Subscribe Us

header ads

Dadabhai Naoroji: "Grand Old Man of India",Political leader

Dadabhai Naoroji: "Grand Old Man of India",Political leader

दादाभाई नौरोजी: राष्ट्रीय आंदोलनाचे पितामह  

जन्मदिन: 4 सप्टेंबर

स्मृतिदिन: 30 जून



बालपण व शिक्षण :

दादाभाई नौरोजी यांचा जन्म मुंबईमध्ये पारशी धर्मातील एका पुजारी कुटुंबात 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.

वडील नौरोजी पलंजी दोर्दी व त्यांच्या आई मानेकाबाई होत्या. ते लहानपणापासूनच ते तल्लक बुद्धीचे होते. दादाभाईंचे प्रारंभिक शिक्षण ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्कूल’ मधून झाले. 

यानंतर दादाभाईंनी मुंबईच्या ‘एल्फिन्स्टन संस्थेमधून’ साहित्याचा अभ्यास केला, जिथे त्यांनी जगातील साहित्य वाचले.

 दादाभाई गणित व इंग्रजीत चांगले होते. वयाच्या 15 व्या वर्षी दादाभाईंना क्लेअरने शिष्यवृत्ती मिळवून 1845 मध्ये पदवीधर झाले. 

1845 मध्ये पदवीधर झाल्याबरोबर त्यांची नेमणूक प्राध्यापक म्हणून एल्फिन्स्टन्स कॉलेजमध्ये झाली. 

1856 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे त्यांची गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली व त्यांनी तेथे दहा वर्ष काम केले.

X X

राजकीय संघटनात्मक बांधणी:

 लंडनमध्ये 1886 वर्षी त्यांनी पार्लमेंटची निवडणूक लढवली व 1907 मध्ये हिंदी स्वराज्याची जोरदार वकिली करण्यासाठी ते पुन्हा इंग्लंडला गेले.

दादाभाई नौरोजी  इंग्लंडमध्ये असताना 1 डिसेंबर 1866 या दिवशी" ईस्ट इंडिया असोसिएशन" ची त्यांनी स्थापना केली. या असोसिएशनचे ते स्वतः सेक्रेटरी होते. 

त्यानंतर भारतातही त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या त्या काळात जन जागृती करण्याचा तो एक मार्ग होता.

1874 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काही काळ काम केले. पण संस्थानिक व इंग्रज रेसिडेंट अधिकारी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी एक वर्षानंतर राजीनामा दिला.

1875 आणि 1883 या दोन वर्षी मुंबई नगरपालिकेचे सदस्य होते. 1885 मध्ये गव्हर्नर रे यांनी दादाभाईंना मुंबई प्रांत कायदे मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केले. 

लंडन प्रमाणे मुंबईतही दादाभाईंनी "मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन" ची स्थापना केली. काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यातही दादाभाईंचा  महत्त्वपूर्ण पुढाकार होता. 

नौरोजी यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे रचनाकार म्हटले जाते. ए.ओ. हुम आणि दिनशॉ एडुलजी यांच्यासमवेत त्यांनी हा पक्ष स्थापन केला. 

X X

1. कलकत्ता (1886) 

2. लाहोर (1893) 

3. कलकत्ता (1906) 

अशा तीन अधिवेशनात दादाभाई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

दादाभाईनी 1883 मध्ये "व्हॉइस ऑफ इंडिया" नावाचे वृत्तपत्र काढले. यात ते लेख लिहीत व अन्य नियतकालिकातही लेख लिहीत असत. 


1902 मध्ये दादाभाई "लिबरल पक्षा"चे उमेदवार म्हणून इंग्लंडमधील पार्लमेंट मध्ये निवडून गेले. सेंट्रल फिन्सबरी हा त्यांचा मतदारसंघ त्यांचा संसदीय लोकशाहीवर दृढविश्वास होता.

दादाभाईनी स्त्री -पुरुष समानता , जातिभेद , उच्चनीचता यावरही विचार मांडले. एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धात दादाभाईंनी सामाजिक सुधारणा क्षेत्रात अनमोल कार्य केले.

