Subscribe Us

header ads

July 29 - Day of Special (Dinvishesh) जुलै 29 : दिनविशेष

 July 29 - Day of Special (Dinvishesh)

जुलै 29 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


विषमता विरोधी दिन
29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र /वाघ दिन म्हणून साजरा केला जातो.

29 जुलै हा दिवस भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो.

29 जुलै 2016 रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा चंद्रपूर येथील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. हे छायाचित्र वाघीण आपल्या बछाड्यावर प्रेम करत असतानाचे असून छायाचित्रकार अमोल बैस (चंद्रपूर) यांनी टिपलेले आहे.
X X
29 जुलै 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

29 जुलै 1876 रोजी फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.

29 जुलै 1920 रोजी जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.

29 जुलै 1921 रोजी ॲडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

29 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.

29 जुलै 1948 रोजी दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या 12 वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
X X
29 जुलै 1957 रोजी ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.

29 जुलै 1985 रोजी मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

29 जुलै 1987 रोजी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.

29 जुलै 1997 रोजी कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.

29 जुलै 2021 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक – रशियन मॉड्यूल नौकाच्या इंजिनातील बिघाडानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.


29 जुलै 1883 रोजी बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा त्यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू 28 एप्रिल 1945 मध्ये झाला.

X X
29 जुलै 1898 रोजी नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म झाला.

29 जुलै 1904 रोजी जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 नोव्हेंबर 1993 मध्ये झाला.


29 जुलै 1922 रोजी ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर यांचा जन्म झाला.

29 जुलै 1925 रोजी शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार यांचा जन्म झाला.

29 जुलै 1937 रोजी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म झाला.

29 जुलै 1953 रोजी अनुप जलोटा – भजनगायक यांचा जन्म झाला.

29 जुलै 1959 रोजी संजय दत्त – अभिनेता यांचा जन्म झाला.

29 जुलै 1981 रोजी फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म झाला.
X X
29 जुलै 238 रोजी बाल्बिनस – रोमन सम्राट यांचे निधन झाले.

29 जुलै 1108 रोजी फिलिप (पहिला) – फ्रान्सचा राजा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म ते 23 मे 1052 मध्ये झाला.


29 जुलै 1781 रोजी योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1713 मध्ये झाला.

29 जुलै 1890 रोजी व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३)

29 जुलै 1891 रोजी इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक यांचे निधन झाले. यांच्या प्रयत्‍नांमुळेच 1856 मधे विधवा विवाहाचा कायदा आला. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1820 मध्ये झाला.


29 जुलै 1900 रोजी इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन झाले.

29 जुलै 1987 रोजी भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1894 मध्ये झाला.

X X
29 जुलै 1994 रोजी नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन झाले.

29 जुलै 1996 रोजी अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी यांचा मृत्यू झाला. 9 ऑगस्ट 1942 रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. त्यांचा जन्म 16 जुलै 1909 मध्ये झाला.


29 जुलै 2002 रोजी सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ मध्ये झाला होता.


29 जुलै 2003 रोजी बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला होता.


29 जुलै 2006 रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1928 मध्ये झाला.


29 जुलै 2009 रोजी महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 मे 1919 मध्ये झाला.

29 जुलै 2013 रोजी भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1929 रोजी झाला.



X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-28-day-of-special-dinvishesh-28.html
👆
July 28 - Day of Special (Dinvishesh)

जुलै 28 : दिनविशेष
X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी



View, Comments and Share......

Post a Comment

0 Comments