Subscribe Us

header ads

February 21 - Day of Special (Dinvishesh)

February 21 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 21: दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO)
दक्षिण आफ्रिका सशस्त्र सेना दिवस
बांगलादेश भाषा चळवळ दिवस.

21 फेब्रुवारी 1842 रोजी जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

21 फेब्रुवारी 1848 रोजी कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा " द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो" प्रकाशित केला.

21 फेब्रुवारी 1849 रोजी ब्रिटिश व शीख यांच्यात गुजरात (पंजाब मधील एक गाव) या ठिकाणी खूप मोठी लढाई झाली. यात तोफांची भयंकर मारगिरी होऊन शेवटी शिखांचा त्यात जबर पराभव झाला. रावळपिंडी येथे छत्रसिंह शेरसिंह या शिखांच्या नेत्यांनी ब्रिटिशांन समोर शरणागती स्वीकारली व शिखांच्या मूळराजाला शिक्षा म्हणून रगून ला धाडण्यात आले. अशा प्रकारे या शरणांगतिने शिखांच्या "खालसा राज्यांचा" सूर्य कायमचा अस्तास गेला.
X X
21 फेब्रुवारी 1878 रोजी न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

21 फेब्रुवारी 1915 रोजी भारतातील स्वातंत्र्यलढ्यात लाहोर बनारस व मिरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतीकारकांनी उठाव झाला या सशस्त्र क्रांतिकारकांच्या या उठावाला लाहोर कट असे म्हणतात.

21 फेब्रुवारी 1925 रोजी अमेरिकेत "द न्यूयॉर्कर " या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला

21 फेब्रुवारी 1953 रोजी भारतातील तिलैया धारण अणि बोकारो वीज स्टेशन प्रधानमंत्री द्वारे उद्घाटन करण्यात आले होते. तीलया धरण हे झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यामध्ये तीलैया या ठिकाणी बराकर नदीवर 1953 मध्ये बांधलेला आहे. बोकारो वीज प्रकल्प हा झारखंड राज्यातील बाटे या ठिकाणी कार्यान्वित आहे.
                 तिलैया धारण
             बोकारो वीज स्टेशन 


21 फेब्रुवारी 1967 रोजी जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार पाडली.
X X
21 फेब्रुवारी 1972 रोजी सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना -20 हे चंद्रावर उतरले. हे चंद्राच्या नमुना परत करण्याच्या तीन यशस्वी मोहिमेपैकी दुसरे होते. सहा यशस्वी अपूर्ण चंद्र नमुना परतीच्या मोहिमेसाठी रोबोटिक स्पर्धक म्हणून लुना प्रोग्राम चा भाग म्हणून हे उड्डाण केले गेले. लुना -20 है मध्यवर्ती पृथ्वी पार्किंग कक्षेत ठेवण्यात आले आणि या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठविण्यात आले. 18 फेब्रुवारी 1972 रोजी त्याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 21 फेब्रुवारी 1972 रोजी चंद्रावर टेरा अपोलोनियस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराळ भागात मारे फेकांडतीस जवळ चंद्रावर उतरला. जिथून 120 किलोमीटर अंतरावर ल्यूना -16 उतरले होते. हे चंद्राच्या पृष्ठभागावर असताना पनोरमिक टेलिव्हिजन यंत्रणा कार्यान्वित होती व चंद्राचे नमुने विस्तारित ड्रिलिंग उपकरणाद्वारे प्राप्त गेले. 22 फेब्रुवारी 1972 रोजी लुना -20 चा चढाईचा टप्पा चंद्राच्या पृष्ठभागावरून 1.9 औस (55 ग्रॅम) गोळा केलेल्या चंद्राचे नमुने एका सीलबंद कॅप्सूल मध्ये घेऊन प्रक्षेपित करण्यात आला. 25 फेब्रुवारी 1972 रोजी ते सोवियत युनियन मध्ये उतरले. दुसऱ्या दिवशी चंद्राचे नमुने परत मिळाले.
                    लुना -20 


