Subscribe Us

header ads

June 29 - Day of Special (Dinvishesh)

June 29 - Day of Special (Dinvishesh)

जुन 29 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो.

29 जुन 2015 रोजी अतुलनीय बॉक्सर पद्मश्री विजेंदर सिंह आपले बॉक्सिंग करीयर सोडुन व्यावसायिक बॉक्सिंग क्षेत्रात पदार्पण केले.2008 च्या बिजींग समर ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ पदक जिंकले होते. हे कोणत्याही भारतीयासाठी बॉक्सिंग चे पहीले पदक होते.


29 जुन 1613 रोजी इंग्लंड देशातील महान नाटककार शेक्सपिअर (William Shakespeare) यांच्या लंडन स्थित ग्लोब नावाच्या थियेटरला आग लागल्याने जमीनदोस्त झाले.
X X
29 जुन 1757 रोजी बंगालचे नवाब मीर जाफर यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांताचे राज्य सांभाळले.

29 जुन 1871 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

29 जुन 1974 रोजी इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

29 जुन 1975 रोजी स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

29 जुन 1976 रोजी सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
X X
29 जुन 1986 रोजी आर्जेन्टिना ने 1986 चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

29 जुन 1995 रोजी दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून 502 जण ठार तर 937 जखमी झाले.

29 जुन 1996 रोजी मेक्सिको देशांत आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला.

29 जुन 2001 रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला.

29 जुन 2001 रोजी पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
X X
29 जुन 2007 रोजी ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.


29 जुन 1793 रोजी प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1857 मध्ये झाला.


29 जुन 1864 रोजी शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म झाला.

29 जुन 1871 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 1934 मध्ये झाला.


29 जुन 1891 रोजी डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 फेब्रुवारी 1978 मध्ये झाला.


29 जुन 1893 रोजी प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 जून 1972 मध्ये झाला.

X X
29 जुन 1901 रोजी प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक तसचं, काकोरी व दक्षिणेश्वर बॉम्बहल्ला प्रकरणांचे सुत्रदार राजेंद्र लाहिरी यांचा जन्म झाला.

29 जुन 1908 रोजी प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जुलै 1968 मध्ये झाला.


29 जुन 1922 रोजी रोमानियन वंशीय सर्बियन कवी वास्को पोपा (Vasko Popa)यांचा जन्म झाला.

29 जुन 1934 रोजी कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 सप्टेंबर 1998 मध्ये झाला.


29 जुन 1945 रोजी चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या 5 व्या राष्ट्राध्यक्षा यांचा जन्म झाला.

29 जुन 1946 रोजी पनामाचे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस यांचा जन्म झाला.

29 जुन 1956 रोजी पोर्तुगालचे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस यांचा जन्म झाला.


29 जुन 1873 रोजी बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1824 मध्ये झाला होता.

X X
29 जुन 1895 रोजी थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 4 मे 1825 मध्ये झाला होता.

29 जुन 1961 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि भारताचे पहिले संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांचे निधन झाले.


29 जुन 1966 रोजी दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 31 जुलै 1907 मध्ये झाला होता.

29 जुन 1981 रोजी दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 मध्ये झाला होता.


29 जुन 1992 रोजी अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन झाले.

29 जुन 1992 रोजी शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते यांचा मृत्यू झाला.

29 जुन 1993 रोजी विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते यांचा मृत्यू झाला.

29 जुन 2000 रोजी कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1911 मध्ये झाला होता.

29 जुन 2003 रोजी कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 12 मे 1907 मध्ये झाला होता.

X X
29 जुन 2010 रोजी प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 जुलै 1927 मध्ये झाला होता.

29 जुन 2016 रोजी प्लास्टिक कलेसाठी प्रसिद्ध भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसचं, कालिदास सन्मान प्राप्त कलाकार के.जी. सुब्रमण्यम यांचे निधन झाले. 

X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-28-day-of-special-dinvishesh.html

👆

June 28 - Day of Special (Dinvishesh)


जुन 28 : दिनविशेष


X X

 https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html

👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

X X





View, Comments and share 

Post a Comment

0 Comments