February 9 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 9: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस
व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)
9 फेब्रुवारी 1897 रोजी कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे ठाणे या ठिकाणी प्लेगच्या साथीने मृत्यू पावले. त्यांना 1896 मध्ये इंग्रज राज्यकर्त्यांनी रावबहाद्दूर हा किताब ( हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबद्दल) दिला होता. त्यांना भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक असे म्हणतात. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 2005 मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कनेरसर या गावी झाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे ते प्रमुख सहकारी होते 1874 मध्ये ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य बनले. 1880 पासून त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूंचे व्यवस्थापनही केले. त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 रोजी बॉम्बे मिलहँड्स असोसिएशनची स्थापना केली. कामगारांसाठी रविवारच्या सुट्टीसाठी दिलेला लढा 10 जून 1890 पासून अमलात आणल्या गेला. तसेच कामगिरीने कामगारांना त्यांच्या आंदोलनामुळे रविवारची साप्ताहिक सुट्टी, दुपारी कामगारांना अर्धा तास जेवणाची सुट्टी दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंत पगार. इत्यादी मागण्या मान्य करून घेतल्या. त्यांनी मुंबई कामगार संघ स्थापन केला.
X X
9 फेब्रुवारी 1900 रोजी लॉन टेनिस या खेळातील "डेव्हिस कप" या करंडकाची सुरूवात झाली होती.
डेव्हिस कप
9 फेब्रुवारी 1933 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना "श्यामची आई" या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.1930 मध्ये गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचे राण उठविले. संपूर्ण भारतभर त्यात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड गाव मीठ सत्याग्रहात खूप गाजले. त्यात चळवळीत स्त्रियांनीही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या सत्याग्रहाच्या चळवळीत गुरुजींनी झंझावात अधिक स्फूर्तीने केला. इंग्रजांनी पुढाऱ्यांचे अटक सत्र सुरू केले. त्यात साने गुरुजींनाही अटक करण्यात आली व त्यांना धुळे येथील तुरुंगवासात ठेवण्यात आले. या तुरुंगवासात गुरुजींना विनोबा भावे, अण्णासाहेब दास्ताने यांचा सहभास लाभला. विनोबा भावे तर रविवारी गीतेतील एकेक अध्याय तुरुंगात कैद्यांना सांगत असत व गीता प्रवचनेही लिहीत असत. या तुरुंगातून साने गुरुजींना सहा महिन्यांनी नाशिकच्या तुरुंगात हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांनी "श्यामची आई" हे छोट्या मुलांना आवडणारे प्रसिद्ध पुस्तक लिहिले.नाशिक येथे तुरुंगात असताना त्यांनी 'श्यामची आई' ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली. आचार्य अत्रे यांनी त्या कादंबरीवर पुढे चित्रपट काढला व तो राष्ट्रपतिपदकाचा मानकरी ठरला.
9 फेब्रुवारी 1951 रोजी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली. 1947 पर्यंत भारत पारतंत्र्यात होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा जनगणनेचा कार्यक्रम भारत सरकारने सुरू केला.
9 फेब्रुवारी 1969 रोजी भारतातील विमान कंपनीने बोईंग -747 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण केले. हे मान लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे चार इंजिनचे जेट विमान जगातील पहिले रुंद आणि दोन मजली विमान आहे. याचे उत्पादन अमेरिका या देशांमध्ये सियाटल शहराजवळील एवरेस्ट येथे करण्यात आले. हे विमान 1993 मध्ये एक हजार विमान विकल्या गेले कंपनीचे एवढे लोकप्रिय झाले होते की जून 2009 पर्यंत या विमानाची विक्री संख्या 1416 होती. हे विमान जगातील अति वेगवान प्रवासी विमाना पैकी आहे. याची उच्च आश्वानातील क्रुजगती 85 माख म्हणजे ताशी 467 मैल किंवा ताशी 967 किलोमीटर चालते.