त्यांनी "ड्युटीज ऑफ द झेरॉस्ट्रियन्स" म्हणजे पारशी धर्मीयांची कर्तव्य असा एक ग्रंथ लिहिला.

दादाभाई पारशी पुरोहित कुटुंबातील होते, त्यांनी 1 ऑगस्ट 1851 रोजी ‘राह्नूमाई मजदसानी सभा’ ​​स्थापन केली होती. पारशी धर्मतील लोकांना एकत्रित करण्याचा त्यांचा हेतू होता.

 X X

राजकीय विचार:

दादाभाई नौरोजीनी राजकीय प्रश्न व सामाजिक प्रश्न यांची गल्लत केली नाही. राजकीय प्रश्न त्यांनी धार्मिक प्रश्न एकत्र आणले नाहीत . काँग्रेस अधिवेशनात केवळ राजकीय प्रश्नांचेच चिंतन व्हावे.

धार्मिक, सामाजिक प्रश्न कितीही तीव्र असले. तरी काँग्रेसमध्ये आणू नयेत. असा दादाभाईंचा कटाक्ष होता. 

राजकीय प्रश्नाशिवाय अन्य प्रश्न आणले की ऐक्याला तडे जातील हे त्यांचे निदान होते. दोन्ही व्यासपीठे स्वतंत्र असावी राजकीय, धार्मिक,

 सामाजिक प्रश्नांची भेसळ करू नये असे त्यांचे मत होते.

X X

भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणुन कामगिरी :

दादाभाई नौरोजींना व्यवसाय हा प्रिय होता. त्यासाठी 1855 मध्ये ते इंग्लंडला लंडनला व्यवसाय करण्यासाठी गेले.

1855 मध्ये ब्रिटनमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या भारतीय कंपनी ‘कॅमा अँड को’ कंपनीचे दादाभाई भागीदार झाले. 


दादाभाई कंपनीच्या कामासाठी लंडनला गेले. दादाभाई तेथे परिश्रमपूर्वक काम करायचे, परंतु त्यांना कंपनीची अनैतिक कार्यपद्धिती आवडली नाही आणि त्यांनी या कंपनीचा राजीनामा दिला.

भारतीय अर्थशास्त्र विचारांचा पाया दादाभाईंनी घातला. भारताचे एकूण व दरडोई उत्पन्न किती हे मोजण्याचे प्रारंभीचे बहुमोल कार्य केले. हे अनमोल संशोधन त्याकाळी धाडसाने मांडण्याचे काम दादाभाईंनी केले. म्हणून त्यांना अर्थशास्त्रातही भीष्म पितामह म्हणतात.

X X

दादाभाई स्वदेशीची पुरस्कर्ते होते. तरी पण देशात उद्योगधंदे वाढले पाहिजेत यंत्र संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजे. या मताचे होते. 

भारतात पोलाद तयार करणारा कारखाना काढा असे त्यांनी टाटांना सतत प्रोत्साहन दिले व त्यांच्याच प्रेरणेने "टाटा आयर्न अँड स्टील" जमशेदपूरचा कारखाना टाटांनी काढला. देशाच्या अर्थव्यवस्थेला व बेरोजगारीला खूप मोठा हातभार लागला.

1859 मध्ये त्यांनी स्वतःची कॉटन ट्रेडिंग फर्म तयार केली, ज्याचे नाव ‘नौरोजी अँड को’ होते.

1860 च्या दशकाच्या सुरुवातीला दादाभाईंनी भारतीयांच्या उन्नतीसाठी सक्रियपणे काम करण्यास सुरवात केली. ते ब्रिटिशांच्या भारतात साम्राज्यवादी राजवटीच्या तीव्र विरोधात होते.

X X

आर्थिक शोषणाचा सिद्धांत:

दादाभाई नौरोजीनी "पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया" नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ फार गाजला. भारतीय अर्थशास्त्रातील तो पहिला महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. 



इंग्रज राजवट हिंदी लोकांचे कसे भीषण आर्थिक शोषण करीत आहे. ते दादाभाईंनी या ग्रंथात समप्रमाणात माडले आहे. 

साम्राज्यवादाच्या आर्थिक पिळूनुकीकडे त्यांनी प्रथम लक्ष वेधले.

