Subscribe Us

header ads

April 1 - Day of Special (Dinvishesh)

April 1 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 1 : दिनविशेष

  


महत्त्वाच्या घटना


जगभरात एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतातील ओरिसा राज्यात उत्कल दिन  साजरा केला जातो.


1 एप्रिल पासून भारताचे आर्थिक वर्ष दरवर्षी सुरु होते.


1 एप्रिल 1669 रोजी उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.


1 एप्रिल 1757 रोजी प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.


1 एप्रिल 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

X X

1 एप्रिल 1882 रोजी पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.


1 एप्रिल 1885 रोजी पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.


1 एप्रिल 1887 रोजी मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.


1 एप्रिल 1889 या दिवशी श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा फुले यांनी "सार्वजनिक सत्यधर्म " हे 150 पानांचे पुस्तक लिहिले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या अनुयायांसाठी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी त्यांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी आर्थिक सहाय्य केले. हा ग्रंथ म्हणजे "सत्यशोधक समाजाचे बायबल " असे मत वि. रा. शिंदे यांनी व्यक्त केले होते.


1 एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना ही सरकारने जाहीर केलेली नवीन वेतन रोजगार योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना होय .ही योजना ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते. मागासलेल्या 120 जिल्ह्यांना रोजगार पुरविण्याच्या हेतूने सुरू केली गेली.

1 एप्रिल 1895 रोजी भारतीय लष्कर स्थापन झाले.

X X

1 एप्रिल 1905 रोजी मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.


1 एप्रिल 1924 रोजी रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.


1 एप्रिल 1928 रोजी पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.


1 एप्रिल 1933 रोजी भारतीय विमानदलाची स्थापना झाली.


1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना झाली.


1 एप्रिल 1936 रोजी मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.


1 एप्रिल 1937 रोजी रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.


1 एप्रिल 1942 रोजी दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

X X

1 एप्रिल 1945 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.


1 एप्रिल 1954 रोजी राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी "भारतरत्‍न" पुरस्कारांची स्थापना केली.


1 एप्रिल 1955 रोजी गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.


1 एप्रिल 1957 रोजी भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.


1 एप्रिल 1969 रोजी भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.


1 एप्रिल 1973 रोजी कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.


1 एप्रिल 1976 रोजी ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.


1 एप्रिल 1989 रोजी मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या करण्यात आली.


1 एप्रिल 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार भारतरत्‍न प्रदान करण्यात आला.


1 एप्रिल 1997 रोजी भारताच्या नवव्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली या योजनेतील मुख्य भाग म्हणजे कृषी व ग्रामीण विकास घोषवाक्य होते "सामाजिक न्याय आणि समानतेचा आर्थिक वाढ "ही योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. या योजनेचा अंतिम कालावधी मार्च 2002.


1 एप्रिल 1999 पासून केंद्र सरकारने "सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना" सुरू केली. ही योजना खालील सहा योजनांचे एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली. त्यात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास, दशलक्ष विहिरींची योजना,गंगा कल्याण योजना, ग्रामीण ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा या सहा योजनांचे एकत्रीकरण करून वरील योजना सुरू केली.

X X

1 एप्रिल 1999 रोजी केंद्र सरकारने जवाहर ग्राम समृद्धी योजना ची सुरुवात केली. ही योजना सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली.


1 एप्रिल 1995 पासून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना सुरू करण्यात आली.


1 एप्रिल 1998 रोजी डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान


1 एप्रिल 2000 रोजी पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.


1 एप्रिल 2000 रोजी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.


1 एप्रिल 2002 रोजी दहावी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तिचे शेवटचं वर्ष 31 मार्च 2007 हे होते या योजनेत मुख्य भर हा शिक्षण व प्राथमिक शिक्षण व सर्व सामान्य विकासाचे धोरण हे होते.


1 एप्रिल 2004 रोजी गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.


1 एप्रिल 2007 पासून 11 वी पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली व तिचा शेवटचा कालावधी 31 मार्च 2012 हा होता याचे घोषवाक्य होते "वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे" आणि उद्दिष्ट जीडीपीच्या वाढीचे वार्षिक सरासरी 9 टक्के लक्ष ठेवण्यात आले आहे .मुख्य भर हा सामाजिक सेवा हा होता.

