July 30 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 30 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे
30 जुलै 1863 मध्ये हेनरी फ़ोर्ड यांचा जन्म अमेरिका मिशिगन येथील ग्रीनफिल्ड फार्म येथे झाला होता.फोर्ड कंपनीचे जन्मदाते हेनरी फ़ोर्ड हे एक अमेरिकन उदयोगपती आहेत जे जगप्रसिध्द फोर्ड या चार चाकी गाडयांची सर्वात मोठी कंपनी आहे.
30 जुलै 762 रोजी खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
30 जुलै 1629 रोजी इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे 10,000 जण मृत्यूमुखी पडले.
30 जुलै 1836 रोजी अमेरिकेतील हवाई या शहरात पहिला इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशित झाले.
X X
30 जुलै 1898 रोजी विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.
30 जुलै 1909 रोजी अमेरिकन वैमानिक व शास्त्रज्ञ राईट बंधू(Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.
30 जुलै 1930 रोजी पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
X X
30 जुलै 1962 रोजी ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे 8030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
30 जुलै 1966 रोजी इंग्लंड च्या फुटबॉल संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकला.
30 जुलै 1971 रोजी अपोलो 15 चंद्रावर उतरले.
30 जुलै 1997 रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
30 जुलै 2000 रोजी चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
30 जुलै 2000 रोजी कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला.
30 जुलै 2001 रोजी राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.
X X
30 जुलै 2012 रोजी दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
30 जुलै 1818 रोजी एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका यांचा जन्म झाला. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
30 जुलै 1822 रोजी वाजिद अली शाह यांचा जन्म झाला.
30 जुलै 1855 रोजी जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती यांचा जन्म झाला. (मृत्यू: १४ आक्टोबर १९१९)
30 जुलै 1863 रोजी हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म झाला. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
30 जुलै 1886 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म झाला.
X X
30 जुलै 1923 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार, संस्कृतज्ञ व सौंदर्यशास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा जन्म झाला.
30 जुलै 1928 रोजी साली पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म झाला.
30 जुलै 1945 रोजी सेवानिवृत्त भारतीय नागरी सेवक व भारताचे माजी 16 वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा जन्म झाला.
30 जुलै 1947 रोजी अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38 वे राज्यपाल यांचा जन्म झाला.
30 जुलै 1951 रोजी भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म झाला.
30 जुलै 1962 रोजी भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म झाला. (मृत्यू: ३० जुलै १९६२)
X X
30 जुलै 1973 रोजी सोनू निगम – पार्श्वगायक यांचा जन्म झाला.
30 जुलै 1950 रोजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म झाला.
30 जुलै 1622 रोजी संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
30 जुलै 1718 रोजी पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन झाले.
30 जुलै 1771 रोजी अठराव्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी, पत्र-लेखक व शास्त्रीय अभ्यासक थॉमस ग्रे (Thomas Gray) यांचे निधन झाले.
30 जुलै 1898 रोजी ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर यांचे निधन झाले. (जन्म: १ एप्रिल १८१५)
30 जुलै 1930 रोजी बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन झाले. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
30 जुलै 1947 रोजी ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन झाले.
X X
30 जुलै 1960 रोजी ’कर्नाटक सिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन झाले. (जन्म: ३१ मार्च १८७१)
30 जुलै 1983 रोजी वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचे निधन झाले. (२ मे १९२०)
30 जुलै 1994 रोजी शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक यांचे निधन झाले. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
30 जुलै 1995 रोजी डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ यांचे निधन झाले. ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (जन्म: ६ जुलै १९२०)
30 जुलै 1997 रोजी व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन झाले.
30 जुलै 2007 रोजी स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन झाले.
30 जुलै 2007 रोजी इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन झाले.
X X
30 जुलै 2011 रोजी डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक यांचे निधन झाले. (जन्म: २५ आक्टोबर १९३७)
30 जुलै 2013 रोजी भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन झाले. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-29-day-of-special-dinvishesh-29.html
👆
July 29 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 29 : दिनविशेष
X X
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html
👆
12 बारावी विज्ञान शाखा
12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html
👆
Career path finder:
12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html
👆
Career path finder:
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
View, Comments and Share......
View, Comments and Share......
0 Comments