बोईंग -747
X X
9 फेब्रुवारी 1971 रोजी भारतातील अवकाश संशोधनात संस्थेतून तयार केलेले “अपोलो 14 मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
9 फेब्रुवारी 1973 रोजी भारतातील ओरिसा राज्याचे माजी मुख्यमंत्री विजू पटनायक हे ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बनले होते.
9 फेब्रुवारी 1975 रोजी रशिया चे सुयोज-17 हे अवकाशयान 29 दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
सुयोज-17
9 फेब्रुवारी 1999 रोजी भारत सरकारने चित्रपट सृष्टीतील भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.
9 फेब्रुवारी 2003 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
9 फेब्रुवारी 2010 रोजी भारतात कृषी विभागाने तयार केलेले बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी घातली होती.
X X
9 फेब्रुवारी 2014 रोजी केंद्र सरकारने वंदेमातरम योजनेची सुरूवात केली. केंद्र सरकारने देशातील मातृ मृत्युदर कमी करण्यासाठी वंदे मातरम योजनेची सुरुवात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुरू केली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पाच हजारांची आर्थिक मदत केली जाते. देशात झालेल्या सर्वेक्षणामध्ये असा खुलासा झाला. की देशातील जवळपास 33 टक्के गर्भवती महिला प्रसुती पूर्व तपासणी करत नाहीत हे याचे मुख्य मातृ मृत्युदराचे कारण आहे. या योजनेचा लाभ जी महिला पहिल्यांदा गर्भवती झाली आहे. तिला दिला जातो अंगणवाडीतून 11 गर्भवती महिलांना पाच हजार रुपये मदत त्यांच्या बँक खात्या ट्रान्सफर केले जाते यासाठी अंगणवाडी केंद्रावर एएनएम द्वारे तपासणी केली जाते पहिल्या महिन्यात दोन हजार रुपये सहाव्या महिन्यात 9000 रुपये असे बँक खात्यामध्ये टाकले जातात.
9 फेब्रुवारी 1404 मध्ये शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म झाला.
9 फेब्रुवारी 1773 रोजी अमेरिकेचे नववे राष्ट्राध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म झाला . त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 841 मध्ये झाला.
9 फेब्रुवारी 1874 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म झाला. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1926 रोजी महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी झाला.
9 फेब्रुवारी 1917 रोजी गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 27 जून 1998 रोजी झाला.
9 फेब्रुवारी 1929 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्याचे 8वे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म आंबेत ता. श्रीवर्धन जि. रायगड येथे झाला. ते केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्र म्हणून सुद्धा त्यांनी मनमोहन सिंग सरकार मध्ये 2006 ते 2009 दरम्यान काम पाहिलेले आहे. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ आणि लंडन या ठिकाणी झाले ते राजकारणामध्ये 1962 पासून आले. 1962 ते 1976 विधानसभेचे सदस्य होते. 1976 ते 1980 दरम्यान राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर जून 1980 ते जानेवारी 1982 या दरम्यान महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांचा मृत्यू 2 डिसेंबर 2014 रोजी मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबई या ठिकाणी झाला.
X X
9 फेब्रुवारी 1899 रोजी भारतीय स्वतंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चाफेकर यांचे निधन झाले.
9 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालमोहन नाटक मंडळाचे संस्थापक दामू अण्णा जोशी यांचे निधन झाले. यांच्या नाटक मंडळींमध्ये सुप्रसिद्ध प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी अनेक नाटकाचे प्रयोग सादर केले होते.
9 फेब्रुवारी 1979 रोजी भारतातील आणि महाराष्ट्रातील मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे उर्फ राजाभाऊ दत्तात्रय परांजपे यांचे निधन महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी झाले. त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 80 पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटासाठी त्यांनी काम केले सचिन पिळगावकर यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून नट म्हणून कारकिर्दीची सुरुवात राजा परांजपे यांनी केली. 1952 मध्ये पेडगावचे शहाणे, 1952 मध्ये लाखाची गोष्ट, 1960 मध्ये जगाच्या पाठीवर असे अनेक सुप्रसिद्ध चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1910 रोजी महाराष्ट्रातील मिरज या ठिकाणी झाला होता.
