February 5 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 5: दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
5 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
X X
5 फेब्रुवारी 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला. कारण दौलताबाद किल्ला हा एक महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक मानला जातो या किल्ल्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांना तो भुरळ देखील घालतो. या किल्ल्याचा 750 पायऱ्या चढाव्या लागतात. या किल्ल्याची उंची 2975 फुट इतकी आहे. 1326 मध्ये मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद असे केले. इसवी सन सोळाव्या शतकाच्या आसपास देवगिरी हे शहर उदयास आले व त्यानंतर हा ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला 1187 च्या जवळपास पहिला यादव सम्राट भिल्लमा व्ही याने बांधला. भिलसा येथे असताना अल्लाउद्दीन खिलजीला दक्षिणेतील देवगिरी हे शहर याची माहिती मिळाली की या शहर हे खूप श्रीमंत लोकांचे असून या शहराला जर लुटले तर आपल्याला प्रचंड खजिना मिळेल व त्याचा फायदा आपल्याला दिल्लीच्या तक्तावर बसण्यासाठी होईल. या हेतूने त्याने या किल्ल्यावर आक्रमण केले. त्यावेळी देवगिरीचा राजा रामदेवराय यादव हा राज्य करत होता. त्याचे राज्य गोव्यापर्यंत पसरलेले होते. अल्लाउद्दीन ने 1296 मध्ये देवगिरी किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेला रामदेवरायचा मुलगा शंकरदेवराय यादव हा दक्षिणेत मोहिमेवर गेलेला असताना किल्ल्याला एकच दरवाजा असल्यामुळे किल्ल्यातली रसद पोहोचणे अशक होऊन बसले. त्यामुळे हा किल्ला रामदेवरायांना गमवावा लागला.
देवगिरी
5 फेब्रुवारी 1766 मध्ये माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
5 फेब्रुवारी 1889 मध्ये भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या संस्थेचे नाव "अन्योन्य सहाय्यकारी मंडळी" असे होते. 2013 मध्ये ही बँक रद्द करण्यात आली. कारण आर्थिक गैरव्यवस्थापन आणि कर्ज वसूल करण्यात बँकेची असमर्थता लक्षात आल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने 14 सप्टेंबर 2007 रोजी बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 नुसार बँकेला त्यांचे बहुतांश कामकाज थांबवण्याचे आदेश दिले.
5 फेब्रुवारी 1919 रोजी चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
5 फेब्रुवारी 1922 रोजी रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
5 फेब्रुवारी 1945 रोजी दुसरे महायुद्ध चालू असताना जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
X X
5 फेब्रुवारी 1948 रोजी महात्मा गांधी हत्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
5 फेब्रुवारी 1952 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. भारताची पहिली लोकसभा 1951 च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी अस्तित्वात आली. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव माळवणकर यांनी 8 मे 1952 ते 27 फेब्रुवारी 1956 या कालावधीमध्ये लोकसभा अध्यक्षांचा पदभार सांभाळला.
5 फेब्रुवारी 1953 रोजी म्हणजे आजच्या दिवशी वॉल्ट डिज़्नी यांची पीटर पॅन मूवीचा प्रीमियर ची सुरुवात झाली.
5 फेब्रुवारी 1958 रोजी 7600 पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
हायड्रोजन बॉम्ब
5 फेब्रुवारी 1961 रोजी म्हणजे आजच्या दिवशी संडे “टेलिग्राफ न्यूज” चा पहिला अंक प्रकाशित झाला.
5 फेब्रुवारी 1962 रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
X X
5 फेब्रुवारी 1971 रोजी म्हणजे आजच्या दिवशी अपोलो-14 अंतरीक्ष यान चंद्रावर उतरून अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले. अपोलो -14 ही युनायटेड स्टेट्स अपोलो प्रोग्रॅम मधील आठवी क्रू मिशन होती चंद्रावर उतरणारी तिसरी आणि चंद्राच्या उंच प्रदेशात उतरणारी पहिली मोहीम होती H मिशन पैकी शेवटचे मिशन होत. हे मिशन 1970 मध्ये नियोजित होते. पण आपला या मिशनच्या अडचणीमुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आले. आणि 31 जानेवारी 1971 रोजी नऊ दिवसाच्या मोहिमेला या मिशनच्या सुरुवात झाली. शेपर्ड आणि मिशेल यांनी 5 फेब्रुवारी रोजी फ्रा मोरो फॉर्मेशन मध्ये चंद्रावर उतरले. अपोलो 14 साठी वापरण्यात आलेल्या शनी V ला SA-509 असे नाव देण्यात आले होते.
अपोलो-14
5 फेब्रुवारी 2003 रोजी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
पीएसएलव्ही सी-4
5 फेब्रुवारी 1999 रोजी नेल्सन मंडेला यांनी संसद मध्ये त्यांचे शेवटचे भाषण दिले आणि मे महिन्यात त्यांनी पदाचा त्याग केला.
