Subscribe Us

header ads

May 17 - Day of Special (Dinvishesh)

May 17 - Day of Special (Dinvishesh)

मे 17 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो.

17 मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिन : नॉर्वे

17 मे 1782 रोजी लॉर्ड हेस्टींग आणि मराठे यांच्यात सालबाईचा तह बारभाई तील एक प्रमुख सदस्य महादजी शिंदे ज्यांच्या मध्यस्थीने झाला.

17 मे 1846 रोजी बनेश्वर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झाला. त्यांनी शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास इत्यादी ग्रंथ लिहिले. त्यांना डॉ. दादाभाई नौरोजी यांनी "अद्वितीय विद्वान " "पश्चिम भारतातील अर्वाचीन विद्या मुकूटमणी" " प्रख्यात पंडित" या शब्दात त्यांचा गौरव केला.

17 मे 1977 रोजी महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री म्हणून वसंतदादा पाटील यांनी पदभार स्वीकारला ते 5 मार्च 1978 पर्यंत मुख्यमंत्री होते.2 फेब्रुवारी 1983 मध्ये महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद स्वीकारले .त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल 1 फेब्रुवारी 1985 मध्ये संपला. 1977 ते 1985 या कालखंडात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंत दादा पाटील हे खऱ्या अर्थाने औद्योगिक वर्गात महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही आहे त्यात वसंत दादा पाटलांचे खूप मोठे योगदान आहे. 1983 मध्ये त्यांनी वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन विनाअनुदानित महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठी महाराष्ट्रात क्रांती झाली. वसंत दादा पाटील हे 1985 ते 1987 या कालखंडात राजस्थानचे राज्यपाल राहिलेले आहेत.

17 मे 1756 रोजी ब्रिटन देशाने फ्रांस देशाविरुद्ध युद्ध पुकारले.

17 मे 1775 रोजी आमेरिकन क्रांती – अमेरिकेने कॅनडाशी व्यापार बंद केला.

17 मे 1792 रोजी न्यू यॉर्क शेरबाजाराची स्थापना करण्यात आली.
X X
17 मे 1872 रोजी इंग्रज व मराठे यांच्यातील इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला.

17 मे 1940 रोजी दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.


17 मे 1915 रोजी युनायटेड किंग्डमचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.

17 मे 1949 रोजी भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

17 मे 1983 रोजी लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

17 मे 1990 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
X X
17 मे 1995 रोजी जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

17 मे 2004 रोजी अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.


17 मे 1749 रोजी देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. 26 जानेवारी 1823 रोजी जगात देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन झाले. एडवर्ड जेनर यांनी जगातील पहिली यशस्वी लस तयार केली. त्याला आढळून आले की काउपॉक्सची लागण झालेले लोक चेचकांपासून रोगप्रतिकारक आहेत. मे 1796 मध्ये, इंग्लिश चिकित्सक एडवर्ड जेनर यांनी या शोधाचा विस्तार केलात्यांचा जन्म 1749 रोजी झाला.

17 मे 1865 रोजी मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 नोव्हेंबर 1959 मध्ये झाला.

X X
17 मे 1868 रोजी डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1920 मध्ये झाला.


17 मे 1878 रोजी मुंबई प्रांताचे पहिले भारतीय राज्यपाल व महाराज हरि सिंह यांच्या कारकिर्दीतील जम्मू-काश्मीर प्रांताचे पंतप्रधान व जोधपुर चे दिवाण कपुरथला राजघराण्याचे राजा हरनाम सिंह यांचे पुत्र महाराजा सिंह यांचा जन्म झाला.

17 मे 1888 रोजी टिच फ्रीमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू याचा जन्म झाला.

17 मे 1895 रोजी भारतातील आसाम राज्यातील भारतीय आसामी इतिहासकार, नाटककार, निबंधकार आणि लघुकथा लेखक नकुलचंद्र भुयान यांचा जन्म झाला.

17 मे 1935 रोजी ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म झाला.

17 मे 1945 रोजी भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भागवत चंद्रशेखर, भारतीय क्रिकेट खेळाडू याचा जन्म झाला.

17 मे 1951 रोजी भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचा जन्म झाला.
X X
17 मे 1966 रोजी सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 22 जुलै 2003 मध्ये झाला.


17 मे 1979 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला.

17 मे 1886 रोजी डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1804 मध्ये झाला होता.


17 मे 1972 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार यांचे निधन झाले..

17 मे 1996 रोजी भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1924 मध्ये झाला होता.

17 मे 2004 रोजी कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका यांचा मृत्यू झाला.
X X
17 मे 2009 रोजी सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता प्रकाश मेहरा यांचे निधन झाले.

17 मे 2014 रोजी द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1922 मध्ये झाला.


X X

👆
May 16 - Day of Special (Dinvishesh)

मे 16 : दिनविशेष


X X

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X

👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी

X X


https://www.insearchofknowledge.org/2022/01/6-6-1832.html
👆
मराठी वृत्तपत्राचे जनक समाजसुधारक इतिहास संशोधक व विचारवंत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

17 मे: स्मृतिदिन

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/01/6-6-1832.html
👆
BalShastri Jambhekar: Father of Marathi journalism

आचार्य बाळशास्त्री जांभेकर :

मराठी वृत्तपत्राचे जनक समाजसुधारक इतिहास संशोधक व विचारवंत

17 मे: स्मृतिदिन




XX

View, Comments and share 

Post a Comment

0 Comments