Subscribe Us

header ads

August 16 - Day of Special (Dinvishesh) ऑगस्ट 16 : दिनविशेष

August 16 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 16 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


16 ऑगस्ट 1942 रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांना नामपल्ली स्टेशन वर अटक करण्यात आली. " चलेजाव" चळवळीत संस्थानातील जनतेने निष्ठेने भाग घ्यावा असा त्यांनी आग्रह केला होता. त्यांच्यासोबत अन्य तीस नेतेही पकडण्यात आले.

16 ऑगस्ट 1946 हा दिवस मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला होता.

16 ऑगस्ट 2016 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पंजाबी साहित्यिक गुरू दयाल सिंग यांचे निधन झाले. त्यांच्या " मढी दा दिवा "या कादंबरीला 1999 साली पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता .हे दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पंजाबी साहित्यिक होते. त्यांच्या अगोदर अमृता प्रीतम यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1998 साली त्यांचा भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
X X
16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

16 ऑगस्ट 2010 रोजी जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

16 ऑगस्ट 1994 रोजी बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.


16 ऑगस्ट 1960 रोजी सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

16 ऑगस्ट 1946 रोजी कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन 72 तासात सुमारे 4,000 जण ठार झाले.


16 ऑगस्ट 1913 रोजी स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

X X
16 ऑगस्ट 1970 रोजी नेपाळी-भारतीय हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिचा जन्म झाला.

16 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म झाला.

16 ऑगस्ट 1954 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म झाला.

16 ऑगस्ट 1952 रोजी भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार तिचा जन्म झाला.

16 ऑगस्ट 1950 रोजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म झाला.

16 ऑगस्ट 1913 रोजी इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1992 मध्ये झाला.


16 ऑगस्ट 1904 रोजी भारतातील हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म झाला.
15 फेब्रुवारी 1948 रोजी भारतातील हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री सुभद्राकुमारी चव्हाण यांचे निधन झाले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला सहभाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला त्यांनी हिंदी साहित्यामध्ये कविता लेखन कथालेखन इत्यादी केले. झाशी की राणी हा कवितासंग्रह त्यांचा सुप्रसिद्ध मुकुल या कवितासंग्रहासाठी त्यांना सेकसरिय पारितोषिक 1931 मध्ये प्रदान करण्यात आले. त्यांना 1932 मध्ये बिखरे मोती या कविता संग्रहासाठी पुन्हा सेकसरिय पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद सध्याचे प्रयागराज या ठिकाणी झाला होता. 6 ऑगस्ट 1976 मध्ये भारत सरकारने पंचवीस पैशाचे तिकीट पोस्टाचे त्यांच्या नावे सुरू केले. भारत सरकारच्या भारतीय सीमा सुरक्षा दलाने 26 एप्रिल 2006 रोजी एका सुरक्षा जहाजाला सुभद्रा कुमारी चव्हाण यांचे नाव दिले आहे.



X X
16 ऑगस्ट 1879 रोजी महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म झाला. 1907 ते 1935 या काळात त्यांच्या ’महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते. त्यांचा मृत्यू 27 ऑगस्ट 1955 मध्ये झाला.

16 ऑगस्ट 2010 रोजी महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 मध्ये झाला होता.


16 ऑगस्ट 2003 रोजी युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचा मृत्यू झाला.


16 ऑगस्ट 2000 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 5 जुलै 1952 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झाला होता.

16 ऑगस्ट 1997 रोजी अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म पेडणे गोवा या ठिकाणी झाला होता.

X X
16 ऑगस्ट 1997 रोजी कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1948 मध्ये झाला होता.


16 ऑगस्ट 1977 रोजी सुप्रसिद्ध अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1935 मध्ये झाला होता.


16 ऑगस्ट 1986 रोजी स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल येथे झाला होता.


16 ऑगस्ट 1705 रोजी स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 डिसेंबर 1654 मध्ये झाला होता.