5 फेब्रुवारी 2004 रोजी महाराष्ट्रातील 'पुण्याची' स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
5 फेब्रुवारी 2007 रोजी सुनिता विल्यम्स हि अंतराळात जास्त वेळ राहणारी पहिली भारतीय महिला बनली. सुनिता विल्यम्स ही अमेरिकन अंतराळवीर आणि माझी युएस नेव्ही अधिकारी म्हणून प्रसिद्ध होती. तिची नासाद्वारे अंतराळवीर म्हणून निवड केली गेली तिने दोन मोहिमेमध्ये अंतराळात 322 दिवस प्रवास केला आणि सर्वकालीन यूएस यादीत सहाव्या क्रमांकावर आणि महिला म्हणून दुसऱ्या क्रमांकावर तिचे स्थान होते. तिने एक्सपेंडिशन -32 फ्लाईट इंजिनियर आणि नंतर एक्सपेंडिशन- 33 चे कमांडर म्हणून तिने काम केले. 16 एप्रिल २००७ रोजी अंतराळात मॅरेथॉन मध्ये धावणारी पहिली व्यक्ती म्हणून तिचा विश्वकर्मा विश्वविक्रम आहे. भारताने तिला 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच नासाने तिला स्पेस फ्लाईट मेडल देऊन सन्मानित केले.
सुनिता विल्यम्स
5 फेब्रुवारी 2010 रोजी म्हणजे आजच्या दिवशी लेफ्टनंट कर्नल अभिनव अपजित बिंद्रा ने नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशिप मध्ये 600 पैकी 596 अंक मिळवून सुवर्ण पदक स्वतःच्या नावावर केले. ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. 2008 मध्ये उन्हाळी ऑलिंपिक आणि 2006 मध्ये आयएसएस जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या दहा मीटर रायफल स्पर्धेसाठी एकाच वेळी जागतिक आणि ऑलिंपिक विजेते पद मिळवणारा तो पहिला भारतीय आहे. अभिनव बिंद्राने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सात पदके प्राप्त केली आणि आशियाई स्पर्धेत तीन पदके त्याने जिंकली. त्याचे पूर्ण शिक्षण चंदिगड येथे झाले. त्याला 2000 मध्ये अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 2001 मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2009 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार पुरस्काराने सन्मान केले आणि 2011 मध्ये अनारारी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेनापदक त्याला प्राप्त झाले.
अभिनव बिंद्रा
5 फेब्रुवारी 2016 ला भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने युट्युब चॅनेल सुरू केले.
X X
5 फेब्रुवारी 1788 मध्ये युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म झाला.
5 फेब्रुवारी 1840 मध्ये वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 ऑक्टोबर 1921 मध्ये झाला.
जॉन बॉईड डनलॉप
5 फेब्रुवारी 1905 मध्ये भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, 1942 च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण एमए अर्थशास्त्र या विषयांमध्ये काशी विद्यापीठांमध्ये शिक्षण पूर्ण केले होते. हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते. अच्युतराव पटवर्धन व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव व जयप्रकाश नारायण यांनी 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली व काही कालावधीनंतर 1947 मध्ये भारतीय समाजवादी पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यांचा मृत्यू पाच ऑगस्ट 1992 मध्ये झाला.
5 फेब्रुवारी 1966 रोजी भारतातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होते.
5 फेब्रुवारी 1914 रोजी मराठी साहित्यातील प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 30 ऑगस्ट 1994 रोजी झाला.
5 फेब्रुवारी 1916 मध्ये भारतातील सुप्रसिद्ध भारतीय कवी जानकी वल्लभ शास्त्री यांचा जन्म झाला.
5 फेब्रुवारी 1919 रोजी भारताचे पहिले मुस्लिम विदेश मंत्री खुर्शीद आलम खान यांचा जन्म झाला.
5 फेब्रुवारी 1933 रोजी भारतातील सुप्रसिद्ध लेखिका आणि कथाकथनकार गिरिजा कीर यांचा जन्म झाला.
5 फेब्रुवारी 1949 रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म झाला.
5 फेब्रुवारी 1920 रोजी आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1867 रोजी झाला होता.
विष्णू नरसिंह जोग
5 फेब्रुवारी 1927 रोजी सुप्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक इजराइत इनायत खान यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 5 जुलै 1882 मध्ये झाला होता.
X X
5 फेब्रुवारी 1919 रोजी भारतातील सुप्रसिद्ध नर्तकी इंद्राणी रहमान यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते.
5 फेब्रुवारी 2003 रोजी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या "हरिजन" या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन झाले.
5 फेब्रुवारी 2008 रोजी भारतातील सुप्रसिद्ध योग गुरु महर्षी महेश योगी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1917 मध्ये झाला होता.
5 फेब्रुवारी 2010 मध्ये भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आणि व निर्माता सुजित कुमार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1934 मध्ये झाला होता.
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-4-day-of-special-dinvishesh-4.html
👆
February 4 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 4: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-6-day-of-special-dinvishesh.html
👆
February 6 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 6: दिनविशेष
X X
View, Comments and share...













1 Comments
Very nice information
ReplyDelete