 आर्थिक शोषण असे असते की ते सहसा चटकन लक्षात येत नाही. जळू रक्त शोषून घेताना माणसाला जाणवत नाही.

 त्याप्रमाणे शोषणाची जाणीव माणसाला फार उशिरा होते. राजकीय, धार्मिक वर्चस्वापेक्षा आर्थिक शोषण अतिघातक असते. या आर्थिक शोषणाकडे पद्धतशीर ग्रंथ लिहून दादाभाईंनी लक्ष वेधले.

दादाभाईंनी आर्थिक स्थितीचा समतोल अभ्यास करून पुष्कळ माहिती एकत्र गोळा केली व अधिकृत आकडेवारी मिळवून त्यावर तज्ञांचा सल्ला घेतला आणि इंग्रज राजवट हिंदी लोकांचे कसे भीषण शोषण करीत आहे ते सप्रमाण सिद्ध केले.

X X

दादाभाई नौरोजी मवाळ की जहाल:

दादाभाई नौरोजी सुरुवातीच्या काळात मवाळ वृत्तीचे होते. शांतता व घटनात्मक मार्गाचे ते पुरस्कार होते. 

हिंसात्मक मार्गावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मागणी फक्त सनदशीर मार्गानेच करायची असा त्यांचा आग्रह असायचा.

नंतर त्यांच्या लक्षात आले की इंग्रजी राजवट हिंदी लोकांचे शोषण करण्यासाठी प्रस्थापित झाली आहे. 

इंग्रज राज्यकर्ते वचने पाळणार नाहीत. वचने पाळण्याची त्यांची इच्छा नाही. ते दुट्टपी धोरण राबवतात मग दादाभाई नवरोजी जहाल मतवादी बनले.

लॉर्ड कर्झन त्यावेळेस व्हाईसरॉय होता. त्याची दडपशाही चालू होती. अर्ज विनंती यास तो अजिबात लक्ष्य घालत नव्हता. त्यामुळे ही सर्व मवाळ मंडळी निराश झाली. 

राष्ट्रीय आंदोलन निस्तेज होऊ लागले. अशा वेळी दादाभाई नौरोजींनी अर्ज निवेदने चालू ठेवली. 

भारतात व इंग्लंडमध्ये लोकांना जागृत करण्याचे काम केले. निर्भयपणे ते विचार मांडत राहिले. 1907 च्या काँग्रेस अधिवेशना मध्ये बहिष्काराचा ठराव खुद्द दादाभाईंनी मांडला. 

1909 च्या काँग्रेसमध्ये त्यांनी असे जाहीर केले की, आता स्वराज्याची मागणी केल्यावाचुन आम्हाला पर्याय नाही. शोषण करणारे सरकार लवकरात लवकर जावे असे दादाभाईंनी म्हटले होते. त्याकाळी इंग्रांविरुध्द एवढे बोलणे धैर्याचे लक्षण मानले जात होते. 

X X

मावळ आणि जहाल यांना एकत्र ठेवण्याचे कार्य दादाभाईंनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले.

दादाभाई नौरोजी यांना राष्ट्रीय आंदोलनाचे पितामह म्हणतात . त्यांच्या काळात 1857 चे बंड, 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, 1905 मध्ये बंगालची फाळणी अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या.

 स्वातंत्र्य चळवळ निश्चित होत असताना ती सजीव चैतन्यामय करण्यात  दादाभाईचा सिंहाचा वाटा आहे. ते पारशी होते पण ते मी प्रथम भारतीय आहे असे ते मानत व राष्ट्रीय एकात्मता धर्मनिरपेक्षता यांचा पायाच भारतात त्यांनी घातला.

X X

दादाभाई नौरोजी यांचे निधन :

शेवटच्या दिवसांमध्ये दादाभाई इंग्रजांकडून भारतीयांच्या शोषणावर लेख लिहित असत, तसेच या विषयावर भाषणे देत असत. 

भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा पाया दादाभाई नौरोजी यांनी स्थापित केला.

 भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी दादाभाई नौरोजी यांचे 30 जून 1917 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

X X

सन्मान:

1916 मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना डी.लिट.ही मानद पदवी अर्पण केली.


X X







View, comments and Share 


Post a Comment

5 Comments