21 फेब्रुवारी 1975 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला ते 17 मे 1977 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक निर्णय घेतले त्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या सचिवालयाचे नामांतर करून मंत्रालय हे केले. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर चहाची गाडी. शेतीला आठ माही पाणी देणे ही योजना त्याने यशस्वीपणे राबवली. महाराष्ट्राची विजेची मागणी लक्षात घेता कोराडी येथील औष्णिक वीज केंद्र दुसरे युनिट सुरू केले व मुबलक प्रमाणात वीज निर्मिती केली. तसेच त्यांच्या काळात पारस, येलदरी, चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रांची निर्मिती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी राज्यात पाटबंधारे प्रकल्पाला मोलाचे स्थान दिले. जायकवाडी, विष्णुपुरी यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प उभारण्यात शंकरराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर उजनी, इस्लामपूर ,पैनगंगा, अप्पर मांजरा अशी मोठे जलसिंचन प्रकल्पाची मालिकाच निर्माण त्यांनी केली. त्यांनी कापूस एकाधिकार योजना, घरकुल योजना, रेल्वे रुंदीकरण योजना अशा योजना राबवल्या. त्यांच्या या पाटबंधारे क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्राचे जलसंस्कृतीचे जनक म्हणून ओळखले जातात. 20 पेक्षा अधिक धरणांची त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधणी केली. केंद्र सरकार मध्ये इंदिरा गांधींच्या सरकार मध्ये त्यांना संरक्षणमंत्री, गृहमंत्री ,अर्थमंत्री यासारखी महत्त्वाची साथ खाते सांभाळली. ते रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांना आपले राजकीय गुरु माणित असत . एक कर्तव्यदक्ष मितभाशी ,प्रशासक आणि अभ्यासू वृत्तीचे ते एक व्यक्तिमत्व होते. त्यांचे निधन 26 फेब्रुवारी 2004 ला झाले.

            डॉ. शंकरराव चव्हाण

21 फेब्रुवारी 1942 मध्ये महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर हिचा जन्म कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील कणसगिरी येथे झाला. 1956 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी दिसतं तसं नसतं या चित्रपटा द्वारे अभिनय क्षेत्रामध्ये तिने पदार्पण केले. सुप्रसिद्ध चित्रपट साधी माणसं, सवाल माझा ऐका, कडकलक्ष्मी, अशी असावी सासू , मोहित्यांची मंजुळा, वैजयंता, सांगते ऐका, सुन लाडकी या घरची इत्यादी. जयश्री गडकर यांना मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका आणि साधी माणसं या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिचा मृत्यू 29 ऑगस्ट 2008 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. 21 फेब्रुवारी 1975 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर व बाळ धुरी या अभिनेत्याचा यांचा विवाह झाला.



21 फेब्रुवारी 2001 रोजी महाकुंभ मेळाव्याचा समारोप झाला.


21 फेब्रुवारी 2004 रोजी लॉस टेनिस डब्ल्यू.टी.ए. मध्ये खिताब जिंकणारी सानिया मिर्झा पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.
                 सानिया मिर्झा


X X
21 फेब्रुवारी 2013 रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान 17 जण ठार आणि 119 जण जखमी झाले.

21 फेब्रुवारी 1875 रोजी 122 वर्ष आणि 164 दिवस जगलेली फ्रेंच देशातील फ्रेंच महिला जीन काल्मेंट हिचा जन्म झाला. तिचा मृत्यू 4 ऑगस्ट 1997 रोजी झाला.


21 फेब्रुवारी 1894 रोजी भारतातील सुप्रसिद्ध वैज्ञानिक तथा रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म ब्रिटिश भारत पाकिस्तान भागातील शहापूर येथे झाला. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात त्यांचा बहुमोल वाटा आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च चे ते शिल्पकार आहेत . 1921 मध्ये लंडन विद्यापीठात डीएससी ही पदवी भौतिक रसायनिक गुणधर्मसंबंधी संशोधन करून प्राप्त केली त्यानंतर त्यांनी भारतात पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1924 मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तेथील प्रयोगशाळेचे संचालक झाले .1926 पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ केला आणि मॅग्नेटिक इंटरफेअरन्स बॅलन्स हे उपकरण त्यांनी तयार केले आणि त्याचे पेटंट 1936 मध्ये मिळवले. त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडवण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कंपनीने दिलेल्या मोबदल्या त्यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली. ज्यामध्ये केरोसीनचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन,
वंगणे व क्रिया धातूंच्या शरण क्रियेला प्रतिबंधन यासारख्या विविध समस्यावर संशोधन केले. त्यांनी 1942 मध्ये वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे रूपांतर कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत केले आणि या संस्थेचे ते पहिले संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली ब्रिटिश सरकारने 1936 मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर व 1941 मध्ये नाईट हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 1943 मध्ये रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीज लंडन येथील या संस्थेचे सदस्य होण्याचा त्यांना बहुमान मिळाला . भारत सरकारने त्यांना 1954 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविले. त्यांचा मृत्यू 1 जानेवारी 1955 रोजी झाला. त्यांच्या नावे भारतात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शास्त्रज्ञांना पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार 1957 पासून आज पर्यंत एकूण 450 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे.


21 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील सुप्रसिद्ध हिंदी साहित्यातील साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म बंगालमधील मेदिनीपूर येथे झाला.त्यांनी 44 ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या "सरोजस्मृती" या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. ते नवे नवे प्रयोग करणारे सहासी कवी होते हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. भिक्षुक, वह तोडली पत्थर, बन बेला, कुकुरमुत्ता यासारख्या सामाजिक आशयांच्या कविता त्यांनी लिहिल्या. त्यांनी अप्सरा, अलका, निरुपमा, प्रभावती, इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचा मृत्यू 15 ऑक्टोबर 1961 रोजी झाला.