X X

1 एप्रिल 1578 रोजी रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे याचा जन्म झाला. शरीरशास्त्र आणि शरीर शास्त्रात प्रभावी त्यांनी योगदान दिले. मेंदू आणि उर्वरित शरीरात हृदयाद्वारे पंप केलेल्या रक्ताच्या प्रणालीगत अभिसरण आणि गुणधर्माचे संपूर्ण वर्णन करणारे हे पहिले ज्ञात वैद्य होते. विलियमचे वडील थॉमस हार्वे हे सोळाशे मध्ये महापौर म्हणून जुराट या ठिकाणी काम करत होते. हर्वेचे प्रारंभिक शिक्षण फोकस्ड मध्ये झाले त्या ठिकाणी त्यांनी लॅटिन भाषा ही शिकली. त्यानंतर किंग स्कूल मध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी पाच वर्ष आणि त्यानंतर 1593 मध्ये केंब्रिजच्या गौणविले आणि क्याएस कॉलेजमध्ये मॅट्रिक पर्यंत शिक्षण केले. 1597 मध्ये त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आणि 1599 मध्ये पडूवा विद्यापीठात त्यांनी प्रवेश केला. त्याने पडवा विद्यापीठातून वयाच्या 24 व्या वर्षी 25 एप्रिल 1602 मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो इंग्लंडला परत आला आणि केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टर ऑफ मेडिसिन ची पदवी त्याने त्याच वर्षी प्राप्त केली. हार्वे हे 5 जून 1607 मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे फेलो म्हणून निवडले गेले. त्याची 1615 मध्ये लुमिनियन व्याख्याता पदावर नियुक्ती झाली आणि 1916 पासून त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. त्याने संपूर्ण इंग्लंडमध्ये शरीर शस्त्राचे सामान्य ज्ञान वाढवण्याच्या उद्देशाने व्याख्याने दिली. 1628 मध्ये त्यांनी रक्तभिसरणावरील डी मोटू कार्डिस हा ग्रंथ प्रकाशित केला. 1632 मध्ये जेव्हा ते इंग्लंडला परतले तेव्हा राजा चार्ल्स पहिला यांच्या समवेत फिजिशियन इन ऑर्डिनन्स म्हणून काम  त्यांनी केले.


1 एप्रिल 1621 रोजी शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला . त्यांचा मते 24 नोव्हेंबर 1665 मध्ये झाला.


1 एप्रिल 1815 रोजी जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 30 जुलै 1898 रोजी झाला होता


1 एप्रिल 1889 रोजी डॉ .केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील बोधन तालुक्यातील कुंदकुर्ती गावामध्ये झाला. त्यांच्या मोठ्या भावावर त्यांची जबाबदारी होती. त्यांनी 1910 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कलकत्ता या ठिकाणी गेले. तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांती संग्रामात सहभाग नोंदवला होता. शाळेमध्ये वंदे मातरम हा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. बंगालमधील क्रांती कारकांसोबत क्रांतीकार्यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेता यावा यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी उच्च शिक्षण कोलकत्यामध्ये घ्यावे असे ठरवले. नागपुरात परत आल्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आता अनेक स्वातंत्र्यलढ्यात आंदोलनामध्ये सहभाग घेतला व त्यांना तुरुंगवास भोगावे लागला. 1920 ते 1931 या काळात त्यांनी अनेक सत्याग्रहांमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. डॉक्टर हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व त्याचे वेगळे तत्त्वज्ञान व त्याची कार्यपद्धती निर्माण केली. त्याच कार्यात निर्मितीवर अनेक वर्ष यशस्वीपणे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत आहे. काही जुने मित्र सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपूरला परत आल्यावर एका पडक्या वाड्यात पहिली संघाची शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्ती निर्माण व त्या आधारावर राष्ट्र निर्माण या अंतिम ध्येयाचा विचार संघ स्थापने मागचा होता. डॉक्टर एक कुशल संघटक, उत्कृष्ट मार्गदर्शक आणि एक प्रभावी नेते होते. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच गोलवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दानी, पंडित दीनदयाळ उपाध्याय इत्यादी नेते कार्यकर्ते भारतामध्ये राष्ट्र निर्मितीसाठी त्यांना प्राप्त झाले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पंधरा वर्षे सतत प्रवास करून एक एक माणूस कार्यकर्ता स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न 1925 ते 1940 या कालखंडात केला. संघाचा भगवा ध्वज, गुरुदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला घेऊन स्थान सामूहिक निर्णय पद्धती पूर्ण वेळ कार्यकर्ता संकल्पना दैनंदिन शाखा असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये रुजवली. अशा महान त्यागी, समर्पित भावना, दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध कार्य जीवनशैली अशा व्यक्तीमत्त्वाचा 21 जून 1940 मध्ये मृत्यू झाला.

