोळ्या झाडून जालियानवाला बाग हत्याकांडा चा बदला घेतला अश्या सरदार उधम सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म.
X X
26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रात कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 2008 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1914 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशीला नायर यांचा जन्म झाला. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. 3 जानेवारी 2000 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म झाला. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.

26 डिसेंबर 1925 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे यांचा जन्म झाला. 13 जुलै 1994 रोजी यांचे निधन झाले होते.
X X
26 डिसेंबर 1929 रोजी गुजराती साहित्यिक तारक मेहता यांचा जन्म झाला.

26 डिसेंबर 1935 रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म झाला. 27 डिसेंबर 1999 रोजी यांचे निधन झाले होते.

26 डिसेंबर 1941 रोजी मराठी रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म झाला.

26 डिसेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज सुधारक तथा बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म झाला.


26 डिसेंबर 1530 रोजी पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर याचे निधन झाले. 14 फेब्रुवारी 1483 रोजी यांचा जन्म झाला होता.
X X
26 डिसेंबर 1961 रोजी भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक तसेच लेखक भूपेंद्रनाथ दत्त यांचे निधन झाले.

26 डिसेंबर 1966 रोजी पंजाब चे पहिले मुख्यमंत्री तसेच गांधी स्मारक निधी चे पहिले अध्यक्ष गोपी चंद भार्गव यांचे निधन झाले.

26 डिसेंबर 1972 रोजी अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन झाले. 8 मे 1884 रोजी यांचा जन्म झाला होता.

26 डिसेंबर 1989 रोजी व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (1976), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन झाले. 31 जुलै 1902 रोजी यांचा जन्म कायमकुलम, केरळ येथे झाला होता.
X X
26 डिसेंबर 1999 रोजी भारताचे 9 वे राष्ट्रपती व 8 वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन झाले. 19 ऑगस्ट 1918 रोजी यांचा जन्म झाला होता.

26 डिसेंबर 2000 रोजी मराठी नाट्यभूमीवरील सुप्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन झाले.

26 डिसेंबर 2006 रोजी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन झाले. 15 सप्टेंबर 1921 रोजी यांचा जन्म झाला होता.

26 डिसेंबर 2011 रोजी कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन झाले. 26 ऑक्टोबर 1933 रोजी यांचा जन्म झाला होता.

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-25-day-of-special-dinvishesh-25.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 25 

डिसेंबर 25 : दिनविशेष

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/baba-amte-indian-social-worker-and.html
👆
बाबा आमटे ऊर्फ डॉ. मुरलीधर देविदास आमटे: थोर समाजसेवक

26 डिसेंबर : जन्मदिन

X X

X X







View, Comments and Share...........



Post a Comment

0 Comments