9 फेब्रुवारी 1981 रोजी भारतातील सुप्रसिद्ध न्यायाधीश मुसंडी राजकारणी आणि भारतीय केंद्रीय मंत्री मंडळातील केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन झाले त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1900 रोजी झाला होता.
9 फेब्रुवारी 1984 रोजी भारतातील दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी बालासरस्वती यांचे निधन झाले. या भारतातील सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिकी होत्या त्यांचा जन्म मद्रास या ठिकाणी झाला. त्यांची आई जयम्मा ही कर्नाटक राज्यातील संगीतातील नामवंत गायिका होती. आणि आजी विनाधनम ही प्रख्यात विनावादक होती. त्यांची पणजी तंजावरच्या राजदरबारात राजनर्तकी होती. त्यांना अनुवंशिक वारसा असल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून कंडप्पा नुट्टवणार या त्यांच्या नृत्य गुरूंच्या हाताखाली त्यांनी शिक्षण पूर्ण केले. अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी नृत्य कौशल्याचा साक्षात्कार केला. 1962 मध्ये अमेरिकेमध्ये कार्यक्रम केले. अंदिंबरो संगीत महोत्सवात 1963 मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. अमेरिकेत अमेरिकन सोसायटी फॉर ईस्टर्न आर्ट्स या संस्थेच्या वतीने सनफ्रान्सिसको येथे भरतनाट्यम नाट्य शिक्षणाचे वासंती वर्ग त्यांनी 1965 मध्ये चालवले होत. त्यांनी "सर्वेन्द्र भूपाळ कुरवजी" नृत्य नाट्याचे नृत्य लेखनही केले होते. त्यांनी व्ही. राघवन यांच्यासोबत भरतनाट्यम हे तामिळ पुस्तक लिहिले आहे. त्या मद्रासंगीत अकादमी नृत्य विद्यालयाच्या संचालिका आहेत. त्यांना 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीचे भारतनाट्यम् साठी पारितोषिक प्रदान करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 1957 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
नृत्यांगना टी बालासरस्वती
9 फेब्रुवारी 2001 रोजी भारतातील सैन्य दलातील माजी हवाई दल प्रमुख, एअरचीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन झाले. ते भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून 1981 ते 1984 या कालखंडात होते. त्यांची नियुक्ती 1944 मध्ये पायलट या स्वरूपामध्ये झाली होती. ते भारताचे ब्राझील या ठिकाणी राजदूत म्हणून 1985 ते 87 या कालखंडामध्ये त्यांनी काम पाहिले. त्यांनी भारत पाकिस्तान युद्ध 1965 1971 मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता "ऑपरेशन लाल दोरा" मध्ये काम केले. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल प्रदान करण्यात आले. तसेच अति विशिष्ट सेवा मेडल वायुसेना मेडल त्यांना प्रदान करण्यात आली.
9 फेब्रुवारी 2018 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजासाठी अहोरात्र झटणारे ज्यांनी समाजासाठी आपला देह पूर्ण वाहून घेतला कुष्ठरोग यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ज्यांनी वरोरा या ठिकाणी आनंदवन उभे केले असे डॉ. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला होता.
https://www.insearchofknowledge.org/2022/12/baba-amte-indian-social-worker-and.html
👆
Open link
Baba Amte: Indian social worker and social activist known particularly for his work for the rehabilitation and empowerment of people suffering from leprosy
बाबा आमटे ऊर्फ डॉ. मुरलीधर देविदास आमटे: थोर समाजसेवक
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-8-day-of-special-dinvishesh.html
👆
February 8 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 8: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-10-day-of-special-dinvishesh.html
👆
February 10 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 10: दिनविशेष
View, Comments and share.....
0 Comments