Subscribe Us

header ads

May 26 - Day of Special (Dinvishesh)

 May 26 - Day of Special (Dinvishesh)

मे 26 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

26 मे 1896 रोजी निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

26 मे 1945 रोजी बाभळगाव ता. जि. लातूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव दगडोजीराव देशमुख यांचा जन्म झाला.

26 मे 1950 रोजी ब्रिटन देशाने पेट्रोलच्या खरेदीसाठी राशन कार्डच्या सक्तीचा कायदा रद्द केला.
X X
26 मे 1986 रोजी युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.


26 मे 1971 रोजी बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने 71 हिंदूंची कत्तल केली.

26 मे 1973 रोजी बहारीन देशाने संविधान स्वीकारले.

26 मे 1989 रोजी मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

26 मे 1991 रोजी लॉडा एर फ्लाइट 004 हे बोईंग 767 प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले, 223 ठार.

26 मे 1999 रोजी भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.

X X
26 मे 1999 रोजी श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. 2 या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. 4 (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

26 मे 2007 रोजी भारत आणि जर्मनी देशांतर्गत सुरक्षा संबंधी करार करण्यात आले.


26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

नरेंद्र मोदी

26 मे 2016 रोजी पुणे येथे प्रसिद्ध समीक्षक व कवी प्राध्यापक रावसाहेब गणपतराव जाधव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा 2015 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

26 मे 1667 रोजी फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1754 मध्ये झाला.
             अब्राहम डी. मुआव्हर


26 मे 1799 रोजी अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक यांचा जन्म झाला.

X X
26 मे 1885 रोजी नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 जानेवारी 1919 मध्ये झाला.


26 मे 1902 रोजी नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जानेवारी 1968 मध्ये झाला.


26 मे 1906 रोजी बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक यांचा जन्म झाला.

26 मे 1908 रोजी न्विन न्गॉक थो, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान यांचा जन्म झाला.

26 मे 1909 रोजी आदोल्फो लोपेझ मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष
यांचा जन्म झाला.


26 मे 1930 रोजी भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून 9 जुलै 2005 मध्ये झाला.

26 मे 1937 रोजी भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 2015 मध्ये झाला.


X X
26 मे 1938 रोजी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म झाला. यांचा मृत्यू 12 मे 2013 मध्ये झाला.



26 मे 1945 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, भारतीय राजकारणी विलासराव दगडोजीराव देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या ठिकाणी झाला. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचा मृत्यू चेन्नई या ठिकाणी झाला. विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे 1974 मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. 1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. इ.स. 1974 साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 व 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.ऑगस्ट 2009 मध्ये राज्यसभेवर निवड 2009 ते 2011 दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री 12 जुलै 2011 पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री म्हणुन काम केले.
               विलासराव देशमुख


26 मे 1946 रोजी प्रख्यात भारतीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या तसचं, मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापिका अरुणा रॉय यांचा जन्म झाला.

26 मे 1949 रोजी हँक विल्यम्स जुनियर, अमेरिकन संगीतकार यांचा जन्म झाला.

26 मे 1961 रोजी भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म झाला.

26 मे 1966 रोजी झोला बड, दक्षिण आफ्रिकेची धावपटू यांचा जन्म झाला.

26 मे 1968 रोजी सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते, तसचं, दूरदर्शन विनोदी मालिका तारक मेह्ता का उलटा चश्मा या विनोदी मालिकेतील प्रख्यात कलाकार दिलीप जोशी यांचा जन्म झाला.

26 मे 1983 रोजी अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ दी इयर स्पोर्ट्स तसचं, सन 2008 साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती – पुरुष फ्रीस्टाईल लाइटवेट पदक विजेता सुप्रसिद्ध भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांचा जन्म झाला.
             सुशील कुमार सोलंकी


X X


26 मे 1703 रोजी विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1633 मध्ये झाला.


26 मे 1902 रोजी अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1839 मध्ये झाला.


26 मे 1908 रोजी अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1835 मध्ये झाला होता.


26 मे 1972 रोजी सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री राजलक्ष्मी यांचे निधन झाले.

26 मे 2000 रोजी प्रभाकर शिरुर, चित्रकार यांचे निधन झाले.

26 मे 2000 रोजी अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन झाले.
                श्रीपाद वामन काळे


26 मे 2014 रोजी भारतीय राज्य केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यातील मालंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्च चे धर्मगुरू कॅथोलिक बेसीलिओस मार थोमा डिडिमॉस पहिले यांचे निधन झाले.

26 मे 2017 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक कंवर पाल सिंह गिल यांचे निधन झाले.

X X

👆
May 25 - Day of Special (Dinvishesh)

मे 25 : दिनविशेष


X X

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X

👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X X




👆
बेंजामिन पिअरी पाल : भारतीय कृषि-वनस्पतिवैज्ञानिक व संशोधक

(तांबेऱ्यासारख्या रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार शोधून काढणारे)

 जन्मदीन: 26 मे



X X







View, Comments and share 



Post a Comment

0 Comments