September 11 - Day of Special (Dinvishesh)
सप्टेंबर 11 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
11 सप्टेंबर 1885 रोजी इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेनस् यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1930 रोजी झाला.
11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
11 सप्टेंबर 1895 रोजी भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला. त्यांना भारतरत्न ( 1983) मरणोत्तर, 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. त्यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1982 रोजी झाला.
11 सप्टेंबर 1901 रोजी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल’ यांचा जन्म झाला. त्यांचे ’प्रेम आणि जीवन’, ’ भग्नमूर्ती’, ’चिनी मुलास’, ’निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते. त्यांचा मृत्यू 8 मे 1982 रोजी झाला.
X X
11 सप्टेंबर 1915 रोजी सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 मार्च 1997 रोजी झाला.
11 सप्टेंबर 1917 रोजी फिलिपाइन्सचे 10 वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 सप्टेंबर 1989 रोजी झाला.
11 सप्टेंबर 1919 रोजी अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
11 सप्टेंबर 1961 रोजी ’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.
11 सप्टेंबर 1964 रोजी हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा मृत्यु झाला. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता.
X X
11 सप्टेंबर 1965 रोजी भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
11 सप्टेंबर 1971 रोजी सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1894 रोजी झाला होता.
11 सप्टेंबर 1972 रोजी नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग 5 आक्टोबर 1972 रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
11 सप्टेंबर 1987 रोजी हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (1933) व कुलगुरू महादेवी वर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यांचा जन्म 26 मार्च 1907 रोजी झाला होता.
X X
11 सप्टेंबर 1998 रोजी क्रीडा महर्षी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 आक्टोबर 1909 अहमदनगर, महाराष्ट्र येथे झाला होता.
11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 2996 लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत 75 हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी सी मधील पेंटागन,अमेरिका विरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर (ज्याला 9 /11 हल्ला म्हणून ओळखले जाते) दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले.
11 सप्टेंबर 2024 च्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना-IV या निर्णयाला मान्यता दिली. मंत्रिमंडळाने वित्त वर्ष 2024-25 ते 2028-29 यादरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजना-IV या योजनेस कार्यान्वित करण्यासाठी मंजुरी दिली. (पीएमजीएसवाई-IV) ही योजना संपूर्ण 70,125 करोड़ रुपये एवढी होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र 25000 असंबंध बस्ती साठी खर्च होणार आहेत. त्यांच्या नवीन कनेक्टिव्हिटी साठी खर्च होणार आहे तसेच 62500 किलोमीटरचा देशात रस्ते तयार करण्यासाठी व नवीन रस्ते आणि त्या रस्त्यावरील नवीन पूल बांधण्यासाठी आणि जुन्या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी या योजनेतून खर्च होणार आहे. देशातील दुर्गम भागातील ग्रामीण क्षेत्रामधील सामाजिक आर्थिक विकास आणि भागाचा परिवर्तिक परिवर्तन करण्यासाठी त्यांना जोडणारे रस्ते जे वर्षभर कोणत्याही वातावरणातील ऋतूमध्ये संपर्क तुटणार नाही अशा पद्धतीचे रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी प्रेरणा दायी करणे. ही योजना राबवत असताना आंतरराष्ट्रीय मानक आणि सर्वोत्कृष्ट प्रथांचा यामध्ये समावेश करणे.
पीएमजीएसवाई-IV रोड एलाइनमेंट योजना पीएम गति शक्ति पोर्टल यांच्या माध्यमातून हे संपूर्ण कार्य कार्यानवित करण्यात येईल.
11 सप्टेंबर 1891 मध्ये भारतीय म्हणून हिंदू धर्माचे प्रचारक तथा भारतीय संस्कृती धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञानाची कास जगभरात बसवण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे भारताचे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व म्हणून स्वामी विवेकानंद गेले आणि जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी आपले जोरदार भाषण केले. ज्यामुळे त्या परिषदेतील सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचे स्वागत केले . हिंदू धर्माबद्दल त्यांनी सांगितले त्यामुळे तेथील लोकांनी त्यांची प्रशंसा केली. तो आज भाषणाचा स्मृती दिवस दिग्विजय दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो.
11 सप्टेंबर रोजी जगातील सर्वात मोठा संघटन असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांचा जन्मदिवस.
श्री मोहनजी भागवत
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-10-day-of-special-dinvishesh.html
View, Comments and Share...........
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-10-day-of-special-dinvishesh.html
👆
September 10 - Day of Special (Dinvishesh)
सप्टेंबर 10 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/11/vinoba-bhave-indian-philosopher.html
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/11/vinoba-bhave-indian-philosopher.html
👆
Vinayak Narahari Bhave or Acharya Vinoba Bhave: Indian advocate of nonviolence, human rights,Bhoodan Movement. National Teacher of India and spiritual successor of Mahatma Gandhi.
आचार्य विनोबा भावे ऊर्फ विनायक नरहरी भावे:पहिले सत्याग्रही, भारतीय स्वातंत्र्यसैनिक,सर्वोदयी नेते व भूदान चळवळीचे प्रणेते
जन्मदिन :11 सप्टेंबर
X X
अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो,
X X
11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण .
अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो,
आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी येथे उभा आहे. शब्द सुचत नाहीत, हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासीसमाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदुधर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्याने, मी तुम्हास धन्यवाद देत आहे. आणि, अधिक काय बोलू, अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णाच्या व सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीने मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे. याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधीविषयी बोलताना काही सन्मान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की, "दूरदूरच्या देशांतून आलेले हे प्रतिनिधी, सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरविणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच संशय नाही. " या वक्त्यांचेही मी आभार मानतो. जो धर्म समस्त जगाला ' सहिष्णुता' आणि 'सर्वच मतांना मानणे'
या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्यधर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वदा आश्रय दिला आहे, त्या जातीस जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता
माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरिले, हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे, त्याच धर्मात मी जन्मास आलो आहे.
बंधूंनो,
लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात,
आणि जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहे, त्याच स्तोत्रातील काही ओळी मी आज तुमच्यासमोर उदधृत करितो -"रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम् नृणाम् एको गम्यः त्वमसि पयसाम् अर्णव इव ।"
"भिन्न भिन्न उगमांतून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व पथिक, प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात "
गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करितात
"ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम् मम वर्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः"
"कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येईना का, मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना! लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात." आजची ही अपूर्व, महिमाशाली सर्वधर्मपरिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजविला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाणून काढली आहे. संस्कृतींचा विध्वंस करून त्यांनी कधीकधी राष्ट्रची राष्ट्र हताश करून सोडली आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर मानवसमाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता. पण आता त्यांचीही घटका भरली आहे आणि मला अशी उत्कट आशा वाटते आहे की, या धर्मपरिषदेच्या सन्मानार्थ, आज प्रातःकाळी, निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेडाची, धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची,आणि, एकाच लक्ष्याकडे, आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तींतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्युघंटाच ठरेल.
View, Comments and Share...........





0 Comments