Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) -December 25 डिसेंबर 25 : दिनविशेष

Day of Special (Dinvishesh) -December 25

डिसेंबर 25 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


25 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गुड गव्हर्नन्स डे /सुप्रशासन दिन म्हणून साजरा केला जातो.

ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस

25 डिसेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सिताराम अल्हाट व राधाबाई ग्‍यानोजी निंबनकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला या विवाहाचा खर्च अवघा 15 रुपये एवढा होता.

25 डिसेंबर 1927 रोजी सत्याग्रह परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल. या परिषदेचे स्वागताध्यक्ष दिपू संभाजी गायकवाड हे होते. या परिषदेत हिंदू समाजाचा धर्मग्रंथ "मनुस्मृती" चे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रंथामुळे जातीव्यवस्था व अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती .त्यामुळे 25 डिसेंबर रोजी " मनुस्मृती" ग्रंथांचे दहन या परिषदेत करण्यात आले.ही घटना अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी ठरली. 26 डिसेंबर रोजी या परिषदेचा सांगता समारोह संपन्न झाला.
X X
25 डिसेंबर 1991 रोजी गोर्बाचेव्ह यांनी सोवियत रशियाचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला.दुसऱ्या दिवशी "सुप्रीम सोवियत" ने (सोवियत संसद) मतदाना मार्फत सोविएत रशियाचे देश म्हणून असणारे अस्तित्व संपवले. सोवियत रशियाचे विघटन झाले आणि नवीन देश अस्तित्वात आले.

25 डिसेंबर 2000 रोजी केंद्र सरकारने "अंत्योदय अन्न योजना" सुरू केली. या योजनेचा उद्देश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रतिमहिना 35 किलो अन्नधान्य किमान किमतीत उपलब्ध करून देण्यात येईल.

25 डिसेंबर 2000 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात केली.

25 डिसेंबर 2015 रोजी भारत सरकारने "किलकारी योजना" ची सुरुवात केली.

X X

25 डिसेंबर 00 रोजीरोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.

25 डिसेंबर 1771 रोजी मुघल प्रशासक दुसरा शाह आलम दिल्लीच्या सिंहासनावर बसले.

25 डिसेंबर 1763 रोजी भरतपूर चे महाराजा सुरजमल यांची हत्या करण्यात आली.

25 डिसेंबर 1946 रोजी ताईवान ने संविधानाला स्वीकारले.
X X
25 डिसेंबर 1974 रोजी रोम जात असेलेले एअर इंडिया चे बोईंग 747 चे अपहरण.

25 डिसेंबर 1976 रोजी ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.

X X
25 डिसेंबर 1990 रोजी वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी केली.

25 डिसेंबर 1991 रोजी मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.

25 डिसेंबर 2002 रोजी चीन आणि बांगलादेश मध्ये संरक्षण करार पार पडला.

25 डिसेंबर 2005 रोजी 400 वर्षाआधी लुप्त झालेला पक्षी “डोडो” चे दोन ते तीन हजार वर्ष जुने अवशेष आढळले.

25 डिसेंबर 2008 रोजी भारताने पाठविलेल्या चंद्रयान-1 च्या पेलोडर ने चंद्राचा पहिला नवीन फोटो पाठविला.
X X


25 डिसेंबर 1021 रोजी अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म झाला. 12 एप्रिल 1912 रोजी यांचे निधन झाले.

X X
25 डिसेंबर 1861 रोजी पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
यांचा जन्म झाला. 12 नोव्हेंबर 1946 यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1872 रोजी संस्कृत भाषेचे विद्वान पंडित गंगानाथ झा यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1876 रोजी बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल
यांचा जन्म झाला. 11 सप्टेंबर 1948 यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1878 रोजी शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म झाला. 6 जून 1941
यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1886 रोजी पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म झाला. 11 सप्टेंबर 1948
यांचे निधन झाले.
X X
25 डिसेंबर 1889 रोजी रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म झाला. 8 मे 1984
यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1911 रोजी बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
यांचा जन्म झाला. 28 जानेवारी 1993 यांचे निधन पॅरिस, फ्रान्स येथे झाले.

25 डिसेंबर 1916 रोजी अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म झाला. 11 एप्रिल 2012
यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1918 रोजी अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
यांचा जन्म झाला. 6 आक्टोबर 1981 यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1919 रोजी नौशाद अली – संगीतकार
यांचा जन्म झाला. 5 मे 2006 यांचे निधन झाले.