X X

21 फेब्रुवारी 1911 रोजी भारतातील पश्चिम बंगाल येथील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1997 रोजी झाला.


21 फेब्रुवारी 1943 रोजी ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म झाला.

21 फेब्रुवारी 1961 रोजी भारतातील सुप्रसिद्ध पश्चिम बंगालमधील अभिजीत बॅनर्जी ज्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचा जन्म झाला. ते भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत ते मेसाटूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांना 2019 चे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांनाही पारितोषिक जागतिक दारिद्र्य दूर करण्याच्या त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी देण्यात आले. ते प्रेसिडेंसी कॉलेज कोलकत्ता येथे त्यांचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेचे पदवीधर हे कलकत्ता विद्यापीठात पूर्ण केले. त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे पूर्ण करून तत्त्वज्ञानामध्ये पीएचडी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून प्राप्त केली.
             अभिजीत बॅनर्जी


21 फेब्रुवारी 1829 रोजी भारतातील कित्तूर येथील महाराणी चन्नम्मा हिचा मृत्यू झाला. कर्नाटका राज्यातील धारवाड आणि बेळगावच्या दरम्यान असलेल्या कित्तूर या राज्याची ती राणी होती. ब्रिटिश शासनाविरोधामध्ये बंड करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासकांपैकी एक होत्या. त्यामुळे त्यांना कर्नाटक मधील लोक नायक आणि भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक ती बनली. 1924 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध सशस्त्र विद्रोह सुरू झाला. या क्षेत्रावर भारतीय नियंत्रण होते. परंतु त्यास योग्य प्रकारे ठेवण्यात इराणी कमी पडली असेल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणणे होते. सशस्त्र विरोधात ती पराभूत झाली आणि तिला बेल होंगलच्या तुरुंगात टाकण्यात आले. त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला किंवा तिला ठार मारण्यात आले असेही म्हणतात. तिचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 रोजी पुणे बेंगलोर महामार्गावरील काकती गावात तील किल्ल्यात झाला तिचे आई-वडील आंध्रातील काकतीय लिंगायत सांप्रदायाचे उपासक होते. राणी चन्नम्माला मराठी कानडी उर्दू या भाषा अवगत होत्या. राणी चन्नम्मा याच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली येथील विधानभवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 2007 साली करण्यात आले. राणी चन्नम्मा च्या नावे भारत सरकारने भारतीय रेल्वे विभागाने राणी चन्नमा एक्सप्रेस ही गाडी मिरज ते बंगलोर सिटी दरम्यान सुरू केलेली आहे.
              महाराणी चन्नम्मा

21 फेब्रुवारी 1913 रोजी बंगालमधील सुप्रसिद्ध स्वातंत्र लढ्यातील क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना फाशी देण्यात आले.

21 फेब्रुवारी 1965 रोजी कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 मे 1925 रोजी झाला होता.

21 फेब्रुवारी 1975 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील व रंगभूमीवरील अभिनेते व सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1912 रोजी झाला होता.
X X
21 फेब्रुवारी 1977 रोजी मराठी साहित्यातील साहित्य मीमांसक सुप्रसिद्ध कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म पंधरा मे 1903 मध्ये झाला होता.

21 फेब्रुवारी 1991 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नूतन बहल हिचा मृत्यू झाला. तिचा जन्म 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला होता. दिग्दर्शक आणि कवी कुमार सेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या त्या थोरल्या कन्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी 1952 मध्ये त्यांनी मिस इंडिया हा किताब जिंकला. 1945 मध्ये जनक पिक्चरच्या बॅनरखाली आणि वडील कुमार सेन यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या नल दमयंती या चित्रपटाद्वारे त्यांनी बालकलाकार म्हणून पडद्यावर पदार्पण केले. तिचा 1950 मध्ये आलेला पहिला सिनेमा हमारी बेटी हा होता. त्यांना 1955 मध्ये रिलीज झालेला सीमा या चित्रपटात सुधार गृहातील कैद्याची भूमिका साकारली होती त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मै तुलसी तेरे आंगन की या पाच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यकर्तीबद्दल 1974 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.


           अभिनेत्री नूतन बहल 

21 फेब्रुवारी 1998 रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी उर्फ ओमप्रकाश यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1919 रोजी झाला होता.

21 फेब्रुवारी 2011 मध्ये अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता.


XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-20-day-of-special-dinvishesh.html
👆
February 20 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 20: दिनविशेष

XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-22-day-of-special-dinvishesh.html
👆
February 22 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 22: दिनविशेष





X
X
View, Comments and share.
......

Post a Comment

2 Comments