25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात वाजपेयी यांचा जन्म झाला . त्यांच्या आईचे नाव कृष्णा देवी आणि वडील कृष्ण बिहारी वाजपेयी होते. त्यांचे वडील त्यांच्या गावी शाळेत शिक्षक होते. त्यांचे आजोबा, श्याम लाल वाजपेयी, उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर या त्यांच्या वडिलोपार्जित गावातून ग्वाल्हेरजवळील मोरेना येथे स्थलांतरित झाले होते . वाजपेयी यांचे शालेय शिक्षण ग्वाल्हेर येथील सरस्वती शिशु मंदिरात झाले. 1934 मध्ये , त्यांचे वडील मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना उज्जैन जिल्ह्यातील बारनगर येथील अँग्लो-व्हर्नाक्युलर मिडल (AVM) शाळेत दाखल करण्यात आले . त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेज, आग्रा युनिव्हर्सिटी (आता महाराणी लक्ष्मीबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एक्सलन्स ) येथे शिक्षण घेतले जेथे त्यांनी हिंदी , इंग्रजी आणि संस्कृतमध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली . त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर , आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्रातील मास्टर ऑफ आर्ट्ससह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले . भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) यांची कारकीर्द ओळखली जाते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' (Good Governance Day)अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले.त्यांनी 5:05 म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला.



XX


झांसी की रानी यह कविता कवयित्री 'सुभद्रा कुमारी चौहान' ने लिखी है।


 ‘ख़ूब लड़ी मर्दानी’

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी 
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी 
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी


चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी, 
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी, 
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी, 
बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।

वीर शिवाजी की गाथायें उसको याद ज़बानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार
लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, 
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार, 
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, 
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़। 

महाराष्ट्र-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ 

हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में
हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में, 
ब्याह हुआ रानी बन आई लक्ष्मीबाई झाँसी में, 
राजमहल में बजी बधाई खुशियाँ छाई झाँसी में, 
सुघट बुंदेलों की विरुदावलि-सी वह आयी थी झांसी में।

चित्रा ने अर्जुन को पाया, शिव को मिली भवानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई,
उदित हुआ सौभाग्य, मुदित महलों में उजियाली छाई, 
किंतु कालगति चुपके-चुपके काली घटा घेर लाई, 
तीर चलाने वाले कर में उसे चूड़ियाँ कब भाई, 
रानी विधवा हुई, हाय! विधि को भी नहीं दया आई।

निसंतान मरे राजाजी रानी शोक-समानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया
बुझा दीप झाँसी का तब डलहौज़ी मन में हरषाया, 
राज्य हड़प करने का उसने यह अच्छा अवसर पाया, 
फ़ौरन फौजें भेज दुर्ग पर अपना झंडा फहराया, 
लावारिस का वारिस बनकर ब्रिटिश राज्य झाँसी आया। 

अश्रुपूर्ण रानी ने देखा झाँसी हुई बिरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया
अनुनय विनय नहीं सुनती है, विकट शासकों की माया, 
व्यापारी बन दया चाहता था जब यह भारत आया, 
डलहौज़ी ने पैर पसारे, अब तो पलट गई काया, 
राजाओं नव्वाबों को भी उसने पैरों ठुकराया। 

रानी दासी बनी, बनी यह दासी अब महरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ 
छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात
छिनी राजधानी दिल्ली की, लखनऊ छीना बातों-बात, 
कैद पेशवा था बिठूर में, हुआ नागपुर का भी घात, 
उदैपुर, तंजौर, सतारा,कर्नाटक की कौन बिसात? 
जब कि सिंध, पंजाब ब्रह्म पर अभी हुआ था वज्र-निपात। 

बंगाले, मद्रास आदि की भी तो वही कहानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार
रानी रोयीं रनिवासों में, बेगम ग़म से थीं बेज़ार, 
उनके गहने कपड़े बिकते थे कलकत्ते के बाज़ार, 
सरे आम नीलाम छापते थे अंग्रेज़ों के अखबार, 
'नागपुर के ज़ेवर ले लो लखनऊ के लो नौलख हार'। 