X X
25 डिसेंबर 1921 रोजी भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म झाला. 10 सप्टेंबर 2000
यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1924 रोजी अटलबिहारी बाजपेयी – भारताचे 10 वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
यांचा जन्म झाला. वाजपेयी यांचे शालेय शिक्षण ग्वाल्हेर येथील सरस्वती शिशु मंदिरात झाले. 1934 मध्ये , त्यांचे वडील मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना उज्जैन जिल्ह्यातील बारनगर येथील अँग्लो-व्हर्नाक्युलर मिडल (AVM) शाळेत दाखल करण्यात आले . त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेज, आग्रा युनिव्हर्सिटी (आता महाराणी लक्ष्मीबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एक्सलन्स ) येथे शिक्षण घेतले जेथे त्यांनी हिंदी , इंग्रजी आणि संस्कृतमध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली . त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर , आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्रातील मास्टर ऑफ आर्ट्ससह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले . भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) यांची कारकीर्द ओळखली जाते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' (Good Governance Day) अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती. भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. 

25 डिसेंबर 1925 रोजी प्रसिद्ध चित्रकार सतीश गुजराल यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1926 रोजी चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस यांचा जन्म झाला. 5 आक्टोबर 1997 यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1926 रोजी डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे 27 वर्षे संपादक यांचा जन्म झाला. ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. 4 सप्टेंबर 1997 यांचे निधन झाले.

X X
25 डिसेंबर 1927 रोजी पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1932 रोजी प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1936 रोजी भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म झाला. 25 मे 2005 यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 1949 रोजी नवाझ शरीफ – पाकिस्तानचे 12 वे पंतप्रधान यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1959 रोजी भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1980 रोजी राष्ट्रवादी मुस्लीम नेते मुख्तार अहमद अंसारी यांचा जन्म झाला.

25 डिसेंबर 1949 रोजी वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन झाले. 20 मे 1884 रोजी यांचा जन्म झाला होता.

X X
25 डिसेंबर 1957 रोजी प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक यांचे निधन झाले. 1916 मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. 2 सप्टेंबर 1886 रोजी यांचा जन्म झाला होता.

25 डिसेंबर 1972 रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक यांचे निधन झाले. 10 डिसेंबर 1878 रोजी यांचा जन्म झाला होता.

25 डिसेंबर 1977 रोजी चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले.16 एप्रिल 1889 रोजी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅप्लिन यांचा जन्म युनायटेड किंगडम मधील लंडन या ठिकाणी झाला. हा एक प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता मुखपटमध्ये काम करणारा होता तो स्वतः अभिनेता दिग्दर्शक आणि संगीतकार होता. विनोदी ढंगांच्या मुखवहेण्यासाठी तो जगप्रसिद्ध होता. त्यासोबत त्याने मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सुद्धा सांभाळले होते व संगीताची रचना ही तोच करत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात जगभरातल्या प्रसिद्ध अभिनेत्यापैकी तो एक होता. त्याचा मृत्यू 25 डिसेंबर 1977 मध्ये स्वित्झर्लंडमधील वेवी या ठिकाणी झाला. ब्रिटिश मध्ये त्याला 'सर किताब' हा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. त्यांनी त्याचे काही विचार प्रगट केले आहेत. तो म्हणतो, 'ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समजा'. 'साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तुमचा वाईट काळ सुद्धा'. 'आरसा हा माझा सर्वात चांगला मित्र आहे कारण ज्यावेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही'. 'आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो'. 'जीवन जवळून पाहिले तर खूप त्रासदायक वाटते पण जेव्हा याला दुरून पाहिले तर कॉमेडी वाटते'. 'मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून'. असे खूप सुंदर महान विचार यांनी जगाला दिले.


25 डिसेंबर 1989 रोजी रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन झाले. 26 जानेवारी 1918 रोजी यांचा जन्म झाला होता.

25 डिसेंबर 1994 रोजी ग्यानी झैलसिंग – भारताचे 7 वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांचे निधन झाले. 5 मे 1916 रोजी यांचा जन्म झाला होता.
X X
25 डिसेंबर 1995 रोजी डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
यांचे निधन झाले. 7 जून 1917 रोजी यांचा जन्म झाला होता.


25 डिसेंबर 1998 रोजी दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक यांचे निधन झाले.

25 डिसेंबर 2015 रोजी भारतीय अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन झाले.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-24-day-of-special-dinvishesh-24.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 24 

डिसेंबर 24 : दिनविशेष

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/atal-bihari-vajpayee-indian-politician.html
👆
Atal Bihari Vajpayee : Indian politician , poet and former Prime Minister of India

अटल बिहारी वाजपेयी : भारतीय राजकीय नेते, कवी माजी पंतप्रधान

जन्मदिन :25 डिसेंबर
X X

X X







View, Comments and Share...........




Post a Comment

0 Comments