         डॉ .केशव बळीराम हेडगेवार


1 एप्रिल 1907 रोजी भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म यांचा जन्म झाला.


1 एप्रिल 1912 रोजी हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 1988 रोजी झाला.

 X X

1 एप्रिल 1920 रोजी पंडित रविशंकर यांचा जन्म झाला.


1 एप्रिल 1941 रोजी भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म झाला.


1 एप्रिल 1984 रोजी भारतातील ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन त्यांचा जन्म 4 एप्रिल 1902 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी झाला होता.

 

1 एप्रिल 1989 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 रोजी झाला होता.


1 एप्रिल 1999 रोजी भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन झाले. वयाच्या आठव्या वर्षी आईचे छत्र हरवले. रत्नागिरीतून 1931 मध्ये राजापूर हायस्कूल मधून मॅट्रिक झाली त्यानंतर मुंबईला विल्सन महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत मध्ये बीए प्रथम वर्गात उत्तीर्ण केले. 1937 मध्ये ते एम ए प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळेस त्यांना भगवानदास शिष्यवृत्ती तसेच सर लॉरेन्स जंकिन्स शिष्यवृत्ती मिळाली. 1940 मध्ये त्यांनी एलएलबी ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्पर्धा परीक्षेला बसून ते डाक तार खात्यात अधिकारी म्हणून नियुक्त झाले. वेलणकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त होते. त्याने संपूर्ण भारत देशात 300 पेक्षा जास्त जिल्ह्यात नोकरी केली. 15 ऑगस्ट 1972 पासून संपूर्ण भारतभर लागू झालेली टपाल खात्याच्या पिन कोड योजनेचे ते वेलणकर हे जनक आहेत. त्यांनी वेलणकर फार्मूला या नावाने त्यांची ओळख आहे. 1973 मध्ये दळणवळण खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम करून त्या पदावरून ते निवृत्त झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना कविता करण्याची हौस होती. 1929 मध्ये विद्यार्थी जस त्यांनी एक संस्कृत कविता लिहिली. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक ग्रंथ लिहिले. मराठी संस्कृती इंग्रजी हिंदी जर्मनी पाली इत्यादी अनेक भाषेवर त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. संस्कृत भाषेविषयी लोकांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी ती वाढावी म्हणून त्यांनी देववानी मंदिरम नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून गिरवान सुधा 1979 पासून हे नियमित निघणारे संस्कृत मासिक आहे. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दीच्या वेळी डॉक्टरांच्या जीवनावर केशव संघ निर्माता नावाचे शाहिरी धरतीचे काव्यही त्यांनी तयार करून दिले होते. त्यांच्या या मौलिक कार्याबद्दल सूर सिंगार परिषद मुंबई यांनी त्यांना रसेश्वर पुरस्कार 1989 मध्ये देऊन त्यांचा गौरव केला. अखिल भारतीय साहित्य संमेलन 1992 मध्ये त्यांना राज्यपालांच्या हस्ते भारत भाषा भूषण ही पदवी देऊन त्यांच गौरव केला. त्यांनी निर्मिती केलेल्या 1975 मध्ये शिवाजी या नाटकाबद्दल भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांनी चा गौरव झाला. याच नाटकाच्या पुस्तकाला राष्ट्रपतींनी प्रस्तावना लिहिली त्यांचे एकूण ग्रंथ 104 प्रकाशित आहेत.

          श्रीराम भिकाजी वेलणकर


X X

1 एप्रिल 2000 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 मध्ये झाला. 


1 एप्रिल 2006 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन झाले. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1925 रोजी झाला होता.


1 एप्रिल 2012 रोजी भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 मार्च 1921 मध्ये झाला होता.

X X




https://www.insearchofknowledge.org/2024/03/march-31-day-of-special-dinvishesh.html

👆

March 31 - Day of Special (Dinvishesh)

मार्च 31 : दिनविशेष


www.insearchofknowledge.org 

👆

Visit 




X X


View, Comments and share....

Post a Comment

0 Comments