यों परदे की इज़्ज़त परदेशी के हाथ बिकानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान
कुटियों में भी विषम वेदना, महलों में आहत अपमान, 
वीर सैनिकों के मन में था अपने पुरखों का अभिमान, 
नाना धुंधूपंत पेशवा जुटा रहा था सब सामान, 
बहिन छबीली ने रण-चण्डी का कर दिया प्रकट आहवान। 

हुआ यज्ञ प्रारम्भ उन्हें तो सोई ज्योति जगानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी
महलों ने दी आग, झोंपड़ी ने ज्वाला सुलगाई थी, 
यह स्वतंत्रता की चिनगारी अंतरतम से आई थी, 
झाँसी चेती, दिल्ली चेती, लखनऊ लपटें छाई थी, 
मेरठ, कानपुर,पटना ने भारी धूम मचाई थी, 

जबलपुर, कोल्हापुर में भी कुछ हलचल उकसानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम
इस स्वतंत्रता महायज्ञ में कई वीरवर आए काम, 
नाना धुंधूपंत, ताँतिया, चतुर अज़ीमुल्ला सरनाम, 
अहमदशाह मौलवी, ठाकुर कुँवरसिंह सैनिक अभिराम, 
भारत के इतिहास गगन में अमर रहेंगे जिनके नाम। 

लेकिन आज जुर्म कहलाती उनकी जो कुरबानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी

इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में
इनकी गाथा छोड़, चले हम झाँसी के मैदानों में, 
जहाँ खड़ी है लक्ष्मीबाई मर्द बनी मर्दानों में, 
लेफ्टिनेंट वाकर आ पहुँचा, आगे बढ़ा जवानों में, 
रानी ने तलवार खींच ली, हुया द्वंद असमानों में। 

ज़ख्मी होकर वाकर भागा, उसे अजब हैरानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार
रानी बढ़ी कालपी आई, कर सौ मील निरंतर पार, 
घोड़ा थक कर गिरा भूमि पर गया स्वर्ग तत्काल सिधार, 
यमुना तट पर अंग्रेज़ों ने फिर खाई रानी से हार, 
विजयी रानी आगे चल दी, किया ग्वालियर पर अधिकार। 

अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी
विजय मिली, पर अंग्रेज़ों की फिर सेना घिर आई थी, 
अबके जनरल स्मिथ सम्मुख था, उसने मुहँ की खाई थी, 
काना और मंदरा सखियाँ रानी के संग आई थी, 
युद्ध श्रेत्र में उन दोनों ने भारी मार मचाई थी। 

पर पीछे ह्यूरोज़ आ गया, हाय! घिरी अब रानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार
तो भी रानी मार काट कर चलती बनी सैन्य के पार, 
किन्तु सामने नाला आया, था वह संकट विषम अपार, 
घोड़ा अड़ा, नया घोड़ा था, इतने में आ गये सवार, 
रानी एक, शत्रु बहुतेरे, होने लगे वार-पर-वार। 

घायल होकर गिरी सिंहनी उसे वीर गति पानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी
रानी गई सिधार चिता अब उसकी दिव्य सवारी थी, 
मिला तेज से तेज, तेज की वह सच्ची अधिकारी थी, 
अभी उम्र कुल तेइस की थी, मनुज नहीं अवतारी थी, 
हमको जीवित करने आयी बन स्वतंत्रता-नारी थी, 

दिखा गई पथ, सिखा गई हमको जो सीख सिखानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी
जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी, 
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी, 
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी, 
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी। 

तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी, 
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, 
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥


साभार- कविताकोश 
(झाशी की राणी- सुभद्रा कुमारी चौहान)

XX

सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची कविता 


दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

कविवर्य नारायण सुर्वे



XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/07/august-15-day-of-special-dinvishesh-15.html
👆
August 15 - Day of Special (Dinvishesh)

ऑगस्ट 15 : दिनविशेष

XX








X
X



View, Comments and share...

Post a Comment

1 Comments

  1. छान माहिती दिली आहे.

    ReplyDelete