डिसेंबर 24 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
24 डिसेंबर भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
24 डिसेंबर 1973 रोजी पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी यांचे निधन झाले.हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले.
X X
राष्ट्रीय ग्राहक दिन- दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय ग्राहक दिन National Consumer Day
24 डिसेंबर 1777 रोजी कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
24 डिसेंबर 1892 रोजी भारताचे प्रसिद्ध लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांचा जन्म.
24 डिसेंबर 1894 रोजी पहिली वैद्यकीय परिषद कोलकत्ता येथे सुरु झाली.
24 डिसेंबर 1906 रोजी रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
X X
24 डिसेंबर 1910 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
24 डिसेंबर 1924 रोजी अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
24 डिसेंबर 1943 रोजी दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
24 डिसेंबर 1951 रोजी लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
24 डिसेंबर 1979 रोजी सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
24 डिसेंबर 1986 रोजी भारतीय ग्राहक दिन.
X X
24 डिसेंबर 1986 रोजी दिल्ली येथील लोटस टेंपल भक्तांसाठी उघडण्यात आले होते.
24 डिसेंबर 1989 रोजी मुंबई मध्ये देशातील पहिले मनोरंजन पार्क ‘एस्सेल वर्ल्ड’ उघडल्या गेले.
24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 814’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
24 डिसेंबर 2000 रोजी भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चैंपियनशिप आपल्या नावावर केली.
X X
24 डिसेंबर 2002 रोजी दिल्लीच्या मेट्रोचा शुभारंभ झाला.
24 डिसेंबर 2014 रोजी अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
X X
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
24 डिसेंबर 1166 रोजी जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: 19 आक्टोबर 1216)
24 डिसेंबर 1818 रोजी जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: 11 आक्टोबर 1889)
X X
24 डिसेंबर 1864 रोजी विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. 1896 मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: 19 आक्टोबर 1934)
24 डिसेंबर 1880 रोजी डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: 17 डिसेंबर 1959)
X X
24 डिसेंबर 1899 रोजी पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: 11 जून 1950)
24 डिसेंबर 1924 रोजी मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (1967) (मृत्यू: 31 जुलै 1980 – मुंबई)
24 डिसेंबर 1930 रोजी देशातील प्रसिद्ध लेखिका उषा प्रियंवदा यांचा जन्म.
X X
24 डिसेंबर 1942 रोजी भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: 25 मार्च 2015)
24 डिसेंबर 1956 रोजी भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.
24 डिसेंबर 1957 रोजी हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
24 डिसेंबर 1959 रोजी हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.
24 डिसेंबर 1988 रोजी भारतीय क्रिकेट खेळाडू पियुष चावला यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
X X
24 डिसेंबर 1524 रोजी वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९)
24 डिसेंबर 1967 रोजी बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1913)
24 डिसेंबर 1973 रोजी पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: 17 सप्टेंबर 1879)
X X
24 डिसेंबर 1977 रोजी नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: 23 मार्च 1898)
24 डिसेंबर 1987 रोजी एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: 17 जानेवारी 1917)
24 डिसेंबर 1988 रोजी प्रसिद्ध लेखक जैनेंद्रकुमार यांचे निधन.
24 डिसेंबर 1993 रोजी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1879)
24 डिसेंबर 1999 रोजी नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911)
24 डिसेंबर 2000 रोजी कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1923)
24 डिसेंबर 2005 रोजी भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: 7 सप्टेंबर 1925)
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-23-day-of-special-dinvishesh-23.html
👆
Day of Special (Dinvishesh) -December 23
डिसेंबर 23 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/sane-guruji-marathi-author.html
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/sane-guruji-marathi-author.html
👆
साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने):
एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक
24 डिसेंबर: जन्मदिन
X X
X X
View, Comments and Share...........
X X
X X
View, Comments and Share...........
0 Comments